'भटकंती' माहितीची 🎷
❁!!**!!❁☆❁۞!!**!!۞❁
What's App Group
Join Now
✈️ प्रश्न: भारतातील सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत?
उत्तर - राष्ट्रपती.
❁!!**!!❁☆❁۞!!**!!۞❁
🥚 संपूर्ण भारतात अंडा निर्यातीत कोणते राज्य अग्रेसर आहे?
उत्तर:-
- अंडा निर्यातील आंध्र प्रदेशचा नंबर हा प्रथम लागतो.
- अंडा निर्यातीत दुसऱ्या स्थानावर तामिळनाडू राज्याचा क्रमांक आहे.
- तिसरे स्थान हे तेलंगानाचे आहे.
- चौथ्या स्थानावर पश्चिम बंगाल.
- पाचव्या स्थानावर कर्नाटक.
- महाराष्ट्राचे स्थान हे सातव्या क्रमांकावर येते.
🔡 चिकटवणे की चिटकवणे? योग्य शब्द कोणता?
उत्तर:- योग्य शब्द आहे चिकटवणे.
चिकट पासून ‘चिकटवणे’.
❁!!**!!❁☆❁۞!!**!!۞❁
🤢 इन्सुलिन कोणत्या रोगाच्या उपचारात वापरले जाते?
उत्तर - मधुमेह.
❁!!**!!❁☆❁۞!!**!!۞❁
👁️ प्रश्न: रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो?
उत्तर - व्हिटॅमिन " ए " च्या कमतरतेमुळे, रातांधळेपणा (रात्री दिसण्यात अडचण) होतो. रातांधळेपणात डोळ्याच्या पांढऱ्या भागात डाग आणि कॉर्निया कोरडा होऊ लागतो.
❁!!**!!❁☆❁۞!!**!!۞❁
📝 कागदाचा शोध कोणत्या देशात लागला?
उत्तर : कागदाचा शोध चीनमध्ये लागला.
❁!!**!!❁☆❁۞!!**!!۞❁
प्रश्न - बिहू हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे?
उत्तर - आसाम.
❁!!**!!❁☆❁۞!!**!!۞❁
🍓 असे कोणते फळ आहे ज्याच्या बिया फळाच्या बाहेर असतात?
उत्तर 4 - स्ट्रॉबेरी फळ. बिया त्या फळाच्या बाहेर आहेत.
The "seeds" on the outside of the strawberry are not actually seeds but ovaries called achenes that contain a separate fruit with a single seed inside it.
❁!!**!!❁☆❁۞!!**!!۞❁
👀 मानवी डोळ्यापेक्षा अत्यंत तेज डोळे असलेले सजीव?
उत्तर:- फाल्कन / बहिरी ससाणा बाज़/ , Hawk , घुबड / उल्लू, चील / Eagle 🦅, मैंटिस श्रिम्प समुद्रातील जीव, या सजीवांच्या डोळ्याची क्षमता मानवी डोळ्यापेक्षा जास्त आहे.
❁!!**!!❁☆❁۞!!**!!۞❁
😴 आपण डोळे बंद करून का झोपतो? डोळे उघडे ठेवून का झोपत नाहीत?
उत्तर:- मानवी शरीराची रचनाच अशी आहे की आपण झोपताना डोळे बंद करतोत.
मेलाटोनिन हा हार्मोन आपला मेंदू अंधाराच्या प्रतिसादात तयार करतो. डोळे बंद करताच मेलाटोनिन हार्मोन/ संप्रेरक स्त्रवले जाते. मेलाटोनिन संप्रेरकामुळे आपणास आनंदही वाटतो.
❁!!**!!❁☆❁۞!!**!!۞❁
🐍 प्रश्न उत्तराच्या ऐवजी थोडी माहिती सापाची.
जगात अंदाजे 3000 साप आहेत व त्यातील 600 हे विषारी आहेत.
काही साप हवेत उडू शकतात.(Chrysopelea paradisi/ paradise tree snake,)
उत्क्रांतीच्या प्रक्रियेत सापांनी त्यांचे पाय गमावले.
सापांना बाह्य कर्ण, व डोळ्यावर पापण्या नसतात.
रेप्टिलिया/ सरीसृप म्हणजे सरपटणारे प्राणी आहेत.
सापाच्या राजाला किंग कोब्रा असे म्हणतात. मादा किंग कोब्रा साप एक मात्र असा आहे जो पिलांसाठी घरटे तयार करते.
❁!!**!!❁☆❁۞!!**!!۞❁
🦘 पृथ्वीवर कोणते प्राणी उडी मारू शकत नाहीत?
उत्तर:- स्लॉथ, कासव, हत्ती, हिप्पो, पोर्क्युपिन, हे प्राणी उडी मारू शकत नाही.
(Pumpkin toadlets उडी मारू शकतात पण crash landing करतात.)
❁!!**!!❁☆❁۞!!**!!۞❁
🎷स्लॉथ बद्दल थोडीशी माहिती.
जगातील सर्वात आळशी प्राणी. तो त्याच्या आयुष्यातील बराच कालावधी झाडावर लटकन्यात घालवतो. एकदा तो झाडावर चढला की झाडाला चिकटून राहतो. स्लॉथ यांचे चयापचय मंद असते.
❁!!**!!❁☆❁۞!!**!!۞❁
🤔 हनुवटी असलेला प्राणी कोणता?
उत्तर मानव हा एकमेव प्राणी आहे ज्याला हनुवटी आहे.
❁!!**!!❁☆❁۞!!**!!۞❁
🌌 आपल्या आकाशगंगेचे नाव काय?
उत्तर:- सूर्य, पृथ्वी आणि इतर सर्व ग्रह हे मिल्की वे गॅलेक्सि (Milky Way Galaxy) या आकाशगंगेत आहेत.
❁!!**!!❁☆❁۞!!**!!۞❁
🌞 आपल्या सूर्यामध्ये किती पृथ्वी सामावू शकतात?
सूर्यामध्ये दहा लाखांहून अधिक पृथ्वी सामावू शकतात.
❁!!**!!❁☆❁۞!!**!!۞❁
🌅 सूर्याच्या अंतर्भागातील तापमान किती असू शकते?
सूर्याच्या आत तापमान १५ दशलक्ष डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.
❁!!**!!❁☆❁۞!!**!!۞❁
👃 Pinocchio effect म्हणजे काय?
उत्तर:- आपण जेव्हा खोटे बोलतो तेव्हा आपल्या नाकाचे तपमान वाढते किंवा जो भौतिक बदल (डोळ्याचे ऑर्बिटल स्नायू प्रसरण पाळतात) यास Pinocchio effect म्हणतात.
*
प्रगतीच्या या दुनियेत आपण इतके पुढे निघून गेलो आहोत की...!!*
*हातात पकडलेल्या मोबाइलची किंमत...!!*
*बाजूला बसलेल्या माणसांपेक्षा जास्त झालीय...!!*
*आपला दिवस आनंदी जावो.*
श्री 🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा