मुख्य सामग्रीवर वगळा

Top 10, 10th, part II, Heredity and Evolution I Top 10, भाग II, 10 वी, अनुवंशिकता व उत्क्रांती I,

 


Top 10, 10th class,part II, Heredity and Evolution I

Top 10, भाग II, 10 वी अनुवंशिकता व उत्क्रांती I,


आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला 🔗 स्पर्श करा👇

👉 माहिती विज्ञानाची 🎷


प्रथम आपण एक वाद निर्माण करणारा प्रश्न पाहणार आहोत.

* आपल्या पचनसंस्थेतील आंत्रपुच्छ appendix या अवयवाचे काम काय आहे?

उत्तर:- पचनसंस्थेतील आंत्रपुच्छास कोणतेही कार्य नाही.

(मानवी आंत्रपुच्छ मध्ये लिम्फोइड पेशी आहेत, ज्यामुळे शरीरास रोग संक्रमणास लढायला मदत होते. कच्चे अन्नपचनास मदत करणे. एखाद्या व्यक्तीला अमांश, कॉलेरा यासारखे आजार झाल्यावर यातून बरे होण्यासाठी अपेंडिक्स त्याच्या चांगल्या बॅक्टेरियांचा साठा सोडते आणि आपली पाचक प्रणाली "रीबूट करतो". काही जणांचे असे मत आहे की आपल्या अन्न नलिकेतील कचरा काढून टाकण्याच्या कार्यात देखील अपेंडिक्स मदत करते.)

कृपया आपणास योग्य वाटेल तेच घ्यावे 🙏


* आपल्या अक्कलदाढेचा अन्न चावून खाण्यासाठी खरंच उपयोग होतो का?

उत्तर:- आपल्या अक्कलदाढेचा अन्न चावून खाण्यासाठी उपयोग होत नाही.

* डायनासोर सारखे महाकाय प्राणी नामशेष काय झाले? 

उत्तर:-

  •  6.5 करोड वर्षांपूर्वी एक महाकाय उल्का पृथ्वीवर आदळली, यातून डायनासोर नष्ट झाले.
  • स्वतःच्या परिसरात जुळून न घेता आल्यामुळे डायनासोर नष्ट झाले.
  • हिमयुगाची सुरुवात झाल्यावर, अन्नाची कमतरता भासू लागली आणि यात उपासमारीने डायनासोरना जगणे कठीण झाले.



* सजीवांच्या पेशी केंद्रकातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता?

उत्तर:- केंद्रकाम्ले व प्रथिने यांनी बनलेले गुणसूत्र हे सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवंशिक गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत वाहून निराळा घटक होय.


* आपल्या मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात?

उत्तर:- अनुवंशिकता असा गुणधर्म आहे ज्यात आपल्या मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संतती मध्ये संक्रमित होतात.


* डी. एन. ए. (🧬) चा रेणू कोणत्या घटका पासून बनलेला असतो?

उत्तर:- डीऑक्सिरायबोझ शर्करा, फॉस्फोरिक आम्ल आणि नत्रयुक्त पदार्थांच्या जोड्यांनी, दोन  सर्पिलाकार धाग्यापासून  डी. एन. ए. चा रेणू बनलेला असतो.


* अनुवंशिकता म्हणजे काय?

उत्तर:- एका पिढीतील जैविक लक्षणे जणूकांच्या मदतीने पुढच्या पिढीत संक्रमित होण्याला अनुवंशिकता म्हणतात.


* ग्रेगर जोहान मेंडेल यांनी वाटाण्याच्या झाडावर विविध प्रयोग करून अनुवंशिकतेबद्दलचे निष्कर्ष शोधून काढले.


* वॉल्टर सटन या शास्त्रज्ञांनी नाकतोड्याच्या पेशी मध्ये गुणसूत्राच्या जोड्या शोधल्या.


* प्रथिने संश्लेषणाच्या प्रक्रियेचा उलगडा झाल्यावर मानवास काय फायदा झाला?

उत्तर:- प्रथिने संश्लेषणाच्या प्रक्रियेचा उलगडा झाल्यावर मानवास पुढील प्रमाणे फायदा झाला.

  • डी. एन. ए. च्या रेणूमध्ये असणारे जनुकीय संकेत समजले.
  • यातून जणूक अभियांत्रिकीचे शास्त्र विकसित झाले.
  • पुन: संयोजी डी.एन.ए. तंत्र विकसित झाले.


* अनुवंशिकिचा मानवास होणारा उपयोग.

उत्तर:- अनुवंशिकिचा मानवास पुढील प्रमाणे उपयोग होतो. 

  • अनुवंशिक विकृतींचे निदान करता येते.
  •  अनुवंशिक विकृतीला प्रतिबंध करता येतो.
  •  अनुवंशिक विकृतीवर विचार करता येतात.
  •  प्राणी संकर व वनस्पती संकर करता येते.
  • औद्योगिक प्रक्रियांत सूक्ष्मजीवांचा वापर करता येतो.


* डी.एन.ए चा रेणू दोन सर्पिल आणि एकमेकात गुंतलेल्या समांतर न्यूक्लिओटाइड धाग्यांचा बनलेला असतो.


* आर. एन. ए. (RNA) हे न्यूक्लिओटाइडने बनलेले, एकच धागा असलेले न्युक्लीक आम्ल आहे.


* डी.एन.ए रेणू मधील नायट्रोजन युक्त पदार्थ प्युरीन आणि पिरिमिडीन या दोन प्रकारचे असतात.


* आर. एन. ए. चे घटक पुढीलप्रमाणे: न्यूक्लिओटाइड 1. रायबोज शर्करा, 2. फॉस्फेटचे रेणू, 3. नत्रयुक्त पदार्थ.


* आर. एन. ए. मधिल चार नायट्रोजन युक्त पदार्थ

1. ग्वानिन,

2. सायटोसीन,

3.ॲडेनीन व

4. युरॅसिल.


* डी.एन.ए रेणू मधील ॲडेनीन व ग्वानिन हे दोन प्युरीन तर सायटोसिन आणि थायमिन हे पिरिमिडीन पदार्थ आहेत.


* ॲडेनीनची थायमिन बरोबर आणि ग्वानिनची सायटोसिन बरोबर जोडी असते.


* डी.एन.ए. च्या सर्पिल रेणूचे दोन्ही धागे हायड्रोजन बंधनामुळे शिडीतील पायऱ्याप्रमाणे जोडलेले असतात.


* RNA च्या कार्यानुसार त्यांचे तीन प्रकार पडतात.

1. मेसेंजर RNA (m-RNA)

2. रायबोझोमल RNA ( r-RNA)

3. ट्रान्सफर RNA (t-RNA)


* व्याख्या

1. प्रतिलेखन (Transcription):-

DNA च्या रेणू वरील जणूकांच्या साखळीप्रमाणे आर. एन. ए. तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन (Transcription) म्हणतात.


2. भाषांतरण (translation):-

m-RNA वर जसा कोडॉन असतो, त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन ज्या t-RNA वर असतो त्या t-RNA ला, m-RNA च्या जवळ आणले जाते या प्रक्रियेला भाषांतरण (translation) असे म्हणतात.


3. स्थानांतरण (translocation)

ज्या वेळी रायबोझोम, m-RNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक-एक ट्रीप्लेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो, त्यावेळी होणाऱ्या क्रियेस स्थानांतरण (translocation)  म्हणतात.


* डॉक्टर हरगोविंद खुराना या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांनी सर्व वीस आम्ला करिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली.


* उत्परिवर्तन (mutation):-

जणूकांतील एखाद्या न्यूक्लिओटाइडने अचानक आपली जागा बदलल्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो, त्या बदलाला उत्परिवर्तन म्हणतात.


* कार्बनी वयमापन ( Carbon Dating)

मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्या शरीरातील C-14 आणि C-12 यांचे गुणोत्तर सतत बदलत असते अशा बदलणाऱ्या गुणोत्तरास कार्बनी वय मापन असे म्हणतात.

प्राणी अथवा वनस्पती जिवंतपणी सतत कार्बन ग्रहण करत असतात, पण मृत झाल्यावर हे कार्बन ग्रहण थांबते त्या क्षणापासून त्यांच्या शरीरात C-14 चा ह्रास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. C-12 हा किरणोत्सारी नसतो. त्यामुळे मृत शरीरातील C-14 आणि C-12 यांचे गुणोत्तर सतत बदलते.



नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही.* 


*जीव तेंव्हाच जातो जेंव्हा आपल्याला पोहता येत नाही..*

 

*त्याप्रमाणे परिस्थिती कधीच समस्या नसते.*

*ती समस्या तेंव्हाच बनते, जेंव्हा आपल्याला नीट हताळता येत नाही.*

🙏🎺

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आपण तपासले पाहिजे. जो

Practice... Of Chemical Reaction 🎷 1

 Practice... Of Chemical Reaction 🎷 1 Touch the blue link below to join this What's App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇 👉  मा हिती विज्ञानाची 🎷 Practice and discipline/ keep patience are very essential for understanding or learning chemical reactions. In daily life, many natural and man-made chemical reactions occur, but we might not be aware of how to write that chemical reactions. To write a chemical reaction, basic preparation is necessary. First, it's necessary to remember a minimum of one to twenty basic elements. Additionally, knowledge of the symbols for these elements is necessary. 1. Hydrogen (H),  2. Helium (He) 3. Lithium (Li),  4. Beryllium (Be) 5. Boron (B),  6. Carbon (C) 7. Nitrogen (N),  8. Oxygen (O) 9. Fluorine (F),  10. Neon (Ne) 11. Sodium (Na),  12. Magnesium (Mg) 13. Aluminum (Al), 14. Silicon (Si) 15. Phosphorus (P),  16. Sulfur (S) 17. Chlorine (Cl),  18. Argon (Ar) 19. Potassium (K),  20. Calcium (Ca) If we know the proper definitions of some te

अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷

  अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷 1 आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷  😀 रासायनिक अभिक्रिया येण्यासाठी सखोल अभ्यास व संयमाची गरज आहे. दैनंदिन जीवनात निसर्गतः व मानव निर्मित अनेक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. पण रासायनिक अभिक्रिया कशा लिहाव्यात हे आपणास माहीत नसते.  🎻 रासायनिक अभिक्रिया लिहिण्यासाठी पूर्व तयारी ही आवश्यक असते. ⭐ प्रथम आपणास कमीत कमी एक ते वीस मूलद्रव्य पाठ असणे आवश्यक आहे. त्यासोबत त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा आपणास माहित असणे आवश्यक आहे. 1. हायड्रोजन H, 2.हेलियम He  3. लिथियम Li, 4 बेरिलियम Be  5.बोरॉन B  6.कार्बन C ,  7. नायट्रोजन N, 8.ऑक्सिजन, O 9. फ्लोरीन, F   10.निऑन Ne 11.सोडियम, Na  12. मॅग्नेशियम, Mg  13. ॲल्युमिनियम, Al 14.सिलिकॉन, Si  15.फॉस्फरस, P 16. सल्फर (गंधक), S 17. क्लोरीन, F 18. अरगॉन, Ar 19. पोटॅशियम, K 20. कॅल्शियम. Ca यानंतर आपणास काही  व्याख्या माहीत असणे आवश्यक आहे. 1. अणुअंक :- मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉन किंवा  इलेक्ट्रॉन च्या संख्येला अणुअं