मुख्य सामग्रीवर वगळा

8 वी, विज्ञान, धाराविद्युत आणि चुंबकत्व

 

8 वी, विज्ञान, धाराविद्युत आणि चुंबकत्व

▬▬▬۩۞۩▬▬▬

विज्ञान विषयाचा दररोज थोडा थोडा अभ्यास करण्यासाठी खालील "माहिती विज्ञानाची" या What's App समूहात सामील व्हावे🙏


What's App Group Join Now

 ▬▬▬۩۞۩▬▬▬


⚛️  अणुमध्ये कोणकोणते घटक असतात?

उत्तर:- अणुमध्ये धनप्रभारित प्रोटॉन, प्रभार रहित न्यूट्रॉन आणि ऋण प्रभारीत इलेक्ट्रॉन हे कण असतात.

(Quarks, Gluons, Photons, Neutrinos & More than 200 subatomic particles have been detected—most of them highly unstable, existing for less than a millionth of a second—as a result of collisions produced in cosmic ray reactions or particle accelerator experiments.)

(+)(+)(+)(+)(+)

🌾  काचेची कांडी रेशमी कापडावर घासल्यावर काय होते? 

उत्तर:- काचेची कांडी रेशमी कापडावर घासल्यावर काचेच्या कांडीवर धनप्रभार आणि रेशमी वस्त्रावर ऋण पभार निर्माण होतो.

/-/-/-/-/-/-/

🔋वस्तू प्रभारित कशा होतात? 

उत्तर:- जेव्हा दोन योग्य पदार्थ एकमेकांवर घासल्या जातात तेव्हा एका पदार्थातून इलेक्ट्रॉन दुसऱ्या पदार्थाकडे जातात व वस्तू/ पदार्थ प्रभारीत होतात.

+-:+-:+-:+-:+-:+

👋 स्थिर आणि चल प्रभार कशाला म्हणतात

उत्तर:- 

अचल प्रभारास स्थिर प्रभार म्हणतात.

गतिमान प्रभारास चल प्रभार म्हणतात.

"-+-"-+-"-+-"

➖  ऋण प्रभार प्रवाहित करता येतात का

उत्तर:-

 विभवांतर प्रयुक्त करून ऋण प्रभार प्रवाहित करता येतात. 

🎸 धारा विद्युत कशी मिळते

एखाद्या सुवाहकातील इलेक्ट्रॉन्स ना जर गती देऊन वाहते केले तर आपल्याला धाराविद्युत मिळते.

🚈. विद्युतस्थितिक विभव:

विद्युतप्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या विद्युत पातळीस विद्युतस्थितिक विभव असे म्हणतात.

^°^•°^•°^•°^•°^•°^

🌪️ विभवांतर 

दोन बिंदूंच्या विभवामधील फरक म्हणजे विभवांतर. 

* विभवांतराचे SI पद्धतीत एकक होल्ट हे आहे.

🖱️ विद्युतप्रवाहाचे SI एकक अँपिअर आहे.

^`^`^`^`^`^`^`^

➡️. विद्युतप्रवाह ही अदिश राशी आहे.

×°×°×°×°×°×

 🏄  विविध विद्युतघटांचे मुख्य कार्य विद्युत घटाच्या दोन टोकांमधील विभवांतर कायम राखणे हे होय.

|~|~|~|~|~|~|


🔦  कोरडा विद्युत घट 

  1. कोरड्या विद्युत घटात जस्त (Zn) धातूचे आवरण हे घटाचे ॠण टोक आहे.
  2. कोरड्या विद्युत घटातील विद्युत अपघटनी म्हणजे ZnCl2 (झिंक क्लोराईड) आणि NH4Cl (अमोनिअम क्लोराईड) यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो. 
  3. कोरड्या विद्युत घटाच्या मध्यभागी एक ग्राफाइट कांडी असते. हे घटाचे धन टोक असते. 
  4. ग्राफाइट कांडीच्या बाहेरील भागात MnO2 (मँगनीज डायॉक्साइड) ची पेस्ट भरलेली असते.
  5. कोरडे विद्युतघट वापरायला सोयीचे असतात कारण ते उभे, आडवे, तिरपे, कसेही ठेवता येतात व चल/गतिमान साधनांमध्येही सहजपणे वापरता येतात.

_#_#_#_#_#_#_#_


📢  लेड-आम्ल विद्युतघट (Lead-Acid Cell)

  1. लेड-आम्ल विद्युतघट ह्या प्रकारचे घट विद्युतविमोचन (Elec￾trical discharge) झाल्यानंतर पुन्हा विद्युत प्रभारित करता येतात
  2. लेड-आम्ल विद्युतघटात शिश्याचे (Pb) एक विद्युत अग्र (electrode) व लेड डायऑक्साइड (PbO2) चे दुसरे विद्युतअग्र (electrode) विरल सल्फ्युरिक आम्लात बुडविलेले असते.
  3.  PbO2 या विद्युत अग्रावर धन प्रभार, तर Pb ह्या विद्युत अग्रावर ॠणप्रभार असतो. 
  4. लेड-आम्ल विद्युतघटा मधील विभवांतर सुमारे 2V इतके असते.
  5. मोठा विद्युतप्रवाह पुरविण्याची क्षमतेमुळे मोटारी, ट्रक, मोटारसायकली, अखंड विद्युतशक्ती पुरवठायंत्रे (UPS), यांमध्ये लेड-आम्ल विद्युतघट वापरले जातात.

$°$°$°$°$°$°$

🏹  निकेल-कॅडमिअम घट (Ni-Cd cell)

  1.  निकेल-कॅडमिअम घट हे घट 1.2 V विभवांतर देतात.
  2. पुन्हा प्रभारित करता येतात.

¢^¢^¢^¢^¢^¢^¢

विद्युत परिपथ (Electric Circuit)

विद्युतघटाच्या दोन्ही अग्रभागांना जोडलेल्या वाहक तारा, विद्युतदिवा, कळ आणि इतर रोध यामधून वाहणाऱ्या विद्युतधारेचा सलग मार्ग म्हणजेच 'विद्युत परिपथ' होय.

@-@-@-@-@-@

लिथिअम (Li) आयन विद्युत घट:-

  1. वापर:- लिथिअम (Li) आयन विद्युत घट आधुनिक साधनांमध्ये वापरले जातात, उदाहरणार्थ स्मार्टफोन, लॅपटॉप, इत्यादी.
  2. हे घट पुनःप्रभारित करता येतात
  3. ह्यामध्ये Ni-Cd घटांपेक्षा अधिक विद्युत ऊर्जा साठविली जाते.

*-_- *-_-*- _- *-_-*-_-*-_-*

तारेतून विद्युतप्रवाह गेल्यास चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. 

हान्स ख्रिस्तिअन ओरस्टेड या वैज्ञानिकाने असे निरीक्षण प्रथम नोंदविले.

 एखाद्या तारेतून विद्युतप्रवाह गेल्यास त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. 

®™®™®™®™®™®™®

विज्ञान संशोधनात उपयोगी तीव्र चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी विद्युत चुंबक वापरले जातात.

=%=%=%=%=%=

विद्युतघंटा कार्य:-

विद्युत घंटेचे कार्य विद्युत चुंबकावर आधारित आहे. तांब्याची तार एका लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते. हे कुंतल विद्युतचुंबक म्हणून कार्य करते. एक लोखंडी पट्टी टोलासहित विद्युतचुंबकाजवळ बसवलेली असते. ह्या पट्टीच्या संपर्कात संपर्क स्क्रू असतो. विद्युत परिपथ आकृती मध्ये दाखविल्याप्रमाणे जोडलेला असतो.

