10 th, Sci-II, Life processes in living organisms: part-1.4, 10 वी, विज्ञान-2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.4.
10 th, Sci-II, Life processes in living organisms: part-1.4, 10 वी, विज्ञान-2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.4.
विज्ञानाची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी खालिल 👇लिंकला स्पर्श करावा 🎷
WhatsApp Group
Join Now
💪 गरजेपेक्षा जास्त खाल्लेले कर्बोदक पदार्थ शरीरात यकृत आणि स्नायू मध्ये ग्लायकोजेनाच्या स्वरूपात साठवले जाते.
🔊 Excess of carbohydrates are stored in liver and muscles in the form of glycogen.
🍹प्रथिने: अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन म्हणतात.
⚡ Proteins: proteins are the macromolecules formed by bonding together many amino acids.
☘️ फर्स्ट क्लास प्रथिने: प्राणिज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात.
⛱️ First class proteins: proteins of animal origin are called as first class proteins.
🌝 प्रथिनांपासून प्रति ग्रॅम 4 KCal एवढी ऊर्जा मिळते.
🔥 We get 4 KCal of energy per gram of proteins.
🫡 प्रथिनांचे पचन झाल्यावर अमिनो आम्ल तयार होते.
🫀 Amino acids are obtained after digestion of proteins.
🔦 वेगवेगळे अवयव व पेशी अमिनो आम्लांपासून त्यांना अथवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिने कशी तयार करतात यांची उदाहरणे सांगा.
उत्तर: वेगवेगळे अवयव व पेशी अमिनो आम्लांपासून त्यांना अथवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिने मिळवण्याची उदाहरणे खालील प्रमाणे.
प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेली अमिनो आम्ले
- त्वचा: मेलेनिन रंगद्रव्य, केरॅटिन.
- हाडे: ऑस्सीन
- रक्त : हिमोग्लोबीन, प्रतिपिंडे
- पेशी: प्रद्रव्य पटलातील प्रथिने, विविध विकरे.
- स्वादुपिंड : इन्शुलिन, ट्रीप्सीन
- पियुषिका ग्रंथी : विविध संप्रेरके
- स्नायू : ॲक्टीन व मायोसिन ही लवचीक प्रथिने
🎊 What are the amino acids, organs and cells produced various proteins necessary for body?
Ans: The amino acids, organs and cells produced various proteins necessary for body are as follows
Amino Acids
- Skin: Melanin , keratin
- Bones: Ossein
- Cells : various proteins of cell membrane, various enzymes
- Pancreas: Insulin, Trypsin
- Blood: Haemoglobin, Antibodies
- Pituitary Gland : Various hormones
- Muscles: Actin and Myosin flexible proteins
🥁 आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.
- गरजेपेक्षा जास्त सेवन केलेल्या प्रथिनांपासून मिळालेली अमिनो आम्ले शरीरात साठवून ठेवली जात नाहीत. त्यांचे विघटन करून त्यातून तयार झालेला अमोनिया(NH3) शरीराबाहेर टाकून दिला जातो.
- गरज असेल तर प्रथिनांचे रूपांतर दुसऱ्या उपयोगी पदार्थामध्ये जसे की ग्लुकोनीओजेनेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केले जाते.
- वनस्पती स्वतःला लागणारी अमिनो आम्ले खनिजांपासून नव्यानेच तयार करतात व त्यांपासून विविध प्रथिने तयार करतात.
- वनस्पतीपेशींच्या हरीतलवकांमध्ये असलेले रुबिस्को (RUBISCO) नावाचे विकर म्हणजे निसर्गात सर्वांत जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिने होय.
🥤We should always remember following points.
- Excess of Amino acids obtained from proteins are not stored in the body. They are broken down and the ammonia (NH3) formed is eliminated out of the body.
- If necessary, excess of proteins are converted into other useful substances like glucose through the process of gluconeogenesis.
- Plants produce the necessary amino acids from minerals denovo and there by produce different proteins.
- An enzyme RUBISCO present in the plant chloroplasts is most abundant protein found in nature.
🔦 स्निग्ध पदार्थ: मेदाम्ले आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ म्हणतात.
🎇 lipids: The substances formed by specific chemical bond between fatty acids and alcohol are called as lipids.
🫵 आपण सेवन केलेले स्निग्ध पदार्थांचे पचन होते म्हणजे त्यांचे रूपांतर मेदाम्ल आणि अल्कोहोलमध्ये केले जाते.
🦕 Digestion of lipids consumed by us is nothing but their conversion into fatty acids and alcohol.
🦢 मेदाम्लांचा वापर कोठे होतो?
प्रोजेस्टेरोन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरोन, आल्डोस्टेरोन यांसारखी संप्रेरके, चेतापेशीच्या अक्षतंतूभोवती असलेले आवरण तयार करण्यासाठी मेदाम्लांचा वापर केला जातो.
🎈 Which fatty acids are used for production of hormones?
Ans: progesterone, estrogen, testosterone, aldosterone, etc. and the covering
around the axons of nerve cells, are produced with the help of fatty acids.
💐 स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला प्रति ग्रॅम 9 KCal इतकी ऊर्जा मिळते.
🦋 We get 9 KCal of energy per gram of lipids.
🚲 रोजच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ शरीरात ‘चरबीयुक्त संयोजी ऊतींमध्ये’ साठवून ठेवले जातात.
🛩️ Excess of lipids are stored in adipose connective tissue in the body.
🌚 निसर्गात सर्वांत जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन वनस्पतीपेशींच्या हरीतलवकांमध्ये असलेले रुबिस्को (RUBISCO) नावाचे विकर होय.
🌹 An enzyme RUBISCO present in the plant chloroplasts is most abundant protein found in nature.
*संवादात होणारी
सर्वात मोठी चूक म्हणजे
आपण समजून घेण्यासाठी
ऐकत नाही , तर
उत्तर देण्यासाठी ऐकतो.*
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा