मुख्य सामग्रीवर वगळा

Top 10,10 वी विज्ञान I, शास्त्रीय कारणे व Q.1 ब

 Top 10,10 वी विज्ञान I, शास्त्रीय कारणे व Q.1 ब 


*🙏 सुमधुर स्नेह वंदन।🙏*

*अकेले खड़े होने का साहस रखो*

*दुनिया ज्ञान देती है साथ नहीं।*

*🙏आपका हर दिन मंगलमय और सुखमय हो।🙏*


आज आपण  इयत्ता दहावीचे उर्वरित शास्त्रीय कारणे द्या पाहू.

 

* सोडियम हा धातू कायम केरोसीन मध्ये ठेवतात.

( अत्यंत क्रियाशील, घनता)

उत्तर:- 1. सामान्य / कक्ष तापमानाला सोडियम Na धातू अत्यंत तीव्रपणे ऑक्सिजनशी O2 संयोग पावतो.

सोडियम धातूची हवेतील ऑक्सिजन, बाष्प H2O(g), कार्बन डाय-ऑक्साइड CO2 बरोबर अत्यंत जलद अभिक्रिया होते व तो पेट घेतो.

2. सोडियमची घनता केरोसीन पेक्षा जास्त आहे त्यामुळे तो त्यात बुडतो. केरोसीन बरोबर सोडियमची अभिक्रिया होत नाही. म्हणून सोडियम हा धातू कायम केरोसीन मध्ये ठेवतात.


* हिरवी पडलेली तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंच वापरतात.

( प्रथम कॉपर ऑक्साईड , कॉपर कार्बोनेट, आम्ल आम्लारी अभिक्रिय )

1. तांब्याची दमट हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचे कॉपर ऑक्साईड CuO तयार होते. या कॉपर ऑक्साईड ची हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड बरोबर अभिक्रिया होऊन तांब्यावर कॉपर कार्बोनेट CuCO3 चा हिरवा थर जमा होतो त्यामुळे तांब्याची चकाकी नाहीशी होते.

2.   लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक आम्ल असते , तर चिंचेमध्ये टारटारीक आम्ल असते या आम्लात काॅपर कार्बोनेटचा हिरवा थर विरघळतो, त्यामुळे तांब्याची भांडी स्वच्छ होतात व त्यांना पुन्हा चकाकी प्राप्त होते.



* अॅल्यूमिनाच्या विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची आवश्यकता असते.

(C +O2 ---> CO2 धनाग्र कार्बन चे ऑक्सिडीकरण)

उत्तर:-1. विद्युत अपघटनात उच्च तापमानाला ॲल्युमिनियम Al धातू ऋणाग्रावर तर धनाग्रावर ऑक्सिजन वायू मुक्त होतो. मुक्त झालेल्या ऑक्सीजन वायूची कार्बन धनाग्राशी अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो.  

2.धनाग्राचे ऑक्सिडीकरण झाल्यामुळे आकार कमी कमी होत असल्यामुळे तो वेळोवेळी बदलणे गरजेचे असते.


* पाण्याशी अभिक्रिया होताना कॅल्शियम पाण्यावर तरंगते.

( तीव्रता कमी , उष्णता , पृष्ठभागावर जमा )

उत्तर:-कॅल्शियमची Ca पाण्याबरोबर अभिक्रिया कमी तीव्रतेने होते, यामुळे बाहेर पडणारा हायड्रोजन H2 वायू उष्णता कमी निर्माण झाल्यामुळे पेट घेत नाही.

Ca+2 H2O ---> Ca(OH)2 + H2 

2. तयार झालेला हायड्रोजन वायू कॅल्शियम धातूच्या पृष्ठभागावर जमा झाल्यामुळे पाण्याशी अभिक्रिया होताना कॅल्शियम पाण्यावर तरंगते.


* साधारणपणे आयनिक संयुगांचे द्रवणांक उच्च असतात.

( तीव्र आकर्षण बल , कठीण, स्थायुरूप)

उत्तर:-1. आयनिक संयुगांमध्ये आकर्षणाचे बल तीव्र असते, त्यामुळे आयनिक संयुगे स्थायुरूप असुन कठीण असतात.

2. परस्पर विरुद्ध आयनामुळे आंतररेण्वीय आकर्षण बल अधिक असल्याने ते बंध तोडण्यास बरीच ऊर्जा लागते म्हणून आयनिक संयुगांचे द्रवणांक उच्च असतात.


* ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह उपयोगी पडत नाही.

(भ्रमणकक्षा, एकच दिशा, आवर्तकाल ,एकाच ठिकाणासमोर स्थिर)

उत्तर:- भूस्थिर उपग्रहांची भ्रमणकक्षा ही विषुववृत्ताच्या प्रतलात असते. पृथ्वीची दररोजची परिवलन गती आणि उपग्रहांची भ्रमणगती यांची दिशा एकच असते. तसेच उपग्रहांच्या भ्रमणगतीचा आवर्तकाल हा पृथ्वीच्या दैनिक परिवलन गतीच्या आवर्तकाला एवढा असतो. यामुळे त्यांची समोरासमोरील सापेक्ष स्थिती ही स्थिर राहते.

2. भूस्थिर उपग्रह हे  कधीही ध्रुवीय प्रदेशावरून जात नाही तर, विषुववृत्तावरील एकाच ठिकाणासमोर स्थिर राहतात त्यामुळे ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह उपयोगी पडत नाही.


* कार्बनच्या अंगी अगणित संयुगे तयार करण्याचा गुणधर्म आहे.

(चतु:संयुजी, मालिका बंधन, समघटकता )

 उत्तर:- कार्बन चतु:संयुजी मूलद्रव्य आहे. त्यामुळे एक कार्बन आणि इतर चार कार्बन अणू बरोबर किंवा इतर अणु मूलद्रव्या बरोबर संयोग पावून अनेक संयुगे तयार करु शकतो.

2.कार्बनचा  मालिका बंधन ह्या गुणधर्मामुळे तो अगणित संयुगे तयार करू शकतो. मालिका बंधन या अद्वितीय गुणधर्मामुळे  कार्बन मोठे रेणू तयार करतो.

3.एकेरी, दुहेरी, तिहेरी बंध तयार करण्याच्या गुणधर्मामुळे संयुगांच्या संख्येत भर पडते.

4. समघटकता या गुणधर्मामुळे संयुगात आणखीन वाढ होते. ब्युटेन व आयसो ब्युटेन.


* एथिलीन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहे.

(व्याख्या, दुहेरी बंध, )

 उत्तर :-1. ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन-कार्बन दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना असंपृक्त  हायड्रोकार्बन म्हणतात.

2.एथिलीन हे हायड्रोकार्बन असुन यात कार्बन-कार्बन दुहेरी बंद आहे. 

3.ऎथिलीन मध्ये दोन्ही कार्बनच्या चारही संयुजा एकेरी सहसंयुज बंधाने संपृक्त झालेल्या नाहीत. म्हणून एथिलीन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहे.


आज आणखीन एक प्रश्न प्रकार पाहू. या प्रश्न प्रकारात उत्तराचे स्पष्टीकरण लिहिण्याची गरज नसते.

नाव, रेणुसूत्र, इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. फक्त नाव लिहायचे किंवा विचारलेल्या संयुगाचे  रेणुसूत्र लिहायचे किंवा विचारलेल्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरक्षण लिहिणे अपेक्षित असते.

वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा.

हा प्रश्न ,प्रश्न क्रमांक 1( ब ) ,एक गुणासाठी विचारला जातो.

आऊट ऑफ मिळवण्यासाठी थेंबे थेंबे तळे साचणे गरजेचे असते.


* आवर्त दोन मधील अल्क धातू .

उत्तर:- लिथियम Li

* आवर्त 3 मधील हॅलोजन.

उत्तर:- क्लोरीन Cl 

* इलेक्ट्रॉन संरूपण 2, 7 असणारे मूलद्रव्य.

उत्तर:- फ्ल्युओरिन 

* बाह्यतम कक्षा पूर्ण असलेले तीन मूलद्रव्य.

किंवा

दोन निष्क्रिय वायू मूलद्रव्य. किंवा

दोन राज वायू मूलद्रव्य.

उत्तर :- हेलियम , निऑन ,आरगॉन,  झेनॉन

* बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन असलेली दोन मूलद्रव्य.

उत्तर :-हायड्रोजन ,सोडियम, लिथियम, पोटॅशियम

* दोन अल्क धातू मूलद्रव्य.

उत्तर:-लिथियम, सोडियम, पोटॅशियम.

* आवर्तसारणीतील उभ्या ओळी.

उत्तर :-गण

 * आवर्तसारणीतील आडव्या ओळी.

उत्तर :- आवर्तन

* दोन हॅलोजन मूलद्रव्य.

किंवा

बह्यातम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असलेली दोन मूलद्रव्य.

उत्तर:- फ्ल्युओरिन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडिन

* आवर्त 2 व 3 मधील स्थिर मूलद्रव्य.

उत्तर:- आवर्त 2 -  निऑन , आवर्त 3 - आरगाॅन


* सर्वात लहान आकारमानाचा अणु.

उत्तर:- हेलियम He.

बऱ्याच जणांना याचे उत्तर हायड्रोजन वाटेल पण तसे नाही.आवर्त सारणीतील हेलियम हा सर्वात लहान 🥁घटक आहे.हेलियम चा आकार 31pm आहे तर हायड्रोजनचा आकार 53pm आहे.🎺🥁🎇

* सर्वाधिक अभिक्रियाशील धातू.

उत्तर :- पोटॅशियम (K).

* सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू.

उत्तर:- (F)

* दोन किरणोत्सारी मूलद्रव्य.

उत्तर:- युरेनियम (U), थोरियम(Th), रेडिअम (Ra)

* सर्वात कमी अनुवस्तुमानाचा अणू.

उत्तर:- हायड्रोजन (H)

* कॉपर ऑक्साईडच्या क्षपण अभिक्रियेसाठी वापरला जाणारा वायू.

उत्तर:- हायड्रोजन 

* साखरेचे औष्णिक अपघटन केल्यानंतर तयार होणारे उत्पादित.

उत्तर:- कार्बन (C)

* बेरियम सल्फाइडची झिंक सल्फेट बरोबर अभिक्रिया केली असता तयार होणारा अवक्षे.

उत्तर:- बेरियम सल्फेट BaSO4 (White)

*  ज्या संमिश्र पासून वितळतार बनवलेली असते त्याचे घटक.

उत्तर:- शिसे (Pb)+ कथिल (Sn)

* रशियाने अवकाशात पाठवलेल्या सर्वात पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव लिहा.

उत्तर:- स्पुटनिक

* नैसर्गिक वायू मध्ये प्रामुख्याने आढळणारा वायू . उत्तर:- मिथेन

* बेन्झीन मधील दुहेरी बंधांची संख्या.

उत्तर :-दोन

* दोन ऑक्सिडीकारक संयुगे.

उत्तर:-1. पोटॅशियम परमॅग्नेट , 2.पोटॅशियम डायक्रोमेट

* असे भिंग ज्यामुळे होणारे विशाल नेहमी एक पेक्षा कमी असते.

उत्तर:- अंतर्गोल भिंग.

* असे भिंग ज्यामुळे वस्तूच्या स्थानानुसार वास्तव प्रतिमा अथवा आभासी प्रतिमा तयार होते.

उत्तर :-बहिर्गोल भिंग

*मर्यादित हवेत उच्च तापमानास कार्बोनेट धातुके तापवण्याची प्रक्रिया.

उत्तर :- निस्तापान 

* धातुक भरडण्यासाठी वापरण्यात येणारे साधन .

उत्तर:-गोलाकार चक्की

* थंड पाण्याची अभिक्रिया न होणारा परंतु वाफेशी अभिक्रिया होणारा धातू.

उत्तर:- ॲल्युमिनियम Al,  लोह Fe, जस्त Zn

*ॲल्युमिनियमच्या निष्कर्षणात विद्युत अपघटनी द्रावणाचे तापमान कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे संयुग.

उत्तर:- क्रायोलाइट ( NaAlF6) आणि फ्ल्युरस्पार (CaF2)

* तांबे आणि जस्ताचे संमिश्र 

उत्तर:- पितळ


खरतर हसत खेळत अभ्यास झाला पाहिजे. पण बऱ्याच वेळेस दडपणाखाली आपण हसणे विसरून जातो. म्हणून हा प्रयत्न 🙏

वाढत्या पोटाला सगळेच नाव ठेवतात, पण मोबाईलची स्क्रीन किती छान पूसता येते त्याने.🎸


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आप...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.