10th, Sci. Animal classification. 10 वी, विज्ञान, प्राण्यांचे वर्गीकरण 8.
आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇
उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी हा सहा वर्गांत विभागलेला आहे, चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी, सस्तन. यातील एक वर्ग चक्रमुखी प्राणी वर्ग काल पाहिला, आज उर्वरित पाच वर्गांचा अभ्यास करू.
🎺 मत्स्य प्राणीवर्ग (Class- Pisces)
- आधिवास: हे प्राणी समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर प्राणी आहेत.
- तापमान नियंत्रण: शीतरक्ती
- स्वरूप: पाण्याचा प्रतिरोध/ अडथळा कमीत कमी होण्यासाठी ह्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते, म्हणजेच यांचे शरीर विटी आकृती असते.
- प्रजनन: एकलिंगी. लैंगिक प्रजनन. हे प्राणी अंडी घालतात म्हणून यांना अंडज म्हणतात.
- उपांगे: ह्यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात.
- पुच्छ पराचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी होतो.
- त्वचा: ह्यांचे बाह्यकंकाल खवल्यांच्या स्वरूपात असते तर अंत:कंकाल कास्थिमय किंवा अस्थिमय असते.
- श्वसन: श्वसन कल्ल्याद्वारे होते.
- उदाहरणे : Rohu (रोहू), बोंबील, पापलेट, समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक-रे, स्टिंग-रे, इत्यादी.
🥁 Class- Pisces
- Habitat: These are always aquatic animals living in marine and fresh waters.
- Structure of body: Body of fishes is spindle shaped to minimize water-resistance.
- Exoskeleton: Exoskeleton is in the form of scales & endoskeleton is either cartilaginous or bony.
- Appendages: They have paired & un-paired fins for swimming. Tail fin is useful as a steering organ during swimming.
- Reproduction: unisexual. sexual reproduction. They are oviparous means they lay eggs.
- Respiration: Respiration occurs with gills.
- Thermoregulation: These are cold blooded (Poikilotherms) animals.
- Examples.: Rohu, Bombay duck, Pomfret, Sea horse, Shark 🦈, Electric ray, Sting ray, etc.
उभयचर प्राणीवर्ग (Class- Amphibia)
- अधिवास: हे प्राणी त्यांच्या डिंब-अवस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात आणि तर प्रौढावस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतात.
- मान नसते.
- डोळे बटबटीत असून त्यांना पापण्या असतात.
- बाह्यकर्ण नसतो पण कर्णपटल असते.
- त्वचा: बाह्यकंकाल नसते आणि त्वचा बहुतेक मृदू असून श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली जाते.
- उपांगे: उपांगांच्या दोन जोड्या असतात आणि अंगुलींना नखे नसतात.
- प्रजनन: एकलिंगी. लैंगिक प्रजनन. अंडी, डिंब, प्रौढ ही अवस्थांतरे दर्शवतात.
- तापमान नियंत्रण: शीतरक्ती प्राणी.
- श्वसन: अंड्यातून बाहेर पडल्यावर अळी अवस्थेत हे कन्याद्वारे श्वसन करतात.
- प्रौढावस्थेत हे प्राणी पाण्यात असताना त्वचेद्वारे तर जमिनीवर असताना फुप्फुसाद्वारे श्वसन करतात.
- उदाहरणे : बेडूक, सॅलॅमँडर, टोड, इत्यादी.
Class- Amphibia
- Habitat:
- These animals are strictly aquatic during
- larval life and perform only aquatic respiration.
- whereas they can live in water as well as on land during adult life and
- can perform aquatic as well as aerial respiration.
- Structure of body:
- External ear is absent but tympanum is present.
- Neck is absent.
- Eyes are prominent with eye lids.
- Exoskeleton: Exoskeleton is absent. Skin is without any derivative and usually kept moist for respiration.
- Appendages: They have two pairs of appendages. Digits are without claw.
- Reproduction: unisexual. sexual reproduction. Eggs, larva( tadpole) adult metamorphosis is seen.
- Respiration: by gills in larval stage and in adults by skin and lungs when on ground.
- Thermoregulation: cold blooded.
- Ex.: Frog, Toad, Salamander, etc.
🐊 🐢 सरीसृप प्राणीवर्ग (Class- Reptilia)
- अधिवास:प्राणी-उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी होत.
- स्वरूप:
- शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात.
- शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते.
- बाह्यकर्ण नसतो.
- त्वचा: यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते.
- उपांगे: अपंगांच्या दोन कमकुवत जोड्या असतात. अंगुलींना नखे असतात.
- प्रजनन: एकलिंगी. लैंगिक प्रजनन. अंडी, पिल्लू, प्रौढ या अवस्था दर्शवतात.
- तापमान नियंत्रण: हे प्राणी शीतरक्ती (Poikilothermic) असतात.
- श्वसन: श्वसन हे फुप्फुसाद्वारे होते.
- उदाहरणे : कासव, मगर, पाल, साप, सरडा, सुसर इत्यादी.
🥁 बऱ्याच जणांना कासव, मगर हे प्राणी उभयचर वाटतात. पण ते उभयचर नसून सरीसृप आहेत कारण श्वसनासाठी दोघांनाही हवेतील ऑक्सिजनचा आधार घ्यावा लागतो. पाण्यातील ऑक्सिजन यांना घेता येत नाही.
🐢🐊 Class- Reptilia
- Habitat: According to the course of animal evolution, these are first true terrestrial animals with creeping movement.
- Structure of body:
- They creep on the land as their body cannot be lifted up.
- Neck is present between head & trunk.
- External ear is absent.
- Exoskeleton: Their skin is dry and scaly.
- Appendages: Digits are provided with claws.
- Reproduction: unisexual, sexual reproduction. Egg, young one, adult these are the stages of growth.
- Respiration: respiration by lungs.
- Thermoregulation:These are cold blooded (poikilotherms) animals.
- Examples: Tortoise 🐢, alligator 🐊, crocodile, Lizard 🦎, Snake 🐉 , etc.
Many people think that tortoise and crocodile are amphibians, but they are reptiles. Because they can't breathe in water, for respiration they are use aerial oxygen
🦜🦆🦚 पक्षीवर्ग (Class- Aves)
- अधिवास: हे कशेरुस्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत.
- स्वरूप:
- शीर आणि धड यांच्यामध्येमान असते.
- जबड्यांचे रूपांतर चोचीत झालेले असते.
- हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी ह्यांचे शरीर
- दोन्ही टोकांना निमुळते असते.
- त्वचा: बाह्यकंकाल पिसांच्या स्वरूपात असते.
- उपांगे:
- अग्रउपांगे (Forelimbs) पंखांमध्ये परिवर्तित झालेली असतात.
- अंगुली खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नखे असतात.
- प्रजनन: एकलिंगी. लैंगिक प्रजनन. अंडज.
- तापमान नियंत्रण: हे प्राणी उष्णरक्ती आहेत. ते त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात.
- श्वसन: श्वसन हे फुप्फूसद्वारे वायुकोशांच्या मदतीने होते.
- उदाहरणे : मोर, चिमणी, पोपट, कबुतर, बदक, पेंग्वीन, शहामृग, कोंबडी इत्यादी.
🦜🦆🦚 Class- Aves
- Habitat: These vertebrates are completely adapted for aerial life.
- structure of body:
- Jaws are modified into beak.
- Neck is present between head and trunk.
- Their body is spindle-shaped to minimize air resistance during flight.
- Exoskeleton: Exoskeleton is present in the form of feathers.
- Appendages:
- Forelimbs are modified into wings.
- Digits are covered with scales and bear claws.
- Reproduction: Oviparous. Young ones are cared by their parents.
- Respiration: respiration by lungs with the help of air sacs.
- Thermoregulation: These are warm blooded (Homeotherms) i.e. they can maintain their body temperature constant.
- Examples: Peacock 🦚, Sparrow, Parrot 🦜, Hen, Pigeon, Ostrich, Duck 🦆, Penguin 🐧, etc.
❤️ सस्तन प्राणीवर्ग (Class- Mammalia)
- अधिवास: सस्तन प्राणी हे मुख्यतः भूचर आहेत. [अपवाद: देवमासा हा जलचर आहे, तर वटवाघुळ हे खेचर आहे. ]
- स्वरूप:
- दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा सस्तनी प्राण्यांचा विशिष्ट गुणधर्म आहे.
- डोके, मान, धड व शेपूट हे शरीराचे भाग असतात.
- त्वचा: बाह्यकंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या (Fur) स्वरूपात असते.
- उपांगे: अंगुलींना नखे, नखर, खूर इत्यादी असतात.
- तापमान नियंत्रण: हे प्राणी उष्णरक्ती (Homeothermic) असतात.
- श्वसन: श्वसन फुप्फुसाद्वारे होते.
- प्रजनन: एकलिंगी. लैंगिक प्रजनन.
- उदाहरणे : मानव, वालरस, कांगारू 🦘, डॉल्फीन🐬 , वटवाघूळ🦇 , गाय 🐄, कुत्रा 🐶 इत्यादी.
🐘🐶🐄 Class- Mammalia
- Habitat: mammals are mainly terrestrial.[exceptions: Whale 🐋 is aquatic. Bat 🦇 is aerial.]
- structure of body:
- Presence of mammary glands is typical character of mammalia.
- Body is divided into head, neck, trunk and tail.
- Exoskeleton: Exoskeleton is in the form of hairs or fur.
- Appendages: Digits are provided with nails, claws, or hooves.
- Respiration: unisexual. sexual reproduction. Few oviparous. Majority Viviparous
- Thermoregulation: These animals are warm blooded.
- Examples: Elephant 🐘, cow 🐄, dog 🐶, Human 😀, Kangaroo 🦘,Walrus , Dolphin 🐬, Bat 🦇, etc.
अंडज: भृणाचा विकास मातेच्या गर्भात न होता अंड्यात होण्याला अंडज असे म्हणतात.
जरायुज: ज्या भ्रणांचा विकास मातेच्या शरीरात होतो व माता क्रियाशील पिलांना जन्म देते त्यांना जरायुज असे म्हणतात.
प्राण्यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे.
Viviparous: animals that give birth to living young, rather than laying eggs.
Oviparous animals reproduce by laying eggs.
We should be cautious about not causing any harm to animals.
*प्रामाणिकपणा, अपेक्षा न ठेवता केलेले कर्म, सत्य वचन आणि मधुर वाणी हे दुसऱ्याला दिलेले वचन नसून चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वतःलाच घातलेला एक नियम आहे.*
*जो तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य खुलवत असतो...!!!*
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷
छान सुटसुटीत मांडणी .
उत्तर द्याहटवा