मुख्य सामग्रीवर वगळा

9th Science, laws of Motion 1, 9 वी विज्ञान, गतीचे नियम 1

 

9th Science, laws of Motion 1

9 वी विज्ञान, गतीचे नियम 1

आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇


🌻  शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अभ्यासा हा अखंड असावा लागतो.
For a learner, learning has to be continuous.

🎻 इयत्ता नववीचा अभ्यासक्रम हा इयत्ता अकरावी साठी पूरक आहे. त्यामुळे इयत्ता नववी मध्ये जर आपण लक्षपूर्वक अभ्यास केला तर इयत्ता अकरावी मध्ये शिकत असताना पाया तयार असल्यामुळे आपल्याला लवकर समजते. 
The class IX syllabus is supplementary to Class XI. So if we study carefully in class 9th then we understand early as the foundation is ready while studying in class 11th. 

🪘 तहान लागल्यावर विहीर खोदणे इष्ट ठरेल का?
उद्या घडणाऱ्या गोष्टींसाठी तुम्हाला आज योजना तयार करण्याची आवश्यकता नक्की आहे .
You definitely need to plan today for things that happen tomorrow.

🥁 सर्वप्रथम गतीची व्याख्या पाहू.
First, let's look at the definition of speed.
 
🌻 व्याख्या ही आपणास खूप मार्गदर्शक असते. त्यामुळे पाठांतरालाही खूप छान मदत होते.
The definition is very much a guide for us. The definition is also helpful in the recitation.
व्याख्या गती:-

🦜 वस्तू गतिमान आहे असे केव्हा म्हणतात?
जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात. 
Definition of motion:-
The body is said to be in motion if it changes its position concerning its surroundings.

🦢 व्याख्या अंतर:-
अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय.
Definition distance:-
Distance is the length of the actual path followed by a body between the points under consideration.
अंतर ही अदिश राशी आहे.
Distances scalar quantity
अंतर कधीही शून्य नसते.
Distance is never zero.


✈️ व्याख्या विस्थापन:-
विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय.
 Definition displacement:-
Displacement is the shortest distance from the initial point to the final point of the movement of a body.
विस्थापन ही सदिश राशी आहे.
Displacement is a vector quantity. 
विस्थापन शून्य असू शकते.
Displacement can be zero.
वरील मुद्द्यांचा वापर करून अंतर व विस्थापन हा फरक आपण लिहू शकतो.

🐦 Using the above points we can write the difference between distance and displacement.

 🎻 आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे स्वराली दररोज पहाटे 210 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाच्या कडेने फेऱ्या मारते. तिने R या बिंदू पासून चालण्यास सुरूवात करून एक फेरी पूर्ण केल्यास तिने कापलेले अंतर व तिचे झालेले विस्थापन किती ?

1. वर्तुळाकार मैदानाच्या कडेने एक फेरी = वर्तुळाचा परीघ 
 = 2πr
 = 2 × 22/7 × 210
 = 2 × 22 × 30
 = 1320 m

स्वरालीने R बिंदूपासून एक फेरी पूर्ण केल्यास तिने कापलेले अंतर 1320 m.

2. स्वरालीचे झालेले विस्थापन शून्य मीटर. (कारण आरंभ व अंतिम बिंदू यामधील अंतर शून्य मीटर आहे.)

🌠  Every morning, Swaralee walks round the edge of a circular field having a radius of 210 m. As shown in Fig. if she starts from the point R and takes one round, how much distance has she walked and what is her displacement?

Ans. 
The distance covered by Swaralee in one round = circumference of the circle 
  = 2 × π × 210 m 
  = 2× 22/7 × 210 m
  =  2 × 22 × 30 m
  = 1320 m
 
displacement of Swaralee
 = zero metre. ( Displacement is the shortest distance from the initial point to the final point of the movement of a body. )




🎆  आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे समजा एक गाडी R या बिंदूपासून निघून S या ठिकाणापर्यंत गेली व पुन्हा R या ठिकाणी परत आली. तर तिने कापलेले अंतर व तिचे झालेले विस्थापन किती ?
गाडीने कापलेले अंतर = 90 m + 90 m
                             = 180 m

 गाडीचे झालेले विस्थापन शून्य मीटर.

💐 If a car, starting from point R, goes to point S and then returns to point R, how much distance has it travelled and what is its displacement?
Ans:-
Distance  travelled= 90 m + 90 m
                                    = 180 m


😎 समजा एक गाडी A या बिंदूपासून B या बिंदू पर्यंत गेली, त्यानंतर B या बिंदूपासून C या बिंदूपर्यंत त्या गाडीने मार्गक्रमण केले. तर गाडीने कापलेले अंतर किती? गाडीचे झालेले विस्थापन किती? 

उत्तर:-
 गाडीने कापलेले एकूण अंतर = 4 m + 3 m
                                       = 7 m.

गाडीचे झालेले विस्थापन = 5 m.
 (विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय. पायथागोरसचा प्रमेय वापरून.)

😎 Suppose a vehicle travels from point A to point B, then from point B to point C. So what is the distance covered by the vehicle ? What is the displacement of the vehicle 
Ans:-
The distance covered by the vehicle = 4 m + 3 m
               = 7 m
The displacement of the vehicle = 5 m
(By using Pythagoras theorem ge)


🍓 अदिश राशि:-
ज्या राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाची गरज असते त्यांना अदिश राशी असे म्हणतात.
उदा:- वस्तुमान, लांबी, वेळ, चाल, अंतर इत्यादी.
Scalar quantity:-
Those physical quantities which have only magnitude are considered as scalar quantities. e.g., mass, length, time, speed, etc. 

😀 सदिश राशी:-
ज्या राशी व्यक्त करण्यासाठी दिशा व परिमाण या दोघांचीही गरज असते त्या राशींना सदिश राशी म्हणतात.
उदा:-विस्थापन, वेग, त्वरण, बल
Vector quantity:-
The physical quantity that has both directions as well as magnitude is called a vector quantity.
Ex. Displacement, velocity, acceleration, force, etc.

🎷 हे नेहमी लक्षात ठेवा.
  1.  चाल आणि वेग यांची एकके सारखीच असतात. 
  2. चाल आणि वेग यांची एसआय (SI) पद्धतीतील एकके m/s व सीजीएस (CGS) पद्धतीत cm/s आहेत.
  3.  चाल अतराशी संबंधित आहे तर वेग विस्थापनाशी संबंधित आहे.
  4.  गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांची मूल्य सारखेच असते. 
  5.  एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला वेग म्हणतात.

🍦Always remember
  1.  The units of speed and velocity are the same. 
  2. In the SI system, the unit is m/s while in the CGS system, it is cm/s.
  3.  Speed is related to distance while velocity is related to displacement. 
  4.  If the motion is along a straight line, the values of speed and velocity are the same, otherwise, they can be different.
  5.  Velocity is the displacement that occurs in unit time.

🥁 व्याख्या वेग:-
  1. एखाद्या वस्तूने एक कालावधीत एकाच दिशेने कापलेल्या अंतरास वेग म्हणतात.
  2. एक कालावधी म्हणजे एक सेकंद, एक मिनिट, एक तास, एक वर्ष इत्यादी असू शकतो.
Definition velocity:-
  1. The distance traveled in one direction by an object in a unit of time is called its velocity.
  2. Here unit time can be one second, one minute, one hour, 1 year, etc.

🎷 हे नेहमी लक्षात ठेवा.
  1. चालीचे मापन अंतर/काल याप्रमाणे सर्वप्रथम गॅलिलिओने केले होते. 
  2. हवेतील ध्वनीची चाल 343.2 m/s आहे.
  3.  प्रकाशाची निर्मातातील चाल 3 x 10^8 m/s इतकी आहे. 
  4. पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल 29770 m/s (29.77 km/s)आहे.
  5. सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 8.3 मिनिट लागतात.


Always remember
  1. The first scientist to measure speed as the distance/time was Galileo
  2. The speed of sound in dry air is 343.2 m/s.
  3. The speed of light in a vacuum is about 3 x 10^8 m/s. 
  4. The speed of revolution of the earth around the sun is about 29770 m/s (29.77 km/s).
  5. Sunlight takes about 8.3 minutes to reach the Earth.


     *बऱ्याचदा पाहिजे तसं जगता येत नाही.*

             *कारण...*

             *आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे गहाण ठेवावे लागतात.*


         *आपला दिवस आनंदी जावो.*🎷

  



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

10 th,Sci.I, Periodic classification of elements I.

10 th, Sci.I,Periodic classification of elements I.   ▬▬▬۩۞۩▬▬▬ आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇 माहिती विज्ञानाची 🎷 ▬▬▬۩۞۩▬▬▬ As we grown up, we forget the definition and some terms or do not fully/ totally understand the exact meaning of those words. Today's main objective is to increase basic chemistry knowledge with gradual study . In science meaning of unchangeable terms are useful in day today life .  🎻  Definition of element :- Element is a substance that cannot be broken down into simpler substances by chemical means. Element is also defined as a pure substance made up of only one kind of atom which can't be split up into two or more substance. Ex. Silver Ag ,   Chlorine Cl ~*◄⏤͟͞✥➳  🪷 Atom :- An atom is the basic building block. Atom is the smallest unit of matter that has the characteristic properties of an element. In the nucleus of atom positively charged protons p and ne...

10 वी, भाग 1, गुरुत्वकर्षण. मराठी .,10 th, Part 1, Gravitation Exercise in Marathi 🎷

  १० वी, भाग १, गुरुत्वकर्षण. मराठी .🎷 व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा ( माफ करा🙏 फॉन्ट प्रॉब्लेम मुळे हा स्वाध्याय खराब झाला आहे. हा स्वाध्याय दुरुस्तीसाठी सध्या आहे. कृपया सध्या पाहू नये) न्यूटनचा वैश्विक गुरुत्वकर्षणाचा सिद्धांत. न्यूटनचा गुरुत्वकर्षणाचा सार्वत्रिक नियम लिहा. अवकाश पृथ्वीच्या स्थानावर g चे मूल्य उताराची किंमत.....% ने असते.  अंतर स्थानात g चे मूल्य  पृथ्वीला घडवण्यासाठी त्याचे मूल्य फक्त........ % कमी असते. ....... हे परवर्तक दुर्बिण तयार करणारे आधी होते. ...........  हे परवर्तक दुर्बिणी बनवणारे आधी होते. अभिकेंद्री बल म्हणजे काय? केंद्राभिमुख प्रदान करा. SI एक प्रणाली G चे एक ...... आहे. SI एककात जीचे मूल्य ........ आहे. ..... म्हणजे विद्युत चुंबकीय तरंग. ...... हा एक प्रकार आहे ज्याला इलेक्ट्रोमॅगटिक वेव्ह्ने म्हणतात. ......... म्हणजे एखाद्या शंकूला एक प्रतलाने तिरके छेदले तयार होणार आकृती. ........ म्हणजे शंकूला कलत्या प्रतलाने कापल्यावर  वक्र. ग्रहाची इच्छाही........ आणि सूर्याचा कक्ष एका नाभीवर असतो. ज्याच्या एका...