10 th, Sci-II, Life processes in living organisms: part-1.6, 10 वी, विज्ञान-2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.6.
10 th, Sci-II, Life processes in living organisms: part-1.6, 10 वी, विज्ञान-2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.6.
दररोज विज्ञानाची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी निळ्या लिंकला स्पर्श करावा 🎻👇
- आज आपण पेशीविभाजन, एक आवश्यक जीवन प्रक्रिया पाहणार आहोत.
- Today we will look at cell division, an essential life process.
- पेशीविभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे.
- Cell division is one of the very important properties of cells and living organisms.
👉 पेशी विभाजनाचे फायदे कोणते?
उत्तर: पेशी विभाजनाचे फायदे पुढील प्रमाणे,
- एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो,
- बहुपेशीय सजीवाच्या शरीराची वाढ होऊ शकते,
- शरीराची झालेली झीज भरून काढता येऊ शकते.
🫵 What is Significance of cell division?
Ans: significance of cell division are as follows,
- A new organism is formed from existing one,
- A multicellular organism grows up and
- Emaciated body can be restored.
🎻 पेशी विभाजनाचे किती प्रकार आहेत?
उत्तर: पेशी विभाजनाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत
- सूत्री विभाजन
- अर्धगुणसूत्री विभाजन.
⛱️ How many types of cell division are there?
Ans: Types of cell division are as follows,
- Mitosis and
- Meiosis
🍹 कोणत्याही प्रकारच्या पेशीविभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित म्हणजे दुप्पट करते. याचा अर्थ, जर गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर ती 4n केली जाते.
🥬 Before any type of cell division, the cell doubles up its chromosome number present
in its nucleus i.e. if chromosome number is 2n, i.e. doubled up to 4n.
🩸 आपल्याला जखम होते त्या ठिकाणच्या ऊतींतील पेशींचे काय होते?
उत्तर: एखाद्याला जखम झाल्यावर त्या ठिकाणी पुढील बदल दिसून येतात
- त्या ठिकाणच्या अनेक पेशी क्षतीग्रस्त होतात.
- जखम झालेल्या ठिकाणच्या पेशी व ऊती त्यांचे नियमित कार्य लगेच करू शकत नाही.
- जखमेच्या भागातील रक्त केशिका, रक्तवाहिन्या तुटतात व त्या भागात सूज येऊन, दाह होतो.
- वेदना संवेदी चेता पेशी वेदना प्रवृत्त करतात.
💉What happens to the cells of injured tissue?
Ans:
- Many cells are damaged, after injury.
- The pain receptor nerves induce pain.
- Blood capillaries and blood vessels get ruptured.
- The area of injury gets inflamed.
- The cells and the tissues are not able to perform the regular functions properly.
💀 झालेली जखम बरी होताना तेथे पेशी नव्याने तयार होतात का?
उत्तर: झालेली जखम बरी होताना तेथे पुढील बदल होतात:
- जखम भरून येताना जखमेवर खपली तयार होते.
- क्षतीग्रस्त झालेल्या पेशींची संख्या पेशी विभाजनातून पुन्हा भरून निघते.
- जखम भरून येण्यासाठी जखमे भोवतालच्या पेशींची संख्या भरून निघते.
- अशाप्रकारे पेशी विभाजनातून झालेली जखम भरून निघते.
🦕 Weather New cells are formed during healing of wound?
Ans:
- At the time of wound healing there is scab developed.
- The cells lost in the injury are restored back by cell division.
- For healing purpose, the cells surrounding the wound start dividing rapidly.
- In this way new cells are formed by cell division to heal the wound.
🌹 आपण फुले तोडतो त्यावेळी वनस्पतींना जखमा होतात का? त्या जखमा कशा भरून येतात?
उत्तर:
आपण फुले तोडतो तेव्हा वनस्पतींना ही जखमा होतात.
फुल तोडण्यातून झालेली जखम पेशी विभाजनातून भरून निघते.
सुरुवातीस आपणास असे वाटत होते की वनस्पतींना चेतापेशी नसतात, त्यामुळे त्यांना संवेदना नसते.
पण आधुनिक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की वनस्पतींना संवेदना असतात, फुल तोडण्यातून त्यांना त्रास होतो.
🌺 Do the plants get injured when do we pluck the flowers? How are those wounds healed ?
Ans:
The plants get injured when we pluck the flowers.
These wound get healed by restoring the cells by cell division.
First we thought that plants do not have nervous system.
Recent discoveries proved that plants also have sensations.
🎈 कोणत्याही सजीवाची वाढ कशी होते? त्याच्या शरीरात पेशींची संख्या वाढते का? वाढत असेल तर ती कशी?
उत्तर:
कोणत्याही सजीवांची वाढ ही पेशी विभाजनातून तयार झालेल्या पेशींच्या संख्येतून होते.
शरीर वाढीसाठी आवश्यक असलेल्या पेशींची संख्या ही पेशी विभाजनातून पुरवली जाते.
त्यामुळे पेशी विभाजन ही शरीर वाढीसाठी आणि शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आवश्यक क्रिया आहे.
🦢 How does the growth of any living organism occur? Does the number of cells in their body increases? If yes how?
Ans:
The growth of any living organisms occur due to the increase in the number of cells by cell division.
New cells are essential for body growth.
For body growth cells divide regularly.
Thus cells are necessary for growth and regeneration and repair of tissue.
🧬 एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा निर्माण होतो?
उत्तर:
अस्तित्वात असलेल्या सजीवापासून प्रजनन क्रियेतून नवीन सजीव तयार होतो.
प्रजननाचे दोन प्रकार आहेत लैंगिक प्रजनन व आलैंगिक प्रजनन.
अलैंगिक प्रजनन सूत्री विभाजनातून होते. सूत्री विभाजनातून तयार झालेल्या पेशी संख्येतून नवीन जीवाची निर्मिती होते.
अर्धगुणसूत्री विभाजनातून पूयुग्मक व स्त्रीयुग्मक तयार होतात.
एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव तयार होण्याची मुख्य कारण म्हणजे गुणसत्रे, जनुके आणि डीएनए आहेत.
🔊 How the new individual of a species is form from existing one of same species?
Ans:
The new individual of species is formed from existing one by the process of reproduction.
There are two types of reproduction sexual reproduction and asexual reproduction.
In asexual reproduction mitosis takes place and forms new individual.
In sexual reproduction male and female gametes are formed by reproduction division called meiosis.
The new individual of a species become similar to the existing spaces due to chromosomes, gene and DNA 🧬.
*ज्या दर्जाचे विचार असतात त्याच दर्जाचे आयुष्य असते,**त्यामुळे विचारांचा दर्जा चांगला हवा. चांगल्या विचारांनीच मनातील अंधार दूर करायचा असतो,**मनात काळोख असेल तर डोळे उघडे असूनही समोर काळोखच दिसेल. पण मनात उमेद असेल तर काळोखातही आशेचा किरण सापडेल...!!!**आपला दिवस आनंदी जावो.*🎻🎷🦢
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा