मुख्य सामग्रीवर वगळा

Top 10, 10 th Class, विज्ञान I, अवकाश मोहीम.

Top 10, 10 वी विज्ञान I, अवकाश मोहीम

*

सुख दुख तो अतिथि है,.*

*बारी बारी से आयेंगे चले जायेंगे..*

*यदि वो नहीं आयेंगे तो हम*

*अनुभव कहां से लायेंगे।*


अवकाश मोहीम.

      2023 हे वर्ष भारतीय अवकाश संशोधनासाठी अत्यंत मोलाची ठरले. चंद्रयान 3 व आदित्य L 1  यांचे प्रक्षेपण यशस्वी झाले व जगात भारताचे नाव अवकाश संशोधनात अग्रेसर झाले. जगासाठी अशक्य असलेल्या चंद्राच्या भागावर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान दोन यशस्वीपणे उतरले त्यामुळे जगाचे नेत्र विस्फारले गेले.

आज आपण इयत्ता दहावी भाग- 1 दहावा धडा अवकाश मोहीम पाहणार आहोत.


* अवकाश व आकाश यातील  फरक 

 अवकाश व आकाश यातील फरक पुढीलप्रमाणे आहे.

  •  1. पृथ्वीवरून दिवसा दिसते ते आकाश व रात्री दिसते ते अवकाश.
  • 2. पृथ्वीच्या वातावरणाच्या अंतरापर्यंत आकाशाला मर्यादा आहे. पण अवकाश अनंत आहे आपल्या डोळ्यांना दिसत नाही त्याही पलीकडे अवकाश आहे.
  • 3. व्याख्या आकाश:- पृथ्वी सभोवतालचे वातावरण व त्याही पलीकडील नुसत्या डोळ्यांनी दिसणारा भाग म्हणजे आकाश होय.
  • 4. व्याख्या अवकाश:- विश्वातील सर्व घटक ज्या अमर्याद न संपणाऱ्या विस्तारात फिरतात अशी अनंत, अथांग पोकळी म्हणजे अवकाश होय.
  • 5. आकाश व अवकाश यांना निश्चित अशी सीमारेषा नाही. जर तुलना केली तर, अवकाशाच्या मानाने आकाशी फारच लहान क्षेत्र आहे.


* सौरमंडलातील विविध घटक 


  •  1. आपले सौरमंडल हे अतिविशाल आकाशगंगेचा एक अगदी छोटासा घटक आहे.
  • 2. आपल्या सौरमंडळात केंद्रस्थानी म्हणजे मध्यभागी सूर्य हा प्रचंड आकाराचा तारा आहे.
  • 3. आपल्या सौरमंडलात सूर्याभोवती क्रमशः बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून हे ग्रह फिरत असतात.
  • 4. उल्का, अश्णी, धूमकेतू, लघुग्रह हे पण आपल्याच सौरमंडळात आहेत.


* उपग्रह म्हणजे काय?

  • उत्तर:-
  •  1.सौरमंडलातील एखाद्या ग्रहाच्या भोवती वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणारा खगोल म्हणजे उपग्रह होय.
  • 2. ग्रहाला उपग्रह असेलच असे नाही. उदा. बुध हो शुक्र या दोन ग्रहांना उपग्रह नाही.
  • 3. काही ग्रहांना एकापेक्षा अधिक उपग्रह आहेत. उदा.
  • a. गुरु ग्रहाला 69 उपग्रह आहेत.
  • b.शनि-82
  • C.युरेनस- 27
  • D.नेपच्यून- 14


* पृथ्वी ग्रहाला केवळ एकच नैसर्गिक उपग्रह असून त्यास आपण चंद्र (Moon 🌝) असे म्हणतो.


* कृत्रिम उपग्रहाद्वारे कोणकोणत्या प्रकारच्या दुर्बिणी पृथ्वीची परिक्रमा करीत असतात? त्यांना अवकाशात ठेवणे का आवश्यक असते?

उत्तर:- कृत्रिम उपग्रहावर खालील प्रकारच्या दुर्बिणी कार्यरत असतात.

  • 1. दृश्य प्रकाश वक्रीभवन दुर्बीण.
  • 2. दृश्य प्रकाश परावर्तक दुर्बीण.
  • 3. रेडिओ दुर्बीण.

ज्या दुर्बिणी पृथ्वीच्या वातावरणात असतात त्यांना तापमान, हवेचा दाब, ढगाळ वातावरण, शहरातील प्रदूषण, शहरातील प्रकाशझोत या अडचणींवर मात करावे लागते. पण जर आपण दुर्बिणी अवकाशात ठेवल्या तर आपणास स्थिर व सुस्पष्ट प्रतिमा मिळतात. म्हणून अशा दुर्बिणींना अवकाशात ठेवणे आवश्यक असते.


* अवकाशयानातून अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव हा रशियाचा युरी गागारीन होता.


* अमेरिकेचा निल आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर प्रथम पाऊल ठेवणारा मानव होय.


* भारताच्या राकेश शर्मा यांनी सन 1984 मध्ये रशियाच्या अवकाशयानातून पृथ्वीच्या परिक्रमा केल्या.


* भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स व कल्पना चावला यांनी अमेरिकेच्या नासा ( National aeronautics and space administration ) या संस्थेच्या अवकाश यानातून अवकाश भ्रमण केले.


* अपोलो 11 मोहिमेत बझ आल्ड्रिन हा चंद्रावर उतरणारा दुसरा माणूस ठरला. 


* आपल्या भ्रमणध्वनी मध्ये सिग्नल कोठून येतो?

उत्तर:- शहरात किंवा गावात भ्रमणध्वनीचे अनेक मनोरे असतात. आपल्या भ्रमणध्वनीच्या जवळच्या मनोऱ्यातून आपल्याला सिग्नल येतात.


* भ्रमणध्वनी मनोऱ्यामध्ये सिग्नल कोठून येतो?

उत्तर:- भ्रमणध्वनी द्वारे जवळच्या मनोर याकडे सिग्नल्स पाठवले जातात. त्या मनोर्याकडून हे सिग्नल्स अवकाशातील उपग्रहाची जोडले जातात. भ्रमणध्वनीचे सर्व मनोरे हे अवकाशातील उपग्रहांशी जोडलेले असतात. मोबाईल -->जवळचा मनोरा--> अवकाशातील उपग्रह --> दुसऱ्या व्यक्तीच्या जवळील मनोरा--> मनोऱ्याकडून भ्रमणध्वनीकडे.


* दूरचित्रवाणीचे कार्यक्रम तुमच्या दूरचित्रवाणी संचात कसे येतात?

उत्तर:-दूरचित्रवाणी केंद्रातून प्रसारित केलेले कार्यक्रम सर्वप्रथम उपग्रहाकडे जातात. तेथून ते प्रसारण केबल ऑपरेटर च्या संवाहक केंद्रात त येतात व तेथून ते केबलच्या माध्यमातून आपल्या संचात येतात.

आता आपल्या घराच्या छतावर बसवलेले डिश अँटेना याकडे संदेश येतात.


काही पूर्ण रूप (Full form)लक्षात ठेवावे लागतात.

  • INSAT - Indian National Satellite
  • GSAT- Geosynchronous satellite
  • IRNSS- Indian Regional Navigation Satellite System
  • IRS -Indian Remote Sensing Satellite
  • GSLV - Geosynchronous Satellite Launch Vehicle
  • PSLV - Polar Satellite Launch Vehicle


* अवकाश मोहिमांचे चार प्रमुख उद्देश लिहा.

अवकाश मोहिमांचे चार प्रमुख उद्देश पुढील प्रमाणे.

  • 1. अवकाशात उपग्रह पाठवणे.
  •  2. पृथ्वीवरील जीवण उपयोगी गोष्टीसाठी उपग्रहांचा वापर करणे. 
  • 3.सौरमंडल व त्याही पलीकडे विश्वाचा वेध घेणे.
  • 4. सौरमंडलातील ग्रह, उपग्रहांचा अभ्यास करणे.


* अवकाश मोहिमांचे महत्त्व लिहा.

अवकाश मोहिमांचे महत्त्व पुढील प्रमाणे आहे.

  • 1. क्षणार्धात जागतिक संपर्क करणे.
  • 2. घरबसल्या जागतिक घडामोडी व मोहीम माहितीचे आदान प्रदान करणे. 
  • 3.करमणूक.
  • 4. आंतरजालाद्वारे माहितीचा महापूर.
  • 5. साधन संपत्तीचे व्यवस्थापन करणे.
  • 6. नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना मिळवणे व त्यासंबंधी व्यवस्थापन करणे.
  • 7. शत्रुसैन्याचा सुगावा घेणे.
  • 8. जागतिक व्यापार वाहतूक पर्यटन इत्यादी उपक्रमांना हातभार लावणे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

10 वी बोर्ड निकाल आज 🎷

 10 वी बोर्ड निकाल आज 🎷 ®®®💠®®® व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा   ▬▬▬۩۞۩▬▬▬ इयत्ता 10 वीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली 👏. 10 वीचा निकाल येत्या मंगळवारी म्हणजे दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार.🎺 विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या निकालातून त्यांना पाहता येतील. राज्यातील 23,492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विद्यार्थी 'महा एचएससी बोर्ड डॉट इन' (mahahsscboard.in) या संकेतस्थळासह विविध वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.  ®®®💠®®® 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.👇   https://sscresult.mahahsscboard.in   https://results.digilocker.gov.in   https://www.aajtak.in/education/board-exam-resul   http://sscresult.mkcl.org   https://results.targetpublications.org   https://results.navneet.com   http...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷

  11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷 🎷 11th Admission Registration  ●~•❅•۞•❅•~● इयत्ता अकरावी साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया  ऍडमिशन 19- 05 -2025 पासून सुरू. भाग 1 कसा भरावा   Part 1 Fill Up Guidene संपूर्ण महाराष्ट्र मध्ये यावर्षी सन 2025 पासून 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.  ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तसेच महाराष्ट्रामधील सर्व कॉलेजमध्ये लागू होणार.   यावर्षी आपल्याला 11 वीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे ऍडमिशन घ्यावे लागणार ┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━.  रजिस्ट्रेशन कसे करावे  11 वी प्रवेशाच्या Website वर जाणे✈️  visit 11 th admission website   मोबाईल 📱 वरून जर रजिस्ट्रेशन करणार असाल तर.....  क्रोम वर जाऊन तीन डॉट स्पर्श करावा व डेस्कटॉप निवडावे. ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬ स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर स्पर्श करा. https://mahafyjcadmissions.in/ {[( टिप :- मागील वर्षीपर्यंत विद्यार्थी https://11thadmission.org.in/ या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करत होते. आता व...