मुख्य सामग्रीवर वगळा

10 th, Sci.2, Disaster management 4, 10 वी, विज्ञान भाग 2,आपत्ती व्यवस्थापन 4.

 

10 th, Sci.2, Disaster management 4, 10 वी, विज्ञान भाग 2,आपत्ती व्यवस्थापन 4.



What's app link 👇

ग्रुप वर जॉईन का व्हावे? यांची कारणे....
आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू.
अभ्यास हा दररोज करायचा असतो. परीक्षेची तयारी दोन-चार दिवसात करून ज्ञान वाढत नसते.


😰 प्रथमोपचार म्हणजे काय?
उत्तर:
  •  रुग्णालयात जायच्या आधी केलेला घरगुती प्राथमिक उपाय म्हणजे प्रथमोपचार.
  • विशिष्ट वैद्यकीय उपचार उपलब्ध होईपर्यंतच्या कालावधीत दिला जाणारा उपचार म्हणजे प्रथमोपचार होय.
  • एखाद्या आजारी किंवा जखमी व्यक्तीला आपत्कालीन परिस्थिती एखाद्या तज्ञ नसलेल्या व्यक्तीद्वारे जो प्राथमिक उपचार दिला जातो त्यास प्रथमोपचार म्हणतात.

⛑️What is first aid? 
Ans:
  •  Immediate aid  given to someone who is ill or injured is called first aid.
  • The primary immediate help given to a Sick or injured person until full medical treatment is available.

💁‍♂️आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपद्ग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा?
उत्तर: 
  • जखमी व्यक्तीला आराम पडेल अशा अवस्थेत ठेवावे.
  • कोणत्या प्रकारची इजा आहे त्याप्रमाणे प्रथमोपचार करावा.
  • प्रथमोपचार हा लगेच करावयाचा असतो यात विलंब जीवावर बेतू शकतो.

⛑️ How can we offer first aid to victims of any disaster?Ans: 
  • put injured person in resting position in which sufferer is at ease. 
  • The most important is timely rescue which can help the victim to survive.
  • First it given maybe different for different sufferer depending upon the nature of the disaster. 

🩹 प्रथमोपचार पेटी साठी आवश्यक साहित्य
औषधे:
  •  अँटीसेप्टिक्स जसे डेटॉल, सॅव्हलाॅन, पेट्रोलियम जेली.
  • साहित्य: ब्लेड, सुई, कात्री, छोटा चिमटा, सेफ्टीपिना
  • पट्ट्या: वैद्यकीय कापूस, जखमा बांधण्यासाठी बँडेज पट्ट्या,
  • आवरण: बँड -एडसजाळीची पट्टी, त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारी बँडेजेस,  चिकटपट्टी.
  • रबरी हातमोजे, अँटीसेप्टिक साबण 🧼, सुके सुती कापडाचे तुकडे, टॉर्च 🔦.

🧤 The necessary material in first aid box:
  • Medicines such as Dettol sevlon type antiseptics, petroleum jelly.
  • Hand gloves , antiseptic soap, 🧼 clean and try cotton cloth pieces. 
  • Small pins, needle, safety pins, blade,  scissors ✂️, torch 🔦.
  • Triangular and circular bandage, medicated cotton, band aid, bandage strips of different size. 

💯 स्वतःच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे मुद्दे:
  • गर्दीची ठिकाणे टाळावित, गर्दीच्या ठिकाणी गोंधळ करू नये.
  • रस्ता ओलांडत असताना डावीकडे व उजवीकडे पाहावे, रहदारीचे नियम पाळावेत.
  • महत्वाचे दूरध्वनी क्रमांक पाठ असावेत किंवा डायरेक्ट लिहिलेले असावेत. मुलांची हेल्पलाइन 1028, रुग्णवाहिका 102, आपत्ती नियंत्रण कक्ष 108, पोलीस 100, अग्निशामक दल 101,चाइल्डलाइन 1098, बालविवाह निर्मूलन 1098 व 112.
  • बेवारस वस्तू हात लावू नये.
  • शाळेमध्ये, रेल्वे स्थानकात जिना उतरताना गर्दी न करता आणि एकमेकांना न ढकलतात उतरावे.

🛟 Important notes for our safety:
  • Avoid crowded places, don't mess around in crowded places.
  • Looking first at left and then at right side while crossing the road. Always follow the traffic rules.
  • Not to crowd and push each other while using staircase in school and in railway station. 
  • Important helplines should be remembered, note down in diary and used whenever need arises: Police station 100, Child helpline 1018, Ambulance 102, Disaster control unit 108, Fire fighting force 101, Abolition of child marriage- 1098 and 112.
  • Do not touch any unclaimed object.
  • Not to cause chaos at the crowded places. 
  • Not to spread rumours.

अभिरूप सरावाचे ध्येय स्पष्ट करा. Aim of mock drill. 
  • आपत्ती ओढावल्यावर आपण कसे वागतो याची कार्यक्षमता ओळखता येते.
  • आपत्तीच्या परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्याची क्षमता वाढवणे.
  • आपत्ती नियंत्रणाच्या निरनिराळ्या विभागात असणारा समन्वय सुधारणे.
  • आपत्ती आल्यावर दिलेला प्रतिसाद कसा आणि कितपत प्रभावी आहे याची योग्य मूल्यमापन करणे.
  • आपत्ती आली असताना कराव्या लागतील अशा नियोजित कृतींची यशस्वीता तपासणे.
  • आपत्ती व्यवस्थापन करताना संभाव्य त्रुटी आणि धोके ओळखणे.

Aim/objectives of mock drill. 
  • Checking the competency/ability of the planet action. 
  • Evaluating/judging the response of the common people to the disaster. 
  • Developing the ability to respond quickly to disaster. 
  • Improving the coordination between various departments that work for the disaster control.
  • Identifying one's own abilities at the time of disaster.
  • Assessing/estimating the possible errors and risks. 


                *आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते. 
त्यामध्ये मे महिन्याची सुट्टीही नसते.*
                *स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत,
तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.*

             *आपला दिवस आनंदी जावो.🎷

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आप...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.