इयत्ता - 8 वी, आरोग्य व रोग 2
WhatsApp Group
Join Now
आपल्या विज्ञान विषयक माहितीसाठी वरील🔝 What's App समूहात सामील व्हावे 🙏
▬▬▬۩۞۩▬▬▬
🧠 सर्वांनी हे कायमस्वरूपी लक्षात ठेवावे 🙏
- प्रत्येक रोगाला विशिष्ट असे वैज्ञानिक कारण असते.
- दैवी प्रकोप किंवा इतर व्यक्तींच्या मत्सरामुळे रोग होत नाही.
- योग्य वैद्यकीय उपचारांनीच रोग बरे होतात.
- मंत्रतंत्र, जादूटोणा यांमुळे रोग बरे होत नाहीत.
""""----""""
असंसर्गजन्य रोग:-
जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे म्हणतात.
🎗️कर्करोग (Cancer) :
व्याख्या:- पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस कर्करोग म्हणतात.
अर्बुद:- कर्करोगाच्या पेशीसमूहास किंवा गाठीस दुर्दम्य अर्बुद म्हणतात.
अवयव:- कर्करोग फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा यांसारख्या अवयवांत रक्त किंवा अन्य कोणत्याही ऊतीत होऊ शकतो.
कारणे:-
- अतिप्रमाणात तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करणे,
- आहारात चोथायुक्त अन्नपदार्थांचा (फळे व पालेभाज्यांचा) समावेश नसणे,
- अनुवांशिकता, लठ्ठपणा हे ही एक कारण असू शकते,
- अति प्रमाणात जंकफूड (वडापाव,पिझ्झा, इत्यादी) खाणे. यांसारखी अनेक कारणे असू शकतात.
लक्षणे
- दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे.
- उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज.
- स्तनात गाठी निर्माण होणे.
- अकारण वजन घटणे.
🦀 कर्करोगावरील आधुनिक निदान व उपचार पद्धती:-
* कर्करोगाचे निदान करण्यासाठी
- टिशू डायग्नोसिस,
- सी.टी.स्कॅन,
- एम. आर.आय.स्कॅन,
- मॅमोग्राफी
- बायप्सी, इत्यादी तंत्राचा वापर करण्यात येतो.
* उपचारांमध्ये
- रसायनोपचार,
- किरणोपचार,
- शल्यचिकित्सा या प्रचलित पद्धतींबरोबरच
- रोबोटिक सर्जरी,
- लॅप्रोस्कॉपिक सर्जरी अशा उपचार पद्धती
- वापरल्या जातात.
* कर्करोगावर प्रतिबंध कसा करावा?
- आहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यास काही प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण मिळते.
- कर्करोगावर आधुनिक उपचारां-बरोबरच शारीरिक व्यायाम🏋️ केल्यास अधिक फायदा होतो.
- तंबाखू सेवन, धूम्रपान 🚬 यांसारख्या व्यसनांच्या आहारी जाऊ नये.
- 🍍🍒🍓🥝🥑भरपूर फळे आणि 🥗भाज्या खाव्यात,
- प्रक्रिया केलेले मांस🍗 मर्यादित करावे,
- 🩺नियमित आरोग्य तपासणी करावी.
-------++++-------
🧬 मधुमेह (Diabetes) :
स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या 🍬 प्रमाणावर नियंत्रण ठेवते. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही, ह्या विकाराला मधुमेह म्हणतात.
* लक्षणे
रात्री मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे,
वजन खूप वाढणे किंवा कमी होणे यांसारखी लक्षणे आढळतात.
* मधुमेहाची कारणे:-
- अनुवंशिकता
- अतिलठ्ठपणा
- व्यायामाचा/कष्टाचा अभाव
- मानसिक ताण/ तणाव
* प्रतिबंधात्मक उपचार:-
डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, औषधे व व्यायाम याचा अवलंब करून नियंत्रण ठेवणे.
* भारतीय जनते साठी.
सध्या भारतात साधारणतः सात कोटी मधुमेहाचे रुग्ण आहेत. जगातील मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आढळतात.
++++-----+++++
❣️ हृदयविकार (Heart Diseases) :
हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा
पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते. यामुळे हृदयास जास्त कार्य करावे लागते व ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ
शकतो. हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार अत्यावश्यक आहे.
* लक्षणे:-
- छातीत असह्य वेदना होणे,
- छातीतील वेदनांमुळे खांदे, मान व हात दुखणे,
- हात आखडणे,
- घाम येणे,
- अस्वस्थता,
- कंप जाणवणे.
* औषधांचा गैरवापर:-
कधी कधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर काही व्यक्ती औषधे घेतात. औषधांच्या💊 अतिवापराने आपल्या शरीरावर वाईट परिणाम घडून येतात. जसे, जास्त प्रमाणात अथवा वारंवार वेदनाशामके (Pain Killers)
घेतल्यास चेतासंस्था🧠, उत्सर्जन संस्था, यकृत यावर विपरीत परिणाम होतो. प्रतिजैविकांच्या (Antibiotics) अतिवापराने मळमळ, पोटदुखी,पातळ जुलाब, अंगावर पुरळ येणे, जिभेवर👅 पांढरे चट्टे पडणे इत्यादी लक्षणे तयार होतात.
