मुख्य सामग्रीवर वगळा

NMMS परीक्षा 🎷


 NMMS परीक्षा 🎷

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा. 

National Means-cum Merit Scholarship scheme examination.

हेतू:- समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान व विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करणे.


परीक्षेचे वैशिष्ट्ये:- वजा गुण पद्धतीचा अवलंब केला जात नाही. 

1️⃣ पेपर 1

बौद्धिक क्षमता चाचणी 

(MAT - Mental Ability Test)

गुण - 90 

वेळ - 90 मिनिटे 

सकाळी 10.30 ते 12.00

2️⃣ पेपर 2

शालेय क्षमता चाचणी 

( सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्रे व गणित)

SAT - Scholastic Aptitude Test 

गुण - 90 

वेळ - 90 मिनिटे 

दुपारी 1.30 ते 3.00

🏅 पात्रता गुण 

खुला वर्ग - 40 % 

ST/SC व दिव्यांग - 32 %

शिष्यवृत्ती:- परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना चार वर्षासाठी दरमहा 1000 ₹ एवढी शिष्यवृत्ती दिली जाते.

दरवर्षी NMMS परीक्षे नंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाते, त्यानुसार शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना चार वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.

उत्तर पत्रिकेत विद्यार्थ्यांनी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ काळ्या किंवा निळ्या बॉल पेन ने रंगवावे.

☝️NMMS परीक्षेसाठी विषय 

A) बौद्धिक क्षमता चाचणी 

MAT - Mental Ability Test

मानसशास्त्रीय चाचणीवर आधारित 90 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न.

सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक.

B) शालेय क्षमता चाचणी  (SAT)

शालेय क्षमता चाचणीसाठी सामान्यतः इयत्ता सातवी व इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातात. 

1. सामान्य विज्ञान 

a) भौतिकशास्त्र - 11 गुण 

b) रसायनशास्त्र - 11 गुण

c) जीवशास्त्र - 13 गुण

एकूण = 35 गुण 

2. सामाजिक शास्त्र 

a) इतिहास - 15 गुण

b) नागरिकशास्त्र - 05 गुण

c) भूगोल - 15 गुण

एकूण = 35 गुण 

3. गणित - 20 गुण

SAT = 35 + 35 + 20  =  90

📋 अट 

NMMS परीक्षेसाठी इयत्ता 8 वी मधील विद्यार्थी हा महाराष्ट्रातील शासकीय, शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिकणारा विद्यार्थी असावा.

सदर विद्यार्थ्यास इयत्ता सातवी मध्ये कमीत कमी 55% गुण असावेत. ( SC/ST साठी किमान 50 टक्के गुण असावेत.)

विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे रुपये 3,50,000 पेक्षा जास्त नसावे.


📖  तयारी अभ्यासाची:-

 त्याग करायला शिका.

मोबाईल, टीव्ही व इतर वायफळ गप्पा या गोष्टीत वेळ वाया घालू नका.

  1. इयत्ता 7 वी व इयत्ता 8 वी वरील अभ्यासक्रमावर NMMS परीक्षा असल्यामुळे या परीक्षेची तयारी इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी सुरू करावी. सातवीच्या अभ्यासासोबतच आठवीतील विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांचा अभ्यास सुरू करावा. 
  2. या विषयांच्या तयारीसाठी आठवी पास झालेल्या विद्यार्थ्यांची जुनी पुस्तके या मुलांना शिक्षक सहज देऊ शकतात.
  3. मुख्य परीक्षेच्या एक महिना अगोदर  विद्यार्थ्यांनी कमीत कमी 90 गुणांच्या दोन तरी संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवणे गरजेचे आहे.
  4. प्रश्नपत्रिका वाचत बसू नये, त्या ऐवजी पहिल्या प्रश्नापासूनच प्रश्न सोडविण्यास सुरुवात करावे. 
  5. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर आले नाही तर त्यासाठी जास्तीचा वेळ देत बसू नये. ताबडतोब पुढचे प्रश्न सोडवण्यास सुरुवात करावे. व त्याच प्रश्नाचे पर्यायी उत्तर वर्तुळ रंगवावेत. 
  6. सराव नसलेल्या विद्यार्थ्यांना MAT परीक्षेसाठी वेळ कमी पडतो.
  7. (Negative marking system नसल्यामुळे शेवटच्या कालावधीत.....⚫🔫🔫⚫🔫⚫🔫🎯)

वेळेचे नियोजन कसे करावे व अभ्यास नेमका कसा करावा हे समजून घेण्यासाठी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात दिलेले मार्गदर्शन कृपया वाचावे. जरी ते इयत्ता पाचवी सठी गृहीत धरून लिहिले तरीही आपणास त्याचप्रमाणे नियोजन करता येते. कारण कोणत्याही परीक्षेत यश मिळवायचे असेल तर वेळेचे नियोजन जमले पाहिजे.

https://studyforbrain39.blogspot.com/2024/08/blog-post.html


✍️ NMMS शिष्यवृत्ती संदर्भात अधिक माहिती मिळवायची असेल तर खालील👇 लिंकला स्पर्श करा.

htpps://www.mscepune.in


*जिथे प्रश्नपत्रिका 

काढलेली नाही,

 आदर्श उत्तरांचा नमुना 

उपलब्ध नाही, 

अभ्यासक्रमही अज्ञात आहे, 

अशी परीक्षा म्हणजे

 मानवी जीवन.*

आपला दिवस आनंदात जावो 🎷

👏 आपल्या विज्ञान विषयक माहिती साठी खालील What's App group जॉईन करावा.🙏

WhatsApp Group Join Now

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

Top 10,10 वी विज्ञान 1, विद्युतधारेचे परिणाम...🎷

 Top 10,10 वी विज्ञान 1, विद्युतधारेचे परिणाम...🎷 ▬▬▬۩۞۩▬▬▬ विज्ञान विषयाचा दररोज थोडा थोडा अभ्यास करण्यासाठी खालील "माहिती विज्ञानाची" या What's App समूहात सामील व्हावे.🙏 What's App Group Join Now ▬▬▬۩۞۩▬▬▬ Interesting Coincidence:🎇 Today is ...........               *Week End*                *Month End* Tomorrow will be. *Year End* *🏵️*  *🏵️* *🏵️* या पाठावर आधारित MCQ परीक्षा👇 *╭✺༺☬༒☬༻✺╮* * पदार्थ विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवतो? उत्तर:- a. सोने Au, चांदी Ag, तांबे Cu,  अल्युमिनियम Al या धातूंची रोधकता खूप कमी असते व  धातूंच्या आणूच्या शेवटच्या कक्षेत  मुक्त इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे धातूंना विद्युत सुवाहक म्हणतात. b. रबर, काच , लाकूड व प्लॅस्टिक पदार्थाची रोधकता खूप जास्त असते व त्यांच्याकडे मुक्त इलेक्ट्रॉन नसतात, म्हणून या पदार्थांना विद्युत दुर्वाहक म्हणतात. ━━━━✧❂✧━━━━ * विद्युतशक्ती म्हणजे काय? एकक कालावधीत घडून ...

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.             __[♡!!...🥀⛓️...!!♡]__ दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या  व्हाट्सॲप  ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे . What's app link 👇 --> 🔴  माहिती विज्ञानाची 🎷  🔴          :⋯ ◯ ⋯ : 🏈  ग्रुप वर जॉईन का व्हावे ? याचे कारण.... आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू. शिक्षक होण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरील CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) किंवा राज्यस्तरीय TET ( शिक्षक पात्रता परीक्षा ) उत्तीर्ण करावी लागते, जी तुम्हाला शिक्षक म्हणून पात्र करते.  कोणत्याही स्पर्धा परीक्षे त विज्ञान विषय हा असतोच.याची तयारी दररोज थोडी थोडी आपल्या विज्ञान लेखातून नक्की होईल. दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो. एखाद्या...