मुख्य सामग्रीवर वगळा

9th Science, laws of Motion-4, 9 वी विज्ञान, गतीचे नियम-4

 9th Science, laws of Motion-4, 9 वी विज्ञान, गतीचे नियम-4

🎇 न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या दोन नियमांमधून बल आणि बलाचे परिणाम यांची माहिती मिळते.

🎷 न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम:- 
न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमात पदार्थाच्या जडत्व याच गुणधर्माचे वर्णन केले आहे, म्हणून त्याला ‘जडत्वाचा नियम’ असेही म्हणतात.

🥁 नियम:- जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते.

🌻 न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाची उदाहरणे:- 
  1. ओले कपडे झटकल्यास ओल्या कपड्यातील पाण्याचे थेंब बाहेर पडतात. 
  2. धावत्या अगगाडीतून 🚆 उतरताना पुरेश काळजी घेतली नाही तर  पडण्याची शक्यता असते. 
  3. गतिमान बसचे ब्रेक एकदम दाबल्यास बसमधील प्रवासी पुढे झुकतात.
  4. धावती बस अचानक डावीकडे वळल्यास बसमधील प्रवासी उजवीकडे झुकतात.
  5. विराम अवस्थेतील बसने/ स्कूटरने / बाईकने  / मोटर- सायकलने अचानक वेग घेतल्यास आपण मागे फेकले जातो.

🎻 Newton's law of motion 
Newton's first law of motion describes inertia property and is there for also called the law of inertia. 
🔥 Law
An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line only sends external unbalanced force acts on it. 

🌻 Examples of Newton's first law of motion:-
  1. We get a backward push when the bus 🚐 starts at once. 
  2. If breaks are suddenly applied to a moving bus 🚌, the passengers in the bus are pushed in the forward direction.
  3. When we shake a wet piece of cloth water droplets 💦 come out. 
  4. A person alighting/stepping off  from a moving train is likely to fall in the direction of motion of the train.

💐 संवेग (P) म्हणजे काय
व्याख्या:-
 वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार यास संवेग म्हणतात
सूत्र 
P = mv
एकक 
संवेगाचे SI पद्धतीतील एकक kg. m/s आहे व CGS पद्धतीतील एकक g. cm/s आहे.

🌠 न्यूटनच्या गतीविषयक दुसरा नियम:- 
संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाची परिवर्तन बलाच्या दिशेने होते.

😎 न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमांची उदाहरणे:-
  1. क्रिकेटचा चेंडू 🏀 थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सहज सोपे असते. 
  2. कार 🚗 ढकलण्यापेक्षा कार्ट cart 🛒 ढकलले सहज सोपे जाते.
  3. लहान मुलांसाठी कॉर्कच्या चेंडूने 🏀 क्रिकेट खेळण्यापेक्षा टेनिसच्या चेंडूने क्रिकेट खेळणे सोपे जाते. 
  4. बंदुकीची गोळी हाताने लाकडी फळीवर मारल्यास निश्चित वरखडा पडेल पण तीच गोळी बंदुकीतून झाडली असता लाकडी  फळीमध्ये ती आरपार घुसेल.
💐 Define momentum (P)
Momentum is the product of the mass and velocity of an object.

Formula of momentum 
P = m . v

Unit of momentum 
The SI unit of momentum is kg.m/s and the CGS unit of momentum is g. cm / s.

🌠 Newton's second law of motion:-
The rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force.

😎 Write down examples of Newton's second law of motion:-
Ans:-
  1. When a bullet is fired from a gun it pierces through a wooden plank,  but the same bullet when thrown with the hand hardly scratches the wooden plank.
  2. It is easier to play cricket with a tennis ball than that of a cork ball. 
  3. It is easier to stop a tennis ball than to stop a cricket cork ball. 
  4. Pushing a cart 🛒 is easier than pushing a car 🚗.

🍭 न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम:-
प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे त्याचवेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्परविरुद्ध असतात. 

🐦 न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमांची उदाहरणे:-
  1. अग्निबाणाचे 🚀 उड्डाण हे न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमाचे उत्तम उदाहरण होय. 
  2. जेव्हा बंदुकीतून गोळी झाडली जाते तेव्हा गोळीद्वारे बंदुकीवरील बलामुळे बंदूक कमी वेगाने विरुद्ध दिशेने गतिमान होते, तर गोळीवरील बलामुळे गोळीला प्रचंड वेग प्राप्त होतो. 
  3. पाण्यात पोहत 🏊 असताना हातांनी पाणी मागे लोटले जाते, तर त्याचवेळी पाणीसुद्धा पोहणाऱ्या व्यक्तीवर समान परिमाणाच्या प्रतिक्रिया बनाने पुढे लोटत असते.
  4. टेबलावर ठेवलेला लॅपटॉप 💻 त्याच्या वजना इतके बल टेबलावर अधोगामी 👇 दिशेने प्रयुक्त करते तर, त्याच वेळी टेबल सुद्धा तेवढ्याच परिमाणाचे प्रतिक्रिया बल लॅपटॉप वर उर्ध्वगामी👆 दिशेने प्रयुक्त करत असते.
  5. होडीतील 🚣 मनुष्य ओअर / वल्हे (लाकडाचा एक लांब शाफ्ट) वापरून पाण्यावर कृती शक्ती वापरतो; आणि त्याच वेळी पाणी, माणसावर आणि बोटीवर प्रतिक्रिया शक्तीचा वापर करते.

🥁 Newton's third law of motion:-
Every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. 

Give five examples of Newton's third law of motion:-
  1. When a bullet is fired from a gun 🔫 the gun and bullet except forces of action and reaction on each other. The gun moves in the opposite direction to that the velocity of the bullet.
  2. When a laptop 💻 is kept on a table it exerts downward action force on the table. At the same time the table exits upward reaction force on the laptop.
  3. A person, while swimming 🏊, pushes the water in the backward direction. At the same time that person experience an equal and opposite push in the forward direction.
  4. Launching of a rocket 🚀 is based on Newton's third law of motion.
  5. A person in a rowboat 🚣 exerts an action force on the water, and the water exerts a reaction force on the rowboat propelling it forward.

एक सनक होनी चाहिए 

मंजिल पाने की,

भनक तक नहीं लगेगी

 और मंजिल क़दमों में होगी।🎷

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आप...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.