* हृदयविकाराची कारणे:-
- धूम्रपान करणे, 🚬
- मद्यपान🥂,
- मधुमेह,
- उच्च रक्तदाब,
- लठ्ठपणा,
- शारीरिक श्रमाची कमतरता,
- व्यायामाचा🏋️ अभाव,
- सतत बैठे काम करणे, 💺
- अनुवंशिकता,
- तणाव,
- रागीटपणा😡 आणि
- चिंता इत्यादी.
* हृदयविकारावरील उपचार:-
- ॲन्जिओ - प्लास्टी
- हृदय प्रत्यारोपण
- हृदय स्टेंट्स टाकणे
- पेसमेकर बसविणे
- ओपन हार्ट सर्जरी
- बाय पास सर्जरी
* हृदयरोगावर प्राथमिक उपचार:-
- 🚑 पहिल्यांदा 108 क्रमांकावर रूग्णवाहिकेसाठी फोन करा.
- रूग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का ते तपासा.
- C.O.L.S.:- रूग्णाला कडक पृष्ठभागावर झोपवून शास्त्रशुद्ध पद्धतीने रूग्णाच्या छातीवर दाब द्या. या पद्धतीला कॉम्प्रेशन ओन्ली लाईफ सपोर्ट (C.O.L.S.) म्हणतात. यामध्ये एका मिनीटाला 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यावा.
####----####
💊 टीप जेनेरिक औषधे:-
- जेनेरिक औषधे यांना सामान्य औषधे असेही म्हणतात.
- जेनेरिक औषधांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटेंट शिवाय केली जाते.
- जेनेरिक औषधे ब्रॅन्डेड औषधांच्या समकक्ष व त्याच दर्जाची असतात.
- जेनेरिक औषध तयार करताना त्या औषधातील घटकांचे प्रमाण किंवा त्या औषधांचा फॉर्मुला तयार मिळत असल्यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो, त्यामुळे जेनेरिक औषधांची किंमत ब्रॅन्डेड औषधांच्या किमतीपेक्षा तुलनेने खूप कमी असते.
💉 जीवनशैली आणि आजार:-
- व्याख्या:- जीवनशैली म्हणजे आहार-विहार यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि आहाराचा समावेश होतो.
- आजकाल उशीरा उठणे, उशीरा झोपणे,💤 आहाराच्या वेळा सारख्या बदलणे, व्यायाम व कष्टाची कामे यांचा अभाव असणे, जंकफूड🍔 (अरबट चरबट) खाणे अशा गोष्टींचे प्रमाणे वाढले आहे. यामुळेच आजारी पडण्याचे प्रमाणे वाढले आहे.
- आजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल तर योग्य जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे.
- योग्य जीवनशैलीमध्ये योग्य झोप, योग्य आहार या व्यतिरिक्त योगासने, प्राणायाम आणि व्यायाम करणे आवश्यक आहे.
- तसेच व्यायामसुद्धा 🏋️ आपल्या शरीराला झेपेल असाच करावा.
- प्राणायाम व योगासने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावीत.
- विविध प्राणायाम व योगासनांचे व्हिडिओ पहावेत.
📢 लसीकरण (Vaccination) :-
आजार होऊ नये म्हणून, त्यांचा प्रतिबंध म्हणून लसीकरण करून घेणे हेही तितकेच महत्वाचे आहे.
'''''''-----'''''''
🩸 रक्तदान :
रक्तदात्याचे एक युनिट रक्तदान एका वेळेला किमान तीन रुग्णांची गरज पूर्ण करते. जसे की, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका.
एका वर्षात चारदा रक्तदान केल्यास 12 रुग्णांचे प्राण वाचवता येतात.
______&&&____
👁️ नेत्रदान :
मृत्यूनंतर आपल्याला नेत्रदान👀 करता येते. त्यामुळे अंध🧑🦯 व्यक्तींना दृष्टी मिळू शकते.
+++++----+++++
💪 आरोग्य दिनविशेष:-
- 27 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन
- 14 जून - जागतिक रक्तदान दिन
- 29 सप्टेंबर - जागतिक हृदय दिन
- 14 नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन
=====©©©======
🎷 ही माहिती आपणास नक्की माहित हवी
भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर जेनेरिक औषधांची निर्यात करतात; परंतु देशात मात्र ब्रॅन्डेड कंपनीच्या नावानेच जास्त किमतीला औषधे विकतात. अमेरिकेत 80% जेनेरिक औषधांचा वापर केला जातो त्यामुळे औषधावरील शेकडो अब्ज रुपये तेथे वाचविले जातात.🙏
▬▬▬۩۞۩▬▬▬
*आयुष्यात यशस्वी होण्यासाठीहुशारी सोबत ...,**तर इतरांपेक्षा वेगळा विचारकरण्याची वत्यावर मेहनत घ्यायची तयारी असली पाहिजे.**आपला दिवस आनंदी जावो.*🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा