मुख्य सामग्रीवर वगळा

10 वी विज्ञान भाग -1 शास्त्रीय कारणे द्या.

 

10 वी विज्ञान भाग -1 शास्त्रीय कारणे द्या.

•●┈┉꧁●꧂┉┈●•

      

What's App Group Join Now

~●●○○○○●●~

सोडियम हा धातू कायम केरोसीन मध्ये ठेवतात
 ( अत्यंत क्रियाशील, घनता
 उत्तर:- 
  1.  कक्ष तापमानाला सोडियम Na धातू अत्यंत तीव्रपणे ऑक्सिजनशी O संयोग पावतो. सोडियम धातूची हवेतील ऑक्सिजन, बाष्प H2O(g), कार्बन डाय-ऑक्साइड CO2 बरोबर अत्यंत जलद अभिक्रिया होते व तो पेट घेतो. 
  2.   सोडियमची घनता केरोसीन पेक्षा जास्त आहे त्यामुळे तो त्यात बुडतो.
  3.  केरोसीन बरोबर सोडियमची अभिक्रिया होत नाही. म्हणून सोडियम हा धातू कायम केरोसीन मध्ये ठेवतात.
 ▬▬▬۩۞۩▬▬▬ 

 * हिरवी पडलेली तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंच वापरतात.
 ( प्रथम कॉपर ऑक्साईड , कॉपर कार्बोनेट, आम्ल आम्लारी अभिक्रिय ) 
  1.   तांब्याची दमट हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचे कॉपर ऑक्साईड CuO तयार होते. या कॉपर ऑक्साईड ची हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड बरोबर अभिक्रिया होऊन तांब्यावर कॉपर कार्बोनेट  CuCO3 चा हिरवा थर जमा होतो त्यामुळे तांब्याची चकाकी नाहीशी होते. 
  2.   लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक आम्ल असते , तर चिंचेमध्ये टारटारीक आम्ल असते या आम्लात काॅपर कार्बोनेटचा हिरवा थर विरघळतो, त्यामुळे तांब्याची भांडी स्वच्छ होतात व त्यांना पुन्हा चकाकी प्राप्त होते.  ▬▬▬۩۞۩▬▬▬ 
 * अॅल्यूमिनाच्या विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची आवश्यकता असते.
 ( C +O ---> CO धनाग्र कार्बन चे ऑक्सिडीकरण) 
 उत्तर:-
  1. विद्युत अपघटनात उच्च तापमानाला ॲल्युमिनियम Al धातू ऋणाग्रावर तर नाग्रावर ऑक्सिजन वायू मुक्त होतो. मुक्त झालेल्या ऑक्सीजन वायूची कार्बन धनाग्राशी अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड (CO2) वायू तयार होतो.C +O ---> CO
  2.  धनाग्राचे ऑक्सिडीकरण झाल्यामुळे आकार कमी कमी होत असल्यामुळे तो वेळोवेळी बदलणे गरजेचे असते. 
 ▬▬▬۩۞۩▬▬▬ 

 * पाण्याशी अभिक्रिया होताना कॅल्शियम पाण्यावर तरंगते. 
 ( तीव्रता कमी , उष्णता , पृष्ठभागावर जमा ) 
 उत्तर:-
  1. कॅल्शियमची Ca पाण्याबरोबर अभिक्रिया कमी तीव्रतेने होते, यामुळे बाहेर पडणारा हायड्रोजन H2  वायू उष्णता कमी निर्माण झाल्यामुळे पेट घेत नाही. Ca+2H2O  ---> Ca(OH)2+ H2
  2.   तयार झालेला हायड्रोजन वायू कॅल्शियम धातूच्या पृष्ठभागावर जमा झाल्यामुळे पाण्याशी अभिक्रिया होताना कॅल्शियम पाण्यावर तरंगते.
 ▬▬▬۩۞۩▬▬▬ 

 * साधारणपणे आयनिक संयुगांचे द्रवणांक उच्च असतात. 
 ( तीव्र आकर्षण बल , कठीण, स्थायुरूप ) 
 उत्तर:-
  1. आयनिक संयुगांमध्ये आकर्षणाचे बल तीव्र असते, त्यामुळे आयनिक संयुगे स्थायुरूप असुन कठीण असतात.
  2.   परस्पर विरुद्ध आयनामुळे आंतररेण्वीय आकर्षण बल अधिक असल्याने ते बंध तोडण्यास बरीच ऊर्जा लागते म्हणून आयनिक संयुगांचे द्रवणांक उच्च असतात.
 ▬▬▬۩۞۩▬▬▬ 
 
* ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह उपयोगी पडत नाही.
 (भ्रमणकक्षा, एकच दिशा, आवर्तकाल ,एकाच ठिकाणासमोर स्थिर) 
 उत्तर:- 
  1. भूस्थिर उपग्रहांची भ्रमणकक्षा ही विषुववृत्ताच्या प्रतलात असते. पृथ्वीची दररोजची परिवलन गती आणि उपग्रहांची भ्रमणगती यांची दिशा एकच असते. तसेच उपग्रहांच्या भ्रमणगतीचा आवर्तकाल हा पृथ्वीच्या दैनिक परिवलन गतीच्या आवर्तकाला एवढा असतो. यामुळे त्यांची समोरासमोरील सापेक्ष स्थिती ही स्थिर राहते. 
  2.  भूस्थिर उपग्रह हे कधीही ध्रुवीय प्रदेशावरून जात नाही तर, विषुववृत्तावरील एकाच ठिकाणासमोर स्थिर राहतात त्यामुळे ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह उपयोगी पडत नाही.
 ▬▬▬۩۞۩▬▬▬

 * कार्बनच्या अंगी अगणित संयुगे तयार करण्याचा गुणधर्म आहे
 (चतु:संयुजी, मालिका बंधन, समघटकता ) 
 उत्तर:- 
  1. कार्बन चतु:संयुजी मूलद्रव्य आहे. त्यामुळे एक कार्बन आणि इतर चार कार्बन अणू बरोबर किंवा इतर अणु मूलद्रव्या बरोबर संयोग पावून अनेक संयुगे तयार करु शकतो. 
  2.  कार्बनचा मालिका बंधन ह्या गुणधर्मामुळे तो अगणित संयुगे तयार करू शकतो. मालिका बंधन या अद्वितीय गुणधर्मामुळे कार्बन मोठे रेणू तयार करतो. 
  3.  एकेरी, दुहेरी, तिहेरी बंध तयार करण्याच्या गुणधर्मामुळे संयुगांच्या संख्येत भर पडते.
  4.   समघटकता या गुणधर्मामुळे संयुगात आणखीन वाढ होते. ब्युटेन व आयसो ब्युटेन.
 ▬▬▬۩۞۩▬▬▬ 

 * एथिलीन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहे.
(व्याख्या, दुहेरी बंध, ) 
 उत्तर :- 
  1.  ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन-कार्बन दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणतात. एथिलीन हे हायड्रोकार्बन असुन यात कार्बन-कार्बन दुहेरी बंद आहे. 
  2.  ऎथिलीन मध्ये दोन्ही कार्बनच्या चारही संयुजा एकेरी सहसंयुज बंधाने संपृक्त झालेल्या नाहीत. म्हणून एथिलीन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहे.
  3. ऎथिलीन मध्ये दोन्ही कार्बनच्या चारही संयुजा एकेरी सहसंयुज बंधाने संपृक्त झालेल्या नाहीत. म्हणून एथिलीन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहे.
     

    ❅•~~  🎷~~•❅       

    ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जातं. परंतू एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...

12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.

12  वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल २०२६ संदर्भात मोठी अपडेट! डिजीलॉकरवर रिझल्ट लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत  बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होतो. निकाल ऑनलाइन कसा तपासायचा? निकाल जाहीर झाल्यावर  विद्यार्थी खालील 👇 अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.... 👉   🌈    mahahsscboard.in १. mahresult.nic.in २.  hscresult.mkcl.org ३.  results.digilocker.gov.in ४.  mahahsscboard.in निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव. स्ट्रीम वाईज निकाल (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञ...