10th, Sci.II, Animal classification. 10 वी, विज्ञान II, प्राण्यांचे वर्गीकरण 7.
आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला 🔗 स्पर्श करा👇
आज आपण समपुष्ठरज्जू प्राण्यांचा अभ्यास करणार आहोत
समपुष्ठरज्जू प्राण्यांच्या शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू असतो. सर्व समपृष्ठरज्जू प्राणी या एकाच संघात समाविष्ट केलेले आहेत. समपृष्ठरज्जू प्राणी संघाचे तीन उपसंघामध्ये वर्गीकरण केले आहे.
- उपसंघ - (पुच्छसमपृष्ठरज्जूप्राणी/कंचुकयुक्त बाह्यकवची प्राणी) (Urochordata)
- उपसंघ - शीर्षसमपृष्ठरज्जूप्राणी)(Cephalochordata)
- उपसंघ- पृष्ठवंशीय प्राणी (Vertebrata/Craniata)
Today we are going to study phylum cordata. Chordates animals have supporting notochord in their body. All chordates are included in
the same phylum. The phylum Chordata is classified in to three subphyla.
- Sub phylum - Urochordata
- Sub phylum -Cephalochordata
- Sub phylum -Vertebrata/Craniata
समपृष्ठरज्जू प्राणीसंघाची महत्त्वाची लक्षणे
- पृष्ठरज्जू: विकासाच्या अवस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो.
- ग्रसनी-कल्लाविदरे: विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत ग्रसनी-कल्लाविदरे (Pharyngeal gill slits) असतात.
- चेतारज्जू : (Spinal cord) एकच असून पृष्ठ बाजूस आणि नळीसारखा पोकळ असतो.
- हृदय: अधर बाजूस असते.
Important characters of phylum Chordata
- Notochord: Notochord is present in the body during at least any developmental stage.
- Gill slits: Pharyngeal gill slits are present in the body during at least any developmental stage.
- Spinal cord: Single, tubular spinal cord is present on dorsal side of body. Dorsal hollow nerve cord.
- Heart: Heart is present on ventral side of body.
उपसंघ - (पुच्छसमपृष्ठरज्जू प्राणी/कंचुकयुक्त बाह्यकवची प्राणी) (Urochordata)
- त्यांच्या फक्त शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू असतो. म्हणून यांना पुच्छसमपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात.(the Greek words uro, meaning tail, and chorde, meaning cord)
- आधिवासी: हे प्राणी फक्त सागरनिवासी आहेत. प्रौढ प्राणी स्थानबद्ध असतात.
- एक वैशिष्ट्य: यांच्या अळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात, आणि ते काही पण खात नाहीत.
- सागरतळाशी स्थिरावल्यावर अळ्यांचे रूपांतरण स्थानबद्ध प्रौढ प्राण्यांमध्ये होते.
- ह्या प्राण्यांचे शरीर कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेले असते.
- प्रजनन: हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी असतात. लैंगिक प्रजनन करतात.
- उदाहरण : हर्डमानिया, डोलिओलम, ऑइकोप्ल्युरा, इत्यादी.
Sub phylum - Urochordata
- Habitat: These are marine animals.
- One feature: Urochordata have a short larval stage, and the larva doesn't feed.
- Exoskeleton: Their body is covered by skin-like test or tunic.
- Larvae of these animals are freely swimming and notochord is present in only tail region of larvae(the Greek words uro, meaning tail, and chorde, meaning cord). Hence, they are called as Urochordata.
- Larvae metamorphose into adults after settling down at bottom of the sea.
- Generally, these animals are hermaphrodite.
- Examples: Herdmania, Doliolum, Oikopleura, etc.
उपसंघ - शीर्षसमपृष्ठरज्जूप्राणी)(Cephalochordata)
- लांबी: हे प्राणी फक्त काही सेंटीमीटर लांब आहेत.
- अधिवास: हे लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी प्राणी आहेत.
- ग्रसनी मोठी असून तिला श्वसनासाठी कल्लाविदारे असतात.
- ह्यांचा पृष्ठरज्जू संपूर्ण शरीराच्या लांबी-इतका असतो, म्हणजेच डोक्यापासून ते शेपटीपर्यंत असतो.
- प्रजनन: हे प्राणी एकलिंगी असतात. लैंगिक प्रजनन करतात.
- उदाहरण: ॲम्फिऑक्सस.
Sub phylum -Cephalochordata
- Length: They are only a few centimeters long animal.
- Habitat:These are small, fish-like, marine animals.
- Notochord is present throughout the body length, means notochord that runs from head to tail.
- Pharynx is very large and contains gill-slits.
- Reproduction: These animals are unisexual.sexual reproduction.
- Ex.: Amphioxus.
उपसंघ- पृष्ठवंशीय प्राणी (Vertebrata/Craniata)
- पाठीचा कणा : ह्या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या जागी पाठीचा कणा असतो.
- शीर: यांचे शीर (Head) पूर्णपणे विकसित झालेले असते.
- मेंदू कवटीत संरक्षित असतो.(animals with a skull. The name Craniata comes from the Latin word cranium, which means skull.)
- अंत:कंकाल (Endoskeleton) कास्थिमय (Cartilagenous) किंवा अस्थिमय (Bony) असते.
- जबडा: काही पृष्ठवंशीय प्राणी जबडेविरहित (Agnatha) असतात तर काहींना जबडे असतात (Gnathostomata).
- उदा. मासा, बेडूक, पाल, कबूतर, वटवाघुळ मानव, इत्यादी.
Sub phylum -Vertebrata/Craniata
In these animals, notochord is replaced by vertebral column.(animals with backbones or vertebrae)
Head: In these animals, head is well developed.
Brain: Brain is protected by cranium.
skeleton: Endoskeleton is either cartilaginous or bony.
jaw: Some chordates are jaw-less (Agnatha) whereas some are with jaws (Gnathosto)
Ex. Fish 🐟, frog 🐸, lizard 🦎, pigeon, Bat 🦇, man ♂️ etc.
उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी हा सहा वर्गांत विभागलेला आहे. ते सहा वर्ग खालीलप्रमाणे आहेत.
. चक्रमुखी प्राणीवर्ग (Class- Cyclostomata)
- Greek words cyclos (circular) and stoma (mouth).
- शरीरस्वरूप: ह्या प्राण्यांना जबडेविरहीत असे चूषीमुख असते.
- त्वचा: त्वचा मृदू असून खवलेविरहित असते.
- उपांगे: युग्मित उपांगे नसतात.
- कंकाल: अंत:कंकाल कास्थिमय असते.
- तापमान नियंत्रण: शीतरक्ती प्राणी आहेत.
- आधिवासी: हे प्राणी बहुतेक बाह्यपरजीवी असतात. सागर निवासी.
- प्रजनन: हे प्राणी अंडी घालतात म्हणून त्यांना अंडज म्हणतात.
- श्वसन: कल्याद्वारे होते.
- उदाहरणे : पेट्रोमायझॉन, मिक्झीन इत्यादी.
Subphylum- Vertebrata is divided into six classes
Those six classes are as follows.
Class- Cyclostomata
- The name Cyclostomata comes from the Greek words cyclos (circular) and stoma (mouth).
- Jaw: These animals have jaw-less mouth provided with sucker.
- Skin: Their skin is soft and without any scale.
- Appendages: Paired appendages are absent.
- Skeleton Endoskeleton is cartilaginous.
- Temperature: cold blooded animals.
- Respiration: by gills
- Habitat: Most of the animals are ectoparasites. Marine animals.
- Examples: Petromyzon, Myxine, etc.
शीत रक्ती प्राणी: ज्या प्राण्यांच्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानाबरोबर बदलते त्या प्राण्यांना शीत रक्ती प्राणी असे म्हणतात. उदाहरणार्थ मासा, बेडूक, सर्व सरीसृप, इत्यादी.
Cold blooded animals:Animals whose body temperature varies with the temperature of the environment are called cold-blooded animals. They are also known as poikilotherms. Ex. Fish 🐟🐠, frog 🐸, all reptiles 🦎,🐊,🐉.
*मनाच्या गाभा-यात
रातराणी फुलवायची की ,
निवडुंगाचे कुंपण घालून
विचार खुंटवायचे.*
*जन्माला आलो म्हणून
आयुष्य रेटायचं.
की एकच जन्म आहे म्हणून
आयुष्य जगायचं.
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं...*
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा