मुख्य सामग्रीवर वगळा

☕ Tea चहा ☕

 Tea, चहा ☕🎷


सकाळची सुरुवात ☕ ने 😘.
सकाळी चहा घेतल्याशिवाय अनेक जणांना करमत नाही, फ्रेश वाटत नाही, झोप उडत नाही, ताजेतवाने वाटत नाही.
तरी बरे आहे आपल्याकडे 'बेड टी' चे अस्तित्व कमी आहे. खरेच चहातून प्रेरणा मिळते का? सुदैवाने खरोखर आपल्याकडील विद्यार्थी चहाचे प्राशन करत नाही.

आपण कोणाकडे गेलो तर काय घेणार ? हा प्रश्न असतो चहा की कॉफी. उन्हाळ्यात उसाचा रस, लिंबू शरबत, कैरीचे पन्हे, ताक, मठ्ठा, कोकम सरबत इत्यादी पदार्थांचे योग्य पद्धतीने सेवन करता येते.

भारतीय संस्कृतीत तुळस🌿 व बेल ☘️यांना अत्यंत महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांनी प्रत्येक पत्री (वनस्पतींची पाने) चे महत्व जाणले. या औषधी वनस्पतींना जर धार्मिक भावनेशी जोडले तर...... या वनस्पती आपल्या कायम घराच्या जवळ राहतील हे त्यांनी ओळखले. 

हिम:- एक आयुर्वेदिक सल्ला असा आहे की रात्री झोपताना दोन पाने तुळशीचे व दोन पाने बेलाचे पाण्यात टाकून ठेवायची. हे पाणी सकाळी आपण जर प्राशन केले तर त्यास हिम असे म्हणतात. 
आता तुम्हाला आश्चर्य वाटेल हा पण एक प्रकारचा चहाच आहे. हा चहा स्वास्थ्यवर्धक असून आरोग्य सुधारण्यासही यातून मदत होते. 
काढा:- कोरोना काळात काढ्याला घरातून काढा अशी परिस्थिती आली होती. कोरोना काळात यास जे महत्त्व प्राप्त झाले होते ते आता हळूहळू कमी होत आहे किंवा बंद होत आले आहे. काढ्याला आपण आपल्या जीवनातून काढूनच टाकत आहोत.
काही वनस्पतींची पाने केवळ पाण्यात ठेवून त्या पानांचा अर्क पाण्यात उतरत नाही म्हणून त्यांना उकळून, गाळून घ्यावे लागते. उकळण्याच्या क्रियेत त्या वनस्पतींचे गुण पाण्यात अधिक प्रमाणात उतरतात.
☕ आपला नेहमीचा चहा आपल्या जीवनात एवढा रुजला आहे की बऱ्याच जणांना आता चहाशिवाय करमत नाही. काही जणांचे जेवण कमी झाले आहे पण त्यांनी चहाचे प्रमाण कमी केले नाही. जेवण,नाश्त्याला पर्याय/सब्स्टिट्यूट म्हणून काहीजण चहा पितात.

उत्तेजना:- मनुष्याला मिळणारी उत्तेजना बाह्य गोष्टीवर अवलंबून असावी का? अंतर्मनातील उत्तेजना आपणास उपयुक्त असते. जे पालक स्वतः चहा पितात त्यांनी कमीत कमी आपल्या मुलांना तरी चहा देऊ नये. चहा पिल्याने थोड्यावेळासाठी तात्पुरती उत्तेजना येते. लहान मुलांना या उत्तेजनेची काहीच गरज नसते कारण लहान मुले ही उत्साहाचा झरा असतात. 

उकळलेला चहा:-
हॉटेल किंवा रस्त्यावरील चहा अति उकळला जातो तो घातक ठरतो. थंड झालेला चहा पुन्हा गरम करून पिणे हा पण एक वाईट प्रकार आहे. चहा अतिप्रमाणात उकळला तर, चहातील चांगल्या गुणाबरोबरच वाईट गुणधर्मांची रसायने त्यात मिसळतात. त्यामुळे घरगुती योग्य प्रमाणात, व्यवस्थित उकळलेला अर्धा कप चहा दिवसातून दोन वेळा बरा. 
बाजारातील चहा:- बाजारातील चहा चे पातेले गॅसवर चालूच असते, उष्णता देणे चालूच असते. त्याच पातेल्यात चहा पुन्हा पुन्हा तयार केला जातो. बाजारातील चहाला विशिष्ट रंग, चव प्राप्त होण्यासाठी त्यात नको असलेले पदार्थ पण मिसळले जातात. त्या दुकानदाराच्या चहाची सवय लागावी म्हणून त्या चहात विशिष्ट पदार्थ टाकला जातो.

चहाचे दुष्परिणाम:-
  • काही जणांच्या मते चहाचे व्यसन हे दारूच्या व्यसना प्रमाणेच आहे.
  • भारतीय स्त्रीयांमध्ये लोहाची कमतरता ही मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यात जर स्त्रीला चहाचे व्यसन असेल तर चहातील टॅनिनमुळे लोह शोषणाचे प्रमाण कमी होते. 

  • चहातील निकोटीन किंवा कॅफीनचे सेवन आरोग्यासाठी घातक आहे.
  • चहाचे अतिसेवक गरोदर स्त्री सोबत बाळासाठीही हानिकारक ठरू शकते.
  • तज्ञांच्या मते रिकाम्या पोटी चहा पिऊ नये. रिकाम्या पोटी पिलेल्या चहामुळे हृदयावर दुष्परिणाम होतो. 
  • दुधाचा चहा:- दुधाचा चहा हा शरीरासाठी घातक ठरतो. दुधाच्या चहामुळे रक्तदाब, हृदयावर दुष्परिणाम, लोहाची कमतरता यासारखे दुष्परिणाम होतात. ICMR (INDIAN COUNCIL OF MEDICAL RESEARCH) ने एक संशोधन केले त्यामध्ये दुधाच्या चहा टाळावा असे त्यांनी सुचवले आहे.
  • ब्रु-कॉफीमध्ये 150 मिली मध्ये 80 ते 120 मिलिग्रॅम कॅफिन असते. 
  • इन्स्टंट कॉफीमध्ये 50 ते 65 मिलिग्रॅम कॅफिन आढळून येते. 
  • जेवणाआधी किंवा नंतर कमीत कमी एक तास चहाचे सेवन टाळावे असेही मार्गदर्शक तत्वात सांगितले आहे.

ICMR व NIN (National Institute of Nutrition) यांनी संशोधन करून हे सिद्ध केले की कॅफिन युक्त पदार्थातील टॅनिन आरोग्यास घातक ठरते.[ICMR ने दुधा शिवाय चहा पिल्यास कोरोनरी धमनी चा रक्त प्रवाह सुधारतो, कर्करोगाचा धोका कमी होतो असे अहवालाअंती त्यांनी सांगितले. ची मार्गदर्शक तत्वे ही लिंक शेवटी दिली आहे]

दिवस भरात 4 ते 6 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिल्याने पचनशक्ती बिघडते. अति उकळलेल्या चहाचा दुष्परिणाम एवढाच नसून त्यामुळे आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी या विकारांनाही आपण बळी पडतोय. याचाच पुढचा परिणाम मलावरोध हा आहे.

उकळलेला गरम चहा:- 
काहीजण उकळलेला गरम चहा पितात याचा परिणाम आतड्याच्या आतील अस्तरावर होतो. यातून आतड्यांचा अल्सर होण्याची शक्यता वाढते.
सांधेदुखी:-
चहा व कॉफी है हाडांना आतून पोकळ करतात, याचाच परिणाम होतो सांधेदुखीत.
झोप:-
चहाच्या अतिसेवनामुळे आपल्या झोपेवर दुष्परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, चहातील कॅफिन झोपेसाठी आवश्यक असलेल्या मेलाटोनिन हार्मोनमध्ये व्यत्यय आणू शकते. यामुळे झोपेचे खोबरे होऊ शकते.
 अ‍ॅसिडिटी:-
जास्त चहा जर प्राशन केला तर पोटातील अ‍ॅसिडचे प्रमाण वाढू शकते. याचाच पुढील भाग म्हणजे छातीत जळजळ होणे, सूज येणे आणि अस्वस्थ वाटणे असे प्रकार होऊ शकतात.

तरीपण चहा पिणार्‍यांसाठी 
चहा बनवण्याची योग्य रीत :-
एक कप पाण्यात साधारण एक चमचा साखर घालावी. पाणी उकळायला लागल्यावर त्यात योग्य प्रमाणात चहा पत्ती टाकावी. आपल्याला आवडेल त्याप्रमाणे गवती चहा, आद्रकाचा तुकडा, विलायची, दालचिनी, व जर आवड असेल तर तुळशीचे पान किंवा पुदिन्याचे पान टाकावे. पातेल्यावर झाकण ठेवून लगेच ते खाली उतरून घ्यावे.

🥁 स्पर्धा परीक्षा व दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून आपल्या माहिती विज्ञानाची🎷 या What's App ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील 👇 निळ्या लिंक 🔗 ला स्पर्श करा.


काही वेळेस चहा पिण्याची इच्छा झाली तर हर्बल टी, ग्रीन टी, गवती चहा या प्रकारचा चहा आपणास पिता येऊ शकतो


👏🔗 ICMR ची मार्गदर्शक तत्वे:-

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आप...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.