कार्बनी संयुगे- रासायनिक अभिक्रिया 1.1
🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴
●┈┉꧁●꧂┉┈●
कोणत्याही इंधनाचे ज्वलन केले असता त्या इंधनाची ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया होते या क्रियेत कार्बन डाय-ऑक्साइड, पाणी, उष्णता व प्रकाश तयार होतात.
●~~•❅••❅•~~●
- मिथेन वायू हवेत जाळला.
CH4 + 2O2 ----- > CO2 + 2H2O + उष्णता व प्रकाश
मिथेन वायू हवेत जाळला असता कार्बन डायऑक्साईड, पाणी तयार होऊन या क्रियेत उष्णता व प्रकाश तयार होते.
•─────●────━•
- इथेनॉलचे हवेत ज्वलन केले
CH3 -CH2 -OH + 3O2 -----
> 2CO2 + 3H2O + उष्णता
व प्रकाश
इथेनॉलचे हवेत ज्वलन केले असता कार्बन डायऑक्साईड, पाणी तयार होऊन या क्रियेत उष्णता व प्रकाश तयार होते.
•─────●────━•
- प्रोपेन वायू हवेत जाळला
C3H8 + 5O2 ----- > 3CO2
+ 4H2O + उष्णता
व प्रकाश
प्रोपेन वायू हवेत जाळला असता कार्बन डायऑक्साईड, पाणी तयार होऊन या क्रियेत उष्णता व प्रकाश तयार होते.
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
ईथेनॉइक ॲसिडची सोडिअम कार्बोनेट या आम्लारिधर्मी क्षाराबरोबर अभिक्रिया केली.
ईथेनॉइक ॲसिडची सोडिअम कार्बोनेट या आम्लारिधर्मी क्षाराबरोबर अभिक्रिया होऊन सोडिअम ईथेनॉएट हा क्षार, पाणी व कार्बन डायऑक्साइड वायूतयार होतात.
- इथेनॉल मध्ये जलीय पोटॅशियम परमॅग्नेट टाकले
CH3 - CH2 – OH + KMnO4 ----- > CH3 – C=O - OH
इथेनॉल मध्ये जलीय पोटॅशियम परमॅग्नेट टाकले असता इथेनॉलचे ऑक्सिडीकरण होऊन इथेनॉईक ॲसिड मध्ये रूपांतर होते.
( ईथेनॉलमध्ये पोटॅशिअम परमँगनेट थेंबा-थेंबाने मिळवणे सुरू केल्यावर ऑक्सिडीकरणाच्या अभिक्रियेत वापरले गेल्याने पोटॅशिअम परमँगनेटचा गुलाबी रंग नाहीसा होतो. मिळवणीचा एका टप्प्यावर परीक्षानळीतील सर्व ईथेनॉलचे ऑक्सीडीकरण पूर्ण होते. त्यानंतर पोटॅशिअम परमँगनेटची मिळवणी चालू ठेवल्यास त्याचा वापर न झाल्यामुळे ते अतिरिक्त होते. या अतिरिक्त पोटॅशिअम परमँगनेटचा गुलाबी रंग नाहीसा न होता नंतर कायम राहतो.)
•─────●────━•
- 🔴मीथेनची क्लोरीनीभवन अभिक्रिया.
सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात संपृक्त हायड्रोकार्बनची क्लोरीनबरोबर जलद अभिक्रिया होते. या अभिक्रियेत एकेक करून संपृक्त हायड्रोकार्बनमधील सर्वहायड्रोजन अणूंची जागा क्लोरिन अणू घेतात. जेव्हा अभिकारकामधील एका प्रकारच्या अणूची / अणुगटाची जागा दुसऱ्या प्रकारचा अणू / अणुगट घेतो तेव्हा त्या अभिक्रियेला प्रतियोजन अभिक्रिया म्हणतात.
मीथेनच्या क्लोरीनीभवन ह्या प्रतियोजन अभिक्रियेने चार उत्पादिते मिळतात.
- सूर्यप्रकाशात क्लोरीन वायूची मिथेन बरोबर अभिक्रिया झाल्यावर क्लोरोमिथेन तयार होते.
CH 4 + Cl2----- > CH 3 -
Cl + HCl
क्लोरोमिथेन ची सूर्यप्रकाशात क्लोरीन बरोबर रासायनिक अभिक्रिया झाल्यावर डायक्लोरोमिथेन तयार होते.
CH 3 Cl+
Cl 2 ----- > CH 2 Cl 2 + HCl
डायक्लोरोमिथेन ची सूर्यप्रकाशात क्लोरीन बरोबर अभिक्रिया झाल्यावर ट्रायक्लोरोमिथेन तयार होतो.
CH 2 Cl2 + Cl 2----- >
CHCl 3 + HCl
ट्रायक्लोरोमिथेन ची सूर्यप्रकाशात क्लोरीन वायू बरोबर अभिक्रिया झाल्यावर टेट्राक्लोरो मिथेन तयार होते.
CHCl 3 + Cl2 ----- > CCl 4
+ HCl
मीथेनची क्लोरीनीभवन हि प्रतियोजन अभिक्रिया होऊन चार उत्पादिते मिळतात.
