मुख्य सामग्रीवर वगळा

इयत्ता 8 वी, 3. बल व दाब.1


 इयत्ता 8 वी, 3. बल व दाब.1 

▬▬▬۩۞۩▬▬▬

 विज्ञान विषयाचा दररोज थोडा थोडा अभ्यास करण्यासाठी खालील "माहिती विज्ञानाची" या What's App समूहात सामील व्हावे🙏

  What's App Group Join Now

▬▬▬۩۞۩▬▬▬


🪠  बल म्हणजे काय? 

स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी, गतिमान वस्तूला स्थिर करण्यासाठी, वस्तूच्या वेगात व वस्तूच्या चालीत बदल करण्यासाठी तसेच वस्तूचे आकारमान व आकार यात योग्य बदल करण्यासाठी ज्या भौतिक राशीचे आवश्यकता असते त्यास बल असे म्हणतात.

किंवा

स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा सरळ रेषेतील वस्तूची गती बदलण्यासाठी आवश्यक असलेल्या भौतिक राशीला बल असे म्हणतात.

####&&&####

👏  संपर्क बल:-

वस्तूंच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे जे बल पयुक्त होते त्या संपर्क बल असे म्हणतात.

असंपर्क बल:-

दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरीही त्या दोन वस्तूंमध्ये जे बल प्रयुक्त होताना दिसते अशा बलास असंपर्क बल म्हणतात.

उदा

1. झाडावरून खाली पडणारे फळ.(गुरुत्वीय बल)

2. लोहचुंबकाकडे टाचण्या आकर्षिले जाणे.(चुंबकीय बल)

3. प्रभारीत काव्याकडे कागदाचे तुकडे आकर्षिले जाणे.(स्थितिक विद्युत बल) 

@@@---@@@ 

🎉.   संतुलित बल:

जेव्हा एखाद्या वस्तूवर क्रिया करणाऱ्या दोन शक्तींचे परिमाण समान असतात परंतु दिशेने विरुद्ध असतात, तेव्हा बलांना संतुलित बल म्हणतात.

,,,,,_____,,,,,

💤  असंतुलित बल:-

जेव्हा वस्तूवर कार्य करणाऱ्या दोन किंवा अधिक शक्ती समान नसतात, परिणामी निव्वळ बल निर्माण होते ज्यामुळे वस्तूच्या हालचालीत बदल होतो त्यास असंतुलित बल म्हणतात. 

++++----++++

🪨  जडत्‍व:-

वस्‍तू गतीच्‍या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्‍याच्‍या प्रवृत्‍तीला त्‍याचे जडत्‍व असे म्हणतात. 

-----+++----

🏋️  जडत्वाचे तीन प्रकार

1. विराम अवस्थेतील जडत्व:-

वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही, त्यास विराम अवस्थेचे जडत्व म्हणतात. उदा. बस अचानक थांबल्यास प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात.

2. गतीचे जडत्व:- वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही, त्यास गतीचे जडत्व म्हणतात.

उदा. फिरणारा विजेचा पंखा बंद

केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो.

3. दिशेचे जडत्व:-  वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा

बदलू शकत नाही, यास दिशेचे जडत्व म्हणतात.

उदा. वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक उजवीकडे वळण घेतल्यास प्रवासी विरुद्‍ध दिशेला म्हणजे डावीकडे फेकले जातात.

▬▬▬۩۞۩▬▬▬

🎷 दाब:-

एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्‍त असणाऱ्या बलास दाब (Pressure) असे म्‍हणतात.

P (पास्कल) = F(न्यूटन) / A(मीटर^ 2)

दाब = बल / एकक क्षेत्रफळावर कार्य करणारे बल.

बलाचे SI पद्‍धतीत एकक न्यूटन Newton (N) आहे. 

क्षेत्रफळाचे SI पद्‍धतीत एकक m^2 किंवा चौरस मीटर आहे.

*  दाबाचे एकक-  N/m^2 यालाच पास्‍कल (Pa) असे म्‍हणतात. 

हवामानशास्‍त्रात दाबाचे एकक bar हे आहे.

1 bar = 10^ 5 Pa

दाब ही अदिश राशी आहे.

*  क्षेत्रफळ वाढले की त्‍याच बलाला दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झाले की त्‍याच बलाला दाब वाढतो.

▬▬▬۩۞۩▬▬▬

🍶 द्रवाचा दाब व पातळी 


सर्वांत वरच्‍या छिद्रातून पाण्‍याची धार

बाटलीच्‍या जवळ पडते, तर सर्वांत खालच्‍या उंचीवरील छिद्रातून धारा सर्वांत दूर पडते, कारण द्रवाच्‍या खोलीप्रमाणे दाब वाढत जातो. एकाच पातळीतील दोन छिद्रांमधून धारा बाटलीपासून समान अंतरावर पडतात. कारण एकाच पातळीत द्रवाचा दाब एकच(सारखा) असतो. 

▬▬▬۩۞۩▬▬▬

द्रायू:-  सर्व द्रव आणि वायू यांना द्रायू (fluid) अशी संज्ञा आहे.

▬▬▬۩۞۩▬▬▬

🔘 वातावरणीय दाब (Atmospheric Pressure):-

  • पृथ्वी भोवतालच्या हवेमुळे निर्माण झालेल्‍या दाबाला वातावरणीय दाब असे संबोधले जाते.
  •  पृथ्‍वीवर सर्व बाजूंनी हवेचे आवरण आहे. ह्या आवरणालाच वातावरण असे म्‍हणतात.
  •  पृथ्‍वीच्‍या पृष्‍ठभागापासून सुमारे 16 km उंचीपर्यंत वातावरण आहे. 
  •  सुमारे 400 km पर्यंत वातावरण अतिशय विरल स्वरूपात असते. 
  • समुद्रसपाटीला असणाऱ्या हवेच्‍या दाबाला 1 Atmosphere म्‍हणतात. 
  • जसजसे समुद्रसपाटीपासून वर जाऊ तसतसा हवेचा दाब कमी कमी होतो.
  • 1 Atmosphere = 101x10^ 3 Pa = 1 bar =10^3 mbar
  • 1 mbar » 10^2 Pa (hectopascal )
  • वातावरणीय दाब mbar किंवा hectopascal (hPa) या एककामध्‍ये मोजतात.

*****-----*****

🏹  प्‍लावक बल:-

पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्‍या दिशेने प्रयुक्‍त बलाला प्‍लावक बल (f b) असे म्‍हणतात. 

""""----""""

💊प्लावक बल कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? 

1. वस्‍तूचे आकारमान – द्रवात बुडणाऱ्या वस्‍तूचे आकारमान जास्‍त असल्‍यास प्‍लावक बल जास्‍त असते.

2.द्रवाची घनता – जितकी जास्‍त घनता तितके प्‍लावक बल जास्‍त असते.

▬▬▬۩۞۩▬▬▬

ज्याप्रमाणे वह्या पुस्तकांना लावलेले कव्हर हे वह्या व पुस्तकांचे संरक्षण करते, त्याच पद्धतीने स्वतःला लावलेले योग्य संस्काराचे कव्हर वाईट गोष्टी पासून आपल्याला दूर करते.

           ✍️ श्री....

आपला दिवस आनंदात जावो 🎷 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आप...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.