मुख्य सामग्रीवर वगळा

9 th Science, Current Electricity, 9 वी विज्ञान, धाराविद्युत

 

9 th Science, Current Electricity 1, 9 वी विज्ञान, धाराविद्युत 1.


आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंक 🔗 ला स्पर्श करा🙏

👉 माहिती विज्ञानची 🎷


🐠 Eel:-

Just like a man animals use electricity. Fishes such as eels use electricity to catch their prey and also for self-defence. 

-----++-----

🎻 ईल मासा:-

माणसाला ज्याप्रमाणे विजेची गरज आहे त्याचप्रमाणे ईल हा मासा आपले भक्ष्य पकडण्यासाठी व स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विजेचा वापर करतो.

______***_____

☘️ Electric potential:-

The flow of electric charge between two points depends on

a kind of electric level at those points. This level is called electric potential. Electricity flows due to the conduction of negatively charged electrons.

----@@---

💐 विद्युत विभव

विद्युत प्रभाराचा प्रवाह एक प्रकारच्या विद्युत पातळीवर अवलंबून असतो त्या विद्युत पातळीस विद्युत विभव असे म्हणतात.

विद्युत प्रवाह इलेक्ट्रॉनच्या म्हणजे ऋण प्रभारित कणांच्या वहनामुळे होतो.

''''''##'''''

☁️ A lightning strike is the flow of electrons from point of lower (negative) potential on the

clouds to the point of higher (zero) potential on the earth.

""""***""""

⛈️ आकाशात चमकणारी वीज म्हणजे कमी विभव असलेल्या ढगांतून अधिक विभव असलेल्या जमिनीपर्यंत येणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह असतो.

::::::##::::::

🥁 Potential difference:-

The difference between the values of potentials at two points is called the potential difference between them.

====$$$====

🏵️ विभवांतर:-

वाहकाच्या विद्युत विभवांतील फरकास त्या वाहकांदरम्यानचे विभवांतर म्हणतात.

`````•••````

🎷 Potential difference of a cell:- 

The difference in potential between the positive and negative terminals of a cell is the

potential difference of that cell. The potential difference sets the electrons in motion and results

in the flow of electricity through a conducting wire connected to the two ends of the cell.

||||••••||||


🔋 विद्युत घटाचे विभवांतर:-

विद्युत घटाच्या धन अग्र आणि ऋण अग्र यांच्या विद्युत विभवातील फरक म्हणजे त्या घटकाचे विभवांतर होय. विभवांतरामुळे इलेक्ट्रॉन्स् गतिमान होतात त्यामुळे दोन्ही टोकांना जोडणाऱ्या वाहकामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतो.

^^^^÷÷÷^^^^

🥀 An introduction to scientists:- 

  1. The Italian scientist Alessandro Volta constructed the first electric cell.
  2. The unit of potential difference is named ‘volt’ in his honour. 

×××ו••×××

👨‍🔬 परिचय शास्त्रज्ञाचा 

  1. अलेक्झांडर व्हॊल्टा या इटालियन शास्त्रज्ञाने सर्वप्रथम विद्युत घट तयार केला. 
  2. या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ विभवांतराच्या एककास 'होल्ट' हे नाव देण्यात आले.

∆∆∆∆~~~~∆∆∆∆

🕳️Potential difference between any two point and its formula.

The amount of work done (W) to carry a unit positive charge(Q) from point A to point B is
called the electric potential difference(V) between the two points. 
Potential difference between two points = Work (W) / Total charge (Q) transferred

V= W/Q

∴ 1V = 1J / 1C

The unit of potential difference in SI system is volt

-----☕☕-----


🪘कोणत्याही दोन बिंदू मधील विभवांतराचे सूत्र:-


A या बिंदूपासून B या बिंदूपर्यंत एकक धनप्रभार स्थानांतरित करण्यासाठी जे कार्य (W) करावे लागते आणि B बिंदू दरम्यानचे विद्युत विभवांतर (V) म्हणतात. 

कोणत्याही दोन बिंदू मधील विभवांतर (V) = कार्य (W) / स्थानांतरित झालेला एकूण प्रभार (Q)

∴ V= W/ Q

विभवांतराचे एकक होल्ट (V) आहे.

विद्युत प्रभाराचे एकक कुलोम (C) आहे.

∴ 1 V = 1 J / 1 C

____@@@___


👉 Values of potential difference 

  1. 1mV (millivolt) = 10^ -3 V 
  2. 1mV (microvolt) = 10^ -6 V
  3. 1kV (kilovolt) = 10^ 3 V
  4. 1MV (megavolt) = 10^ 6 V

===£££===

 🙌 विभवांतराची एकके

  1. 1mV (मिलीव्होल्ट) = 10^ -3 V
  2. 1µV (मायक्रोव्होल्ट) = 10^ -6 V
  3. 1kV (kilovolt) = 10^ 3 V
  4.  1MV (megavolt) = 10^ 6 V
((((---))))

🌜Free electrons : 
Every atom of a metallic conductor has one or more outermost electrons
which are very weakly bound to the nucleus. These are called free electrons.
As shown in the figure, these electrons can easily move from one part of a conductor to its
other parts. The negative charge of the electrons also gets transferred as a result of this
motion. The free electrons in a conductor are the carriers of negative charge. 

-----₹₹₹----

 ⚡मुक्त इलेक्ट्रॉन 

कोणत्याही धातुरूप विद्युत वाहकाच्या प्रत्येक अणुजवळ एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन अशा पद्धतीचे असतात जे अणुकेंद्रकाशी अतिशय क्षीण बलाने बांधलेले असतात, त्यांना मुक्ती इलेक्ट्रॉन म्हणतात. वरील वाहकामध्ये असे मुक्त इलेक्ट्रॉन एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे जात आहेत. वाहकातील मुक्त इलेक्ट्रॉनिक्स हे ऋणप्रभाराचे वाहक आहेत कारण इलेक्ट्रॉन्स वर ऋण प्रभार असतो. 
_____####____

🎆 Current flowing through a wire:-
As shown in the Figure, if a
conducting wire is not connected to a cell, its free electrons move randomly in all directions in the space between the atoms. 
When we connect the ends of the wire to the two terminals of a cell, electric force acts on the electrons. Being negatively charged, they start moving from the negative (lower potential) to the positive (higher potential) terminal of the cell, as shown in the figure. Due to the flow of these electrons, the current
starts to flow through the wire.
;;;;;----;;;;;

🔥तारेतून जाणारी विद्युतधारा
(Electric Current)

जर विद्युतवाहक तार विद्युतघटाला जोडलेली
नसेल तर  तारतील मुक्त इलेक्ट्रॉन्स
तारेतील अणूंच्या दरम्यान सर्व दिशांना
मुक्तपणे फिरत असतात.
 परंतु जेव्हा त्या तारेची टोके कोरड्या विद्युत घटासारख्या विद्युत स्रोतास जोडली जातात तेव्हा तारेतील इलेक्ट्रॉन्सवर विभवांतरामुळे विद्युत बल कार्य करते आणि आकृती  मध्ये
दाखवल्याप्रमाणे इलेक्ट्रॉन्स ऋण प्रभारित
असल्याने तारेच्या ऋण टोकाकडून (कमी
विभवाकडून) धन टोकाकडे (जास्त
विभवाकडे) प्रवाहित होतात.
इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळे तारेतून विद्युतधारा
वाहू लागते. इलेक्ट्रॉन्सची ही हालचाल
अनियमित अशा सरासरी चालीने सुरू असते.

÷÷÷÷÷÷===÷÷÷÷

   *माणसांचा संग्रह करणं
 इतकही सोपं नसतं, 
जितकं पुस्तकांचा संग्रह करणं.* 
                 *कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी 
पैशांची गुंतवणूक करावी लागते
 तर माणसांचा संग्रह करण्यासाठी
 भावनांची कदर करावी लागते....*

      *आपला दिवस आनंदी जावो.*🎷

          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आपण तपासले पाहिजे. जो

Practice... Of Chemical Reaction 🎷 1

 Practice... Of Chemical Reaction 🎷 1 Touch the blue link below to join this What's App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇 👉  मा हिती विज्ञानाची 🎷 Practice and discipline/ keep patience are very essential for understanding or learning chemical reactions. In daily life, many natural and man-made chemical reactions occur, but we might not be aware of how to write that chemical reactions. To write a chemical reaction, basic preparation is necessary. First, it's necessary to remember a minimum of one to twenty basic elements. Additionally, knowledge of the symbols for these elements is necessary. 1. Hydrogen (H),  2. Helium (He) 3. Lithium (Li),  4. Beryllium (Be) 5. Boron (B),  6. Carbon (C) 7. Nitrogen (N),  8. Oxygen (O) 9. Fluorine (F),  10. Neon (Ne) 11. Sodium (Na),  12. Magnesium (Mg) 13. Aluminum (Al), 14. Silicon (Si) 15. Phosphorus (P),  16. Sulfur (S) 17. Chlorine (Cl),  18. Argon (Ar) 19. Potassium (K),  20. Calcium (Ca) If we know the proper definitions of some te

अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷

  अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷 1 आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷  😀 रासायनिक अभिक्रिया येण्यासाठी सखोल अभ्यास व संयमाची गरज आहे. दैनंदिन जीवनात निसर्गतः व मानव निर्मित अनेक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. पण रासायनिक अभिक्रिया कशा लिहाव्यात हे आपणास माहीत नसते.  🎻 रासायनिक अभिक्रिया लिहिण्यासाठी पूर्व तयारी ही आवश्यक असते. ⭐ प्रथम आपणास कमीत कमी एक ते वीस मूलद्रव्य पाठ असणे आवश्यक आहे. त्यासोबत त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा आपणास माहित असणे आवश्यक आहे. 1. हायड्रोजन H, 2.हेलियम He  3. लिथियम Li, 4 बेरिलियम Be  5.बोरॉन B  6.कार्बन C ,  7. नायट्रोजन N, 8.ऑक्सिजन, O 9. फ्लोरीन, F   10.निऑन Ne 11.सोडियम, Na  12. मॅग्नेशियम, Mg  13. ॲल्युमिनियम, Al 14.सिलिकॉन, Si  15.फॉस्फरस, P 16. सल्फर (गंधक), S 17. क्लोरीन, F 18. अरगॉन, Ar 19. पोटॅशियम, K 20. कॅल्शियम. Ca यानंतर आपणास काही  व्याख्या माहीत असणे आवश्यक आहे. 1. अणुअंक :- मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉन किंवा  इलेक्ट्रॉन च्या संख्येला अणुअं