मुख्य सामग्रीवर वगळा

9 th Science,series, Current Electricity, 4, 9 वी विज्ञान, धाराविद्युत, एकसर जोडणी 4.

 9 th Science, Current Electricity 4, 9 वी विज्ञान, धाराविद्युत 4.

📝 आपल्या what's App समुहात सामील होण्यासाठी खालील👇 लिंक🔗 ला स्पर्श करा. 
👉 माहिती विज्ञानाची 🎷

( नायक्रोमचे तीन मुख्य प्रकार आहेत. नायक्रोमधील घटक मूलद्रव्यांचे प्रमाण, मैंगनीज 1.5%, निकेल 75% ते 78%, क्रोमियम 20% ते 23% आणि अत्यंत कमी प्रमाणात लोह )

🎷 ओहमच्या नियमाचा प्रयोगाच्या साहाय्याने पडताळा घेणे.

  1. XY या नायक्रोमची तार रोध म्हणून वापरली.
  2. दिलेल्या चार विद्युत घटांपैकी एक विद्युत घट जोडला. (जोडणी ‘a’ प्रमाणे) 
  3. ॲमीटर व व्होल्टमीटरची वाचने घेवून नोंद घेतली.
  4. यानंतर क्रमाक्रमाने एक एक अधिक घट जोडत जायचे आहेत. (जोडणी ‘b’, ‘c’, ‘d’ प्रमाणे) व यांची  पण वाचने (readings) घेतली. आणि निरीक्षण तक्त्यात नोंद घेतली.
  5. V/ I च्या किंमती काढल्या. ती स्थिर असते.

विभवांतर व विद्युतधारा यांचा आलेख काढल्यास तो सरळ रेषेत येतो.

 


++++++---++++++

🪘 (आपण आता जो प्रश्न शिकणार आहोत तो संपूर्ण प्रश्न जवळपास आकृतीवरून आपल्याला लक्षात ठेवता येतो. त्यामुळे या प्रश्नासाठी पाठांतराची गरज पडत नाही केवळ आकृती जर आपल्याला समजली तर आकृतीवरून प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित लिहिता येते.)
( रोधाच्या R एकसर जोडनीला इंग्रजीत series हा शब्द असल्याने  हे वापरतात.)
(खालील प्रश्नासाठी आकृतीमध्ये उत्तरास अपेक्षित योग्य ते बदल केले आहेत, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर लक्षात राहायला मदत होईल.)
 

(नामनिर्देशित सुबक आकृतीला दोन गुण असतात. खालील आकृतीत नामनिर्देश नाही, त्यामुळे आकृतीला एकच गुण मिळेल म्हणून आकृती सोबत नामनिर्देशन केलेले आहे.)
🚧 रोधांची एकसर जोडणी (Resistors in Series)

रोधांची एकसर जोडणी

R1, R2, R3 दिलेले रोध 
V -  होल्ट मिटर 
A -  ॲमीटर 
K - कळ 
E - बॅटरी 
व्याख्या:- दिलेले रोध जेव्हा एका पाठोपाठ एक जोडले जातात, त्यावेळेस त्या रोधाच्या जोडणीला एकसर जोडणी असे म्हणतात.
आकृतीत दाखवल्याप्रमाणे R1, R2, व R3, रोध P व Q बिंदूत एकसर जोडणीत जोडले आहेत.
रोधांना एकसर जोडणीत ॲमिटर (A), की / कळ ( K ), बॅटरी (E) जोडले आहेत.
रोधामधून वाहणारी विद्युत धारा ॲमीटर ने मोजली जाते.
रोधांच्या एकसर जोडणीती प्रत्येक रोधातून समान विद्युत धारा I एवढी वाहते.
R1, R2 आणि R3 या रोधात क्रमशः V1, V2, आणि V3 विभवांतर प्रयुक्त होते.
C व D बिंदूतील परिणामी विभवांतर (V) व्होल्टमीटरने मोजले जाते.
∴ V = V1 + V2 + V3 --------(1)
समजा Rs हा बिंदू C व D मधील तिन्ही
रोधांचा परिणामी रोध असेल तर ओहमच्या नियमानुसार
एकूण विभवांतर
  V = I Rs
V1 = I R1,
 V2 = I R2
आणि
 V3 = I R3
 V = I Rs

 या किंमती समीकरण (1) मध्ये ठेऊन 
  I Rs = I R1+ I R2+ I R3
  Rs = R1+ R2+ R3 (संपूर्ण समीकरणाला I ने भागुन)
जर n रोध एकसर जोडणीत जोडलेले असतील तर,
Rs = R1+ R2+ R3+-------+ Rn
_____________

(पुढील प्रश्न हा संपूर्णतः आकृतीवरून लक्षात ठेवता येतो. कंसात हिंट दिलेली आहे. त्यामुळे वाक्यरचना पाठ करण्याची गरज नाही)

✈️ जर दिलेले रोध एकसर जोडणीत जोडलेले असतील तर, काय काय निष्कर्ष काढता येतो?
उत्तर:-
  1.  प्रत्येक रोधातून समान I विद्युतधारा वाहते.
  2. रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध Rs हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजेइतका असतो.(Rs = R1+ R2+ R3)
  3. जोडणीच्या दोन टोकांतील विभवांतर (V)हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतरांच्या बेरजेइतके असते. (V = V1 + V2 + V3)
  4. रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध Rs हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो.(Rs > R1, R2, R3, ----Rn)
  5.  ही जोडणी परिपथातील रोध Rs वाढवण्यासाठी वापरतात.
---₹₹---

(Nichrome is an alloy of Manganese 1.5%, Nickel 75% to 78%, Chromium 20% to 23%, and a little percentage of Iron.)
The question which we are going to study now can be memorized almost from the diagram. So, there is no need of recitation for this question, only if we understand the figure, then it is easy to answer the question from the figure.)
(For the question below, the diagram has been modified to suit the answer, so it will help you remember the answer to the question.)

🎻 Experimental proof of Ohm’s law:-
  1. Use the nichrome wire XY as the resistance connect one of the 4 cells as shown in the figure above.
  2. Take readings of ammeter A, and voltmeter V and enter them in the table 
  3. Now add the rest of the cells one by one as shown in figures (b, c, and d).
  4. Enter the readings in the table for each case.
  5. Determine the values for each case.

Draw a graph between the current and potential differences.

The current and potential differences graph is a straight-line .

####-----###

🔥   Resistors in series

Resistors in series

R1, R2, R3 Given Resistors 
V - voltmeter
A - Ammeter 
K - key
E - battery

Definition:- when given registors are connected one after another in a single line that connection is called as series.
The three Registors R1, R2, & R3,
are connected in series in the circuit.
The given registors are connected in P and Q point. 
Ammeter, key and battery are connected in series to the registor.
Electric current is measured by ammeter.
In series arrangement, the same current I flows through each registor.
In R1, R2 & R3, V1, V2, & V3 potential difference is produced respectively. 
Potential difference produced between C and D is V.
∴ V = V1 + V2 + V3 --------(1)
If RS (S for series) is the effective resistance between C and D, then, according to Ohm’s
law,
V = I Rs

V1 = I R1,
V2 = I R2 and
V3 = I R3
Substituting 
all these values in equation (1) we get
I Rs = I R1+ I R2+ I R3
   Rs = R1+ R2+ R3 
( dividing I to the equation)
If n resistors are connected in series then,
Rs = R1+ R2+ R3+-------+ Rn

''''''''------'''''''
If resistors are connected in series, what can be concluded? 
 Ans:-
  1. The same current (I) flows through each resistor.
  2. The effective resistance of the resistors is equal to the sum of their individual resistances.(Rs = R1+ R2+ R3).
  3. The potential difference between the two extremes of the arrangement is equal to the sum of the potential differences resistors across individual. (V = V1 + V2 + V3)
  4. The effective resistance is larger than each of the individual resistances.(Rs > R1, R2, R3, ----Rn)
  5. This arrangement is used to increase the resistance in a circuit.

*🙏 सुमधुर स्नेह वंदन।🙏*
*त्याग स्नेह से श्रेष्ठ है,*
*चरित्र सुंदरता से श्रेष्ठ है,*
*मानवता सम्पत्ति से श्रेष्ठ है 
परंतु परस्पर सम्बन्धों को 
जीवित रखने से अधिक 
कुछ भी श्रेष्ठ नहीं।*
*🙏आपका हर दिन 
मंगलमय और सुखमय हो।🙏*



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आप...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.