मुख्य सामग्रीवर वगळा

9th, Science Part 2, 18th Chap. 18 वा पाठ,अवकाश निरीक्षण: दुर्बिणी 2.

 

9th, Science Part 2, 18th Chap. 18 वा पाठ,अवकाश निरीक्षण: दुर्बिणी 2.

आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी पुढील निळ्या लिंक ला स्पर्श करा👇

 👉 माहिती विज्ञानाची 🎷


🔭 न्यूटन पद्धतीची दुर्बीण:


अंतर्वक्र आरशांवर आधारित दुर्बिणींमध्ये

न्यूटन पद्धतीची व कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण

प्रचलित आहे.आकृती मध्ये दाखवल्या प्रमाणे

न्यूटन पद्धतीत अवकाशातून येणारे प्रकाशकिरण अंतर्वक्र आरशावरून परावर्तीत होतात.हे परावर्तित किरण आरशाच्या नाभीपाशी एकत्र येण्याआधी एक सपाट आरसा त्यांचा मार्ग बदलतो. त्यामुळे हे

किरण दुर्बिणीच्या दंडगोलाच्या लंब दिशेला एका बिंदूत एकत्र येतात. तेथे असलेल्या ‘नेत्रिका’ नावाच्या विशिष्ट भिंगाद्वारे आपण वस्तूची वर्धित म्हणजे वाढीव/ मोठी प्रतिमा पाहू शकतो.


👉कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण:


कॅसेग्रेन दुर्बीण ही एक प्रकारची परावर्तित दुर्बिणी आहे. कॅसेग्रेन पद्धतीत अंतर्वक्र आरसा वापरलेला असतो.पण इथे अंतर्वक्र आरशावरून परावर्तित झालेले किरण एका बहिर्वक्र आरशाद्वारे पुन्हा अंतर्वक्र आरशाकडेच परावर्तित होतात व अंतर्वक्र आरशाला त्याच्या केंद्रापाशी असलेल्या छिद्राद्वारे पलीकडे जाऊन नेत्रिकेवर पडतात.

 नेत्रीकेच्या साहाय्याने आपण स्रोताची वर्धित म्हणजे वाढीव प्रतिमा पाहू शकतो.

उपयोग: पृथ्वी स्टेशन,फोटोग्राफिक निरीक्षणे आणि रेडिओ दुर्बिणीसारख्या उपग्रह संप्रेषण प्रणालीच्या बांधकामात कॅसग्रेन डिझाइनचा वापर केला जातो.


🥁 आशियातील दृश्य प्रकाशाची सर्वांत मोठी दुर्बीण कोणती? व ती कोठे आहे?

उत्तर: 

भारतात दोन मीटर व्यास आरसा असलेल्या काही दुर्बिणी अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. 

भारतातील सर्वांत मोठी 3.6 मीटर व्यासाची दुर्बीण आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान शोध संस्थान, नैनिताल जिल्ह्यातील देवस्थळ ह्या संस्थेत स्थित आहे.

ही आशियातील दृश्य प्रकाशाची सर्वांत मोठी दुर्बीण


🔦 रेडिओ दुर्बीण (Radio Telescope)

  •   अनेक खगोलीय वस्तूंपासून दृश्य प्रकाशाशिवाय रेडिओ लहरी सुद्धा निघतात. या लहरी आपण साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. म्हणून या लहरी ग्रहण करण्यासाठी विशिष्ट दुर्बिणींचा वापर होतो. त्यांना रेडीओ दुर्बीण (Radio Telescope) म्हणतात.
  • रेडिओ दुर्बीण एका विशिष्ट आकाराच्या (Paraboloid आकार) डिश पासून अथवा अशा अनेक डिशच्या संचापासून बनलेली असते. 
  • दृश्य-प्रकाश दुर्बीणी`प्रमाणेच या डिशच्या वक्रपृष्ठभागावरून रेडीओ लहरी परावर्तित होतात आणि त्या डिशच्या नाभीकेंद्रापाशी एकत्रित केल्या जातात. तेथे या लहरी ग्रहण करू शकणारे एक यंत्र (Receiver) बसवलेले असते. यंत्राने ग्रहण केलेली माहिती संगणकाला दिली जाते. संगणक या माहितीचे विश्लेषण करून या रेडिओ लहरींच्या स्रोताच्या स्वरूपाचे चित्र तयार करतो. आपल्या घरावरील डीश अँटेना याचप्रकारे कार्य करतो.

📡 महाकाय रेडीओ दुर्बीण:
पुण्याजवळ नारायणगाव इथे Giant Meter-Wave Radio Telescope (GMRT) या नावाची महाकाय रेडीओ दुर्बीण उभारण्यात आलेली आहे. 
ग्रह ताऱ्यांपासून येणाऱ्या, मीटरमध्ये तरंगलांबी
असणाऱ्या रेडिओ तरंगांचा वापर करून खगोलीय वस्तुंचा अभ्यास करण्यासाठी ही दुर्बीण उभारण्यात आली आहे. 
ही दुर्बीण म्हणजे 30 Performs आकाराच्या दुर्बिणींचा समूह आहे. यातील प्रत्येक दुर्बिणीचा व्यास 45 मीटर आहे. या दुर्बिणीला महाकाय दुर्बीण म्हटले जाते. 
कारण म्हणजे यातील 30 दुर्बिणींची रचना 25 km पसरलेल्या क्षेत्रात केली आहे. ही रचना म्हणजे जणूकाही 25 km व्यास असलेली एक दुर्बींणच होय. म्हणजेच 25
km व्यास असलेल्या दुर्बिणीद्वारे जी माहिती
मिळाली असती ती माहिती या 30 दुर्बिणींच्या
समूहाद्वारे मिळते! 
GMRT ही भारतीय वैज्ञानिक व तंत्रज्ञांनी कमीत कमी खर्चात निर्माण केलेली जागतिक
दर्जाची संशोधन सुविधा आहे. 
उपयोग:या दुर्बिणीद्वारे सूर्यमाला, सौरवारे, स्पंदक, महास्फोटक व ताऱ्यादरम्यान असलेल्या हायड्रोजन ढगांचा अभ्यास
केला जातो. ह्या दुर्बिणींचा उपयोग करण्यासाठी जगभरातून शास्त्रज्ञ भारतात येतात.

👓 हबल दुर्बीण: 
1990 साली अमेरिकेच्या नासा (N.A.S.A.) व यूरोपीय अंतरिक्ष एजेंसी संस्थेने हबल या दृश्यप्रकाश दुर्बिणीचे अवकाशात प्रक्षेपण केले.
आत्तापर्यंतची सर्वात प्रगत/ आधुनिक व सर्वात मोठी दुर्बीण आहे
 हबल दुर्बीण 94 इंच व्यासाची असून भूपृष्ठापासून 569 km अंतरावरून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहे. 
अजूनही ही दुर्बीण कार्यक्षम असून, या दुर्बिणीच्या सहाय्याने केलेल्या निरीक्षणामुळे अनेक महत्त्वाचे शोध लागले आहेत.
हबल दुर्बिणीतील दोष दूर करण्यासाठी पुन्हा एकदा स्पेस शटलमध्ये आणून तिची दुरुस्ती 1993 ला करण्यात आले.

👏 चंद्रा क्ष-किरण दुर्बीण: 
क्ष-किरण ग्रहण करून त्यांच्या स्रोतांचा अभ्यास करण्यासाठी 23 जुलाई 1999 साली अमेरिकेच्या नासा संस्थेने चंद्रा क्ष-किरण दुर्बीण अवकाशात सोडली. 
64 तासामध्ये ही वेधशाळा पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करते.
क्ष-किरण परावर्तित करू शकतील अशा विशिष्ट आरशांचा उपयोग या दुर्बिणीत केला गेला.
उपयोग: चंद्रा दुर्बिणीने तारे व दीर्घिका यांच्याविषयी खूप उपयुक्त माहिती मिळवून
दिली आहे. 
विशेष आनंदाची बाब म्हणजे चंद्रा हे नाव प्रसिद्ध भारतीय भौतिक वैज्ञानिक चंद्रशेखर सुब्रमण्यम्‌ यांच्या सन्मानार्थ दिले आह👏🎻🥁.

🦅 भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र (इस्त्रो) Indian Space Research Organization (ISRO), बेंगलूरू.
स्थापना: ISRO या संस्थेची स्थापना 1969 मध्येकरण्यात आली असून येथे मुख्यत: कृत्रिम उपग्रह तयार करण्यासाठी व त्यांचे
प्रक्षेपण करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित केले जाते. 
यश: आजपर्यंत इस्रोने अनेक कृत्रिम उपग्रहांचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले आहे. स्वतंत्र भारताच्या यशस्वी कार्यक्रमामध्ये इस्रोचे कार्य अग्रगण्य आहे.
 योगदान: भारताने अंतराळशास्त्रात केलेल्या प्रगतीचे राष्ट्रीय व सामाजिक विकासात मोठे योगदान आहे. दूरसंचार
(Telecommunication), दूरचित्रवाणी प्रसारण (Television Broadcasting) आणि हवामानशास्त्र-सेवा
(Meteorological services) यासाठी INSAT व GSAT उपग्रह मालिका कार्यरत आहे. 
सेवा: INSAT व GSAT उपग्रह मालिकेमुळेच देशात सर्वत्र दूरचित्रवाणी, दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकली.
 EDUSAT उपग्रह तर फक्त शिक्षणक्षेत्रासाठी वापरला जातो. देशातील नैसर्गिक संसाधनांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन (Monitoring and Management of Natural Resources) आणि आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) यासाठी IRS उपग्रह मालिका कार्यरत आहे. 
संकेतस्थळ ः www.isro.gov.in


