मुख्य सामग्रीवर वगळा

पत्नी प्रशंसा दिवस (Wife Appreciation Day)


पत्नी प्रशंसा दिवस (Wife Appreciation Day) 

 आज २० सप्टेंबर २०२६ रोजी पत्नी प्रशंसा😘 दिवस (Wife Appreciation Day) आहे, 

जो दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो.

पत्नी प्रशंसा दिवस (Wife Appreciation Day) साजरा करण्याची सुरुवात अधिकृतपणे १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला झाली. ( आणि मला...  आज समजले )

हा दिवस अमेरिकेतील प्रसिद्ध वार्षिक दिनदर्शिका 'Chase's Calendar of Events' मध्ये समाविष्ट झाल्यापासून लोकप्रिय झाला🥁

हा दिवस पत्नींबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.

पत्नी प्रशंसा हा दिवस पत्नीच्या प्रेमाबद्दल, त्यागाबद्दल आणि कुटुंबातील तिच्या मोलाच्या सहभागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो.

पत्नीचे कौतुक करण्याचे काही सोपे मार्ग:

  • तिचे आभार मानणे..
  • तिची आवडती गोष्ट किंवा सरप्राईज प्लॅन करणे..
  • घरातील कामात मदत करणे...



पत्नी प्रशंसा दिवस का साजरा करावा?

अर्धनारी नटेश्वर (अर्धनारीश्वर) रूप हे हिंदू तत्त्वज्ञानात शिव आणि शक्ती (पार्वती) यांच्या अद्वैत आणि समरसतेचे प्रतीक आहे.

स्त्री-पुरुष समानता: हे रूप स्त्री आणि पुरुष एकमेकांसमान, परस्परावलंबी आणि समकक्षी असल्याचे स्पष्ट करते. या दोघांशिवाय सृष्टीची निर्मिती किंवा चालना अशक्य आहे.

असेही आपण बरेच वेगवेगळे दिवस साजरे करत असतो, मग हा एक दिवस साजरा केला तर आपले विशेष असे काय बिघडणार आहे?

 मग काय हरकत आहे एक दिवस पत्नी प्रशंसा दवस साजरा केला तर...

जिची व्याख्या करता येत नाही, 

जिला शब्दांमध्ये सांगता येत नाही,

 जिला एका वाक्यात सांगता येत नाही, 

जिच्यावर निबंध ही लिहिता येत नाही.... 

ती नसताना निर्माण झालेली निरव शांतता... पोकळी.. रिकामी जागा... जी तिच्याशिवाय भरून येत नाही अशी व्यक्ती म्हणजे पत्नी.

👩‍❤️‍👨गृहस्थाश्रमाची सुरुवात... जिच्यामुळे तुम्हाला पूर्णत्व आले... अशा व्यक्तीचे आभार मानले तर काय हरकत आहे?

जीवनाची सुरुवात आई-वडिलांसोबत आणि जीवनाचा प्रवास पत्नी सोबत.. 

जिच्यामुळे घराला पूर्णत्व आले तिचे महत्त्व कमी असणार का?

👏कृतज्ञता व्यक्त करणे

पत्नी कुटुंबामध्ये आणि संसारात अहोरात्र जे योगदान देते, त्या लहान-मोठ्या गोष्टींची जाणीव ठेवून तिचे आभार मानण्यासाठी हा दिवस असतो.

💗प्रेमाची आठवण

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात पती-पत्नीमधील प्रेम आणि जिव्हाळा कायम राहावा, तसेच पत्नीच्या कष्टांची कदर व्यक्त व्हावी हा यामागचा मुख्य हेतू आहे.

👉स्पेशल फिल करून देणे

वर्धापनदिन किंवा व्हॅलेंटाईन डे पेक्षा वेगळा असा हा दिवस 

पूर्णपणे पत्नीला तिचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि 

तिला विशेष वाटू देण्यासाठी समर्पित आहे.🥁

 📯 पत्नी कौतुक दिन

🪗 आज जागतिक पत्नी कौतुक सोहळा दिवस

2 मिनिटे चिंतन🧘 करा आणि स्व पत्नीचे🥁 अवश्य कौतुक करा.

🙏 सौजन्य👇: 🪷 पत्नीची गरज का आहे..? 

कारण, पत्नी दुःखात😞 तुम्हांला कधीच एकाकी सोडत नाही.

आई नंतर पत्नी नेहमीच वाईट सवयी🚬🚭🥂 / व्यसनांपासून परावृत्त होण्यासाठी परावृत्त करते, विनवण्या करते.

ती छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण  करते, मात्र अल्पकाळात पत्नीचा राग😡 शांत😌 होतो..

पत्नी तुम्हांला आर्थिक 💷 फायद्यांबाबत जागृत🙋 करते..

काळजी करण्यासारखे खूप काही असले तरी ती सांत्वनपर धीर देते, "काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल"हे धीराचे शब्द खुप फायद्याचे असतात.

🎷 पत्नी तुम्हांला सतत आशावादी होण्यास प्रोत्साहित करते..

💀 वास्तविक पत्नी शिवाय तुम्हीं काहीच करु शकत नाही!

पत्नी ही ईश्वराची नितांत सुंदर😍 देणगी आहे. 

त्यामुळे पत्नीचे मूल्य, महत्त्व जाणा तिचा आदर करा, तिची काळजी🫶 घ्या !

खांद्याला खांदा लावून जीवनाची वाटचाल करा, बघा काय होतेय.....

 पत्नीच्या मनात आले तर ती तुम्हास जगाच्या सर्वोच्च स्थानावर सुध्दा पोचवेल..... 

अशा या स्त्री शक्तीचा/ मातृशक्तिचा🤱 आदर व सम्मान करा🎻👏

लोभस सूर्य किरण, 

नात्या मधले गुंफण, 

स्त्री शुभशकुनाच तोरण....🎺

 

 

(सौजन्य:  पत्नीची गरज का आहे..? हा भाग 'लेक - माहेरचा कट्टा'🙏 मधून घेतला आहे )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...

12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.

12  वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल २०२६ संदर्भात मोठी अपडेट! डिजीलॉकरवर रिझल्ट लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत  बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होतो. निकाल ऑनलाइन कसा तपासायचा? निकाल जाहीर झाल्यावर  विद्यार्थी खालील 👇 अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.... 👉   🌈    mahahsscboard.in १. mahresult.nic.in २.  hscresult.mkcl.org ३.  results.digilocker.gov.in ४.  mahahsscboard.in निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव. स्ट्रीम वाईज निकाल (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञ...