हिरे व्यापारी सावजी धानजी ढोलकिया🎷
आपली मुलं पब्जीचे टास्क पूर्ण करतात तर संस्कारी मुलं..... जीवन शिक्षणाचे टास्क पूर्ण करतात...
दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान मला उत्सुकता असते ती गुजरात मधील एका बातमीची. यावर्षी बोनस म्हणून त्यांच्या कामगारांना काय भेटवस्तू दिली असेल?
एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा पुढे हिरे व्यापारी बनेल असे कोणाला तरी वाटले असेल का?
पुढे चालून त्यांचा व्यापार हा 21,00 करोड़ रुपए चा झाला.
सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे सूरतमधील- सावजी धानजी ढोलकिया.
सावजी हे पैशाने तर श्रीमंत आहेतच पण आपल्या उदार स्वभावासाठी देखील ते प्रसिद्ध आहेत.
जन्म – 12 एप्रिल 1962 (गुजरात मधिल अमरेली.)
शिक्षण – चौथी पास
पत्नी – गौरीबेन ढोलकिया
संस्थापक – हरिकृष्ण ग्रुप
ढोलकिया का चर्चेत असतात?
तर ते कर्मचाऱ्यांना दिवाळीला भेट म्हणून कार आणि मुदत ठेवी देतात. या अगोदरही दिवाळीत बोनस म्हणून कार-फ्लॅट, ज्वेलरी सेट, मुदत ठेव आणि विमा पॉलिसी या भेटवस्तू त्यांनी दिल्या आहेत.
भाच्याच्या साध्या लग्नामुळेही ते चर्चेत होते.
माणसांचे तसेच हिऱ्यांचे उत्तम जाणकार असलेले सावजीभाई स्वतः हीरा घिस्सू (हिरा कापणारा) या नावाने वर्षानुवर्षे ओळखले जात होते, पण त्यांनी स्वतःची कंपनी उघडल्यावर त्यांनी हिरे कापणाऱ्यांना 'डायमंड इंजिनीअर' असे आदरणीय नाव दिले.
सावजीभाई जेंव्हा सुरतला पोहोचले तेंव्हा ते 12 वर्षांचे होते आणि त्यांनी डायमंड कटिंग/ हिरे घासणे सुरुवात केली. त्यावेळी सावजीभाईंना फक्त 180 रुपये पगार मिळत असे. आज त्यांच्या कंपनीची किंमत 6 हजार कोटींहून अधिक आहे. मात्र, असे असतानाही त्यांनी आपला मुलगा द्रव्याला जीवनाचे धडे शिकवण्यासाठी महिनाभरासाठी केरळला पाठवले, तेही केवळ सात हजार रुपये देऊन. द्रव्याने अमेरिकेतून एमबीए MBA केले होते, परंतु सावजीभाईंना त्यांच्या मुलाने खऱ्या आयुष्यात व्यवस्थापन शिकावे अशी इच्छा होती. असे करताना त्यांनी मुख्य 4 अटी ठेवल्या. 40 दिवस घरा पासुन दुर राहावे यासाठी अटी
🎷 अट पहिली- एका आठवड्याच्या वर कुठेही काम करायचे नाही, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी कामाचा अनुभव घ्यायचा.
🥁 अट दुसरी - सात हजार रुपये फक्त आपत्कालीन परिस्थितीतच खर्च करायचे. म्हणजे स्वतः कमावलेला पैसाच त्याने रोजच्या कामासाठी वापरायचा.
🎻अट तिसरी- त्याने कुठेही वडिलांचे नाव किंवा प्रभाव / वजन वापरू नये.
🖌️अट चौथी:- एक आठवडा बिजनेस करायचा.
द्रव्याने तिथे फूड आउटलेट आणि चपलांच्या दुकानात काम केले.
सावजीभाईंनी 12 वर्षांपूर्वी आपल्या भावाच्या मुलांनाही अशाच पद्धतीने इतर शहरात कामासाठी पाठवले होते.
यावर सावजीभाईंचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया....
सावजींच्या म्हणण्यानुसार, 'आम्ही मुलांना सकाळी लवकर उठायला, कमी पैसे खर्च करायला आणि लोकांशी चांगलं वागायला शिकवतो. पण जेव्हा मुलांच्या हातात पैसा असतो आणि त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या दिसली नाही, तेव्हा त्यांना संवेदनशीलता, मानवी मूल्ये आणि वास्तविक जीवनातील संघर्ष शिकवण्यासाठी अशा पद्धतींचा अवलंब करावा लागतो. जीवनात असे धडे शिकायला मिळाले तर परिस्थितीला सामोरे जाण्याचे मार्ग माणसाला आपोआपच सापडतात.
संस्कार हे सहज होत नसतात. संस्कारी पिढी निर्माण करणे हे एक कठीण कार्यच असते.
सावजीभाईंनी स्वतः 10 वर्षे डायमंड कटर म्हणून काम केले.
सावजीभाईंचे वडील छोटे शेतकरी होते. घरातील आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षी शिक्षण सोडले आणि ते सुरत येथे मामाकडे आले. त्यांनी 10 वर्षे हिरे कापण्याचे काम केले. त्यानंतर भाऊ आणि काही मित्रांच्या मदतीने त्यांनी कंपनीचा पाया घातला. सुरुवातीला फारसा फायदा झाला नाही. पण मुंबईत मार्केटिंगसाठी ऑफिस सुरू झाल्यावर हा व्यवसाय वाढला. आज त्याच्या 'कृष्णा डायमंड ज्वेलरी' या ब्रँडची देशभरात 6500 हून अधिक आउटलेट आहेत. लहानपणी आई नेहमी म्हणायची की तू काकांसारखं व्यवसाय कर. आश्चर्य म्हणजे आज त्यांचे काका त्यांचे गुरू आणि हिरे व्यवसायातील त्यांचे प्रतिस्पर्धीही आहेत.
📝 सावजीभाईंच्या मते,
अनुभव आणि ज्ञानाचा अवलंब केल्याने जीवनात यश आणि कामात फायदा होतो.
थोडंसं वाचून शिकलं असलं तरी ते शक्य तितकं लागू करावं.
वर्षानुवर्षे हिरे कापण्याचे काम करणाऱ्यांना हिरा घिसू म्हटले जात होते, परंतु सावजीभाईंनी त्यांना डायमंड इंजिनियर असे नाव दिले.
वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी बेंगळुरूला पाठवले. दोन वर्षांनी मुलगा परत आला तेव्हा त्यांच्या वागण्यात काही फरक दिसला. मुलगा त्याला मिठी मारताना थोडा अस्वस्थ झाला. त्यावेळी सावजीभाई त्यांना काहीच बोलले नाहीत. या वर्तनाच्या मुळाशी जाण्यासाठी आणि आपल्या मुलाला धडा शिकवण्यासाठी त्यांनी कंपनीचे कर्मचारी आणि त्यांच्या पालकांसोबत एक कार्यक्रम आयोजित केला होता. सर्वांनी आपल्या आई-वडिलांना मिठी मारली तेव्हा त्यांच्या मुलाच्या लक्षात आले. अशा पद्धतीने सावजीभाई यांनी त्यांच्या अनुभवातून मुलाला योग्य धडा शिकवला.
🧑🏭 कामगारांसाठी योग्य अट
- कारखान्यात कोणीही पान-गुटखा-मसाला खाणार नाही, अशी अटही त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी ठेवली आहे.
- दुचाकीवरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.
🪘 अशीच एक गोष्ट आज आपण पाहणार आहोत, ध्रुव ढोलकिया यांच्या मुखातून .
ढोलकिया यांनी मुलाला घरापासून दूर ठेवले,ते नवीन पिढीत हे पाहतात की, त्यांच्या कुटुंबातील तरुण मुलं सामान्य जीवन जगू शकतात की नाही.
कुटुंबापासून दूर राहण्याचा अनुभव या परिवारातील मुलाचे काका, मोठे भाऊ या सर्वांनी घेतला आहे.
अशा कुटुंबाला समृद्धी किंवा लक्ष्मीची कृपा का असते हे समजून घेण्यासाठी ढोलकिया कुटुंबाने अतिशय उत्तम उदाहरण मांडले आहे.
चला 🏃♂️🏃♂️🏃♂️तर ध्रुव ढोलकिया सोबत आपणही प्रवास करू...
या प्रवासात काही अटी त्यांना काटेकोरपणे पाळाव्या लागतात.
- आपल्या कुटुंबापासून 45 दिवस दूर राहायचे.
- स्वतःचा महागडा फोन घरीच ठेवायचा.
- सोबत साधा कॉलिंग फोन दिला जातो.
- या दिवसात घरच्या व्यक्तींशी फोनवर बोलायचे नाही.
- केवळ भाऊ किंवा काका यांना एसएमएस करून सांगायचे मी या या ठिकाणी आहे... हा हा जॉब करत आहे... मी सुरक्षित आहे.... याशिवाय दुसरे काहीही संभाषण नाही.
- कुठे जायचे हे अगोदर सांगितले जात नाही.
- प्रवासासाठी फक्त 5000 हजार रुपये दिले जाणार.
- त्या नवीन ठिकाणी जाऊन जॉब / नोकरी करायची.
- प्रत्येक आठवड्याला चालू नोकरी सोडून नवीन जॉब पकडायचा.
- एकच नोकरी पुन्हा करायचा नाही.
- ज्या ठिकाणी ते नोकरी करनार आहोत त्या ठिकाणी स्वतःची मूळ ओळख द्यायची नाही.
..... .... ध्रुव ढोलकिया ला स्टेशनवर आल्यावर त्याच्या हातात तिकीट देण्यात आले कोझीकोडे KOZHIKODE चे. त्यासोबत त्याला दोन जेवणाचे पॅकेट देण्यात आले व एक पाण्याची बॉटल. पॉकेट मध्ये 5000 रुपये देण्यात आले. अंदाजे चौदाशे किलोमीटरचा प्रवास करून ध्रुव कोझीकोड ला पोहोचले.
मनात थोडीशी भीती, आपण हे कार्य करू शकू की नाही याची शंका त्यांच्या मनात होती.
कोझिकोडला पोहोचल्यावर चार-पाच तास शोध मोहीम केल्यावर त्यांना राहण्याचे एक ठिकाण मिळाले. A/C साठी तीनशे रुपये व नॉन एसी साठी दोनशे रुपये मध्ये शेअर रूम.
अलिशान घरात राहणारा ध्रुव नॉन एसी रूम मध्ये राहायला लागला.
ते रात्रीचा एक अनुभव सांगतात.
रात्री जवळपास तीन वाजता एक दारू पिलेला व्यक्ती रूममध्ये आला. त्याला काही समस्या असेल म्हणून तो आवाज देत होता, पण ध्रुवने रिस्पॉन्स न दिल्यामुळे त्याने त्याच्या चेहऱ्यावर मारले. ध्रुवला घरच्यांची सगळ्यांची आठवण आली. ते एवढे घाबरले की त्यांना रडणे पण येत नव्हते .हा अनुभव सांगताना ते खूप भाऊक होतात. सकाळी त्या व्यक्तीने ध्रुवला सॉरी म्हटले. ध्रुवला पण ही गोष्ट पुढे वाढवायची नव्हती म्हणून त्यांनी ती गोष्ट तेथेच सोडून दिली.
सकाळी उठल्यावर त्यांनी नोकरी शोधायला सुरुवात केली. सात ते आठ घंटे शोध मोहीम केल्यावरही त्यांना नोकरी मिळाली नाही. त्यांच्या आयुष्यात प्रथमच त्यांना हे अपयश / rejection येत होते. ते सांगतात की घरी सर्व सुविधा आहेत. पाणी मागितले तर दोन-तीन नोकर पाणी घेऊन येतात पण इथे त्यांना सर्व गोष्टी स्वतःच करायच्या होत्या. शेवटी एका अंकल च्या प्रयत्नातून त्यांना जॉब मिळाला. त्या मालकाने असे विचारले की गुजरात वरून तू पळून वगैरे तर आला नाहीस ना.? कारण गुजराती भाषा लपत नव्हती. त्यावेळेस त्यांनी सांगितले की घरची परिस्थिती वाईट असल्यामुळे मी नोकरीसाठी आलो आहे. त्यांनी त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता कामावर बोलवले.
--> बोलवले नऊ वाजता... पण दुकान उघडले दहा वाजता. तिथे त्यांचे काम होते की प्रथम साफसफाई करायची व नंतर विक्री करायची त्या ठिकाणी सर्व इम्पोर्टेड वस्तू होत्या. त्या ठिकाणी त्यांचे कार्य पाहून तो मालक प्रभावित झाला त्यांनी त्याला सांगितले की तू या ठिकाणी काम करण्याऐवजी मॉलमध्ये जा कारण ध्रुव ला मल्याळम येत नव्हते. ध्रुव ला इंग्रजी छान येत होते त्या ठिकाणी फक्त ड्रायफ्रट्स विकायचे होते.
या ठिकाणी ध्रुवला सकाळी येऊन फरशी व काच पुसून घ्यायचे होते, सर्व स्वच्छ करायचे होते, त्यानंतर हात धुवून विक्रीच्या कामाला लागायचे होते. 12 तासाचा जॉब होता. त्या ठिकाणी त्याचे जेवण सकाळी दहा रुपयांचा गुड डे किंवा पार्ले जी खात असे ते पण फुटपाथ वर बसून.
दुपारी lunch मध्ये 30 रुपयाचा डोसा. दहा रुपयाचे तीन डोसे तो खात असे. त्यासोबत पाच रुपयाची चटणी व पाच रुपयाचे सांभर तो घेत असे.
डिनर साठी काय असेल? रात्रीचे साडेदहा किंवा अकरा वाजत असे. उशीर झाल्यामुळे डिनर मिळत नसे. त्याच्या आयुष्यात तो उपाशी या अगोदर कधीच झोपला नाही पण ही परीक्षा देताना तो रात्री उपाशी झोपला.
ध्रुवला दररोज च्या कामाचे 500 Rs मिळाले. पहिला पगार हातात पडल्यावर त्याच्या डोळ्यात अश्रू आले. या अगोदर त्यांने लाखो रुपये हातात घेतले होते.. पाहिले होते.... पण स्व कमाई चे पैसे हातात आल्यावर भावनाच वेगळ्या असतात हे त्याला प्रथम जाणवले. ज्या डोळ्यांनी लाखो रुपये पाहिले त्या डोळ्याला पाचशे रुपयांची स्व कमाई खूप आनंददायी होती.
असे करत त्याचा तो आठवडा छान गेला. त्या ठिकाणचे लोक हे छान होते असे ध्रुव म्हणतो. त्या कामाच्या ठिकाणी ध्रुव इंग्रजी बोलणारे सर्व गिऱ्हाईक व्यवस्थित हाताळत असे. तरीपण आठवडा झाल्यामुळे त्याला जॉब सोडायचा होता. मालकाला आश्चर्यच वाटले तू जॉब का सोडत आहेस असे मालक म्हणाला. ध्रुव इथे खोटे बोलला की मला इथे पंधरा हजार मिळतात, पण बाजूला एक गॅरेज आहे ते मला जास्त रुपये देऊ करत आहेत व मला पैशाची गरज आहे. इथे ध्रुव मालकाशी खूप व्यवस्थित बोलतो. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मी तसा पैशाचा लालची नाही पण माझी कौटुंबिक परिस्थिती तेवढी चांगली नसल्यामुळे मला हा जॉब सोडावा लागत आहे. हे ऐकून ते लोक पण भाऊक झाले, त्यांनी सांगितले की तुला कोणतीही गरज लागली तर आवश्यक कळव.
ध्रुवने आता दुसरा जॉब शोधला होता. एका कॅफेत त्याने इंटरव्यू दिला. मालकाने त्याला कामाचा अनुभव आहे का असे विचारले. तर ध्रुवने मला अनुभव आहे असे सांगितले. या ठिकाणी तो जो बोलत आहे ते ऐकणे, आपण शिकणे, आत्मसात करणे खूप गरजेचे आहे.
या ठिकाणी ध्रुव सांगतो की त्यांच्या घरात कोणीही मोठे व्यक्ती पाहुणे म्हणून आले तर, मिनिस्टर असो की सामान्य त्या लोकांना खाण्यापिण्याचे सर्व घरातील सदस्यच देतील. ध्रुवच्या आजोबांनी घरातील सदस्यांना हे शिकवले होते की कशा पद्धतीने सेवा करावी. कॅफेमध्ये ध्रुवला जॉब मिळाला. ओणम चा सण असल्यामुळे ध्रुव सोबत काम करणारी एक मुलगी सुट्टीवर गेली होती. त्यामुळे संपूर्ण दहा टेबल ध्रुवला सांभाळावे लागत होते. विचार करा ज्याच्या हाताखाली नोकर तो आज नोकर म्हणून काम करत आहे.
चौथ्या दिवशी मालक नकळत दुरून ध्रुवचे काम पाहत होते. ध्रुव ला जर तीन वस्तूची ऑर्डर दिली जात होती तर ध्रुव त्याच्या बोलण्यातून पाच वस्तू गिर्हाईकांना विकत होता. मालकाला हे पाहून खूप आनंद झाला.
पाचव्या दिवशी मालक त्याच्यासमोर टेबलवर बसले. त्यांनी सांगितले की त्यांना खूप भूक लागली आहे, त्यांच्यासाठी खाण्यास काहीतरी सजेस्ट कर. ध्रुवने सांगितले की इथे सर्व वस्तू छानच आहेत . मालकाने गोड पदार्थ मध्ये काय छान आहे असे विचारले ? ध्रुवने एक वस्तू खाण्याऐवजी ही पण वस्तू खा असे त्यांना छान शब्दात सुचवले. तुम्ही जर ही वस्तू खाल्ली नाही तर तुम्ही या वस्तू पासून वंचित राहाल असे छान शब्दात सांगितलं. (हे मूळतः संस्कार असल्याशिवाय शक्य होत नाही.) मालकाने त्याच्यातील गुणवत्ता पारखून चार दिवसातच त्याला असिस्टंट मॅनेजर हे पद दिले व पंधरा हजार सॅलरी वाढवून 18000 केली. आणि मुंबईला ट्रेनिंग साठी पाठवणार असे पण त्याला सांगितले. हे त्या ठिकाणच्या असिस्टंट मॅनेजरने कुठून तरी ऐकले. तो चांगल्या स्वभावाचा नसेल. त्यांने ध्रुवला नाईट शिफ्ट ला टाकले. रात्रपाळी ही संध्याकाळी पाच ते रात्री दोन पर्यंत होती. ध्रुवसाठी ते नवीन ठिकाण होते, जाण्या येण्याची समस्या निर्माण होणार होती, कारण त्याच्याकडे ना बाईक होती न सायकल होती. या क्रियेमुळे अडचणीत वाढ होणार होती, जे सुरळीत छान चालू होते त्याला कुठेतरी दृष्ट लागली. तरीपण ध्रुवने मनात कोणतीही अढी न धरता त्याचा बेस्ट परफॉर्मन्स दिला.
ध्रुव सांगतो त्याने त्याचा सेकंड जॉब कशा पद्धतीने सोडला....
तो सांगतो की, "सर मम्मी को इमर्जन्सी आ गई है, मेरे भाई ने तिकीट भेजा है" त्यामुळे त्याला गावी जावे लागत आहे. त्यामुळे तो उद्याच गुजरातला जाणार आहे. ते पण सर्वजण भावुक झाले. त्याला त्याची सॅलरी देण्यात आली. खरे तर त्याला दररोजची सॅलरी नव्हती, महिन्याचा पगार होता. तरीपण मालकाने त्याला तीन हजार पाचशे रुपये सात दिवसांचा पगार दिला.
दादाजींचा आणखीन एक नियम होता. एक आठवडा त्याने व्यवसाय करायचा. कोणताही व्यवसाय केला तरी चालेल. व्यवसाय करण्यामागील लॉजिक पण ध्रुवने सांगितले. व्यवसाय केला तर तो थोडा काळा पडेल व स्थानिक लोकाप्रमाणे दिसेल.
मग व्यवसाय करायचा तर कोणता करायचा, त्याचे गोविंद दादाजी एक वाक्य म्हणायचे की प्रॉब्लेम इज प्रोग्रेस/ problem is progress शेवटी लिंबू पाणी विकण्याचा व्यवसाय करण्याचे त्याने ठरवले. कारण गर्मीचा मोसम असल्यामुळे लिंबू पाणी विकणे सोयीचे ठरेल.
लिंबू शरबत बनवण्यासाठी ध्रुवने फिल्टर पाण्याचा वापर केला. दोन लिटरच्या दोन बाटल्यात त्याने लिंबू शरबत तयार केले. बर्फ घेण्यासाठी तो सुपर मार्केटमध्ये जायचा. बर्फ वितळून जाईल म्हणून तो पळत जायचा व पळत यायचा. बर्फ वितळू नये म्हणून मेडिकलच्या थर्माकोलच्या बॉक्स मध्ये तो बर्फ ठेवायचा. सर्वांचे मिळून वजन 15 / 20 किलो व्हायचे. बीचवर लिंबू शरबत विकायचे असेल तर नगरपालिकेची अनुमती / आवश्यक होती. यासाठी बारा दिवस तरी लागणार होते. म्हणून त्याने त्याच्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर एका हॉस्पिटल जवळ लिंबू पाणी विकणे सुरुवात केले. ध्रुवने हॉस्पिटल जवळ फूटपाथ वर लिंबू पाण्याचा व्यवसाय केला. 11 ते 6 लिंबू पाणी विकण्याचा व्यवसाय त्याने केला. या क्रियेत तीव्र उन्हामुळे त्याची त्वचा काळवंडली. उन्हामुळे त्याची त्वचा जळून गेली होती. घरी गुजरातला आल्यावर पण त्वचेवरील खुणा दिसत होत्या.
सहा दिवसांपर्यंत ध्रुवने हा व्यवसाय केला. लोकांना त्याचे लिंबू शरबत आवडायला लागले होते. मार्केटिंग साठी त्याने नवीनच फंडा अवलंबला. 20 जागेवर त्याने सुरत स्पेशल लिंबू शरबत ही पाटी लावली.
यानंतर त्याने नवीन जॉब शोधण्यास सुरुवात केला. या क्रियेत त्याला एक दिवस बिना जॉब चे राहावे लागले. ही व्यथा सांगत असताना ध्रुव सांगतात की तुम्ही एका नवीन शहरात आहात, ओळखीचे कोणीही नाही, आपली व्यथा पण कोणाला काही सांगता येणार नाही.
दुसऱ्या दिवशी ध्रुवला आईस्क्रीम पार्लर मध्ये जॉब मिळाला. त्यावेळेस त्या ठिकाणी निपाह (वटवाघुळांमुळे होणारा आजार) व्हायरस आलेला होता. कोरोनासाठी आता लस आहे पण नीपाह व्हायरस साठी कोणतीच ट्रीटमेंट नाही. ध्रुवने घरी इमर्जन्सी म्हणून सांगितले. ध्रुवच्या भावांनी डॉक्टरांसोबत चर्चा करून सांगितले की तिथे राहणे धोक्याचे आहे, म्हणून त्याच्या कुटुंबाने असे ठरवले की ध्रुवला आता बेंगलोरला पाठवायचे. ध्रुव तिथे सेटल झाला होता, जॉब छान चालू होता, हे सर्व सोडून जायचे त्याला थोडे जीवावर आले होते. पण ध्रुवने दुसरा विचार केला की बेंगलोर मोठी सिटी आहे, आपल्यासाठी ते योग्य राहील. मोठे शहर असल्यामुळे आरामात जॉब मिळेल अशी त्याला आशा होती. पण झाले उलटेच.
ध्रुव म्हणतो बडी सिटी के बडे प्रॉब्लेम. ध्रुव जवळ त्यावेळेस एकूण सहा हजार रुपये होते. भावाने त्याच्यासाठी दुसऱ्या दिवशीचे बेंगलोर चे एरोप्लेन तिकीट पाठवले होते. सहा हजारातील 1000 डिपॉझिट होते जे की त्याला भेटलेच नाहीत, म्हणजे त्याच्या जवळ पाच हजार रुपये होते. सकाळी एरोप्लेन ने जायचे असल्यामुळे त्याला सिटी बस उपलब्ध नसल्यामुळे ऑटो ने जावे लागले, ऑटो चालकाने भाडे बाराशे रुपये असे सांगितले. पण कसे तरी त्याने त्याला हजार रुपये मध्ये भाडे ठेवून तो एअरपोर्टवर गेला.
बेंगलोर शहरात आल्यावर बडे शहर की बडे प्रॉब्लेम या उक्ती प्रमाणे त्याला राहण्याची जागा मिळत नाही. पुन्हा सात आठ तास त्याने राहण्याच्या जागेसाठी खर्च केले. त्याला एके ठिकाणी 3000 रुपयांमध्ये राहण्यासाठी जागा मिळाली. या क्रियेत त्याच्याजवळ पाचशे रुपये शिल्लक राहिले. एवढ्या मोठ्या शहरात पाचशे रुपये खिशात असताना काय मानसिकता असेल?
यापेक्षा वाईट स्थिती त्याची दुसऱ्या दिवश झाली. जॉब शोधण्यासाठी त्याने जवळपास दहा तास प्रवास केला. या क्रियेत तो गुजराती, मारवाडी लोकांनाही जॉब साठी भेटला. त्या ठिकाणी सर्वजण त्याला पॅन कार्ड व आधार कार्ड मागत होते. त्याच्याकडे आधार कार्ड होते पण पॅन कार्ड नव्हते. (आधार कार्ड हे डुप्लिकेट नावाने होते.)
बऱ्याच शोधा नंतर त्याला बेकरीमध्ये काम मिळाले. बेकरीत एकूण सात ते आठ टेबल होते ते त्याला सर्व्ह करायचे होते. सकाळी येऊन ध्रुव त्या ठिकाणी स्वच्छता करत असे व नंतर वेटरचे काम करत असे. सात दिवसानंतर त्याने ते पण काम सोडले. (कारण सात दिवसापेक्षा जास्त काम एका ठिकाणी करायचे नाही ही अट.)
यानंतर त्याने कपड्याच्या दुकानांमध्ये जॉब शोधला. या ठिकाणी तो दररोज 3000 शर्ट घड्या करत असे. लोक 20 ,20 शर्ट ट्राय करायचे व एक-दोन घ्यायचे. त्यामुळे खाण्याची पण त्याला फुरसत मिळत नव्हती.
ध्रुवला हे माहीत नव्हते की त्याचे भाऊ त्याला घेण्यासाठी येणार होते. 45 दिवसातील चाळीस दिवस झालेले होते. अजून पाच दिवसांनी त्याचे टास्क पूर्ण होणार होते. कस्टमर चे कपडे बिल करण्यासाठी तो घेऊन जात असताना त्याला भाऊ दिसले, त्याने कपडे त्याच ठिकाणी टाकून दिले, त्याला धक्काच बसला, डोळ्यातून अश्रू आले होते, तो भावांच्या गळ्याच पडला, डोळ्यातून पाणी येत होते... ..... अशा पद्धतीने त्याचे टास्क पूर्ण झाले.
ध्रुव हे सर्व खूप भरभरून, आनंदाने व खूप मजेदार शब्दात सांगतो. यात काही तक्रार नाही कोणाबद्दलही आकस नाही.
ध्रुव सांगतो की बेस्ट लर्निंग जर सांगायचं असेल तर एका ओळीत सांगता येणार नाही.
कोझीकोड मध्ये ढेकूण असल्यामुळे त्याची पाठ लाल होत असे. राहण्याची जागा तर मिळाली पण ढेकनानी मात्र खूप त्रास दिला.
बेंगलोरला मात्र वेगळीच परिस्थिती होती. त्याच्याजवळ गादीच नसल्यामुळे तो धातूच्या बेडवर झोपत होता.
यापेक्षाही तो अजून एक छान गोष्ट सांगतो की त्याच्याकडे असलेल्या कोणत्याही नोकराची सॅलर पंधरा हजार असू नये. तो म्हणतो की रूपये 15,000 च्या सॅलरीमध्ये घर कसे काय चालेल? ध्रुव सांगतो की त्याला पंधरा हजार रुपये मध्ये राहणे किती कठीण जात होते. ध्रुव अजून एक छान गोष्ट सांगतो की बाहेर कुठे दान नाही केले तरी चालेल पण आपल्याकडे जे नोकर आहे त्यांची सॅलरी मात्र छान असावी.
लोकांना किती त्रास, दुःख आहेत हे तो अनुभवला आहे. लोकांना एका रुपयाचे महत्त्व किती आहे हे त्याला पटले आहे.
या टास्क मुळे त्याचा कॉन्फिडन्स खूप जास्त वाढला असे तो म्हणतो. चुकून दुर्दैवाने जर काही आपत्ती त्याच्यावर आलीच तर तो आता सहजतेने या आपत्तीला हाताळू शकतो, त्याच्या कुटुंबाला त्या वाईट स्थितीत मदत करू शकतो.
या सर्व गोष्टीतून ध्रुव काय शिकला तर, "पैशाची किंमत करायला"🎷
अशा पद्धतीने 40 दिवसांचा जीवन जगण्याचा अनुभव घेऊन ध्रुव गुजरातला परतला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा