मुख्य सामग्रीवर वगळा

10 वी. विज्ञान I, भिंग व त्यांचे उपयोग .. 3 🎷

 10 वी. विज्ञान I, भिंग व त्यांचे उपयोग .. 3 🎷

आपल्या What's app समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंक ला स्पर्श करा.👇

👉माहिती विज्ञानाची 🎷


दृष्टीदोष व त्यावरील उपाय

दृष्टीदोष का निर्माण होतो ?

 उत्तर:- डोळ्यातील समायोजन शक्ती कमी झाल्याने वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. काही वेळेस नेत्रगोल लांबट झाल्याने किंवा नेत्रगोल उभट झाल्याने दृष्टीदोष निर्माण होतो.

 त्यावर काय उपाय करावेत ? 

काय डोळ्याचे  पण व्यायाम असतात का ?

जर आपण मोठा पाच मार्काचा प्रश्न शिकत असू तर त्यावेळेस मुद्देसूद उत्तर लिहिले असता पाठांतराची गरज पडत नाही. काही मुद्दे हे आकृतीवरून पण लक्षात ठेवता येतात. पुढील प्रश्नात आपण मुद्देसूदपणे उत्तर पाहणार आहोत त्यामुळे पाठांतर करण्याची गरज पडणार नाही.


1. लघुदृष्टीता किंवा निकटदृष्टीचा . ( Nearsightedness / myopia )


1. व्याख्या :- ज्या दृष्टीदोषात व्यक्ती जवळचे स्पष्टपणे पाहू 👁️ शकतो पण दूरच्या वस्तू त्याला स्पष्टपणे दिसत नाही त्या दृष्टीदोष लघुदृष्टीता किंवा निकटदृष्टीता असे म्हणतात.

2. कारण :- A. डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त होते.

B. नेत्रगोल लांबट झाल्याने भिंग व दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढते.

3. प्रतिमा :- भिंग व पारपटल यांच्यातील अंतर वाढल्यामुळे प्रतिमा ही दृष्टीपटलाच्या अलीकडेच तयार होते.

4. निराकरण / उपाय :- A.योग्य नाभी अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून निकटदृष्टीता दोषाचे निराकरण करता येते. 👀B. निकटदृष्टी दोषाच्या डोळ्यासाठी ऋण -ve शक्तीचा चष्मा वापरला जातो.


🎷 दूरदृष्टीता 👁️


1. व्याख्या :- ज्या दोशात व्यक्ती दूरवरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो पण जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यात व्यवस्थित तयार होत नाही त्या दृष्टीदोषाला दूरदृष्टीचा असे म्हणतात.

2. कारण :- A. नेत्र गोल उभट झाल्याने डोळ्याचे भिंग व दृष्टीपटल यामधील अंतर कमी होते.

B. पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी होते

3. प्रतिमा :- नेत्रगोल उभट झाल्यामुळे जवळच्या वस्तूची प्रतिमा ही दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होते.

4. निराकरण / उपाय :- A. योग्य नाभीय अंतर असलेल्या बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून दूरदृष्टीचा दोष दूर करता येतो.

B. दूर दृष्टीता दोषाच्या डोळ्यासाठी धन + ve शक्तीचा चष्मा वापरला जातो.


3. वृद्धदृष्टीता presbyopia

व्याख्या :- वृद्धपणामुळे डोळ्याची समायोजन शक्ती कमी होते त्यामुळे जवळच्या वस्तू सहजपणे व सुस्पष्ट दिसत नसल्यास त्या दोषाला वृद्धदृष्टीता म्हणतात.

कारण :- वय वाढल्यामुळे डोळ्याचे समायोजि/ रोमक स्नायू त्यांचे कार्य करू शकत नाही. त्यामुळे भिंगाचे नाभी अंतर बदलण्याची क्षमता नष्ट होते.

वाढत्या वयासोबत काही लोकांना दूरदृष्टीता व निकटदृष्टीता असे दोन्ही दोष डोळ्यात निर्माण होतात. हा दोष दूर करायचा असेल तर चष्म्याचा वरचा भाग अंतर्गोल भिंग वापरून निकटदृष्टीचा दोष दूर करतो. या दोषात जवळचे पाहण्यासाठी चष्म्याचा खालचा भाग बहिर्गोल भिंगाचा असतो.


🥁 वस्तूचा आभासी आकार :-  Apparent size of object


डोळ्याला दिसलेला वस्तूचा आभासी आकार हा त्या वस्तूने डोळ्याशी धारण केलेल्या कोणावर अवलंबून असतो. समान उंचीच्या दोन वस्तू जर वेगवेगळ्या अंतरावर ठेवले तर जवळच्या वस्तूचा डोळ्याशी कोण मोठा झाल्यामुळे ती वस्तू आपणास मोठी दिसते A'B' या वस्तूचा डोळ्याची x एवढा मोठा कोण होतो तर तिच वस्तू दूर अंतरावर A B असेल तर ती आपल्याला छोटी दिसते कारण त्या वस्तूचा डोळ्याशी y एवढा छोटा कोण होतो.

उदा. आकाशातील प्रचंड आकाराचे विमान आपणास छोटे दिसते कारण तेवढ्या दुरून विमानाचा आपल्या डोळ्याशी झालेला कोण लहान असल्यामुळे विमान छोटे दिसते.


🎸  साधा सूक्ष्मदर्शक simple microscope 


साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक असेही म्हणतात.

वस्तूची अंदाजे 20 पट प्रतिमा मिळवण्यासाठी साधा सूक्ष्मदर्शक वापरात येतो.

तत्व :- 

बहिर्वक्र भिंगाच्या नाभीय अंतराच्या आत पदार्थ ठेवल्यावर त्याची सुलटी, मोठी व त्याच बाजूला आभासी प्रतिमा मिळते.

उपयोग 

A. घड्याळाची दुरुस्त करताना,

B.रत्नांची पारख करणे व त्यातील दोष शोधण्यासाठी.

C. हस्तरेखातज्ज्ञ हातावरील रेषा स्पष्ट पाहू शकतो.



🎻  संयुक्त सूक्ष्मदर्शक. Compound microscope


रचना:- नेत्रिका व पदार्थ भिंग अशा दोन बहिर्गोल भिंगांचा मिळून संयुक्त सूक्ष्मदर्शक तयार होतो. या दोन्ही भिंगांचे अक्ष axis एकाच सरळ रेषेत धातूच्या नळी मध्ये असतात. त्यामुळे त्यांच्यातील अंतर आपल्याला बदलता येते 

उपयोग :- शैवाल, हायड्रा,volvox व्हालव्हाॅक्स,  रक्तकणिका blood cells, जीवाणू , प्राणी व वनस्पती पेशी पाहण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शक उपयुक्त ठरतो.


🎺 दुर्बीण किंवा दूरदर्शी telescope



चंद्र , ग्रह , तारे यासारख्या खगोलीय वस्तू पाहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दूरदर्शकास खगोलीय दूरदर्शन असे म्हणतात.

दूरदर्शकाचे दोन प्रकार आहेत 

1 अपवर्तन दूरदर्शन - यात भिंगांचा वापर केला जातो.

 2. परावर्ति दूरदर्शक - यात आरसे व भिंग या दोन्हींचा यात वापर केला जातो.

वैशिष्ट्य :- 

1. अपवर्तनी दूरदर्शक व परावर्ति दूरदर्शक या दोन्ही उपकरणात पदार्थ भिंगाने तयार केलेली प्रतिमा नेत्रीकेसाठी वस्तू म्हणून कार्य करते आणि अंतिम प्रतिमा तयार होते.

2. दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहण्यासाठी यात पदार्थ भिंग मोठ्या आकाराचे व जास्त नाभीय अंतराचे f असते.

3. दोन्ही भिंगाचे अक्ष एका सरळ रेषेत धातूच्या नलिकेमध्ये असतात.

उपयोग:-  ग्रह ,तारे ,चंद्र व खगोलीय वस्तू अभ्यासण्यासाठी.


🪇 दृष्टीसातत्य persistence of vision.

व्याख्या :- डोळ्यासमोरील वस्तू दूर केल्यानंतरही 1 /16 sec. सेकंदापर्यंत त्या प्रतिमेचा दृष्टीपटलावर परिणाम तसेच राहतो. दृष्टी पटलावर अशी संवेदना टिकण्याला दृष्टीसातत्य म्हणतात.

उदा.

1 पुठ्ठ्याच्या एका बाजूला पिंजरा व दुसऱ्या बाजूला पक्षी काढून तो पुठ्ठा दोऱ्याला पिळ देऊन सोडून दिल्यास आपल्याला असे जाणवते की पक्षी हा पिंजऱ्यात आहे, हे असे दृष्टी सातत्यामुळे घडते.

2. जळती उदबत्ती हातात धरून ती वेगाने वर्तुळाकार फिरवल्यास आपल्याला तांबडे वर्तुळ दिसते.


आपल्याला रंगांची जाण कशी होते?

मानवी डोळ्यातील दृष्टी पटलात दंडाकार व शंक्वाकार प्रकाश संवेदी पेशी असतात. दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वतीची/ ऊन किंवा अंधुकतीची / सावली योग्य माहिती पुरवतात.

शंक्वाकार पेशी प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात दृष्टीपटलावर जी प्रतिमा तयार होते त्याप्रतीमेच्या रंगाची माहिती मेंदूस पुरवितात. रंगाची संवेदना फक्त तेजस्वी प्रकाशातच होते अंधुक प्रकाशात लवंगाची संवेदना समजत नाही कारण शंक्वाकार पेशींना अंधुक प्रकाशात संवेदना नसतात.

🌅  रंगांधता :- काही व्यक्तींना निरनिराळ्या रंगात भेद करता येत नाही किंवा विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंक्वाकार पेशींचा अभाव असतो , अशा व्यक्तीना तो विशिष्ट रंग ओळखता येत नाही किंवा निरनिराळ्या रंगात फरक करू शकत नाहीत. या अशा व्यक्तींना रंगांध व्यक्ती म्हणतात.



                  *सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पुर्ण करतो...*

                 *पण स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य कधीच पुर्ण करु शकत नाही...*

                *म्हणुन स्वभाव परिपुर्ण असावा सौंदर्य नव्हे..!*    

   *आपला दिवस आनंदी जावो.*🎷


          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

10 वी बोर्ड निकाल आज 🎷

 10 वी बोर्ड निकाल आज 🎷 ®®®💠®®® व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा   ▬▬▬۩۞۩▬▬▬ इयत्ता 10 वीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली 👏. 10 वीचा निकाल येत्या मंगळवारी म्हणजे दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार.🎺 विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या निकालातून त्यांना पाहता येतील. राज्यातील 23,492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विद्यार्थी 'महा एचएससी बोर्ड डॉट इन' (mahahsscboard.in) या संकेतस्थळासह विविध वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.  ®®®💠®®® 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.👇   https://sscresult.mahahsscboard.in   https://results.digilocker.gov.in   https://www.aajtak.in/education/board-exam-resul   http://sscresult.mkcl.org   https://results.targetpublications.org   https://results.navneet.com   http...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷

  11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷 🎷 11th Admission Registration  ●~•❅•۞•❅•~● इयत्ता अकरावी साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया  ऍडमिशन 19- 05 -2025 पासून सुरू. भाग 1 कसा भरावा   Part 1 Fill Up Guidene संपूर्ण महाराष्ट्र मध्ये यावर्षी सन 2025 पासून 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.  ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तसेच महाराष्ट्रामधील सर्व कॉलेजमध्ये लागू होणार.   यावर्षी आपल्याला 11 वीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे ऍडमिशन घ्यावे लागणार ┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━.  रजिस्ट्रेशन कसे करावे  11 वी प्रवेशाच्या Website वर जाणे✈️  visit 11 th admission website   मोबाईल 📱 वरून जर रजिस्ट्रेशन करणार असाल तर.....  क्रोम वर जाऊन तीन डॉट स्पर्श करावा व डेस्कटॉप निवडावे. ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬ स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर स्पर्श करा. https://mahafyjcadmissions.in/ {[( टिप :- मागील वर्षीपर्यंत विद्यार्थी https://11thadmission.org.in/ या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करत होते. आता व...