🙇‍♀️ अ‍ॅस्ट्रोसॅट (Astrosat)
भारतीय अंतरीक्ष अनुसंधान केंद्राद्वारा 2015 मध्ये अ‍ॅस्ट्रोसॅट या कृत्रिम उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. 
कक्षा: 650 km अंतरावर या ग्रहाची कक्षा आहे.
यूएसए आणि रशिया व्यतिरिक्त, भारत हा एकमेव देश आहे ज्याने अंतराळात अशी वेधशाळा प्रक्षेपित केली आहे.
 अ‍ॅस्ट्रोसॅट उपग्रहावर अतिनील किरणे UV व क्ष-किरणे X-ray ग्रहण करणाऱ्या दुर्बिणी व उपकरणे बसवण्यात आलेली आहेत.

अ‍ॅस्ट्रोसॅट उपग्रहाचे अधिकांश भाग भारतातच तयार केले आहेत.
वैशिष्टय़: उपग्रहाचे ठळक वैशिष्टय़ म्हणजे एकाच उपग्रहाद्वारे, एकाच वेळी विद्युतचुंबकीय तरंगलहरींच्या एका रुंद पट्टय़ांचे निरीक्षण करणे सहज शक्य आहे.
अ‍ॅस्ट्रोसॅट प्रकारचा उपग्रह हा जगातला एक अद्‌वितीय उपग्रह आहे. 
उपयोग: अ‍ॅस्ट्रोसॅटद्वारे मिळवलेली माहिती वापरून भारतीय खगोलशास्त्रज्ञ अवकाशातील विविध घटकांवर शोधकार्य करीत आहेत. अ‍ॅस्ट्रोसॅट हा भारताचा पहिला खगोलशास्त्रसाठी समर्पित उपग्रह आहे.

अपनी इच्छाऔं को 
सिमाऔं में बांधे रखो..
वरना ए शौक 
गुनांहोमे बदल जाते है...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

10 वी बोर्ड निकाल आज 🎷

 10 वी बोर्ड निकाल आज 🎷 ®®®💠®®® व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा   ▬▬▬۩۞۩▬▬▬ इयत्ता 10 वीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली 👏. 10 वीचा निकाल येत्या मंगळवारी म्हणजे दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार.🎺 विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या निकालातून त्यांना पाहता येतील. राज्यातील 23,492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विद्यार्थी 'महा एचएससी बोर्ड डॉट इन' (mahahsscboard.in) या संकेतस्थळासह विविध वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.  ®®®💠®®® 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.👇   https://sscresult.mahahsscboard.in   https://results.digilocker.gov.in   https://www.aajtak.in/education/board-exam-resul   http://sscresult.mkcl.org   https://results.targetpublications.org   https://results.navneet.com   http...

11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷

  11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷 🎷 11th Admission Registration  ●~•❅•۞•❅•~● इयत्ता अकरावी साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया  ऍडमिशन 19- 05 -2025 पासून सुरू. भाग 1 कसा भरावा   Part 1 Fill Up Guidene संपूर्ण महाराष्ट्र मध्ये यावर्षी सन 2025 पासून 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.  ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तसेच महाराष्ट्रामधील सर्व कॉलेजमध्ये लागू होणार.   यावर्षी आपल्याला 11 वीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे ऍडमिशन घ्यावे लागणार ┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━.  रजिस्ट्रेशन कसे करावे  11 वी प्रवेशाच्या Website वर जाणे✈️  visit 11 th admission website   मोबाईल 📱 वरून जर रजिस्ट्रेशन करणार असाल तर.....  क्रोम वर जाऊन तीन डॉट स्पर्श करावा व डेस्कटॉप निवडावे. ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬ स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर स्पर्श करा. https://mahafyjcadmissions.in/ {[( टिप :- मागील वर्षीपर्यंत विद्यार्थी https://11thadmission.org.in/ या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करत होते. आता व...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...