मुख्य सामग्रीवर वगळा

इयत्ता 8 वी, 3. बल व दाब. 2


 इयत्ता 8 वी, 3. बल व दाब. 2

▬▬▬۩۞۩▬▬▬

विज्ञान विषयाचा दररोज थोडा थोडा अभ्यास करण्यासाठी खालील "माहिती विज्ञानाची" या What's App समूहात सामील व्हावे🙏 What's App Group Join Now

▬▬▬۩۞۩▬▬▬







✍️  प्लावक बल कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते?

  1. वस्तूचे आकारमान-  द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बल जास्त असते.
  2. द्रवाची घनता -  जितकी जास्त घनता तितके प्लावक बल जास्त असते.
----+++----

🌞 एखादी वस्तू द्रवात टाकल्यास ती वस्तू द्रवात बुडेल, वर येवून तरंगेल, की द्रवाच्या आत तरंगेल हे कसे ठरते?

1. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू तरंगते.

2. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू बुडते.

3. प्लावक बल वस्तूच्या वजनाएवढे असेल तर वस्तू द्रवामध्ये तरंगत राहते.

----+++----

🏄  आर्किमिडीजचे तत्व 
एखादी वस्तू द्रायू मध्ये अंशतः अथवा पूर्णतः बुडविल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजनाइतके असते.

-+-+-+-+-+-+-+-

🚰  आर्किमिडीज -  परिचय शास्त्रज्ञाचा 
  1. ( 287 ख्रिस्तपूर्व - 212 ख्रिस्तपूर्व ) 
  2. आर्किमिडिज हे ग्रीक शास्त्रज्ञ आणि प्रखर बुद्धीचे गणिती होते. 
  3. π चे मूल्य त्यांनी आकडेमोड करून काढले.
  4.  भौतिकशास्त्रात तरफा, कप्पी, चाके यासंबधीचे त्यांचे ज्ञान ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना उपयोगी ठरले.
  5. भूमिती व यांत्रिकीमधील त्यांचे काम त्यांना प्रसिद्धी देऊन गेले. 
  6. बाथटबमध्ये स्नानासाठी उतरल्यावर बाहेर सांडणारे पाणी पाहून त्यांना आर्किमिडीज तत्त्वाचा शोध लागला. 'युरेका, युरेका' म्हणजे 'मला सापडले, मला सापडले' असे ओरडत ते त्याच अवस्थेत रस्त्यावर धावले होते.

'-'-'-'-'-'-'-'

🛳️  आर्किमिडीज तत्वाचे व्यवहारातील उपयोग 
  1. पाणबुड्या, जहाजे🚢 यांच्या रचनेत आर्किमिडीज चे तत्व वापरले जाते. 
  2. दुग्धतामापी ( लॅक्टोमीटर ), व आर्द्रतामापी (हायड्रोमीटर) ही उपकरणे 
  3. हायड्रॉलिक लिफ्ट आर्किमिडीज तत्वावर आधारित आहेत.
*-*-*-*-*-*

🏹  पदार्थाची घनता
  1. घनता = वस्तुमान/आकारमान. 
  2. घनतेचे एकक S.I. पद्धतीत kg/m³ आहे.
  3.  पदार्थाची शुद्धता ठरवताना घनता हा गुणधर्म उपयोगी ठरतो. 
:-:-:-:-:-:-:-:-:

🎸.  सापेक्ष घनता
  1. पदार्थाची सापेक्ष घनता पाण्याच्या घनतेच्या तुलनेत व्यक्त केली जाते.
  2. सापेक्ष घनता = पदार्थाची घनता / पाण्याची घनता,
  3. सापेक्ष घनता हे समान राशींचे गुणोत्तर प्रमाण असल्याने यास एकक नाही. 
  4. सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे 'विशिष्ट गुरुत्व' म्हणतात.
!+!+!-!+!+!+!+!

📢   उदाहरणे

उदा. 1. फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ 0.27 m ^ 2 असून त्याचे वजन 81 N आहे, त्या डब्याने फळीवर प्रयुक्त केलेला दाब काढा.

दिलेले
क्षेत्रफळ = 0.27 m ^ 2 , 
डब्याचे वजन = 81 N 
दाब =? 
दाब = बल / क्षेत्रफळ     | = 81 ÷ 0. 27
      = 81 N/ 0.27 m²  |= 8100 ÷ 27
      = 300 N/m²
दाब = 300 N/m²
(छेदात दोन घरा नंतर दशांश चिन्ह असेल तर अंशात दोन शून्य घेऊन छेदातील दशांश चिन्ह काढून टाकावे.)

?-?-?-?-?-?

उदा 2. जर पाण्याची घनता 10 ^ 3 * kg / (m ^ 3) आणि लोखंडाची घनता 7.87 * 10 ^ 3 * kg / (m ^ 3) असेल तर लोखंडाची सापेक्ष घनता काढा.

दिलेले
पाण्याची घनता = 10 ^ 3 * kg / (m ^ 3) 
लोखंडाची घनता = 7.87 * 10 ^ 3 * kg / (m ^ 3)
लोखंडाची सापेक्ष घनता = ?

लोखंडाची सापेक्ष घनता = (लोखंडाची घनता)/ (पाण्याची घनता)
 = 7.87 * 10 ^ 3 * kg / (m ^ 3) / (10 ^ 3 * kg / (m ^ 3)
लोखंडाची सापेक्ष घनता = 7.87

@_@_@_@_@_@_@

उदा 3. स्क्रूच्या टोकाचे क्षेत्रफळ 0.3 mm ^ 2 असून त्याचे वजन 1.2 N आहे. तर स्क्रूने लाकडी फळीवर प्रयुक्त केलेला दाब काढा (Pa मध्ये).

दिलेले : 
क्षेत्रफळ = 0.3 * 10 ^ - 6 * m ^ 2 
स्क्रूचे वजन = 1.2 N
 दाब = वजन / क्षेत्रफळ
 दाब = 1.2 N / (0.3x10 ^ - 6 m²) 
= 4 × 10 ^ 6 N/ m²
दाब = 4 × 10 ^ 6  Pa
(छेदात व अंशात समान अंकानंतर दशांश चिन्ह असेल तर ते रद्द होते) 

/*/*/*/*/*/*/*/*/

उदा 4. एका संगमरवरी फरशीच्या तुकड्याचे वजन हवेमध्ये 125 g आहे. त्याची घनता 2.5g/cc इतकी असेल तर त्याचे पाण्यातले वजन किती होईल ?
दिलेले
हवेतील वजन = 100 g
घनता= 2.5g/cc 
 आकारमान = (वजन) / (घनता)
                = 100g/ (2.5g/cc)
                = 50 cc

म्हणून आर्किमिडीजच्या तत्त्वानुसार पाण्यात बुडवल्यावर तुकड्याच्या आकारमानाएवढे 50 cc इतके पाणी बाजूस सारले जाईल. या पाण्याच्या वजनाइतकी म्हणजे 50 g इतकी तूट तुकड्याच्या वजनात येईल.
 पाण्यातील वजन = 100 g - 50 g = 50 g
पाण्यातील वजन = 50 g
▬▬▬۩۞۩▬▬▬
सहज 
  1. ज्याला तव्यावरची भाकरी/ पोळी ताटात मिळते तो नशीबवान.
  2. ज्याला दररोज एक फळ खाण्यास मिळते तो श्रीमंत. 
✍️ श्री.  🎷

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आप...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.