प्रथम- मिथेनचे क्लोरोमेथेन,
द्वितीय- क्लोरोमेथीनचे डायक्लोरोमिथेन,
तृतीय- डायक्लोरो मिथेनचे ट्राय क्लोरो मिथेन,
चतुर्थ- ट्रायक्लोरो मिथेनचे टेट्रा क्लोरो मिथेन मध्ये रूपांतर होते.
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
ईथेनॉलची सोडिअम बरोबर अभिक्रिया
सर्व अल्कोहोलांची सोडिअम धातूबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू बाहेर पडतो व सोडिअमचे अल्कॉक्साइड क्षार तयार होतात.
●~~•❅••❅•~~●
- ईथेनॉलच्या सोडिअम धातूबरोबरील अभिक्रिया.
2Na + 2CH3 -CH2 -OH ---- > 2CH3 -CH2 -ONa + H2
ईथेनॉलच्या सोडिअम धातूबरोबरील अभिक्रियेत हायड्रोजन वायू व सोडिअम ईथॉक्साइड ही उत्पादिते तयार होतात.
•─────●────━•
- अतिरिक्त संहत सल्फ्यूरिक ॲसिडबरोबर ईथेनॉल तापवले
CH3 -CH2 -OH----- > CH2 =CH2 + H2O
अतिरिक्त संहत सल्फ्यूरिक ॲसिडबरोबर 170 °C तापमानाला ईथेनॉल तापवले असता त्याच्या एका रेणूमधून पाण्याचा एक रेणू बाहेर काढला जाऊन एथीन हे असंपृक्त संयुग तयार होते.
•─────●────━•
🔴ईथेनॉइक ॲसिडची आम्लारिबरोबर अभिक्रिया
- ईथेनॉइक ॲसिडची सोडिअम हायड्रॉक्साइड या तीव्र आम्लारीबरोबरअभिक्रिया केली .
CH3-COOH + NaOH ----- > CH3-COONa + H2 O
ईथेनॉइक ॲसिडची सोडिअम हायड्रॉक्साइड या तीव्र आम्लारीबरोबर अभिक्रिया केली असता उदासिनीकरण अभिक्रिया होऊन सोडिअम ईथॉक्साइड चा क्षार व पाणी तयार होतात
•─────●────━•
- ईथेनॉइक ॲसिडची सोडिअम कार्बोनेट या आम्लारिधर्मी क्षाराबरोबर अभिक्रिया केली.
2CH3COOH (aq) + NaCO3 (aq) -----
> CH3COONa (aq) + H2O (l) + CO2 (g)
ईथेनॉइक ॲसिडची सोडिअम कार्बोनेट या आम्लारिधर्मी क्षाराबरोबर अभिक्रिया होऊन सोडिअम ईथेनॉएट हा क्षार, पाणी व कार्बन डायऑक्साइड वायूतयार होतात.
•─────●────━•
ईथेनॉइक ॲसिडची सोडिअम बयकार्बोनेट या आम्लारिधर्मी क्षाराबरोबर अभिक्रिया केली सोडिअम ईथेनॉएट हा क्षार, पाणी व कार्बन डायऑक्साइड वायूतयार होतात.
•─────●────━•
- ॲसिड उत्प्रेरकाच्या उपस्थितीत ईथेनॉईक ॲसिडची ईथेनॉलशी अभिक्रिया केली.
CH3 -COOH + CH3 -CH2 -OH -----
> CH3 -COO-CH 2 -CH3 + H2O
ॲसिड उत्प्रेरकाच्या उपस्थितीत ईथेनॉईक ॲसिड ईथेनॉलशी अभिक्रिया पावते व एथिल ईथेनॉएट हा ईस्टर तयार होतो.
•─────●────━•
यशाचं रहस्य 🎷
एका अब्जाधीश उद्योजकाची मुलाखत घेताना महिला पत्रकाराने प्रश्न विचारला? "सर, तुम्ही आज हजारो कोटींचे मालक आहात. तुमच्या यशाचं रहस्य काय?"
त्यावर त्या उद्योजकाने जवळील एक कोरा चेक काढून त्या पत्रकाराला दिला आणि सांगितलं, "तुम्हाला हवी तेवढी रक्कम त्यावर लिहा."
अचंबित होऊन ती पत्रकार म्हणाली, “सर, माझा प्रश्न तुम्हाला समजला नाही का? मी विचारलं, तुमच्या यशाचं रहस्य काय?”
त्यावर त्या उद्योजकाने पुन्हा तो चेक त्या
पत्रकार महिलेला दिला, पण तिने तो घ्यायला पुन्हा नकार दिला.
यावर उद्योजकाने तो चेक फाडून फेकून दिला आणि तिला म्हणाला; "माझ्या यशाचं रहस्य हेच आहे की; मी कुठलीही संधी सोडत नाही, जशी तुम्ही आत्ता सोडली. जर तुम्ही हा चेक भरला असता, तर कदाचित तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत महिला पत्रकार बनल्या असता."
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा