मुख्य सामग्रीवर वगळा

10 वी, विज्ञान 1, पाठ 9. कार्बनी संयुगे

 

10 वी, विज्ञान 1, पाठ 9. कार्बनी संयुगे 1.


आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇

👉 माहिती विज्ञानाची 🎷


💐 मूलद्रव्य म्हणजे काय? मूलद्रव्यांचे विविध प्रकार कोणते?

उत्तर: ज्या पदार्थांचे भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेने साध्या पदार्थात अपघटन करता येत नाही, अशा पदार्थाला मूलद्रव्य म्हणतात.

किंवा 

एकाच प्रकारच्या अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य.

🎻 धातू, अधातू व धातुसदृश्य हे तीन मूलद्रव्यांचे प्रकार आहेत.


🥐 कोणत्याही सेंद्रिय पदार्थांचे पूर्ण ज्वलन झाल्यानंतर शेवटी काय शिल्लक राहते?

उत्तर:

 कोणत्याही सेंद्रिय पदार्थाचे पूर्ण ज्वलन झाल्यानंतर शेवटी राख शिल्लक राहते.

सेंद्रिय पदार्थाच्या ज्वलनानंतर काळ्या रंगाचा कार्बन शिल्लक राहतो.

सेंद्रिय पदार्थांचे ज्वलन झाल्यानंतर कार्बन डाय-ऑक्साइड CO2 वायू मुक्त होतो, या क्रियेत पाणी तयार होते.

☄️ कार्बन हे कोणत्या प्रकारचे मूलद्रव्य आहे त्याविषयी माहिती सांगा?

उत्तर: 

कार्बन हे अधातू मूलद्रव्य आहे.

सर्व वनस्पती व प्राणी यांच्या शरीरातील मुख्य घटक म्हणजे कार्बन होय.

निसर्गात कार्बन हे मुक्त अवस्थेमध्ये हिरा आणि ग्राफाइट रूपात आढळते व संयुग रूपात ( कापूस, कर्बोदके, प्रथिने, कोळसा, नैसर्गिक वायू ) कार्बन आढळतो.


🌊 संयुग म्हणजे काय? संयुगे कशी तयार होतात?

उत्तर: 

दोन किंवा दोनपेक्षा अधिक पदार्थांमध्ये रासायनिक अभिक्रिया घडून आल्यावर तयार होणाऱ्या नवीन गुणधर्माच्या पदार्थाला संयुग असे म्हणतात.

मूलद्रव्यांमध्ये विद्युतपरमाणुची देवाण-घेवाण किंवा विद्युतपरमाणुच्या भागीदारीमुळे संयुगे तयार होतात.

वनस्पती व प्राणी यांच्यापासून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संयुगे तयार होत असतात तर निसर्गात खनिजांपासून संयुगे तयार होतात.


🔱 संयुगांचे प्रकार कोणते?

उत्तर:-

  सेंद्रिय संयुगे व 

असेंद्रिय संयुगे हे संयुगांची दोन प्रकार आहेत.

🥁 अन्नपदार्थ धागे कागद औषधे लाकूड इंधने या संयुगामध्ये सामायिक असलेली घटक मूलद्रव्य कार्बन (C) हायड्रोजन (H) व ऑक्सिजन (O) ही आहेत.

 

कार्बन मूलद्रव्याची माहिती

  1. संज्ञा - C
  2. अधातू मूलद्रव्य
  3. गण 14
  4. आवर्तन - 2
  5. अणुअंक - 6
  6. इलेक्ट्रॉन संरूपण - 2,4
  7. संयुजा - 4
  8. अणुवस्तुमान - 12
☘️ एक, दुहेरी व तिहेरी बंध
👤 एकेरी बंध
हायड्रोजन रेणू मध्ये एक इलेक्ट्रॉनची जोडी भागीदारीत येऊन एकेरी बंध तयार होतो.
👥दुहेरी बंध
ऑक्सिजनच्या रेणूमध्ये दोन इलेक्ट्रॉनच्या जोड्या भागीदारीत येऊन दुहेरी बंध तयार होतो.
☘️ तिहेरी बंध

नायट्रोजन रेणूमध्ये तीन इलेक्ट्रॉनच्या जोड्या भागीदारीत येऊन तिहेरी बंध तयार होतो.


🦅 मिथेन रेणूची रेषा संरचना व इलेक्ट्रॉन ठिपका संरचना.

😎
 कार्बनी संयुगांचे गुणधर्म 

  • कार्बनी संयुगांचा उत्कलनांक आणि द्रवणांक कमी असतो.
  • कार्बनी संयुगे उष्णता आणि विद्युत यांचे दुर्वाहक असतात.
  • कार्बनी संयुगातील रासायनिक बंधामुळे आयनांची निर्मिती होत नाही.

🎷 कार्बनची वैशिष्ट्ये:

  • श्रृंखला बंधन:- कार्बन मध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर बंध तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता असते, कार्बन अणुच्या या गुणधर्माला श्रृंखला बंधन शक्ती म्हणतात.
  • बंध:- दोन कार्बन अणूंमध्ये एकेरी सहसंयुज बंध, दुहेरी सहसंयुज बंध व तिहेरी सहसंयुज बंध तयार होऊ शकतात.
  • उदा:- 

  • चतु: संयुजा:- कार्बन चतु: संयुजी असतो. जेव्हा एक कार्बन अणू चार कार्बन किंवा इतर अणूशी बंध तयार करू शकतो तेव्हा अनेक संयोग निर्माण होतात. कार्बन अणूचे ज्यांच्याशी बंध तयार झाले त्या अणूप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त झालेले असतात.
  • समघटकता:-कार्बनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समघटकता. यामुळे कार्बनी संयुगांच्या संख्या वाढीला खूप मदत होते.


🎇 हायड्रोकार्बन:- ज्या संयुगात कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्य असतात त्यांना हायड्रोकार्बन असे म्हणतात.

सर्वात साधे हायड्रोकार्बन मीथेन होय, CH4.

🎷 हायड्रोकार्बन 

  1. ज्या हायड्रोकार्बन मध्ये प्रत्येक कार्बन अणुच्या चारही संयुजांची पूर्तता एकेरी बंधाने झालेली आहे अशा हायड्रोकार्बनला संपृक्त हायड्रोकार्बन म्हणतात.
  2.  संपृक्त हायड्रोकार्बन ला अल्केन असेही म्हणतात.
  3. CnH2n+2 हे अल्केन चे सामान्य सूत्र आहे.
  4. संपृक्त हायड्रोकार्बन हे कमी क्रियाशील असतात.
  5. संपृक्त हायड्रोकार्बन संयुगात विस्थापन अभिक्रिया घडून येते.



सरळ शृंखला, शाखीय शृंखला आणि वलयांकित सर्व प्रकारची कार्बनी संयुगे ही संपृक्त किंवा असंपृक्त असू शकतात.



🎻 असंपृक्त हायड्रोकार्बन

  1. ज्या हायड्रोकार्बन मधील किमान दोन कार्बन आणूंच्या संयुजा एकेरी सहसंयुज बंधने संपृप्त झालेल्या नसतात त्या हायड्रोकार्बनला असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणतात.
  2.  असंपृक्त हायड्रोकार्बन मध्ये अल्किन व अल्काईन चा समावेश होतो.
  3.  याचे सामान्य सूत्र CnH2n, किंवा  CnH2n-2 असते.
  4. यांची क्रियाशीलता जास्त असते.
  5. ही संयुगे समावेशन अभिक्रिया घडून आणतात.

संपृक्त हायड्रोकार्बन व असंपृक्त हायड्रोकार्बन हा फरक लिहिण्यासाठी वरील मुद्दे क्रमशः उपयुक्त ठरतात.

🎷 रचना समघटकता

भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगांचे रेणुसूत्र ज्यावेळेस एकच असते तेव्हा या घटनेला रचना समघटकता म्हणतात.

ब्युटेन मध्ये दोन भिन्न रचना सूत्रे आढळतात या दोन्ही रचना सूत्रांची रेणूसूत्र C4H10 असे आहे.


😊 वलयी हायड्रोकार्बन

काही कार्बनी संयुगामध्ये कार्बन अणूंची वलये तयार झालेली दिसतात.

उदा. सायकलोहेक्सेन या संयुगाचे रेणुसूत्र C6H12 


🎈 बेंझिन

बेंझिन हा वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन आहे. बेंझिनच्या संरचनेत सहा कार्बन अणूंच्या वलयात एक आड एक असे तीन दुहेरी बंध असतात. या हायड्रोकार्बन ला ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन संयुगे असे पण म्हणतात.

❤️कार्बनी संयुगांमधील क्रियात्मक गट

  • विविध हॅलोजन (फ्लोरिंन, क्लोरीन, ब्रोमीन आयोडीन), ऑक्सिजन (O2), नायट्रोजन(N2), गंधक(S) अशा मूलद्रव्यांबरोबर कार्बनचे बंध तयार होऊन अनेक प्रकारची कार्बनी संयुगे तयार होतात. 
  •  हायड्रोकार्बन साखळीमधील एक किंवा अधिक हायड्रोजन अणूंच्या जागी या मूलद्रव्यांच्या अणूंचे प्रतियोजन होते व त्यामुळे कार्बनच्या चतुःसंयुजेची पूर्तता होते. हायड्रोजनला प्रतियोजी अशा मूलद्रव्याच्या अणूचा उल्लेख
  • विषम अणू असा करतात. काही वेळा हे विषम अणू एकटे नसतात तर विशिष्ठ अशा अणुगटांच्या रूपात असतात.
  •  या विषम अणूंमुळे व विषम अणूंनी युक्त अशा अणुगटांमुळे त्या संयुगाला विशिष्ठ रासायनिक गुणधर्म
  • प्राप्त होतात , मग त्या संयुगातील कार्बन साखळीची लांबी व स्वरूप काहीही असो. म्हणून या विषम अणू किंवा विषम अणूंनी युक्त अशा अणुगटांना क्रियात्मक गट म्हणतात.

उदा.

  1.  अल्कोहोल --> -O-H
  2. अल्डिहाइड -- -
  3. कीटोन --> -CO- 
  4. कार्बॉक्सिलिक आम्ल - -COOH
  5. ईथर -- -O- 
  6. ईस्टर -- -COO-
  7. अमीन -- - NH3

🎻 समाजात श्रेणी

  1. कार्बन शृंखलांची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये खूप साधर्म्य असते. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट
  2. हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते तिला समजातीय श्रेणी म्हणतात.
  3. क्रियात्मक गट कोणता आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या समजातीय श्रेणी असतात. उदा. अल्कोहोलांची समजातीय श्रेणी,
  4. कार्बॉक्सिलिक आम्लांची समजातीय श्रेणी, अल्डिहाइडांची समजात श्रेणी.
  5. समाजात श्रेणीमध्ये लगतच्या दोन संयुगांमध्ये एका -CH2- गटाचा फरक असतो.



🧊
 समाजात श्रेणीची वैशिष्ट्ये

  1. समजातीय श्रेणीमध्ये एका सदस्याकडून पुढच्या सदस्याकडे जाताना एका मेथिलिन (CH2 ) घटकाची भर पडते. 
  2.  रेणुवस्तुमान 14 u नेवाढते.
  3.  कार्बन अणूंची संख्या 1 नेवाढते.
  4. समजातीय श्रेणीच्या सदस्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य असते.
  5. समजातीय श्रेणीच्या सर्व सदस्यांसाठी एकच सामान्य रेणुसूत्र असते.
  6. समजातीय श्रेणी चढत्या क्रमाने जाताना संयुगांच्या उत्खलनांक द्रवणांक यासारख्या भौतिक गुणधर्मामध्ये प्रवणता (उतार) दिसून येते.
 
 *सौंदर्याची कमतरता 
चांगला स्वभाव 
नक्की पुर्ण करतो...*
    *पण स्वभावाच्या
 कमतरतेला
 सौंदर्य कधीच 
पुर्ण करु शकत नाही...*
         *म्हणुन स्वभाव परिपुर्ण असावा 
सौंदर्य नैसर्गिक असते..!*    

                 *आपला दिवस आनंदी जावो.*


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आप...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.