- अभ्यास कसा करावा?
आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇
- अभ्यास हा स्वतः साठी असतो.
- रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये.
- लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा.
- हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.
- अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी...
- शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏
- दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे.
- मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.
- दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.
- पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.
- आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आपण तपासले पाहिजे.
- जो दररोज अभ्यास करतो तो विद्यार्थी आणि जो दररोज काहीतरी नवीन शिकतो तो चांगला विद्यार्थी.
- वर्गात जो धडा शिक्षक शिकवत आहेत तो आपण घरी वाचवा.धडा वाचत असताना जे नाही समजले ते under line करून ठेवावे. शिकवताना तो भाग समजून घ्यावा. न समजलेला भाग लगेच विचारावा.
- प्रथम हे लक्षात घ्यावे की निव्वळ लिखाण म्हणजे अभ्यास नव्हे.
- लिखाण:- बऱ्याच पालकांना असे वाटते की आपला मुलगा अभ्यास करत आहे परंतु बऱ्याच वेळेस तो मुलगा इकडून. ... तिकडे... फक्त लिहीत असतो.
- अभ्यासाचे वार्षिक नियोजन मासिक नियोजन, साप्ताहिक नियोजन व दैनिक नियोजन असावे.
- प्रकाश:- ज्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे त्या ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश असावा, ट्यूबलाइट हा एक प्रकाशाचा उत्तम स्त्रोत आहे.
- अभ्यासाला बसण्या अगोदर अभ्यास करण्याची मनाची तयारी असावी.
- ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे तेवढेच पुस्तक जवळ असावे .
- पेन, पेन्सिल, हायलाईटर / highlighter /Textliner , स्टिकी नोट्स यांचा योग्य पद्धतीने वापर करावा.
- धड्याचे एक पान वाचून झाल्यानंतर त्या पानावर काय महत्त्वाचे आहे याचे पुनरावलोकन करावे.
- धड्याचे वाचन करत असताना आपणास जो भाग महत्त्वाचा वाटला त्याचे लिखाण कागदावर अवश्य करावे.
- Points पुस्तकावर महत्त्वाच्या वाक्याला कंस करणे ( ), डाव्याा <--- किंवा उजव्याा----> पाण्याच्या बाजूला बाण मारणे यासारख्या कृती कराव्यात.
- संपूर्ण धडा वाचून झाल्यानंतर स्वाध्याय किती येतो हे पाहावे.
- नामनिर्देशित छोटी आकृती व लहान सूत्रांचे गणित 1.5 मिनिटात पूर्ण व्हावेत.
- जो स्वाध्याय आपणास येत नाही त्याचे उत्तर त्या धड्यात प्रत्यक्ष आहे का हे पहावे.
- आता बऱ्याच जणांना असे वाटते की त्या धड्याचा अभ्यास झाला , पण नाही , यानंतर नवनीत गाईड किंवा ज्या चांगल्या बाजारातील नोट्स तुम्हाला आवडतात त्यातून त्या धड्याचे वाचन करावे.
- गाईड चा योग्य वापर करता आला पाहिजे, गाईड हे एक पुस्तकच आहे हे आपण लक्षात घ्यावे.
- रिकाम्या जागा , जोड्या लावा हे आपणास किती येतात यावरून समजते की किती सूक्ष्म चांगल्या पद्धतीने तुम्ही तो धडा वाचला, समजला.
- धडा संपूर्ण व्यवस्थित वाचल्या वरही काही एका वाक्यातील प्रश्नाचे उत्तर आपणास नक्कीच येणार नाही त्या प्रश्नाच्या उत्तराकडे जरूर लक्ष द्यावे.
- काही शास्त्रीय कारणे द्या या प्रश्नाचे संपूर्ण उत्तर आपणास येत नसते , अशा वेळेस गाईड आपणास नक्कीच मदत करते. गाईड मधून आपणास मुद्देसूद उत्तर लिहायला/ काढायला मदत होते. पण उत्तर लिखाण करत असताना गाईडची भाषा नसावी.
- दीर्घोत्तरी प्रश्नाचे उत्तर नेमके किती असावे हे गाईड मधून आपणास कळते.
- आपणास वाटत असेल की आता मात्र धड्याचा संपूर्ण अभ्यास झाला. मग खरोखर आपला त्या धड्याचा अभ्यास झाला का नाही हे पाहण्यासाठी काय परीक्षा घ्यावी?
- जर एखादा अभ्यास करणारा मुलगा आपल्यासारखा छान अभ्यास करत असेल तर त्याच्याकडून त्या धड्यावर एक प्रश्नपत्रिका काढून घ्यावी व ती सोडवावी .
- प्रश्नपत्रिका काढत असताना ती आपल्या बोर्ड पॅटर्न प्रमाणे असावी. त्याच पद्धतीने एक प्रश्नपत्रिका आपण पण काढावी व त्या मुलाला ती प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी द्यावी. आता जे गुण मिळाले ते आपल्यासाठी आरसा आहे.
- किती गुण आपणास मिळाले यावरून त्या धड्याचा अभ्यास आपला किती झाला हे कळायला मदत होते.
- पालकांची भूमिका: मुलांच्या अभ्यासासाठी वातावरण निर्मिती करणे ही एक चांगली जबाबदारी पालकांचीच आहे. दररोज अर्धा तरी तास पालकांनी मुलांसोबत अभ्यास करावा/ घ्यावा.
- यात त्यांनी स्वतः मोबाईल व टीव्ही यांचा दुरुपयोग करू नये.
- यात थोडेफार चांगले बदल करून मुलांचा अभ्यास कसा जास्तीत जास्त होईल हे आपण पाहावे.
*अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे.*
*अपेक्षा ठेवायची असेल तर विश्वास कमवावा लागतो.*
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा