मुख्य सामग्रीवर वगळा

9 th Science, Current Electricity 3, 9 वी विज्ञान, धाराविद्युत 3.

 

9 th Science, Current Electricity 3, 9 वी विज्ञान, धाराविद्युत 3.


📝 आपल्या what's App समुहात सामील होण्यासाठी खालील👇 लिंक🔗 ला स्पर्श करा. 

👉 माहिती विज्ञानाची 🎷


🪘 वाहकाचा रोध व रोधकता (Resistance and Resistivity)

वरील आकृती  प्रमाणे वाहकात खूप मोठ्या प्रमाणात मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात. हे मुक्त इलेक्ट्रान्स सातत्याने यादृच्छिक गतीत (इकडे तिकडे कोणत्याही दिशेला.) असतात. जर वाहकाच्या दोन टोकांमध्ये विभवांतर प्रयुक्त केले तर हे इलेक्ट्रॉन्स कमी विभव असलेल्या टोकाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडे जाऊ लागतात.अशा गतिमान प्रकारच्या इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहामुळे विद्युतधारा निर्माण होते

रोध:-  गतिमान इलेक्ट्रॉन्स त्यांच्या मार्गात येणाऱ्या अणूंवर किंवा आयनांवर (Cu^2+, Al^3+) आदळतात. अशा प्रकारच्या आघातामुळे इलेक्ट्रॉन्सच्या गतीला अडथळा होतो व विद्युतधारेस विरोध होतो. या विरोधालाच वाहकाचा रोध (R) असे म्हणतात.

🎻 Resistance and resistivity of a conductor

Ans:- 

As shown in above figure, there are a large number of free electrons e^- in a conductor. Electrons are constantly in random motion. When a potential difference is applied between the two ends of the conductor, these electrons start moving from the end at lower potential to the end at higher potential. The motion of the electrons causes the flow

of current. 

Resistance:- Moving electrons strike the atoms and ions which lie along their path. Such collisions cause barrier /  hindrance to the flow of electrons and oppose the current. This hindrance is called the resistance of the conductor.


🅿️ रोधकता

विशिष्ट तापमानास वाहकाचा रोध R हा वाहकपदार्थ (Material), वाहकाची लांबी (L) व काटछेदी क्षेत्रफळ A या गोष्टींवर अवलंबून असतो.

जर वाहकाचा रोध R असेल तर

रोध हा लांबीशी समानुपाती असतो

R ∝ L

रोधा हा काटछेदी क्षेत्रफळाशी व्यस्तानुपाती असतो

  R ∝ 1 / A

 ∴ R  ∝ L / A

  R =  ρ L / A (rho, ρ)

या ठिकाणी ρ हा समानुपातता स्थिरांक आहे. या स्थिरांकास वाहकपदार्थाची ‘रोधकता’ (Resistivity) म्हणतात.

एकक:- SI पद्धतीत रोधकतेचे एकक ओहम मीटर (Ω m) आहे. रोधकता हा पदार्थाचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असून वेगवेगळ्या

पदार्थांची रोधकता ही भिन्न असते.

🚧

Resistivity

At a given temperature, the resistance (R) of a conductor depends on its length (L), area of cross-section (A) and the material it is made of.

If the resistance of a conductor is R, then

Resistance is directly proportional to the length of wire.

R ∝ L

Resistances is  inversely proportional to the area of cross section of wire.

R ∝ 1 / A

∴  R ∝ L / A

R = ρ L / A (rho , ρ)

ρ is the constant of proportionality and is called the resistivity of the material. 

Unit:- The unit of resistivity in SI units is Ohm metre (Ωm). Resistivity is a specific property of a material and different materials have different resistivity.


🥁 विद्युत परिपथ (Electric Circuit)

विद्युतघटाच्या दोन्ही अग्रांमध्ये जोडलेल्या

वाहक तारा आणि इतर रोध यामधून वाहणाऱ्या विद्युतधारेचा सलग मार्ग म्हणजे विद्युत परिपथ होय.

🔋Electric circuit

A continuous path of an electric

current through conducting wires connected to the two ends of a cell and other resistances is called an electric circuit.


🪂 खालील चित्रांमध्येकाय चूक आहे ते शोधा.


उत्तर:- 

A आणि B:-  आकृती A व B मधील विद्युत दिवा प्रज्वलित आहे. परिपथ पूर्ण नसताना विद्युत दिवा प्रज्वलित होऊ शकत नाही.

C:- परिपथ पूर्ण असतानाही विद्युत दिवा प्रज्वलित नाही, हे चुकीचे आहे. 

D:- रबर हे विसंवाहक आहे, त्यामुळे बल्ब प्रज्वलित होणे शक्य नाही, हे चुकीचे आहे.

🎷Point out the mistakes in the figure below 👇

Ans:- 

A & B :- In figure A and B though the circuit is incomplete the bulb glows, this is not possible.

C :- In figure C though the circuit is complete, the bulb does not glow.

D:- in figure D, rubber insulator is used and still the bulb glows , this is not possible. 

These are the mistakes in above figure.

 

👇खालील चित्रात B, C, D मध्ये दिवे का पेटत नाहीत? कारण स्पष्ट करा.


उत्तर:- B, C, D  या चित्रात विद्युत वहनासाठी परिपथ पूर्ण झालेला नाही, त्यामुळे विद्युत दिवा पेटत नाही.
🔥 Why are the bulbs in Figures B, C and D below not lighting up ? 
Ans:-

There is no continuous conducting path for the path of electric current in figs. B, C and D.


😎 वाहक : ज्या पदार्थांची रोधकता खूप कमी असते त्यांना वाहक असे म्हणतात. यांच्यातून सहजतेने विद्युतधारा वाहू शकते.

उदा. तांबे, ॲल्युमिनियम, सोने, चांदी., इत्यादी.

Conductors : Those substances which have very low resistance are called conductors.

Current can flow easily through such materials. 

Ex. Copper, aluminium, gold, silver, etc.,

🪘 विसंवाहक : ज्या पदार्थांची रोधकता खूप जास्त असते, म्हणजेच ज्याच्यातून विद्युतधारा वाहूच शकत नाही अशा पदार्थांना विसंवाहक म्हणतात. 

उदा. रबर, प्लास्टिक, काच, कागद, लाकूड, इत्यादी. 

🌚 Insulators : Those substances which have extremely high resistance and through which

current cannot flow are called insulators. 

Ex. Rubber, plastic,paper,glass, wood, etc,. 




                *निर्णय व जबाबदारी या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.*
             *लग्नाचा निर्णय व संसाराची जबाबदारी,* 
               *नोकरीचा निर्णय व नोकरीत टिकून राहण्याची जबाबदारी.* 
              *व्यवसायाचा निर्णय व तो चालवण्याची जबाबदारी.*
              *घर बांधण्याचा निर्णय व सर्वांना सांभाळून घेण्याची जबाबदारी. यांतील गफलत बऱ्याचदा लक्षात येत नाही.*

     *आपला दिवस आनंदी जावो.*🎷

        


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आपण तपासले पाहिजे. जो

Practice... Of Chemical Reaction 🎷 1

 Practice... Of Chemical Reaction 🎷 1 Touch the blue link below to join this What's App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇 👉  मा हिती विज्ञानाची 🎷 Practice and discipline/ keep patience are very essential for understanding or learning chemical reactions. In daily life, many natural and man-made chemical reactions occur, but we might not be aware of how to write that chemical reactions. To write a chemical reaction, basic preparation is necessary. First, it's necessary to remember a minimum of one to twenty basic elements. Additionally, knowledge of the symbols for these elements is necessary. 1. Hydrogen (H),  2. Helium (He) 3. Lithium (Li),  4. Beryllium (Be) 5. Boron (B),  6. Carbon (C) 7. Nitrogen (N),  8. Oxygen (O) 9. Fluorine (F),  10. Neon (Ne) 11. Sodium (Na),  12. Magnesium (Mg) 13. Aluminum (Al), 14. Silicon (Si) 15. Phosphorus (P),  16. Sulfur (S) 17. Chlorine (Cl),  18. Argon (Ar) 19. Potassium (K),  20. Calcium (Ca) If we know the proper definitions of some te

अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷

  अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷 1 आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷  😀 रासायनिक अभिक्रिया येण्यासाठी सखोल अभ्यास व संयमाची गरज आहे. दैनंदिन जीवनात निसर्गतः व मानव निर्मित अनेक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. पण रासायनिक अभिक्रिया कशा लिहाव्यात हे आपणास माहीत नसते.  🎻 रासायनिक अभिक्रिया लिहिण्यासाठी पूर्व तयारी ही आवश्यक असते. ⭐ प्रथम आपणास कमीत कमी एक ते वीस मूलद्रव्य पाठ असणे आवश्यक आहे. त्यासोबत त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा आपणास माहित असणे आवश्यक आहे. 1. हायड्रोजन H, 2.हेलियम He  3. लिथियम Li, 4 बेरिलियम Be  5.बोरॉन B  6.कार्बन C ,  7. नायट्रोजन N, 8.ऑक्सिजन, O 9. फ्लोरीन, F   10.निऑन Ne 11.सोडियम, Na  12. मॅग्नेशियम, Mg  13. ॲल्युमिनियम, Al 14.सिलिकॉन, Si  15.फॉस्फरस, P 16. सल्फर (गंधक), S 17. क्लोरीन, F 18. अरगॉन, Ar 19. पोटॅशियम, K 20. कॅल्शियम. Ca यानंतर आपणास काही  व्याख्या माहीत असणे आवश्यक आहे. 1. अणुअंक :- मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉन किंवा  इलेक्ट्रॉन च्या संख्येला अणुअं