मुख्य सामग्रीवर वगळा

9th, classification of plants 2, 9 वी, वनस्पतींचे वर्गीकरण 2.

 

9th, classification of plants 2, 9 वी, वनस्पतींचे वर्गीकरण 2.


आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी व विज्ञान विषयक माहिती वाढवण्यासाठी खालील👇 निळ्या लिंकला स्पर्श करावा 🙏

😎 विभाग III- टेरिडोफायटा (Pteridophyta)
1. अवयव:- टेरिडोफायटा या गटातील वनस्पतींना मुळे, खोड,पाने असे सुस्पष्ट अवयव असतात.
2.  संवहनी संस्था:- टेरिडोफायटा या गटातील वनस्पतींना पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात.या वनस्पतींमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते. 
3. अपुष्प:- टेरिडोफायटा या गटातील वनस्पतींना फुले-फळे येत नाहीत. 
4. प्रजनन:- 
  • टेरिडोफायटा वनस्पतींच्या पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे प्रजनन होते.
  • टेरिडोफायटा या वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे होते 
  • लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते.
5. उदा., फर्न्स - नेफ्रोलेपीस (नेचे),टेरीस,  मार्सेलिया,एडीअँटम, इक्विसेटम, सिलॅजिनेला,लायकोपोडियम, इत्यादी.

🏵️ Division III- Pteridophyta
Parts:- Plants from this group have well-developed roots, stems, and leaves.
Conducting system:- Pteridophyta has separate tissues for the conduction of food and water. 
Pteridophyta has a well-developed conducting system.
Flowers:- Pteridophyta do not bear flowers and fruits. 
Reproduction:- Pteridophyta reproduces with the help of spores formed along the back or posterior surface of their leaves. 
Pteridophyta plants reproduce asexually by spore-formation and sexually by zygote
formation. 
Ex.:-  Ferns like
Nephrolepis, Marsilea, Pteris, Adiantum, Equisetum, Selaginella, Lycopodium, etc.

🔫 थॅलोफायटा, ब्रायोफायटा व टेरिडोफायटा या तिन्ही गटांतील वनस्पतींच्या शरीररचनांमध्ये फरक असले तरी त्यांच्यातील समानता कोणती?
उत्तर:- 
प्रजनन:- थॅलोफायटा, ब्रायोफायटा व टेरिडोफायटा या सर्वांचे प्रजनन बीजाणूंद्वारे होते. 
अबीजपत्री:- त्यांच्या शरीरातील प्रजननसंस्था अप्रकट असल्याने त्यांना अबीजपत्री (Cryptogams : लपलेली प्रजननांगे असणाऱ्या वनस्पती) म्हणतात.

🥁 What is the similarity between the plants of the groups Thallophyta, Bryophyta and
Pteridophyta irrespective of differences in their body structure?

Ans:- 
Reproduction:- Thallophyta, Bryophyta and Pteridophyta all these plants reproduce by spore formation. 
Cryptogams:- They are called cryptogams as their reproductive organs cannot be seen. (cryptos: hidden, gams: reproductive organs)

💻 उपसृष्टी-बीजपत्री (Phanerogams):- 
बीजपत्री:- ज्या वनस्पतींमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात, त्या वनस्पतींना बीजपत्री म्हणतात.
वैशिष्ट्य:-  बीजपत्री वनस्पतीमध्ये प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होतात ज्यांमध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो. बिया रुजतांना सुरुवातीस काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी या अन्नाचा वापर होतो. 
प्रकार:- बिया फळांमध्ये झाकलेल्या नसणे किंवा असणे ह्या वैशिष्ट्यांवरून बीजपत्री वनस्पतींचे अनावृत्तबीजी व आवृत्तबीजी असे विभाग केले आहेत.

🎻 Phanerogams:- 
Definition:- Plants that have special structures for reproduction and produce seeds are called phanerogams. 
Feature:- In phanerogam plants, after the process of reproduction, seeds are formed which contain the embryo and stored food. During the germination of the seed, the stored food is used for the initial growth of the embryo. 
Types:-  Depending upon whether seeds are enclosed in a fruit or not, phanerogams are classified into gymnosperms and angiosperms

🚗 विभाग I- अनावृत्तबीजी वनस्पती (Gymnosperms):-
वैशिष्ट्य:- 
अनावृत्तबीजी गटातील वनस्पती बहुदा सदाहरित, बहुवार्षिक व काष्ठमय असतात. 
फांद्या:- अनावृत्तबीजी वनस्पतींच्या खोडांना फांद्या नसतात.
मुकुट:- पानांचा मुकुट तयार झालेला असतो. 
 फुले:- अनावृत्तबीजी वनस्पतींची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात. 
फळे:- अनावृत्तबीजी वनस्पतींच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजेच यांना फळे येत नाहीत,म्हणूनच यांना अनावृत्तबीजी म्हणतात. Gymnosperms म्हणजे Gymnos - न झाकलेले/अनावृत्त, Sperm- बीज.
उदा. थुजा (माेरपंखी), सायकस, पिसिया (ख्रिसमस ट्री), पायनस (देवदार) इत्यादी.

🚆 Division I - Gymnosperms
Feature:- 
Gymnosperms are mostly evergreen, perennial, and woody. Their stems are without branches. 
Crown:- The leaves form a crown. 
Flowers:- These plants bear male and female flowers on different
sporophylls of the same plant. Seed cover: The seeds of these plants do not have natural coverings, i.e. these
plants do not form fruits and are therefore called gymnosperms. (gymnos: naked, sperms: seeds).
Ex:- Thuja (Morpankhi), Cycas, Picea (Christmas tree), Pinus (Deodar), etc.

🎆 विभाग II- आवृत्तबीजी वनस्पती (Angiosperms):- 
  1. फुले:- या वनस्पतींना येणारी फुले हे त्यांचे प्रजननाचे अवयव आहेत. 
  2. फळे:- फुलांचे रूपांतर फळांत होते व फळांच्या आत बिया तयार होतात. 
  3. आवरण:- या बियांवर आवरण असते. Angios - Cover म्हणजे आवरण, sperm - बी.
  4. द्‌विबीजपत्री:- ज्यांच्या बियांचे सहजपणे दोन भाग सुटे होतात, त्यांना द्‌विबीजपत्री वनस्पती म्हणतात, तर 
  5. एकबीजपत्री:- ज्यांच्या बियांचे दोन भाग होत नाहीत, त्यांना एकबीजपत्री वनस्पती असे म्हणतात.

🥯 एकबीजपत्री वनस्पती
1. बी:- एक बीजपत्र
2. मूळ:- तंतूमुळे
3. समांतर शिराविन्यास
4. फूल:- 3 किंवा 3 च्या पटीत भाग असणारे (त्रिभागी)
5. खोड:-
  • पोकळ, उदा, बांबू 
  • आभासी, उदा, केळी
  • चकतीसारखे, उदा, कांदा

💀 द्विबीजपत्री वनस्पती
  1. बी:- दोन बीजपत्रे
  2. मूळ:- ठळक प्राथमिक मूळ (सोटमूळ)
  3. पान:- जाळीदार शिराविन्यास
  4. फूल:- 4 किंवा 5 भागांचे फूल (चतुर्भागी किंवा पंचभागी)
  5. खोड:- मजबूत, कठीण खाेड. उदा, वटवृक्ष, पिंपळ
👆 वरील मुद्द्यांचा वापर करून द्विबीजपत्री वनस्पती व एकबीजपत्री वनस्पती हा फरक आपणास उत्तम लिहिता येतो.

🌿 Monocotyledonous
  1. Seed:- Single cotyledon
  2. Root:- Fibrous roots
  3. Leaf:- Parallel venation
  4. Flower:- Flowers with 3 parts or in multiples of three (trimerous).
5. Stem:- 
  • Hollow, Ex. Bamboo
  • False, Ex. Banana
  • Disc-like, Ex. Onion.

🪂 Dicotyledonous plants
  1. Seed:- Two cotyledons
  2. Root:- Well-developed, primary root (Taproot)
  3. Leaf:- Reticulate venation
  4. Flower:- Flowers with 4 or 5 parts or in their multiples (tetramerous or pentamerous)
  5. Stem:- Strong, hard. Ex. Banyan tree, pimpal etc

🪘 Using the above points we can better write the difference between dicots and monocots.



           *प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात अनेक प्रश्न पडतात
त्यातील काही प्रश्नांची उत्तरे 
मिळतात काही प्रश्न 
तसेच अनुत्तरीत राहतात...!* 
         *काही प्रश्नांची उत्तरे उत्तराच्या स्वरूपात नाही मिळत. 
तर जीवनात मिळालेल्या काही अनुभवांच्या आड ती उत्तरे दडलेली असतात...!!*

    *आपला दिवस आनंदी जावो.*🎷

          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

10 th,Sci.I, Periodic classification of elements I.

10 th, Sci.I,Periodic classification of elements I.   ▬▬▬۩۞۩▬▬▬ आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇 माहिती विज्ञानाची 🎷 ▬▬▬۩۞۩▬▬▬ As we grown up, we forget the definition and some terms or do not fully/ totally understand the exact meaning of those words. Today's main objective is to increase basic chemistry knowledge with gradual study . In science meaning of unchangeable terms are useful in day today life .  🎻  Definition of element :- Element is a substance that cannot be broken down into simpler substances by chemical means. Element is also defined as a pure substance made up of only one kind of atom which can't be split up into two or more substance. Ex. Silver Ag ,   Chlorine Cl ~*◄⏤͟͞✥➳  🪷 Atom :- An atom is the basic building block. Atom is the smallest unit of matter that has the characteristic properties of an element. In the nucleus of atom positively charged protons p and ne...

10 वी, भाग 1, गुरुत्वकर्षण. मराठी .,10 th, Part 1, Gravitation Exercise in Marathi 🎷

  १० वी, भाग १, गुरुत्वकर्षण. मराठी .🎷 व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा ( माफ करा🙏 फॉन्ट प्रॉब्लेम मुळे हा स्वाध्याय खराब झाला आहे. हा स्वाध्याय दुरुस्तीसाठी सध्या आहे. कृपया सध्या पाहू नये) न्यूटनचा वैश्विक गुरुत्वकर्षणाचा सिद्धांत. न्यूटनचा गुरुत्वकर्षणाचा सार्वत्रिक नियम लिहा. अवकाश पृथ्वीच्या स्थानावर g चे मूल्य उताराची किंमत.....% ने असते.  अंतर स्थानात g चे मूल्य  पृथ्वीला घडवण्यासाठी त्याचे मूल्य फक्त........ % कमी असते. ....... हे परवर्तक दुर्बिण तयार करणारे आधी होते. ...........  हे परवर्तक दुर्बिणी बनवणारे आधी होते. अभिकेंद्री बल म्हणजे काय? केंद्राभिमुख प्रदान करा. SI एक प्रणाली G चे एक ...... आहे. SI एककात जीचे मूल्य ........ आहे. ..... म्हणजे विद्युत चुंबकीय तरंग. ...... हा एक प्रकार आहे ज्याला इलेक्ट्रोमॅगटिक वेव्ह्ने म्हणतात. ......... म्हणजे एखाद्या शंकूला एक प्रतलाने तिरके छेदले तयार होणार आकृती. ........ म्हणजे शंकूला कलत्या प्रतलाने कापल्यावर  वक्र. ग्रहाची इच्छाही........ आणि सूर्याचा कक्ष एका नाभीवर असतो. ज्याच्या एका...