 स्क्रू पट्टीला संपर्कात असताना परिपथातून विद्युतप्रवाह वाहतो व त्यामुळे कुंतलाचा विद्युतचुंबक होतो व तो लोखंडी पट्टीला खेचून घेतो. त्यामुळे घंटेवर टोला आदळून नाद होतो. मात्र त्याच वेळी संपर्क स्क्रूचा लोखंडी पट्टीशी संपर्क तुटतो आणि परिपथातील विद्युतप्रवाह खंडित होतो. अशा स्थितीत विद्युतचुंबकाचे चुंबकत्व नाहिसे होते व लोखंडी पट्टी पुन्हा मागे येऊन संपर्क स्क्रूला चिकटते. त्यामुळे लगेच पुन्हा विद्युतप्रवाह सुरू होतो व पुन्हा वरील क्रियेने टोला घंटेवर आदळतो. ही क्रिया वारंवार होते आणि घंटा खणाणते.

➖➖➖➖➖➖

*कोणी माझ्या सोबत कसं राहावं हे मी ठरवू शकतं नाही 

पण मी प्रत्येकाशी कसं वागू शकतो

 मात्र हे माझ्या हातात आहे 

मग कशाला कोणाचं एवढं टेन्शन घ्यायचं आपलं आयुष्य आहे

आपण निवांत जगायचं नाही 

म्हटलं तरी टेन्शन प्रत्येकाला असते

 पण ते हसून स्वीकारायचे की

 रडून ते मात्र आपल्यावर असते!

 आपका हर दिन मंगलमय और सुखमय हो🎷

💫💫💫 💫💫💫


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

Top 10,10 वी विज्ञान 1, विद्युतधारेचे परिणाम...🎷

 Top 10,10 वी विज्ञान 1, विद्युतधारेचे परिणाम...🎷 ▬▬▬۩۞۩▬▬▬ विज्ञान विषयाचा दररोज थोडा थोडा अभ्यास करण्यासाठी खालील "माहिती विज्ञानाची" या What's App समूहात सामील व्हावे.🙏 What's App Group Join Now ▬▬▬۩۞۩▬▬▬ Interesting Coincidence:🎇 Today is ...........               *Week End*                *Month End* Tomorrow will be. *Year End* *🏵️*  *🏵️* *🏵️* या पाठावर आधारित MCQ परीक्षा👇 *╭✺༺☬༒☬༻✺╮* * पदार्थ विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवतो? उत्तर:- a. सोने Au, चांदी Ag, तांबे Cu,  अल्युमिनियम Al या धातूंची रोधकता खूप कमी असते व  धातूंच्या आणूच्या शेवटच्या कक्षेत  मुक्त इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे धातूंना विद्युत सुवाहक म्हणतात. b. रबर, काच , लाकूड व प्लॅस्टिक पदार्थाची रोधकता खूप जास्त असते व त्यांच्याकडे मुक्त इलेक्ट्रॉन नसतात, म्हणून या पदार्थांना विद्युत दुर्वाहक म्हणतात. ━━━━✧❂✧━━━━ * विद्युतशक्ती म्हणजे काय? एकक कालावधीत घडून ...

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.             __[♡!!...🥀⛓️...!!♡]__ दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या  व्हाट्सॲप  ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे . What's app link 👇 --> 🔴  माहिती विज्ञानाची 🎷  🔴          :⋯ ◯ ⋯ : 🏈  ग्रुप वर जॉईन का व्हावे ? याचे कारण.... आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू. शिक्षक होण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरील CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) किंवा राज्यस्तरीय TET ( शिक्षक पात्रता परीक्षा ) उत्तीर्ण करावी लागते, जी तुम्हाला शिक्षक म्हणून पात्र करते.  कोणत्याही स्पर्धा परीक्षे त विज्ञान विषय हा असतोच.याची तयारी दररोज थोडी थोडी आपल्या विज्ञान लेखातून नक्की होईल. दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो. एखाद्या...