मुख्य सामग्रीवर वगळा

10th Sci II,Heredity and Evolution 4,10 वी विज्ञान II, अनुवंशिकता व उत्क्रांती 4.


 

10th Sci II,Heredity and Evolution 4,10 वी विज्ञान II, अनुवंशिकता व उत्क्रांती 4.


Touch the blue link 🔗 below to join this What's App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇


The test on Chapter Heredity and Evolution. 🎷👇 Below 🎺

अनुवंशिकता व उत्क्रांती पाठावरील परीक्षा👇. 🎷

* अनुवंशिकता म्हणजे काय? 

उत्तर: एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता म्हणतात.

@ What is heredity
Ans: The process by which the biological characters from the parental generation are transmitted to the next generation through genes is called heredity.

* कार्बनी वय मापन पद्धत कोणत्या शास्त्रज्ञाने विकसित केली?
उत्तर: विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने कार्बनी वय मापन पद्धत विकसित केली.

@ who invented the method of carbon dating?
Ans: Willard Libby invented the carbon dating method.

🎷 DNA 🧬 मधील थायमिन ऐवजी m-RNA मध्ये कोणता नत्रयुक्त पदार्थ असतो?
उत्तर: DNA 🧬 मधील थायमिन ऐवजी m-RNA मध्ये हा नेत्रयुक्त पदार्थ असतो.

@ Which is nitrogenous base present in m-RNA instead of thymine present in DNA?
Ans: In m-RNA uracil is present in place of thymine present in DNA.

* बाह्यरुपीय पुरावे काय सूचित करतात?
उत्तर: त्या त्या सजीवांचा उगम समान आहे आणि ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावे हे आपणास बाह्यरूपीय पुरावे सूचित करतात.

@ What does the morphological evidence indicate?
Ans: There are some similarities in different groups of living organisms which shows that they must have originated from the same and common ancestors.

* डार्विनने कोणते सुप्रसिद्ध पुस्तक लिहिले?
उत्तर:- डार्विनने 'ओरिजिन ऑफ स्पिसिस' (Origin of Species) हे सुप्रसिद्ध पुस्तक लिहिले.

@ Which is the famous book written by Charles Darwin?
Ans: 'Origin of Species ' was written by Charles Darwin.

* प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत कोणत्या स्वरूपात असतो?
उत्तर: प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत ' ट्रिप्लेट कोडॉन ' हा तीन न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो.

@ what does the code for each amino acid consists of?
Ans: the code for each amino acid consists of a 'triplet codon' or 3 nucleotides.

* सजीवांच्या विकासाचा  कालपट किती मोठा आहे?
उत्तर: सजीवांच्या विकासाचा कालपट जवळपास 300 कोटी वर्षाचा आहे.

@ How much is the approximate duration of the changes in development of the living organisms on the earth?
Ans: 300 crore years is the approximate duration of the changes in the development of the living organisms on the earth.

* कार्बनी वयमापन पद्धत कोणत्या तत्त्वावर चालते?
उत्तर:  कार्बनी वयमापन पद्धत ही नैसर्गिक C-14 च्या किरणोत्सर्गी क्षयावर आधारलेली आहे.

@ On what principle does carbon dating work?
Ans: The principle of carbon dating is based upon the radioactive decay of naturally occurring C-14.

* कार्बनी वयमापन पद्धतीचा उपयोग कोठे करतात?
उत्तर: पुरातन अवशेषशास्त्र , जीवाश्म व हस्तलिखिते किंवा मानववंश शास्त्रामध्ये मानवी अवशेष यांचा काळ ठरवण्यासाठी कार्बनी वय मापन पद्धतीचा उपयोग करतात.

Where is carbon dieting method used?
Ans: Carbon dieting method is  used in
1. Paleontology and anthropology to determine the age of fossil and
2. Ancient manuscripts

* सजीवांमध्ये डी.एन.ए हीच अनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध करणारे तीन शास्त्रज्ञ कोणते?
उत्तर: 1.ओस्वाल्ड एवरी
2. मॅकलिन मॅककार्थी आणि
3. कॉलिन मॅक्लॉइड.

@ 3 scientists who prove that except viruses, all living organisms have DNA as genetic material.
Ans: 1. Ostwald A very
2. Mclyn McCarthy and
3. Colin MacLeod

* उत्परिवर्तनामुळे कोणती जनुकी विकृती निर्माण होते.
उत्तर: उत्परिवर्तनामुळे  'सिकलसेल ऍनिमिया' ही जनुकीय विकृती निर्माण होते.

@ Genetic disorder caused due to mutation.
Ans: A genetic disorder caused due to mutation is Sickle cell anemia.

* सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी क्रो
-मान्यां मानव अस्तित्वात आला.

@ the cro-magnon man evolved about 50 thousand year ago.

* आफ्रिकेतील रामापीथिकस या मानव सदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे.

@ The first record of a human-like animal is with us in the form of Ramapithecus from East Africa.

* निॲन्डरथॉल मानव हा पहिला बुद्धी विकसित झालेला मानव म्हणता येईल.

@ Neanderthal man can be considered as the first example of a wise man.

* मानवी शरीरात आढळणारे आंत्रपुच्छ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय. 

@ Vestigial organ appendix present in the human body is proof of evolution.

* अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव ह्युगो द ऱ्व्हीस यांच्या परिवर्तन सिद्धांतामुळे लक्षात आला. 

@ The casualty behind the sudden changes was understood due to the mutation principle of Hugo de Vries.

* डार्विनच्या सिद्धांताला घेतलेले आक्षेप कोणते?
उत्तर: डार्विन ने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मैलाचा दगड आहे, तरीपण डार्विनच्या सिद्धांताला घेतलेले आक्षेप खालील प्रमाणे,
1. केवळ नैसर्गिक निवडीमुळे उत्क्रांती झाली नाही.
2. डार्विनला उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण देता आले नाही.
3. डार्विनने सावकाश होणारे बदल व अचानक होणारे बदल यांचा उल्लेख केला नाही.

@ What were the objections raised against Darwinism?
Ans: Darwin's work on evolution is a milestone, though some of the main objections raised against Darwinism are below:
1. There are other factors too for evolution and just not Natural Selection.
2. Darwin talked about the survival of the fittest but did not explain properly the arrival of useful and useless modifications.
3. Darwin has not explained slow changes and abrupt changes occurring during evolution.

* शास्त्रीय कारणे लिहा.

🎷उत्क्रांती होत असताना मानवाचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले.
उत्तर: मानवी उत्क्रांतीस पृथ्वीच्या हवामानाने हातभार लावला. कोरडे हवामानामुळे जंगले नष्ट झाली त्यामुळे झाडावरील कपि(माकड) गवताळ जमिनीवर आले.
गवताळ जमिनीवर अनुकूलन करताना कपिच्या कमरेच्या हाडाचा विकास त्यांना ताठ उभे राहता येईल असा झाला.
या सर्व बदलात पाठीच्या करण्यात देखील बदल झाले त्यामुळे दोन पायावर भार/ वजन सहन करण्याची शक्ती आली. याचाच परिणाम असा झाला की मानवाचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले

🎺 Give Scientific reasons

* During human evolution the hands become available for use.
Ans: Earth's climate contributed to human evolution. Due to the dry climate, the forests were destroyed, so the apes (monkeys) from the trees moved to the grassland.
During adaptation to grassy ground, the development of the hip/ lumbar bone of the apes allows them to stand erect.
All these changes also changed the back structure so that the load/weight-bearing power was increased on the two All these changes also changed the back structure/ vertebral column. so that the load/weight bearing power was increased on the two hind legs. 
The result was that human hands were freed to use at any time.

🐕अनुवंशिकता व उत्क्रांती पाठावरील परीक्षा. 🎷

🐃Now let's take the test on Chapter Heredity and Evolution. 🎷👇




    *काही गोष्टी सोडता येत नाहीत
 पण त्यांना सोडल्या शिवाय 
पुढेही जाता येत नाही.*
    *त्यामुळे रस्ते कितीही अडचणीचे असो
 ध्येय पक्के आणि
 विचार खंबीर असतील तर
 मेहनत करायची ताकत सुद्धा
 आपल्या मनगटात आपोआप येऊन जाते.*    
           *बस फक्त माणूस
 आपल्या विचारांशी प्रामाणिक असावा.*

   *आपला दिवस आनंदी जावो.*🎷

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आपण तपासले पाहिजे. जो

Practice... Of Chemical Reaction 🎷 1

 Practice... Of Chemical Reaction 🎷 1 Touch the blue link below to join this What's App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇 👉  मा हिती विज्ञानाची 🎷 Practice and discipline/ keep patience are very essential for understanding or learning chemical reactions. In daily life, many natural and man-made chemical reactions occur, but we might not be aware of how to write that chemical reactions. To write a chemical reaction, basic preparation is necessary. First, it's necessary to remember a minimum of one to twenty basic elements. Additionally, knowledge of the symbols for these elements is necessary. 1. Hydrogen (H),  2. Helium (He) 3. Lithium (Li),  4. Beryllium (Be) 5. Boron (B),  6. Carbon (C) 7. Nitrogen (N),  8. Oxygen (O) 9. Fluorine (F),  10. Neon (Ne) 11. Sodium (Na),  12. Magnesium (Mg) 13. Aluminum (Al), 14. Silicon (Si) 15. Phosphorus (P),  16. Sulfur (S) 17. Chlorine (Cl),  18. Argon (Ar) 19. Potassium (K),  20. Calcium (Ca) If we know the proper definitions of some te

अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷

  अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷 1 आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷  😀 रासायनिक अभिक्रिया येण्यासाठी सखोल अभ्यास व संयमाची गरज आहे. दैनंदिन जीवनात निसर्गतः व मानव निर्मित अनेक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. पण रासायनिक अभिक्रिया कशा लिहाव्यात हे आपणास माहीत नसते.  🎻 रासायनिक अभिक्रिया लिहिण्यासाठी पूर्व तयारी ही आवश्यक असते. ⭐ प्रथम आपणास कमीत कमी एक ते वीस मूलद्रव्य पाठ असणे आवश्यक आहे. त्यासोबत त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा आपणास माहित असणे आवश्यक आहे. 1. हायड्रोजन H, 2.हेलियम He  3. लिथियम Li, 4 बेरिलियम Be  5.बोरॉन B  6.कार्बन C ,  7. नायट्रोजन N, 8.ऑक्सिजन, O 9. फ्लोरीन, F   10.निऑन Ne 11.सोडियम, Na  12. मॅग्नेशियम, Mg  13. ॲल्युमिनियम, Al 14.सिलिकॉन, Si  15.फॉस्फरस, P 16. सल्फर (गंधक), S 17. क्लोरीन, F 18. अरगॉन, Ar 19. पोटॅशियम, K 20. कॅल्शियम. Ca यानंतर आपणास काही  व्याख्या माहीत असणे आवश्यक आहे. 1. अणुअंक :- मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉन किंवा  इलेक्ट्रॉन च्या संख्येला अणुअं