मुख्य सामग्रीवर वगळा

10 th, Sci.2, Disaster management 5, 10 वी, विज्ञान भाग 2,आपत्ती व्यवस्थापन 5.

 

10 th, Sci.2, Disaster management 5, 10 वी, विज्ञान भाग 2,आपत्ती व्यवस्थापन 5.


What's app link 👇


माहिती विज्ञानाची 🎷 🔴👈

आपण आयुष्यभर विद्यार्थीच आहोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू.

अभ्यास हा दररोज करायचा असतो. ज्ञान मिळवण्यासाठी वाचन हवे. ज्ञानासाठी सस्नेह निमंत्रण 🙏.


  • आपत्ती काळात प्रशासकीय अडचणी उद्भवतात.
  • Administrative problems arise during the disaster. 
  • पुनर्निर्मान ही अवस्था अत्यंत लिस्ट स्वरूपाचे असते.
  • Reconstruction phase is highly complicated phase. 
  • चेर्नोबिल येथील अणुभट्टी फक्त वीजनिर्मिती साठी वापरली जात होती.
  • The atomic energy plant at Chernobyl was used only for electricity generation
  • 2014 साली माळीण, तालुका आंबेगाव, जिल्हा- पुणे येथे मोठे भूस्खलन होऊन दरड कोसळली होती.

  • There had been huge landslide in the village Malin, Taluka Ambegaon in 2014.
  • देशाच्या अर्थव्यवस्थेवर आपत्तीमुळे निश्चितच परिणाम होतो.
  • Disasters definitely affect the economy of the nation. 
  • एखाद्या अपत्तीत स्थानिक नेतृत्व प्रभावी नसेल तर तेथील नागरिक दिशाहीन बनतात.
  • If local leadership is not strong enough, citizens become confused. 
  • भूकंपामुळे कच्छमध्ये अकस्मात अनेक शाळकरी मुले मातीच्या ढिगार्‍याखाली गाडली गेली.
  • In Kutch, suddenly many school children were buried under the rubble due to earthquake
  • चेन्नईमध्ये आलेल्या  त्सुनामीच्या महाकाय लाटेने बऱ्याच लोकांचा 2004 च्या डिसेंबर मध्ये घास घेतला.
  • The huge waves of Tsunami in Chennai engulfed many human lines in December 2004.
  • कोरड्या दुष्काळामुळे विदर्भातील लोकांना खायला अन्न नसल्याने त्यांना स्थलांतर करावे लागले.
  •  Because of lack of grains, people from Vidarbha migrated to other reasons due to dry famine
  • बंदीपूरच्या जंगलात जंगल वनव्यामुळे हत्ती धुरापासून सैरावैरा पळू लागले.
  • Due to forest fires elephants in the Bandipur forest started running helter and shelter due to smoke. 
  • 🔥आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा. Identify the type of disaster and describe the effects of the same in brief. 

 💦 कावीळ

  • आपत्ती प्रकार: नैसर्गिक, जैविक, प्राणीजन्य.
  • कावीळ हा विषाणूजन्य आजार आहे.
  • प्रसार: दूषित पाणी व दूषित अन्नाद्वारे कावीळ हा आजार पसरतो.
  • काविळीची साथ आटोक्यात आणणे कठीण ठरते, कारण मोठ्या शहरात अन्न सुरक्षितता जपणे अवघड कार्य असते.

🌊 Hepatitis/ Jaundice

  • Type of disaster: Natural, biological, animal origin. 
  • Hepatitis is a viral disease.
  • Hepatitis spreads through the contaminated water and food.
  • The outburst of epidemic of hepatitis is difficult to control because the quality of roadside food is often consumed.


😢चोरी

  • आपत्ती प्रकार-  मानवनिर्मित हेतूपुरस्सर.
  • दुष्परिणाम- आपल्या कष्टाचे पैसे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्यामुळे त्या व्यक्तीस/ कुटुंबास मानसिक धक्का बसतो.
  • चोरी मुळे झालेले आर्थिक नुकसान भरून न येण्यासारखे असते.
  • बऱ्याच वेळेस चोरांकडून शारीरिक त्रासही दिला जातो, यात जीवित हानी ही होऊ शकते.

🥹Theft 

  • Type of disaster- man-made, intentional.
  • The person who suffers the economical loss undergo mental and emotional shock.
  • Theft causes economic loss for the one whose money or valuables silver, gold, articles are looted.
  • Many times the thief may cause physical hard or life too. 


☠️ दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तीमध्ये वाढ होण्याची कारणे सांगा.

उत्तर: 

  • आर्थिक संकट भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा गैरवापर केला गेला.
  • दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी महासंहारक अणुबॉम्ब टाकले गेले, यातून जगभरात जनतेच्या आरोग्यावर विपरीत दुष्परिणाम झाले.
  • नाझी अत्याचारामुळे लोकांच्या मनात तेढ निर्माण झाले. अपहरण दहशतवाद सामाजिक संघर्ष इत्यादी गोष्टी वाढल्या.
  • आर्थिक विषमता, वांशिक आणि धार्मिक तेढ, सामाजिक विषमता असे अनेक प्रश्न प्रमाणाबाहेर वाढत गेले.
  • दुसऱ्या महायुद्धानंतरही शेजारच्या देशांशी युद्धे होत राहिल्यामुळे भौगोलिक सीमा बदलल्या. लोकांच्या मनात असुरक्षितता सतत वाढत गेली.

🔫 War the reasons for increase in human disasters after the World War-II.

Ans

  • To overcome financial loss misuse of Science and technology was done to retrieve these deficits. 
  • The geographic, religious, racial and ethnic differences sprang tremendously. 
  • Atrocities that Nazi has performed made deep impact on the minds of people. Robberies, terrorism and social unrest increased in almost all the countries.
  • Due to fighting in neighbouring Nations, geographical boundaries were changed. People always had feelings of insecurity.
  • Social inequality, economic disparity, racial and religious differences where some adversaries that created unrest in the country. 
  • At the end of World War-II the atomic bombs were dropped in Hiroshima and Nagasaki of Japan. This has created health problems in the entire world

*असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.*
*तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते,*
*त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो,*
*आणि*
*तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाचीही पर्वा, भीती नसते.*🎷🦚🦋


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आप...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.