मुख्य सामग्रीवर वगळा

10th, Science II, Introduction to Microbiology V.10 वी, विज्ञान II, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची V.

10th, Science II, Introduction to Microbiology V.10 वी, विज्ञान II, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची V.

Touch the blue link below to join this What's App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇

🦚 व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणारी सेंद्रिय आम्ले व त्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव, त्याचबरोबर त्यांचे उपयोग स्पष्ट करा.
उत्तर:
  1. 1.सेंद्रिय आम्‍ल: L- ग्‍लुटामिक आम्‍ल
  2.  स्रोत: ऊस किंवा बीट यांची मळी, अमोनिआ क्षार
  3.  सूक्ष्‍मजीव: ब्रेव्‍हीबॅक्‍टेरिअम कोरीनेबॅक्‍टेरिअम
  4.  उपयोग: मोनोसोडिअम ग्‍लुटामेट (अजिनोमोटो) उत्पादन
2.1 सेंद्रिय आम्‍ल: सायट्रीक आम्‍ल 
2.स्रोत: ऊसाची मळी व क्षार 
3.सूक्ष्‍मजीव: अॅस्‍परजिलस नायगर 
4.उपयोग: पेये, गोळ्या, चॉकलेट उत्‍पादन.
3.1 सेंद्रिय आम्‍ल: ग्‍लुकॉनिक आम्‍ल.
2.स्रोत:  ग्‍लुकोज व कॉर्न स्‍टीप
लिकर
3.सूक्ष्‍मजीव: अॅस्‍परजिलस नायगर   
4.उपयोग: कॅल्शिअम व लोह कमतरता भरून
काढणाऱ्या क्षारांचेउत्‍पादन.
4.1 सेंद्रिय आम्‍ल: लॅक्टिक आम्‍ल
2.स्रोत: मळी व कॉर्न स्‍टीप लिकर 
3.सूक्ष्‍मजीव: लॅक्‍टोबॅसिलस डेलब्रुकी 4.उपयोग:  नायट्रोजनचा स्‍त्रोत जीवनसत्‍त्‍वाचे उत्‍पादन.
5.1 सेंद्रिय आम्‍ल: इटाकॉनिक आम्‍ल 
2.स्रोत: मळी व कॉर्न स्‍टीप लिकर 3.सूक्ष्‍मजीव: अॅस्‍परजिलस फेरियस
अॅस्‍परजिलस इटॅकॉनियस
4.उपयोग: कागद, वस्‍त्र, प्‍लॅस्टिक उद्योग, डिंक उत्पादन.

🧇 Write down note on Organic acids used in various commercial products,use and microbes useful for the same, 
Ans:
1.1Amino acid: L-glutamic acid
2. Source:Sugar and beet
molasses, ammonia salt
3. Microbe: Brevibacterium,
Coryno bacterium. 
4. Use: Production of monosodium glutamate (Ajinomoto).
2.1 Amino acid: Citric acid. 
2. Source: Sugar molasses, salt
3. Microbe: Aspergillus niger. 
4. Use: Drinks, toffees, chocolate
production. 
3.1 Amino acid: Gluconic acid. 
2. Source: Glucose, corn steep
liquor. 
3. Microbe: Aspergillus niger. 
4. Use: Production of minerals used as supplement for calcium
and iron. 
4.1 Amino acid: Lactic acid
2. Source: Molasses, corn steep liquor. 
3.Microbe: Lactobacillus
delbrueckii. 
4. Use: Source of nitrogen,
production of vitamins.
5.1 Amino acid: Itaconic acid. 
2. Source: Molasses, corn
steep liquor. 
3. Microbe: Aspergillus
itaconius
4. Use: Paper, textile, plastic
industry, gum production. 

🎷 सूक्ष्मजैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ व त्यांचे कार्य स्पष्ट करा.
उत्तर
1. सायट्रीक आम्‍ल, मॅलिक आम्‍ल, लॅक्टिक आम्‍ल. 
कार्य: आम्‍लता देणे.
2. ग्‍लुटामिक आम्‍ल, लायसिन,ट्रिप्‍टोफॅन. 
कार्य: प्रथिन बांधणी करणे.
3. नायसिन, नॅटामायसिन 
कार्य: सूक्ष्‍मजीव प्रतिबंधक
4. अॅस्‍कॉर्बिक आम्‍ल (Vitamin C), B12, B2.
कार्य: अॅन्‍टीऑक्‍सीडंट व जीवनसत्‍त्‍वे.
5. बीटा कॅरोटीन, लायकोपिन, झॅन्‍थीन्स, ल्‍युटिन्‍स. 
कार्य: खाद्य रंग
6. पॉलीसॅक्‍राईड्स, ग्‍लायको लिपिड्स.
कार्य: इमल्सिफायर्स.
7. व्‍हॅनिलिन, इथाईल ब्‍युटिरेट (फळांचा स्‍वाद), पेपरमिंट स्‍वाद, विविध फुलेव फळांचेसुगंध
कार्य: इसेन्‍स (खाण्‍यायोग्‍य सुगंधी द्रव्ये).
8. झायलीटॉल (Xylitol),अॅस्‍परटेम.
 कार्य: गोडी देणे(उष्‍मांक कमी असतो, मधुमेही रुग्‍णांना उपयुक्‍त).

🔊 Write down substances obtained by microbial processing and their roles. 
 Ans:
1. Citirc, Malic and Lactic acid.
Role: To impart acidity
2. Glutamic acid, Lysine, Tryptophan. 
Role: Protein binding.
3. Nycin and natamycin.
Role: Microbial restrictor. 
4. Ascorbic acid (Vit. C), B12, B2
Roles: Antioxidants, vitamins.
5. Beta carotene, lycopenes, xanthenes, lutein.
Role: Edible colours. 
6. Polysaccharides, glycolipids.
Role: Emulsifiers. 
7. Vanillin, Ethyl butyrate (fruit flavour), peppermint
flavour, essence of various fruits and flowers.
Role: Essence. 
8. Xylitol, aspartame.
Role: Artificial sweetener (low calorie).

🦋 प्रतिजैविके (Antibiotics) म्हणजे काय?
उत्तर :
  • प्रतिजैविके हा सर्वसाधारण औषधांचा गट आहे ज्यांचा वापर जीवाणू, बुरशी व प्रोटोझोआ आदि सूक्ष्मजीवांवर उपचार म्हणून केला जातो.
  • प्रतिजैविके ही कार्बनी संयुगे असून ती सूक्ष्मजीवांचा नाश करतात.
  • प्रतिजैविकांच्या वापरामुळे सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध होतो.
  • जिवाणू आणि कवक यांच्यापासून प्रतिजैविके तयार केली जातात.

🔦 What do you mean by antibiotics?
Ans
  • Antibiotics are carbon medicines that fight infections caused by bacteria and fungi.
  •  Antibiotics either killing the bacteria or making it difficult for the bacteria to grow and multiply.
  • Antibiotics are produced from bacteria and fungi.


🔫 प्रतिजैविकांचे सेवन करताना कोणती खबरदारी घ्यावी?
उत्तर:
  •  डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविक औषधे घेऊ नयेत.
  • स्वतःच्या मतांनी प्रतिजैविकांची खरेदी किंवा सेवन करू नये.
  • डॉक्टरांनी दिलेला प्रतिजैविकांचा संपूर्ण कोर्स पूर्ण करावा.
  • आपणास आजारातून बरे वाटले तरीही प्रतिजैविकांचा डोस पूर्ण करावा.
  • आपण स्वतःच्या इच्छेने इतर लोकांना कोणतेही प्रतिजैविक सुचवू नये. 

 🥁 Which precautions should be taken about consumption of antibiotics?
Ans
  • Antibiotics should be taken only when doctor prescribes to take dose. 
  • It is dangerous to take antibiotics at our own will.
  • One should not purchase any antibiotics from medical stores without prescription.
  • The dose of the antibiotics as told by doctor should be completed. 
  • Antibiotics should not be left half way even if one feels well.
  • We should not suggest any antibiotics to other people at our own will. 

🥁🎇 बातमी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी एक गोड, आनंदाची, अभिमानाची बातमी दिली.चाळीस वर्षानंतर भारतीय अंतराळात जात आहेत.
मिशन गगनयान
चारही ग्रुप कॅप्टन ची नावे पुढीलप्रमाणे
प्रशांत बालकृष्णन नायर
अजित कृष्णन
अंगद प्रताप 
शुभांशू शुक्ला
भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी चारही अंतराळवीरांच्या वर्दीवर सोनेरी पंखांचे डिझाईन असलेले अॅस्ट्रोनाॅट विंग लावले.
चौघेही फायटर पायलट आहेत.
 सुखोई- 30 व इतर लढाऊ विमाने उडवण्यात तज्ञ आहेत. यातील तिघांना अवकाशात जाण्याची संधी मिळणार आहे.
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मांनी 1984 मध्ये अंतराळयात्रा केली होती.

              
 *प्रश्न किती गहन असो 
उत्तर देते विज्ञान,* 
              *तर्काच्या सुगंधाचे अंत्तर देते विज्ञान,* 
             *अंधश्रद्धेच्या पलीकडचे पाहू शकते विज्ञान,* 
             *तुमच्या माझ्या श्रद्धे सोबत राहू शकते विज्ञान.* 
             *विज्ञान शिकता शिकता विज्ञान जगता आले पाहिजे,* 
             *शिकलेले विज्ञान जगणे म्हणजे खरे विज्ञान शिकणे होय.* 
              *राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!*
 
विज्ञान दिनानिमित्त माझ्या मुलाचे भाषण




           *जीवनभर 'अहंकाराला' मोठा करून 'रागाला' जन्माला घालण्यापेक्षा, 'संयमाला' शांतीचे 'खुराक' घाला, सुविचाराने 'धष्टपुष्ट' करून 'आनंदाला' जन्माला घाला.* 
                 *मग 'आयुष्य' नावाच्या मैदानात, 'नातं' नावाचा खेळ, कोणीही 'उध्वस्त' करण्याची हिम्मत करणार नाही...*
 *आपला दिवस आनंदी जावो.*🎷

      


  

 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आप...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.