10th, Sci. II, Towards green energy, 2
10 वी, विज्ञान-II, हरित ऊर्जेच्या दिशेने भाग 2
आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला 🔗 स्पर्श करा 👇
* औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे इंधन.
उत्तर: औष्णिक ऊर्जा प्रकल्पात कोळसा हे इंधन वापरले जाते.
* Fuel used in thermal power plant.
Ans:Fuel used in thermal power plant is coa
* नैसर्गिक वायू मध्ये कोणती ऊर्जा असते?
उत्तर: नैसर्गिक वायू मध्ये रासायनिक ऊर्जा असते.
* Which energy is present in natural gas?
Ans: Chemical energy is present in natural gas.
* पवन ऊर्जा म्हणजे एक प्रकारची गतिज ऊर्जा होय.
* Wind energy is a type of kinetic energy.
* ऊर्जा नसेल तर माणूस अगतिक होतो.
* Without energy, man becomes unassisted.
*जलविद्युत निर्मितीमध्ये पाण्यातील स्थितीज ऊर्जा वापरली जाते.
* Potential energy of water in dams is used for generation of electricity.
* ऊर्जेचा अत्यंत स्वच्छ स्त्रोत म्हणजे सौर ऊर्जा होय.
* Solar energy can be called clean energy.
* भारतामध्ये औष्णिक विद्युत केंद्रातून सगळ्यात जास्त वीज निर्मिती केली जाते.
* Maximum energy generation in India is done using thermal energy.
* यांत्रिक उर्जेवर चालणारी साधने कोणती?
उत्तर: मोटार गाडी, विविध यंत्रे, सायकल, शिलाई मशीन.
* Which devices are work on mechanical energy?
Ans: car, bicycle, sewing machine and different machines are work on mechanical energy.
* सौर उर्जेवर चालणारी साधने कोणती?
उत्तर: सौर कुकर, सौर जलतापक, सौर चूल, सौर कंदील.
* सौर ऊर्जा, बायोगॅस, पवन ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा, लाटांची ऊर्जा हे ऊर्जेचे पुनर्नवीनक्षम/ नूतनीकरण करण्यायोग्य ऊर्जा स्त्रोत आहेत. हा ऊर्जेचा प्रकार म्हणजे हरित ऊर्जा प्रकार होय.
* Wind energy, tidal energy, solar energy, geothermal energy, and biogas these are the renewable source of energy. These energies are also called as green energy.
* Which devices are work on solar energy?
Ans: solar heater, solar cooker, solar lantern, solar furnace
* औष्णिक उर्जेवर चालणारी साधने कोणती?
उत्तर: चूल, वाफेवर चालणारे इंजिन, शेगडी.
* Which devices are work on thermal energy?
Ans: furnace steam, engine, chulha.
* विद्युत उर्जेवर चालणारी साधने कोणती?
उत्तर: हीटर, पंखे, ओव्हन, लिफ्ट( उद्वाहाक ), विद्युत इस्त्री, गिझर, रेफ्रिजरेटर.
* Which devices work on electrical energy?
Ans: geyser, oven, heater, electric iron, elevators/ lift, fan, refrigerator, lights, these devices work on electrical energy.
* कोणती विद्युत निर्मिती प्रक्रिया पर्यावरण स्नेही आहे व कोणती नाही?
उत्तर:
- पवन ऊर्जा निर्मिती, सौर ऊर्जा निर्मिती, आणि लाटांपासून ऊर्जा निर्मिती या खऱ्या अर्थाने पर्यावरण स्नेही आहेत.
- जलविद्युत निर्मिती ही पर्यावरण स्नेही आहे असे म्हणण्याचे धाडस कसे काय करावे? कारण या निर्मिती जैवविविधतेचा बराच ऱ्हास होतो आणि मानवी विस्थापन हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.
- पर्यावरण स्नेही नसलेले प्रकल्प म्हणजे अणुऊर्जा , औष्णिक ऊर्जा आणि नैसर्गिक वायूवर आधारित प्रकल्प.
* Which electricity generation process is eco-friendly and which not?
Ans:
- Electricity generated through wind energy, tidal energy and solar energy are truly eco friendly.
- I think hydro electricity is not truly eco-friendly, because it disturb biodiversity and problem in displacement of local people.
- Nuclear energy, thermal energy, and natural gas are not at all eco -friendly.
* पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी कोणती जागा सर्वात योग्य असते?
उत्तर: पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सागरकिनारी हवेचा वेग जास्त असल्याने तो भाग व डोंगर माथ्यावरील भाग योग्य असतो.
* Which is a perfect site for the installation of wind turbines?
Ans: the wind energy is usually high near seashore and on mountains, therefore this is the perfect site for the installation of wind turbines.
* 'फोटो होल्टाईक परिणाम' म्हणजे काय?
उत्तर: सौर विद्युत घट सौर प्रारणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतात यास सौर फोटो होल्टाईक परिणाम असे म्हणतात.
* What is solar photovoltaic effect?
Ans: when solar plates/ photovoltaic cells convert the solar radiation energy directly into electrical energy then that effect is called solar photovoltaic effect.
* पारंपारिक ऊर्जास्त्रोत
उत्तर:
- परंपरेने चालत आलेल्या ऊर्जेला पारंपारिक ऊर्जा स्त्रोत असे म्हणतात.
- पारंपारिक ऊर्जा स्त्रोत हे अपुनर्नवीकरणीय आहेत.
- पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचे साठे हे मर्यादित ठिकाणीच आहेत, त्यामुळे काही वर्षानंतर हे साठे संपणार आहेत.
- पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरातून प्रदूषण होते.
- या इंधनांचे मूल्य जास्त आहे.
- पारंपारिक ऊर्जेचा स्त्रोत हा पर्यावरणस्नेही नाही.
- उदा: कोळसा, जीवाश्म इंधने, खनिज तेल, नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल इत्यादी.
* Conventional source of energy
Ans:
- The energy sources that are commonly used human being and have been used for a long time is called conventional source of energy.
- Conventional source of energy are non renewable.
- After few years conventional source of energy will be completely over because their deposits are limited.
- Conventional source of energy are highly Polluting.
- The cost of these fuels is high.
- This energy source is not eco friendly.
- Ex: cool fossil fuel petrol natural gas crude oil diesel etc.
*"मदत" एक अशी गोष्ट आहे कीकेली तर लोक लगेच विसरतातआणिमदत नाही केली तरकायम लक्षात ठेवतात...!!!**आपला दिवस आनंदी जावो.*🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा