10 वी. विज्ञान 1. पाठ 1 गुरुत्वाकर्षण 1.
आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇
🎻 एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो?
उत्तर: एखाद्या वस्तूवर बल लावले असेल वस्तूवर होणारे परिणाम पुढीलप्रमाणे.
- वस्तूचा आकार व आकारमान बदलू शकते.
- अचल वस्तू गतिमान होऊ शकते.
- गतिमान वस्तू स्थिर होऊ शकते.
- वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते
- वस्तूची चाल बदलू शकते
- वस्तूची चाल व वस्तूंच्या गतीची दिशा दोन्ही बदलू शकतात.
🦅 बलाचे प्रकार कोणते?
उत्तर:-
- गुरुत्वीय बल
- विद्युत चुंबकीय बल
- अणुकेंद्रकीय बल
- स्नायू बल
- विद्युत चुंबकीय बल
- घर्षण बल
- यांत्रिक बल
- स्थितिक विदयुत बल
😎 गुरुत्वाकर्षण बल हे एक वैश्विक बल आहे. विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होत असते.
😊 न्यूटनचे गतीविषयक तीन नियम हे आपणास आयुष्यभर माहीत असावेत 🙏
🦢 न्यूटनचे गतीविषयक तीन नियम कोणते?
उत्तर:
1. न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम:
जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा वस्तूच्या सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते.
न्यूटनचा पहिला नियम हा जडत्वीय व्याख्या करतो.
उदा:- गालीच्या झटकल्यास त्यावरची धूळ खाली पडते.
न्यूटनच्या गतीविषयक दुसरा नियम:-
संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते.
उदा: जेव्हा बॉल 🏀 क्षेत्ररक्षकाच्या हातात जातो आणि थांबतो तेव्हा त्याची गती शून्य होते.
न्यूटनच्या गतीविषयक तिसरा नियम:-
क्रिया बल व प्रतिक्रिया बल हे परस्पर विरुद्ध असून त्यांची परिमाणे मात्र समान असतात.
उदा:आपण चालताना जमीनीला मागे रेटतो आणि जमीन आपल्याला पुढे रेटते
🎇 अभिकेंद्री बल:-
वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्री बल म्हणतात.
अभिकेंद्री बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते.
उदा:
- पृथ्वीने चंद्रावर प्रयुक्त केलेल्या गुरुत्वीय बलामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो.
- दोरीच्या एका टोकाला दगड बांधून फिरवल्यास तो वर्तुळाकार फिरतो.
- झोका घेताना दोरीला तणाव निर्माण होतो.
😇 लंबवर्तुळ
लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला एका प्रतलाने तिरके घेतले असता तयार होणारी आकृती.
⭕ केप्लर चे तीन नियम
केप्लरचा पहिला नियम
ग्रहांची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून, सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो.
आकृती
केप्लरचा दुसरा नियम
ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते.
केप्लरचा तिसरा नियम
सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा (T) वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या (r) घनाला समानुपाती असतो.
🥁 न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत
विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करीत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराची समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते.
दोन वस्तू मधील गुरुत्वीय बल पुढील प्रमाणे काढता येते.
m1 व m2 वस्तुमानाच्या दोन वस्तू d या अंतरावर असताना.
G - जी हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात.
🌍 पृथ्वीचे गुरुत्व त्वरण
पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिजिलंब दिशेत असते.
g= GM/ r*2
G विश्व स्थिरांक
M पृथ्वीचे वस्तुमान
g गुरुत्व त्वरण
R पृथ्वीची त्रिज्या
r वस्तूचे पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचे अंतर
✍️ वस्तुमान
- वस्तूमध्ये असलेल्या द्रव्यसंचयाला त्या वस्तूचे वस्तुमान असे म्हणतात.
- वस्तुमानाचे SI एकक kg, तर CGS एकक gm आहे.
- वस्तुमान हे कधीही शून्य (0) होऊ शकत नाही.
- वस्तूचे वस्तुमान सर्वत्र सारखेच असते.
- वस्तुमान ही अदिश राशी आहे.
- वस्तुमान हे तराजूच्या साह्याने मोजतात.
🐝 वजन
- एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वस्तूचे वजन म्हणतात.
- वजनाचे SI एकक (N) न्यूटन, तर CGS एकक डाईन आहे.
- पृथ्वीच्या केंद्राजवळ वजन हे शून्य भरते.
- वस्तूचे वजन स्थानपरत्वे बदलते. (कारण पृथ्वीचा आकार)
- वजन ही सदिश राशी आहे.
- वजन हे तानकाट्याने (spring balance) मोजतात.
वस्तुमान व वजन या मुद्द्यांचा वापर करून आपण वस्तुमान व वजन हा फरक छान लिहू शकतोत.
🌖 चंद्र व भरती ओहोटी सहसंबंध
चंद्राच्या गुरुत्वी आकर्षणामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी बदलते. चंद्राच्या गुरुत्वीय बलामुळे चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्यास फुगवटा येतो व त्या स्थानापासून 90° कोण असलेल्या पृथ्वीवरील स्थानावर पाण्याची पातळी कमी होते व त्या ठिकाणी ओहटी येते.
⭐ पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण नसते तर कोणतीही वस्तू पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षणाने आकर्षित झाली नसती.
🦅 G चे मूल्य दुप्पट असते, तर काय झाले असते?
उत्तर:- G चे मूल्य दुप्पट झाले असते तर कोणत्याही दोन वस्तू मधील गुरुत्वीय बल आता आहे त्याच्या दुप्पट झाले असते. पृथ्वीचे गुरुत्व त्वरणही दुप्पट झाले असते.
🎷 पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेत काही फरक पडेल का?
उत्तर: पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेत काहीही फरक पडणार नाही.
🎻 पृथ्वीच्या केंद्रावर g चे मूल्य किती असेल?
उत्तर: पृथ्वीच्या केंद्रावर g चे मूल्य शून्य असेल.
🎈 पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी g चे मूल्य समान असेल का? तुमच्या उत्तराचे समर्थन करा?
उत्तर:
- पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी g चे मूल्य समान असणार नाही.
- पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूंचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या बिंदूच्या स्थानानुसार वेगवेगळे असते, कारण पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही.
- पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे ती ध्रुवाजवळ थोडी चपटी तर विषुववृत्तावर थोडी फुगीर आहे. त्यामुळे पृथ्वीची त्रिज्या ध्रुवाजवळ कमी भरते तेथे g चे मूल्य सर्वात जास्त म्हणजे 9.832 मीटर प्रति सेकंद वर्ग आहे.
- g= GMm/ r*2
- पृथ्वीची त्रिज्या विषुववृत्ताजवळ जास्त असल्याने त्या ठिकाणी g चे मूल्य सर्वात कमी म्हणजे 9.78 मीटर प्रति सेकंद वर्ग आहे.
- याचाच अर्थ g चे मूल्य हे ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जाताना कमी कमी होत जाते.
🌹 g चे मूल्य पडणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून आहे का? कारण सांगा?
उत्तर:- g चे मूल्य पडणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून नसते.
कारण पृथ्वीने वस्तूवर प्रयुक्त केलेले गुरुत्वीय बल वस्तूच्या वस्तूमानाशी समानुपाती असते तर ठराविक बलामुळे वस्तूत निर्माण झालेले त्वरण वस्तूच्या वस्तुमानाशी व्यस्तानुपाती असते.
####_____####
गुरुत्वाकर्षण 1 नंतर गुरुत्वाकर्षण 2 ची लिंक 🔗 खाली👇 दिली आहे.
&&&&----&&&&
🎷 *
समोरचा चुकतोय हे कोणालाही सहज कळतं....*
*पण आपण चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकच मोठं व समजूतदार लागतं...*
*आपला दिवस आनंदी जावो.🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा