एकात्मिक पाठ्यपुस्तके🎷
आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇
एकात्मिक पाठ्यपुस्तक म्हणजे विद्यार्थ्याने आवश्यकतेनुसार अध्ययन साहित्य सोबत ठेवणे होय.
एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या पाठ्यपुस्तकांमध्ये सर्व विषयांचा साधारणपणे तीन महिन्यांच्या कालावधीत वर्गात होणाऱ्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसाठी आवश्यक असा आशय समाविष्ट केलेला आहे.
हा लेख लिहिण्यामागील प्रयोजन म्हणजे विद्यार्थी अजूनही 'माझ्या नोंदी' या पानांचा योग्य वापर करत नाही. माझ्या नोंदी या पानांचा योग्य वापर विद्यार्थ्यांनी केला तर अभ्यासात नक्कीच चांगला बदल होईल.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात ‘बालभारती’ ने इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष 2023-24 साठी नव्या स्वरुपात एकात्मिक पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये उपलब्ध करून दिली आहेत.
वहीची पृष्ठे:-
एकात्मिक पाठ्यपुस्तके यावर्षी मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार माध्यमांसाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत लागू करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये विषयनिहाय पाठ, धडे व कविता इत्यादींच्या आवश्यकतेनुसार वहीची पृष्ठे समाविष्ट केलेली आहेत.
पाठ्यपुस्तकातील पृष्ठांचा सुयोग्य वापर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे करावा या संदर्भातील उदबोधन/ मार्गदर्शन सत्र पाठ्यपुस्तक मंडळाने युट्युब live द्वारे उपलब्ध केले आहे. एक (1) नंबरची लिंक पहावी. (पण ही लिंक उघडून रिडायरेक्ट होते)
पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांच्या पृष्ठांचा समावेश केलेला आहे. ही पृष्ठे ‘माझी नोंद’ या शीर्षकाखाली देण्यात आली आहेत. ही सर्व पाठ्यपुस्तके इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकात्मिक पद्धतीने चार भागांत पथदर्शी स्वरूपात प्रकाशित करण्यात आलेली आहेत. या पाठ्यपुस्तकांतील पृष्ठांचा प्रभावी व सुयोग्य वापर होण्याच्या हेतूने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी हे लक्षपूर्वक वाचावे.
'माझी नोंद' या पानांचा वापर, सर्वसाधारणपणे खालील स्वरूपाच्या नोंदी आवश्यकतेनुसार घेण्यासाठी करता येईल.
1. प्रत्येक विदयार्थ्यांच्या ‘माझी नोंद’ यामधील नोंदी समान असण्याचा आग्रह धरू नये. कारण प्रत्येकाची आकलन शक्ती व बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असते.
2. विदयार्थ्यांनी तारीखवार नोंदी कराव्यात.
3. मुद्दे:-
वर्गातील चर्चेदरम्यान उपस्थित झालेले मुद्दे लिहून ठेवण्यासाठी.
4. महत्त्वाचे मुद्दे नोंदवून घेण्यासाठी
5.वर्गात सूचवलेले अधिकचे प्रश्न नोंदवण्यासाठी.
6.काही संदर्भ, वर्तमानपत्रांत विषयांच्या अनुषंगाने आलेली विविध प्रकारची माहिती/ साहित्यांची नोंद घेणे.
7. पाठाच्या अनुषंगाने वर्तमानपत्रे, माध्यमे इत्यादींद्वारे प्रकाशित झालेल्या अवांतर माहितीची पाठ्यपुस्तकांबाहेरील माहिती लिहून ठेवण्यासाठी.
8. पाठ्यपुस्तकांबाहेरील परंतु आशयाला पूरक माहितीची नोंद घेणे. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेदरम्यान उपस्थित झालेले प्रश्न नोंदवून ठेवणे.
9. चित्राकृती, चित्र, आलेख यासारखी माहिती लिहिण्यासाठी
10.आकृत्या काढण्यासाठी
11. पाठाला पूरक मुद्दे लिहून ठेवण्यासाठी
12. कच्चे काम (पेन्सिलने ), सूत्रलेखन, महत्त्वाचे संबोध, गणित सोडवण्याची वेगळी रीत मांडणे, पाढे तयार करणे, पडताळणी करणे इत्यादी.
13. नियम, सूत्रे, घटना, संबंध, घटनाक्रम आकृत्या, ओघतक्ता, संकल्पनाचित्र, मुक्तोत्तरी प्रश्नांची नोंद (Open Ended Question), तुलनात्मक नोंदी, व्यावहारिक अनुभव विश्वातील उदाहरणे, नावीन्यपूर्ण उपक्रमांची नोंद, स्वनिर्मित उदाहरणांची नोंद यामध्ये केला तर शक्ती वाढण्यास मदत होईल.
14. शब्दार्थ, प्रतिशब्द, संकल्पना, पर्यायी शब्द, वाक्प्रचार, जोडशब्द, म्हणी, भाषिक खेळ, भाषिक सौंदर्य असणारी वाक्ये, व्याकरणातील व्याख्या व उदाहरणे, महत्त्वाचे जोडशब्द, विरुद्धार्थी, समानार्थी शब्द, सुविचार, सुभाषित, ब्रीदवाक्ये, भाषिक खेळ, इंग्रजीतील शब्दांचे उच्चारण देवनागरी लिपीमध्ये लिहिणे या सर्व गोष्टी प्रामाणिकपणे झाल्या तर विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता नक्कीच वाढेल.
15. सहसंबंध लावण्यासाठी, महत्त्वाच्या संकल्पना उतरवण्यासाठी, विस्तारित अर्थ नोंदवणे.
16. रेखाकाम, ठसेकाम, चित्रकाम (इयत्ता पहिली ते पाचवीसाठी)
17. विषयाच्या अनुषंगाने विदयार्थ्यांना सूचलेल्या स्वतःच्या उदाहरणांच्या नोंदीसाठी
18. विषय शिकताना इतर विषयाशी आलेल्या सहसंबंधाची नोंद
19. गृहकार्य लिहून घेण्यासाठी
20. विमर्शी (Reflective) किंवा मुद्दयांची
अध्ययन करताना आलेल्या शंका लिहून ठेवण्यासाठी या उपक्रमाचा उद्देश पुढीलप्रमाणे आहे, हे विचारात घेऊन या पानांचा अत्यंत प्रभावी वापर होईल असे पाहावे :-
1.ओझे:-
एकच पाठ्यपुस्तक शाळेत न्यावे लागेल त्यामुळे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होईल.
२.नोदी:-
पाठ्यपुस्तकांचे स्वयंअध्ययन करताना या नोदींचा वापर विद्यार्थ्यांना करता येईल.
3. फलित:-
नोंदीचा वापर त्याला स्वयंअध्ययनासाठी करता येईल, त्यामुळे प्रत्याभरण (Feedback) व दृढीकरण ( Fixation)होईल.
4. नोंदीची सवय:-
विद्यार्थ्यांना स्वत:च्या शब्दांमध्ये स्वतःच्या नोंदी करता येतील व ही सवय त्यांच्या अंगवळणी पडेल.
5. शिक्षकांनी दिलेली उदाहरणे विद्याथ्यांना ‘माझी नोंद’ यामध्ये नोंदवता येतील.
6. विद्यार्थ्याचे स्वत: चे सुलभ संदर्भ साहित्य तयार होईल.
7. स्वतःचे मुद्दे विदयार्थ्यांना काढता येतील.
8. आशयानुसार दिलेल्या विशेष नोंदी करता येतील.
9. अवांतर वाचनातून तयार झालेल्या महत्त्वाच्या नोंदी घेता येतील.
10. पाठाच्या संदर्भात वर्तमानपत्रे, नियतकालिके इत्यादी संदर्भाची माहिती त्या त्या पाठाला जोडून लिहिता येईल.
11. पाठाची शिकलेली सर्व माहिती नोंद घेतलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुन्हा आठवणे सुलभ होईल.
12. अध्यायनाच्या या सवयीचा फायदा त्यांना पुढील इयत्तांमध्ये उपयोगी पडेल.
13. एकाच पाठ्यपुस्तकात सर्व विषय असल्याने विषयांमधील सहसंबंध शोधणे सुलभ होईल.
14. नियोजन
घटक चाचणी व सत्र परीक्षा या संदर्भाने नियोजन करणे सुकर होईल.
15. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पालकांना वर्गात काय शिकवले आहे हे समजेल.
🙏संदर्भ 🙏
*यश मिळवण्यासाठी
कोणत्या मार्गाने जावे,
हे मी सांगू शकणार नाही.*
*पण स्वतःला ओळखून
स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे,
हे शोधणे म्हणजेच
यशाच्या जवळ जाणे होय.*
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा