मुख्य सामग्रीवर वगळा

अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷

 

अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷 1

आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇

👉 माहिती विज्ञानाची 🎷

 😀 रासायनिक अभिक्रिया येण्यासाठी सखोल अभ्यास व संयमाची गरज आहे.

दैनंदिन जीवनात निसर्गतः व मानव निर्मित अनेक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. पण रासायनिक अभिक्रिया कशा लिहाव्यात हे आपणास माहीत नसते.

 🎻 रासायनिक अभिक्रिया लिहिण्यासाठी पूर्व तयारी ही आवश्यक असते.

⭐ प्रथम आपणास कमीत कमी एक ते वीस मूलद्रव्य पाठ असणे आवश्यक आहे. त्यासोबत त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा आपणास माहित असणे आवश्यक आहे.

1. हायड्रोजन H, 2.हेलियम He

 3. लिथियम Li,

4 बेरिलियम Be 

5.बोरॉन B

 6.कार्बन C , 

7. नायट्रोजन N, 8.ऑक्सिजन, O

9. फ्लोरीन, F

  10.निऑन Ne 11.सोडियम, Na

 12. मॅग्नेशियम, Mg 

13. ॲल्युमिनियम, Al 14.सिलिकॉन, Si 

15.फॉस्फरस, P

16. सल्फर (गंधक), S

17. क्लोरीन, F

18. अरगॉन, Ar

19. पोटॅशियम, K

20. कॅल्शियम. Ca

यानंतर आपणास काही  व्याख्या माहीत असणे आवश्यक आहे.

1. अणुअंक :- मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉन किंवा  इलेक्ट्रॉन च्या संख्येला अणुअंक असे म्हणतात.

2. संयुजा :- मूलद्रव्याच्या संयोग पाहुण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात.

किंवा

द्विक किंवा अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी दिल्या किंवा घेतले जाणाऱ्या इलेक्ट्रॉन च्या संख्येला संयुजाअसे म्हणतात.

3. इलेक्ट्रॉन संरूपण :- कक्षा निहाय इलेक्ट्रॉन च्या वाटणी ला इलेक्ट्रॉन संरूपण असे म्हणतात.

n म्हणजे कक्षा क्रमांक.


कक्षा  |    सूत्र

         |   2n2

------------

1 |   2

2.     |   8

3.     |  18

4.     |  32


मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन संरुपणावरून त्या मूलद्रव्यांचे मुलक आपणास आले पाहिजेत.

मुलक आल्यावर रासायनिक अभिक्रिया लिखाणाचे नियम माहित पाहिजेत.

1. दोन किंवा अधिक अभिक्रिया कारके असतील तर त्यांच्यामध्ये अधिक + चे चिन्ह लिहावे.

2. दोन किंवा अधिक चे उत्पादिते असतील तर त्यामध्ये अधिक + चे चिन्ह लिहावे.

3. अभिक्रियाकारके डाव्या बाजूला व उत्पादिते उजव्या बाजूला लिहावीत.

4. अभिक्रियाकारकांकडून उत्पादित कडे जाणारा बाण दर्शवावा.

5. अवक्षेप तयार झाला असेल तर अधोगामी/ खालच्या दिशेने बाण दर्शवावा.

6. वायु तयार झाला असेल तर ऊर्ध्वगामी/ वरच्या दिशेने बाण दर्शवावा.

7. रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्या भौतिक स्थिती दर्शवाव्यात.( स्थायू Solid (s) , द्रव liquid (l) ,  वायू gas(g)


🎷 रासायनिक अभिक्रियेचे लेखन करताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्या अणु ची संख्या ही सारखी पाहिजे. यासाठी रासायनिक अभिक्रिया ही संतुलित करावी लागते.


❤️ काही मूलद्रव्य निसर्गात एकटे नसतात उदाहरणार्थ 

हायड्रोजन,  अशा मूलद्रव्यांना H2 असे लिहावे लागते.तसेच क्लोरीन Cl2, नायट्रोजन N2 , ऑक्सिजन O2 फ्लोरीन

 F2, ब्रोमीन Br2 हे पण द्वि अणु रेणू रेणू आहेत.


Na + Cl----- NaCl

आता यात क्लोरीन हा द्वि अणु रेणू आहे म्हणुन 

Na + Cl2----- NaCl

वरील रासायनिक अभिक्रियेत भौतिक स्थिती दर्शवली नाही.

Na(s) + Cl2(g)----- NaCl(s)

वरील रासायनिक अभिक्रिया ही संतुलित नाही.

2Na + Cl2----- 2NaCl


संतुलित समीकरण करणे ही एक कला आहे. रासायनिक अभिक्रियेत सगळ्यात जास्त कोणत्या मूलद्रव्याचे अणु आहेत ते

 प्रथम पाहावे. समीकरण संतुलित करत असताना संयुगाच्या समोर योग्य संख्या लिहावी.

संयुगाच्या समोर जी संख्या लिहिलेली असते ती त्या संयुगातील प्रत्येक मूलद्रव्याला लागू होते.


*चांगले मन व चांगला स्वभाव 

हे दोन्ही ही आवश्यक असतात, 

चांगल्या मनाने काही नाती जुळतात

 आणि चांगल्या स्वभावाने 

ती नाती आयुष्यभर टिकतात.....*🎷

                      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.             __[♡!!...🥀⛓️...!!♡]__ दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या  व्हाट्सॲप  ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे . What's app link 👇 --> 🔴  माहिती विज्ञानाची 🎷  🔴          :⋯ ◯ ⋯ : 🏈  ग्रुप वर जॉईन का व्हावे ? याचे कारण.... आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू. शिक्षक होण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरील CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) किंवा राज्यस्तरीय TET ( शिक्षक पात्रता परीक्षा ) उत्तीर्ण करावी लागते, जी तुम्हाला शिक्षक म्हणून पात्र करते.  कोणत्याही स्पर्धा परीक्षे त विज्ञान विषय हा असतोच.याची तयारी दररोज थोडी थोडी आपल्या विज्ञान लेखातून नक्की होईल. दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो. एखाद्या...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...