मुख्य सामग्रीवर वगळा

सर्व पालकांना विनंती 🙏

 

*सर्व पालकांना विनंती* 🙏


आपल्या मुलांना शाळेत विद्यार्थी म्हणूनच पाठवा. नाहीतर मुलं शिक्षकाच्या डोक्यावर बसतील व नंतर भविष्यात बिघडतील व नंतरच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतील म्हणून विचार करा. त्यासाठी...

*काही मुद्दे खालीलप्रमाणे असावेत* 


*1)*केशरचना/Hairstyle:- 

 मुलांच्या केसांची ठेवण व्यवस्थित असावी. केशभूषा साधी असावी.

*2)*बूट 

 पायातील बूट जास्त किमतीचे नसावेत. साधे असावेत. 

*3)*गणवेश

 शालेय गणवेश व्यतिरिक्त इतर ड्रेस वर जास्त खर्च करू नका 

*4)*दप्तर 

 वह्या आणि पुस्तके योग्य तेवढीच घ्या.... 

*5)* उपाधी

दादाचा मुलगा, भाऊचा मुलगा या उपाध्या घरीच ठेवून फक्त विद्यार्थी म्हणूनच शाळेत पाठवून द्या.

*6)*मोबाईल

 अँड्रॉइड मोबाईल पासून मुलांना दुर ठेवा..... 

*7)* लाड व हट्ट

मुलांचे चुकीचे लाड आणि हट्ट पुरवू नका..... 

*8)* मित्र

मुलांचे मित्र तपासा सर्व मित्रांची माहिती करून घ्या.

*9)*शहानिशा 

मुलगा/मुलगी शाळेत जाण्यासाठी घरुन निघतात,खरच शाळेत जातात का याची वरचेवर शिक्षकांना फोन करून शहानिशा करा.

*10)*व्यसन 

 व्यसनाधीन तेचं वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या मुलाबद्दल सतर्क रहा.

 *11)*उणीव

तुमची क्षमता असली तरी आपल्याकडे काहीतरी कमी आहे, उणीव आहे हे त्याच्या लक्षात येऊ द्या*...... 

*12)* पैशाचे महत्त्व त्याला कळू द्या.... 

*13)* शाळेत पाठवताना त्याच्याकडे एकही रूपया देऊ नका अगर .गरजे इतकेच पैसे देने.... 

*14)*संस्कार 

 आपल्या मुलांना शिक्षीत बनवण्या सोबत सुशिक्षित बनवण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करा.... 

*15)*अभ्यास

 24 तासा पैकी कमीत कमी एक तास मुलांसोबत बसून अभ्यास घ्या.... 

*16)* विचारसरणी

आपली मुलं चुकीच्या विचारसरणीच्या सहवासात जात असतील तर त्यांना वेळीच त्या सहवासातून बाजूला घ्या... जास्तीत जास्त तुमच्या सहवासात ठेवा..... 

*17)*शिक्षक भेट

 महिन्यातून कमीत कमी दोन वेळा शिक्षकांना भेटायला नक्की जा.... 

*18)* सहकार्य

तुमच्या सहकार्याशिवाय शिक्षक मुलांमध्ये बदल घडवू शकत नाहीत... 

*19)* जबाबदारी

मुलांना एकदा शाळेत पाठवले की आपली जबाबदारी संपली असे समजू नका... 

*20)* मूल्य संस्कार

आपल्या मुलांना शिक्षक योग्य संस्कार आणि शिक्षण देतात की नाही ते तपासून पाहत जा आणि नसेल तर ते शिक्षकांच्या लक्षात आणून द्या🙏...

*21)* आदर

शिक्षकांचा मान सन्मान करायला आपल्या पाल्याला सांगा आणि ते कृतीतून दाखवून द्या..

22) वाद

 मुलांच्या शिक्षकाविषयी तक्रारी ऐकून शिक्षकांशी विनाकारण वाद घालू नका

23) खापर फोडणे 

 घरचे व रस्त्याने जाता येता मुलांचे होणारे वाद त्याचा शिक्षकावर ठपका ठेवू नका

२4) तुमची मुलं  ध चा म करून शिक्षकाविषयी घरच्यांना काहीतरी सांगत असतात. तुमची खूप चलती आहे, पण विनाकारण शिक्षकाला काही बोलू नका,भांडू नका.शिक्षक अजून शिक्षकच आहे.

25) विद्यार्थी व पालकांनी शिक्षकांशी तुमचे जेवढे होतील तेवढे प्रेमाचे संबंध ठेवता येतील तेवढा अधिकाधिक प्रेम असू द्या. कारण मुलांना शिक्षक किंवा आईच घडवू शकते लक्षात ठेवा.

26) मानसन्मान 

 *पूर्वी विद्यार्थ्यांना योग्य शिक्षा होती म्हणून ती पिढी सुधारली* आता शिक्षकांनी थोडे जरी काही केले तरी पालक शिक्षकांशी वाद घालतात व आमची खूप ओळखी आहे.आमची चलती आहे .असा शिक्षकाला दम देतात. तसे करू नका शिक्षकांना शिक्षकाचा योग्य तो मान द्या

27) उद्देश

तुमची मुलं सुधारतील हा शिक्षकाचा प्रामाणिक उद्देश असतो. कृपया गैरसमज करून घेऊ नका .नाहीतर भविष्यात पश्चाताप करावा लागेल.

*तुम्ही वरील नियम नाही पाळले तर तुमची मुले घडणार हे निश्चित आहे, वरील नियम नाही पाळले तर मुलं निश्चितच बिघडणार हे पण निश्चित आहे*

🙏🙏🙏🙏🙏

 *चला तर मग आपण आपल्या देशाचे एक चांगले दक्ष व सुसंस्कृत नागरिक घडवूया या.....*


*आपल्या मुलांना फक्त आई🙏 किंवा शिक्षकच🥁 घडू शकतात हे लक्षात ठेवा*


🙏ज्यांनी हे संकलित करून लिहिले, त्या लेखकास समर्पित 👏🙏




   _*आयुष्य जगताना आई, वडील व शिक्षक नावाची भीती कायम असली पाहिजे, 

ज्या दिवशी आपण आईवडिल व शिक्षकांना घाबरणार नाही

 तिथून पुढे आयुष्याची

 घसरण चालू होते.*_

🎷

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...

12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.

12  वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल २०२६ संदर्भात मोठी अपडेट! डिजीलॉकरवर रिझल्ट लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत  बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होतो. निकाल ऑनलाइन कसा तपासायचा? निकाल जाहीर झाल्यावर  विद्यार्थी खालील 👇 अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.... 👉   🌈    mahahsscboard.in १. mahresult.nic.in २.  hscresult.mkcl.org ३.  results.digilocker.gov.in ४.  mahahsscboard.in निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव. स्ट्रीम वाईज निकाल (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञ...