मुख्य सामग्रीवर वगळा

यश... आणि अपयशा नंतर...📖

 

यश.🎷.. आणि अपयशा नंतर...📖

कोणत्याही समस्ये कडे प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळ्या असतो. त्याच्या अंतर्मनातील भावनावर त्याच्याकडे कोणत्याही समस्येच्या प्रश्नाचे उत्तर असते.🎷


काही वेळेस काही समस्यांचे उत्तर स्वतःला सापडत नसते कारण प्रत्यक्ष परिस्थिती उद्भवल्यावर काहीजणांचा मेंदू त्यावेळेस त्या समस्येला प्रतिसाद देत नसतो, अशा वेळेस जर आपण त्रयस्थपणे विचार केला तर त्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. 


काल बारावी बोर्ड 2024 चा निकाल लागला. येत्या चार-पाच दिवसात 10 वी बोर्डाचा निकाल लागेल. काहीजण यशाच्या शिखरावर, काही मध्यम, तर काहीजण तळागाळात असतील. पण प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणतीही परीक्षा म्हणजे त्यांचे संपूर्ण जीवन नसते. यशानंतर पाय जमिनीवर ठेवून शांत मनाने पुन्हा आपल्या इच्छित ध्येयापर्यंत जाणे खूप गरजेचे असते, आणि अपयश खरंतर नसतेच फक्त त्यातून संधी शोधायची असते. ज्याला संधी शोधता आली तो विजेता. फक्त एक असते अपयशी विद्यार्थ्याला /व्यक्तीला काही काळ समाजाच्या वेगळ्या नजरेचा सामना करण्याची हिम्मत हवी. यश मिळाल्यावर ह्याच नजरा/ व्यक्ती हार तुरे घेऊन येणार असतात. माझा एक मित्र बारावी बोर्ड परीक्षेत नापास झाल्यावर प्लॉटिंगच्या व्यवसायात पडला आज तो एक नामांकित बिल्डर आहे. पण हे कोणाला शक्य आहे? ज्याला राखेतून विश्व निर्माण करता येण्याची जिद्द आहे त्यालाच. अपयश हे कोणासाठी अंतिम असते? जे प्रयत्न थांबवतात त्यांच्या साठी.

आपल्या मनातील नकारात्मक विचार जर आपण काढून टाकले तर.... स्टार्टअप योजनेअंतर्गत आज आपणास कर्ज उपलब्ध होत आहे. शिकून नोकरी करण्यापेक्षा आपल्याला जो व्यवसाय आवडतो तो व्यवसाय जर आपण सुरू केला तर.... इतरांकडे नोकर म्हणून राहण्यापेक्षा उद्योजक व्हाल व इतरांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्याल. स्वतःची कल्पकता वाढवा, योजना तयार करा कष्ट, जिद्द या शस्त्रांचा योग्य वापर करून, वेळेवर योग्य निर्णय घेऊन संधी निर्माण करून आपल्या प्रगतीकडे चला.

काही गोष्टी विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवाव्यात

  • आपल्या अंतर्मनाला अशी सवय लावावी की, जोपर्यंत तुम्ही स्वतः म्हणणार नाहीत (त्या दिवसाचे काम पूर्ण झाल्यावर )मी थकलो, तोपर्यंत थकायचे नाही.
  • वेळ कोणत्याही परिस्थितीत थांबत नाही, तुम्ही आनंदी असाल किंवा दुःखात असाल वेळ ही पुढे पुढे जातच असते. 
  • दररोज काहीतरी आपण नवीन शिकलेच पाहिजे 
  • वेळेचा सदुपयोग करावाच
  • आपले ध्येय सहसा कोणाला सांगू नये व त्या ध्येयाच्या दिशेनेच वाटचाल करावी 
  • नियोजित कार्य:- आपले ठरवून ठेवलेले काम एवढ्या शांतपणे करावे की यशाचा आवाज हा सुतळी बॉम्ब पेक्षाही नक्कीच मोठा ठरावा.
  • जीवनात चढ-उतार असतातच त्यामुळे जीवनातील प्रसंग मनाला खूप लावून घेऊ नयेत 
  • जिंदगी बहुत छोटी है ऐसे लोगो के साथ बिताएजो आपको हसाये.
  • निराशा सहन करण्याची क्षमता वाढवताना एकांतात कधीही बसू नये
  • संवाद:- कोणत्याही परिस्थितीत आपला इतरांशी असलेला संवाद कधीच बंद करायचा नाही.कारण संवादातूनच मार्ग निघत असतात. 
  • युक्ती:- झपझप चालण्यातूनही काही जणांना काही युक्त्या सुचत असतात त्याच पद्धतीने आपल्याला आपल्यासाठी योग्य युक्त्या कोणत्या वेळेस सुचतात हे पहावे. काही जणांना युक्त्या 🚽 या पण ठिकाणी सुचतात. 🙏

" इच्छाओ की सडक तो बहुत दूर तक जाती है, बेहतर यही है की हम 'जरुरतो की गली मे मुड जाये'."

🥁 जबाबदारी पालकांची:- 

प्लॅन:- पालकांनी मुलांसाठी 'A' प्लॅन तयार करावा, व या प्लॅन सोबत काही कारणाने यात यश आले नाही तर 'B' प्लॅन तयार असावा. हे सहज शक्य नसते.

अपेक्षांचे ओझे होणार नाही याकडे पालकांनी लक्ष दिले तर हे थोडे अजून सहज होते.

अपेक्षा:-आपल्या मुलांची प्रगती पाहताना, पालकांनी मुलांकडून योग्य अपेक्षा ठेवाव्यात. आपल्या अनुभवाचा,डट ज्ञानाचा योग्य वापर करून मुलांना योग्य दिशेला न्यावे. तसे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्यास कशात आवड आहे, अभिरुची आहे हे पहावे व त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. 

अभिरुची:- हे सर्व करत असताना, हा दीर्घकालिन पल्ला असल्यामुळे मन शांती उत्तम राहावी यासाठी प्राणायाम, योगा, ध्यानधारणा, व्यायाम यापैकी ज्यात अभिरुची असेल ते योग्य पद्धतीने मुलांकडून करून घेऊन त्यांची रेल्वे गाडी ट्रॅकवर व्यवस्थित ठेवावी.

मित्र:- प्रगतीसाठी मित्रांची गरज असतेच त्यामुळे आपल्या जीवनातील मित्र हे आपल्या ध्येयाच्या दृष्टीने योग्य असतील असेच असावेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

10 वी बोर्ड निकाल आज 🎷

 10 वी बोर्ड निकाल आज 🎷 ®®®💠®®® व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा   ▬▬▬۩۞۩▬▬▬ इयत्ता 10 वीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली 👏. 10 वीचा निकाल येत्या मंगळवारी म्हणजे दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार.🎺 विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या निकालातून त्यांना पाहता येतील. राज्यातील 23,492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विद्यार्थी 'महा एचएससी बोर्ड डॉट इन' (mahahsscboard.in) या संकेतस्थळासह विविध वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.  ®®®💠®®® 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.👇   https://sscresult.mahahsscboard.in   https://results.digilocker.gov.in   https://www.aajtak.in/education/board-exam-resul   http://sscresult.mkcl.org   https://results.targetpublications.org   https://results.navneet.com   http...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷

  11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷 🎷 11th Admission Registration  ●~•❅•۞•❅•~● इयत्ता अकरावी साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया  ऍडमिशन 19- 05 -2025 पासून सुरू. भाग 1 कसा भरावा   Part 1 Fill Up Guidene संपूर्ण महाराष्ट्र मध्ये यावर्षी सन 2025 पासून 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.  ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तसेच महाराष्ट्रामधील सर्व कॉलेजमध्ये लागू होणार.   यावर्षी आपल्याला 11 वीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे ऍडमिशन घ्यावे लागणार ┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━.  रजिस्ट्रेशन कसे करावे  11 वी प्रवेशाच्या Website वर जाणे✈️  visit 11 th admission website   मोबाईल 📱 वरून जर रजिस्ट्रेशन करणार असाल तर.....  क्रोम वर जाऊन तीन डॉट स्पर्श करावा व डेस्कटॉप निवडावे. ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬ स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर स्पर्श करा. https://mahafyjcadmissions.in/ {[( टिप :- मागील वर्षीपर्यंत विद्यार्थी https://11thadmission.org.in/ या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करत होते. आता व...