मुख्य सामग्रीवर वगळा

Elements, Symbols,and At.No. & Valency,मूलद्रव्य, संज्ञा, अणुअंक, आणि संयुजा.🎷


Elements, Symbols,and At.No. & Valency,मूलद्रव्य, संज्ञा, अणुअंक, आणि संयुजा.


*🙏 सुमधुर सस्नेह वंदन।🙏*

*मेरे कर्म ही मेरी पहचान बने तो बेहतर है।*

*चेहरा का क्या है, वो तो मेरे साथ चला जायेगा।*

*🙏आपका हर दिन मंगलमय और सुखमय हो।🙏*

 

दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सॲप

 ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या ग्रुप मध्ये सामील व्हावे. जॉईन होण्यासाठी निळ्या लिंक ला स्पर्श करावा.

👇What's app link 👇

--> 🔴माहिती विज्ञानाची 🎷  🔴

ग्रुप वर जॉईन का व्हावे? याचे कारण....

• आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू.

• दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो.

• एखाद्याने प्रश्न विचारला व आपल्याला त्या प्रश्नाचे जर उत्तर देता आले तर तो आनंद वेगळाच असतो.

• तुम्ही विद्यार्थी आहात तर शिकले पाहिजे, वयाने मोठे भाऊ-बहीण आहात तर लहान मुलांना अभ्यासात मदत करता आली पाहिजे, पालक आहात तर मुलांचा अभ्यास घेता आला पाहिजे, आजोबा/ आजी आहात तर नातवाच्या प्रश्नांचे उत्तर देता आले पाहिजे. 

• विज्ञानातील बराचसा भाग हा शाश्वत आहे, त्यामुळे बरेच विज्ञान आपल्याला आले पाहिजे.

• देशाची प्रगती करायची असेल तर शास्त्रज्ञ तयार झाले पाहिजेत. शास्त्रज्ञ तयार होण्यासाठी विज्ञान समजले पाहिजे.

• आणखीन कितीतरी कारणे आपणास सांगता येतील, यासाठी सस्नेह निमंत्रण🙏🎷


* मूलद्रव्य

  • एकाच प्रकारच्या अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य

  • एखाद्या पदार्थाचे इतके साधे-सोपे रूप, ज्याचे अन्य कोणत्याही रूपात रासायनिक प्रक्रियेने विघटन करता येणार नाही, त्याचबरोबर त्याचे सर्व अणु हे एकसारखे आहेत, त्यास मूलद्रव्य म्हणतात.


* अणुअंक:- मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉनच्या (p) संख्येला अणुअंक असे म्हणतात.


🎷संयुजा:- 

  • द्विक किंवा अष्टस्थिती प्राप्त करण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा असे म्हणतात.
  • मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात.



🎻 मूलद्रव्यांचा प्राथमिक अभ्यास करत असताना एक ते वीस अणुअंक असलेली मूलद्रव्य व त्यांच्या संज्ञा आपणास माहित असाव्यात.

 मूलद्रव्य        संज्ञा   अणुअंक  संयुजा

हायड्रोजन       H         1          1

 हेलियम         He       2          --

 लिथियम        Li        3          1

बेरिलियम       Be        4          2

बोरॉन            B          5          3

 कार्बन           C          6          4

 नायट्रोजन      N         7          3

ऑक्सिजन      O         8          2

फ्ल्युओरिन      F         9          1   

निऑन           Ne      10         --

सोडियम         Na      11         1

मॅग्नेशियम      Mg      12         2 

ॲल्युमिनियम  Al        13        3

सिलिकॉन       Si       14         4

फॉस्फरस        P        15        3 & 5

सल्फर /गंधक  S        16         2

 क्लोरीन        Cl        17         1

 अरगॉन         Ar       18        --

पोटॅशियम.      K         19       1

कॅल्शियम       Ca       20        2


वीस मूलद्रव्यांचा अभ्यास झाल्यावर आपल्याला काही मूलद्रव्य , त्यांच्या संज्ञा व त्यांच्या संयुजा यांचे ज्ञान हवे.


मॅग्नीज      Mn           25       2

आयर्न       Fe             26      2 & 3

कोबाल्ट     Co 

निकेल       Ni                        2

तांबे          Cu                       1 & 2

जस्त         Zn                       2

ब्रोमीन       Br                        1

चांदी         Ag                        1

कथिल      Sn                      

आयोडीन    I                          1

टंगस्टन       W

सोने           Au

पारा           Hg

वरील काही मूलद्रव्यांचे अणुअंक व संयुजा दिल्या नाही कारण त्यांची विशेष गरज भासत नाही.


* काही निष्क्रिय वायू मूलद्रव्य आपणास माहीत हवेत जसे वर हेलियम (He), निऑन(Ne), अरगॉन (Ar) त्याच सोबत आणखीन काही मूलद्रव्य आपणास माहीत हवेतच.

क्रिप्टॉन      Kr 

झेनॉन        Xe

रेडॉन         Rn


* बोरॉन (B), सिलिकॉन (Si) हि मूलद्रव्य आपण पाहिली, पण त्याच सोबत काही धातूसदृश्य मूलद्रव्य व त्यांच्या संज्ञा आपणास आल्या पाहिजेत.

जर्मेनियम   Ge

अँटीमनी     Sb 

टेल्यूरियम   Te 

पोलोनियम   Po

व्याख्या: जी मूलद्रव्य धातू व अधातू यांचे गुणधर्म दर्शवतात त्यांना धातुसदृश्य असे म्हणतात. ही मूलद्रव्य डावीकडील धातूंना उजवीकडील अधातूपासून वेगळे करतात.


🎺  गण 1 मध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, सीसीअम Cs, फ्रान्सिअम (Fr ) ही मूलद्रव्ये येतात. या मूलद्रव्यांना अल्क धातू असे म्हणतात.


🥁 गण 2 मध्ये बेरिलियम (Be), मॅग्नेशियम (Mg), कॅल्शियम (Ca) स्टोन्शियम (Sr), बेरियम(Ba), रेडियम (Ra) ही मूलद्रव्ये येतात. गण 2 मधील मूलद्रव्यांना अल्कधर्मी मृदा धातू असे म्हणतात.


🎸 गण 17 मधील मूलद्रव्यांना हॅलोजन मूलद्रव्य असे संबोधतात. कारण यांची हायड्रोजन बरोबर रासायनिक अभिक्रिया झाल्यावर ही मूलद्रव्य आम्ल तयार करतात.

उदा: फ्ल्युओरीन (F),  क्लोरीन (Cl), ब्रोमीन (Br) आयोडीन (I), एस्टाटिन (At) 


🪇 तीन संयुजा  दर्शवणारी मूलद्रव्य म्हणजे बोरॉन (B) व ॲल्युमिनियम (Al)


😀 चार संयुजा दर्शवणारी मूलद्रव्य ही कार्बन (C) व सिलिकॉन (Si) ही आहेत.


😊 परिवर्ती संयुजा दर्शवणारे मूलद्रव्य.

1. तांबा (Cu),  Cu+ --> Cuprous क्युप्रस

                  Cu++ --> कॉपर

2. पारा (Hg)     Hg+ --> मर्क्युरस

                        Hg++ --> मर्क्युरीक

3. लोहा (Fe).    Fe++  --> आयर्न

                        Fe+3  --> फेरीक 

4. टिन (Sn)   टिन हे मूलद्रव्य परिवर्ती संयुजा दर्शवते जसे +2, +4


🤝 किरणोत्सारी मूलद्रव्य

  • काही मूलद्रव्यांमध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे/ किरणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याचा गुणधर्म असतो, त्याला किरणोत्सार असे म्हणतात.
  • साधारणत: निसर्गामध्ये अणुअंक 82 ते अणुअंक 92 अणुक्रमांकाची मूलद्रव्ये स्वयंस्फूर्त / उत्स्फूर्तपणे किरणोत्सर्ग करताना आढळतात. याला नैसर्गिक किरणोत्सर्ग म्हणतात.
  • उदा: युरेनियम (U), थोरियम (Th), रेडिअम (Ra)




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

10 th,Sci.I, Periodic classification of elements I.

10 th, Sci.I,Periodic classification of elements I.   ▬▬▬۩۞۩▬▬▬ आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇 माहिती विज्ञानाची 🎷 ▬▬▬۩۞۩▬▬▬ As we grown up, we forget the definition and some terms or do not fully/ totally understand the exact meaning of those words. Today's main objective is to increase basic chemistry knowledge with gradual study . In science meaning of unchangeable terms are useful in day today life .  🎻  Definition of element :- Element is a substance that cannot be broken down into simpler substances by chemical means. Element is also defined as a pure substance made up of only one kind of atom which can't be split up into two or more substance. Ex. Silver Ag ,   Chlorine Cl ~*◄⏤͟͞✥➳  🪷 Atom :- An atom is the basic building block. Atom is the smallest unit of matter that has the characteristic properties of an element. In the nucleus of atom positively charged protons p and ne...

10 वी, भाग 1, गुरुत्वकर्षण. मराठी .,10 th, Part 1, Gravitation Exercise in Marathi 🎷

  १० वी, भाग १, गुरुत्वकर्षण. मराठी .🎷 व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा ( माफ करा🙏 फॉन्ट प्रॉब्लेम मुळे हा स्वाध्याय खराब झाला आहे. हा स्वाध्याय दुरुस्तीसाठी सध्या आहे. कृपया सध्या पाहू नये) न्यूटनचा वैश्विक गुरुत्वकर्षणाचा सिद्धांत. न्यूटनचा गुरुत्वकर्षणाचा सार्वत्रिक नियम लिहा. अवकाश पृथ्वीच्या स्थानावर g चे मूल्य उताराची किंमत.....% ने असते.  अंतर स्थानात g चे मूल्य  पृथ्वीला घडवण्यासाठी त्याचे मूल्य फक्त........ % कमी असते. ....... हे परवर्तक दुर्बिण तयार करणारे आधी होते. ...........  हे परवर्तक दुर्बिणी बनवणारे आधी होते. अभिकेंद्री बल म्हणजे काय? केंद्राभिमुख प्रदान करा. SI एक प्रणाली G चे एक ...... आहे. SI एककात जीचे मूल्य ........ आहे. ..... म्हणजे विद्युत चुंबकीय तरंग. ...... हा एक प्रकार आहे ज्याला इलेक्ट्रोमॅगटिक वेव्ह्ने म्हणतात. ......... म्हणजे एखाद्या शंकूला एक प्रतलाने तिरके छेदले तयार होणार आकृती. ........ म्हणजे शंकूला कलत्या प्रतलाने कापल्यावर  वक्र. ग्रहाची इच्छाही........ आणि सूर्याचा कक्ष एका नाभीवर असतो. ज्याच्या एका...