मुख्य सामग्रीवर वगळा

9th Science, laws of Motion-2, 9 वी विज्ञान, गतीचे नियम-2

 

9th Science, laws of Motion-2, 9 वी विज्ञान, गतीचे नियम-2

आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇

🚉 एकसमान गती:-
  1. जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एकसमान गती म्हणतात.
  2. एकसमान गतीमध्ये चाल कायम असते.

नैकसमान गती:-
  1. जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैकसमान गती म्हणतात.
  2. नैकसमान गतीमध्ये चाल कायम नसते.
वरील मुद्द्यांचा उपयोग करून आपणास एकसमान गती व नैकसमान गती हा फरक लिहिता येतो.

✈️ Uniform motion:-
  1. If an object covers equal distances in equal time intervals, it is said to be moving with uniform motion.
  2. In uniform motion, the speed of the body is constant.

Nonuniform motion:-
  1. If an object covers unequal distances in equal time intervals, it is said to be moving with non-uniform motion.
  2. In nonuniform motion, the speed of the body is not constant.
Using the above points we can write the difference between uniform motion and non-uniform motion.

🎻   त्वरण:-
  • व्याख्या:- वेग बदलातील दराला त्वरण असे म्हणतात. 
  • जर u हा सुरुवातीचा वेग t या कालावधीनंतर बदलून अंतिम वेग v होत असेल तर..
  • a = v - u / t

Acceleration:-
  • Definition:- The rate of change of velocity is called acceleration. 
  • Acceleration is denoted by 'a'. 
  • If the initial velocity is 'u' and in time 't' it changes to final velocity 'v'.  Then  a = v - u / t

🥁 धन, ऋण व शून्य त्वरण:-
धन त्वरण:-
 जेथे त्वरण वेगाच्या दिशेने असते, व एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्वरण धन असते. 
उदा:- स्थिर चेंडूवर बॅटने केलेला आघात.
 ऋणत्वरण:- 
जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वेगाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असून, वेग कमी होतो तेव्हा त्वरणऋणअसते.
ऋण त्वरणालाच ‘अवत्वरण’ किंवा ‘मंदन’ (Deceleration) असे म्हणतात.
उदा:- गतिमान कारचे ब्रेक दाबल्यावर गतीत होणारा बदल.
शून्य त्वरण:
वेग स्थिर असल्यास त्वरण शून्य असते.
उदा:- एका सरळ रेषेत स्थिर गतीसह कार.

🌻 Positive, negative and zero acceleration:-
Positive acceleration:-
When the acceleration is in the direction of velocity and the velocity of an object increases, the acceleration is positive. 
Ex. A ball at rest, hit with a bat. 
Negative acceleration:-
When the velocity of an object decreases with time,and its direction is opposite to the direction of velocity, it has negative acceleration.
Negative acceleration is also called 'deceleration'. 
Ex:- When brakes are applied to a car in motion.
Zero acceleration:-
 If the velocity of the object does not change with time, it has zero acceleration.
Ex. The motion of a car in a straight line with constant speed.

🥁 एकसमान गती व नैकसमान गतीसाठीच्या अंतर-काल आलेखात काय फरक दिसून येतो?
उत्तर:-
  1. एकसमान गतीमध्ये कापलेले अंतर हे वेळेच्या समप्रमाणात असते. 
  2. एकसमान गती ही त्वरणित गती नाही.
  3. नैकसमान गतीमध्ये कापलेले अंतर हे वेळेच्या समप्रमाणात नसते.
  4. नैकसमान गती ही त्वरणित गती आहे. 

🦢 What difference do you see in the distance-time
graphs for uniform and non-uniform motion?
Ans:-
  • For uniform motion distance covered is directly proportional time
  • Uniform motion is not an accelerated motion. 
  • For non-uniform motion distance covered is not directly proportional to time. 
  • Non uniform motion is an accelerated motion. 

💐 आलेख पद्धतीने गतिवषयक समीकरणे:- 
उत्तर:- 
न्यूटनने गतीविषयक तीन समीकरणांचा संच मांडला.एका रेषेत गतिमान
वस्तूचे विस्थापन, वेग, त्वरण व काल यातील संबंध या गतिवषयक समीकरणांत मांडला आहे.
✈️ वेग काल संबंधाचे समीकरण 
समजा एक वस्तू सुरुवातीला 'u' वेगाने सरळ रेषेत प्रतिमान आहे. 't' वेळेत 'a' त्वरणमुळे ती वस्तू 'v' वेग गाठते व तिचे विस्थापन 's' असेल.

एकसमान त्वरणीत वेगाने गतिमान असलेल्या वस्तूच्या वेगातील कालानुसार होणारा बदल वरील आकृती मध्ये आलेखाच्या साहाय्याने दर्शवला आहे. 
वस्तू आलेखातील D या बिंदूपासून गतिमान होते. वेळेनुसार वस्तूचा वेग वाढत जातो व t या कालावधीनंतर वस्तू आलेखातील B ह्या बिंदूपर्यंत पोहोचते.
वस्तूचा सुरुवातीचा वेग = u = OD

वस्तूचा अंतिम वेग = v = OC

कालावधी = t = OE

त्वरण (a) = वेगातील बदल / काल

त्वरण (a) = (अंतिम वेग - सुरुवातीचा वेग) /                       काल
        a =  (OC - OD) / t

        at = (OC - OD) (समीकरणाच्या दोन्ही बाजूला  t ने गुणून)
( बऱ्याच मुलांना हाच भाग लवकर समजत नाही.)
  
 CD = at …… (i)  (OC - OD = CD)

B या बिंदुतून Y अक्षास समांतर रेषा काढा. ती X अक्षास E बिंदूत छेदते. त्याचबरोबर D या बिंदुतून X अक्षास समांतर रेषा काढली.
ती BE ह्या रेषेस A या बिंदूत छेदते.
 आलेखावरून.... BE = BA + AE

v = CD + OD
                ...(AB = CD आणि AE = OD)
 v = at + u ............( i वरून )

v = u + at

हे गतीविषयक पहिले समीकरण आहे.

🚉 Equations of motion using graphical method:- 
Newton studied motion of an object and gave a set of three equations of motion.
These relate the displacement, velocity, acceleration and time of an object moving along a straight line.
Suppose an object is in motion along a straight line with initial velocity ‘u’. It attains a final velocity ‘v’ in time ‘t’ due to acceleration ‘a’ its desplacement is ‘s’.

Equation describing the relation between velocity and time:-  

The above figure shows the change in velocity with time of a uniformly accelerated object.
The object starts from the point D in the graph with velocity u. Its velocity keeps increasing and after time t, it reaches the point B on the graph.

The initial velocity of the object = u = OD

The final velocity of the object = v = OC

Time = t = OE

Acceleration (a) = (Change in                                          velocity) /
                                   Time 
=(Final velocity – Initial velocity)/
                     Time

a = ( OC - OD ) / t

at = ( OC - OD ).  (Many students do not understand this part.)

CD =  at ...... ( i )  ( OC - OD = CD )

Draw a line parallel to Y axis passing through B. This line will cross the X axis in point E. 
Now draw a line parallel to X-axis passing through point D. This line will cross the line BE at A.
From the graph.... BE = AB + AE

v = CD + OD .....(AB = CD and                                         AE = OD)
v = at + u ............(from i )

v = u + at
This is the first equation of motion.



                  *जर अंगातील खराब कपड्यांची लाज वाटत असेल तर, डोक्यातील वाईट विचारांची पण लाज वाटायला पाहिजे.* 
                 *मन मोहून टाकणारी सुंदरता निसर्गात प्रत्येक ठिकाणी असते. फक्त आपण त्या सुंदरतेचा योग्य उपभोग घ्यायला चुकतो...!*

         *आपला दिवस आनंदी जावो.*🎷

        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आप...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.