मुख्य सामग्रीवर वगळा

9th Science, laws of Motion-5, 9 वी विज्ञान, गतीचे नियम-5

9th Science, laws of Motion-5, 9 वी विज्ञान, गतीचे नियम-5 


आपल्या  What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या लिंकला स्पर्श करा.🙏👇

संवेग अक्षय्यतेचा सिद्धांत (Law of Conservation of Momentum):- 
  

समजा, A या वस्तूचे वस्तुमान m1 असून तिचा सुरुवातीचा वेग u1 आहे. तसेच B या वस्तूचे वस्तुमान m2 असून तिचा सुरुवातीचा वेग u2 आहे.
संवेगाच्या सूत्रानुसार, A वस्तूचा सुरुवातीचा संवेग = m1 u1
व 
B वस्तूचा सुरुवातीचा संवेग = m2 u2
  ज्यावेळी या दोन्ही वस्तू एकमेकांवरती आदळतील त्या वेळी A वस्तूवर B वस्तूमुळे F1 बल प्रयुक्त होऊन A वस्तू त्वरणीत झाल्यामुळे तिचा वेग v1 होतो.
A वस्तूचा आघाता नंतरचा संवेग = m1v1
  न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमानुसार, A वस्तू देखील B वस्तूवर समान बल विरुद्ध दिशेनेप्रयुक्त करते त्यावेळी तिच्या संवेगात बदल होतो. समजा तिचा वेग v2 झाल्यास
B वस्तूचा आघातानंतरचा संवेग = m2v2 

जर B वस्तूवर F2 बल प्रयुक्त होत असेल तर
F2 = - F1 (विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त होत असल्यामुळे ते ऋण चिन्हाने दर्शवले आहे.)
 m2 a2 = - m1 a1 … कारण F = ma
a = v - u / t

m2 (v2 - u2) / t =  -  m1 ( v1 - u1 )/t
कारण a = (v-u)/t
 m2 v2 - m2 u2= - m1 v1+ m1 u1
(m2v2+ m1v1 ) = (m1 u1+m2u2)
एकूण अंतिम संवेगाचे परिमाण = एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिमाण
  म्हणून जर दोन वस्तूंवर बाह्य बल कार्य करत नसेल तर त्यांचा सुरुवातीचा एकूण संवेग व अंतिम एकूण संवेग सारखाच असतो. वस्तूंची संख्या कितीही असली तरी त्यासाठी हे विधान सत्य असते.
‘दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो. तो बदलत नाही.’यास संवेग अक्षय्यतेचा सिद्धांत म्हणतात.

🎆 Law of conservation of momentum

Suppose an object A has mass m1
 and its initial velocity is u1.
An object B has mass m2 and
initial velocity u2.

According to the formula for momentum, the initial momentum of A is m1u1 and that of B is m2u2.
 
Suppose these two objects collide. Let the force on A due to B be F1. 
This force will cause acceleration in A and its velocity will become v1.
The momentum of A after collision = m1v1
According to Newton’s third law of motion, A also exerts an equal force on B but in the opposite direction. This will cause a change in the momentum of B. If its velocity after the collision is v2
 The momentum of B after collision = m2 v2.
 If F2 is the force that acts on object B, 
F2 = - F1  (It is indicated by a negative sign because the force is acting in the opposite direction.) 

m2 a 2 = - m1 a1 …  (F= ma)

 a = v - u / t
m 2 ( v2 - u2 )/ t = - m1 (v1 - u1 )/ t

 m2 v2 - m2 u2 = - m1 v1 + m1u1
 (m2 v2 + m1 v1 ) =
 (m1 u1 + m2u2)
The magnitude of total final momentum = The magnitude of total initial momentum.
Thus, if no external force is acting on two objects, then their total initial momentum is
equal to their total final momentum. This statement is true for any number of objects. 

आता काही या धड्यावरील उदाहरणे पाहू.
उदा. 1 : एका तोफेचे वस्तुमान 300 kg असून त्यातून तोफगोळा Alternative तोफ 0.25 m/s वेगाने प्रतिक्षेपित होते, तर तोफेचा संवेग काढा.
दिलेले :
 तोफेचे वस्तुमान m = 300 kg ,
 तोफेचा प्रतिक्षेप वेग v = 0.25 m/s
संवेग = ? kg m/s
संवेग p = m × v 
           = 300 × 0.25 
           = 75.00 kg m/s
संवेग p = 75 kg m/s

Ex. 1: The mass of a cannon is 300 kg and it recoils with a speed of 0.25 m/s. What is the momentum of the cannon?
Given :
 mass of the cannon m = 300 kg, cannon recoil speed v = 0.25 m/s Momentum = ? kg m/s
Momentum P = m × v 
                          = 300 x 0.25 
                          = 75.00 kg m/s
Momentum P = 75 kg m/s

उदा:- 2  
 2 चेंडूंचे वस्तुमान अनुक्रमे 30 ग्रॅम व 90 ग्रॅम असून ते एकाच रेषेवर व एकाच दिशेने 3 m/s व 1.5 m/s वेगाने जात आहेत. त्यांची टक्कर होते व टक्कर झाल्यानंतर पहिला चेंडू 1.2 m/s वेगाने गतिमान होतो. तर दुसऱ्या
चेंडूचा वेग काढा.

दिलेले:-
पहिल्या चेंडूचे वस्तुमान = m1 
                                = 30 g 
                                = 30/1000 kg
                                =  0.03 kg, 
दुसऱ्या चेंडूचे वस्तुमान = m2
                                = 90 g
                                = 90/1000 kg
                                = 0.09 kg
पहिल्या चेंडूचा सुरुवातीचा वेग = u1 
                                         = 3 m/s, दुसऱ्या चेंडूचा सुरुवातीचा वेग  = u2 
                                         = 1.5 m/s
पहिल्या चेंडूचा अंतिम वेग = v1 
                                   = 1.2 m/s , दुसऱ्या चेंडूचा अंतिम वेग = v2 = ? m/s

संवेग अक्षय्यतेच्या सिद्धांतानुसार,
 सुरुवातीचा एकूण संवेग = अंतिम एकूण संवेग
m1 u1 + m2 u2 = m1 v1 + m2 v2
(0.03 × 3) + (0.09 × 1.5) 
= (0.03 × 1. 2) + (0.09 × v2 )
(0.09) + (0.135) = ( 0.036) + 0.09 v2
0.225 =  ( 0.036) + 0.09 v2 
0.225 - (0.036) = 0.09 v2
   0.189  = 0.09 v2
 0.189/ 0.09 = v2
 2.1 m/s = v2
v2 = 2.1 m/s 
दुसऱ्या चेंडूचा अंतिम वेग = v2 
                                     = 2.1 m/s

Ex. 2: 
2 balls have masses of 30 gm and 90 gm respectively and they are moving along the same line in the same direction with velocities of 3 m/s and 1.5 m/s respectively. They collide with each other and after the collision, the first ball moves with a velocity of
1.2 m/s. Calculate the velocity of the other ball after collision.

Given :
The mass of the first ball = m1
 = 30 g 
 = 30 / 1000 kg
 = 0.03 kg, 
mass of the second ball = m2
= 100 g 
= 100 / 1000 kg
= 0.1 kg
The initial velocity of the first ball 
= u1 = 3 m/s, 
Initial velocity of the second ball = u2 = 1.5 m/s
The final velocity of the first ball
 = v1 = 2.5 m/s ,
The final velocity of the second ball 
= v2 = ? m/s

According to the law of conservation of momentum,
 Total initial momentum = Total final momentum.
m1 u1 + m2 u2 = m1 v1+ m2 v2
(0.03 × 3) + (0.09 × 1.5) 
= (0.03 × 1. 2) + (0.09 × v2 )
(0.09) + (0.135) = ( 0.036) + 0.09 v2
0.225 = ( 0.036) + 0.09 v2 
0.225 - (0.036) = 0.09 v2
   0.189 = 0.09 v2
 0.189/ 0.09 = v2
 2.1 m/s = v2
The final velocity of the second ball v2 = 2.1 m/s 

✍️ *आपली संगत ही केवळ* *आपलेच नाही तर संपूर्ण* *कुटुंबाचे देखील भविष्य,* *अस्तित्व आणि संस्कार ठरवते,* *संस्काराच्या स्वाक्षरी* *शिवाय आयुष्याच्या* *प्रमाणपत्राला* *काहीच किंमत नसते..!* 

      तुमचा दिवस आनंदात जावो 🎷



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आपण तपासले पाहिजे. जो

Practice... Of Chemical Reaction 🎷 1

 Practice... Of Chemical Reaction 🎷 1 Touch the blue link below to join this What's App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇 👉  मा हिती विज्ञानाची 🎷 Practice and discipline/ keep patience are very essential for understanding or learning chemical reactions. In daily life, many natural and man-made chemical reactions occur, but we might not be aware of how to write that chemical reactions. To write a chemical reaction, basic preparation is necessary. First, it's necessary to remember a minimum of one to twenty basic elements. Additionally, knowledge of the symbols for these elements is necessary. 1. Hydrogen (H),  2. Helium (He) 3. Lithium (Li),  4. Beryllium (Be) 5. Boron (B),  6. Carbon (C) 7. Nitrogen (N),  8. Oxygen (O) 9. Fluorine (F),  10. Neon (Ne) 11. Sodium (Na),  12. Magnesium (Mg) 13. Aluminum (Al), 14. Silicon (Si) 15. Phosphorus (P),  16. Sulfur (S) 17. Chlorine (Cl),  18. Argon (Ar) 19. Potassium (K),  20. Calcium (Ca) If we know the proper definitions of some te

अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷

  अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷 1 आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷  😀 रासायनिक अभिक्रिया येण्यासाठी सखोल अभ्यास व संयमाची गरज आहे. दैनंदिन जीवनात निसर्गतः व मानव निर्मित अनेक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. पण रासायनिक अभिक्रिया कशा लिहाव्यात हे आपणास माहीत नसते.  🎻 रासायनिक अभिक्रिया लिहिण्यासाठी पूर्व तयारी ही आवश्यक असते. ⭐ प्रथम आपणास कमीत कमी एक ते वीस मूलद्रव्य पाठ असणे आवश्यक आहे. त्यासोबत त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा आपणास माहित असणे आवश्यक आहे. 1. हायड्रोजन H, 2.हेलियम He  3. लिथियम Li, 4 बेरिलियम Be  5.बोरॉन B  6.कार्बन C ,  7. नायट्रोजन N, 8.ऑक्सिजन, O 9. फ्लोरीन, F   10.निऑन Ne 11.सोडियम, Na  12. मॅग्नेशियम, Mg  13. ॲल्युमिनियम, Al 14.सिलिकॉन, Si  15.फॉस्फरस, P 16. सल्फर (गंधक), S 17. क्लोरीन, F 18. अरगॉन, Ar 19. पोटॅशियम, K 20. कॅल्शियम. Ca यानंतर आपणास काही  व्याख्या माहीत असणे आवश्यक आहे. 1. अणुअंक :- मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉन किंवा  इलेक्ट्रॉन च्या संख्येला अणुअं