बॉम्बार्डियर बीटल (Bombardier Beetle) एक प्रकारचा भुंगा
बॉम्बार्डियर बीटल हा कीटक त्याच्या अद्भूत आणि विनाशकारी संरक्षण व्यवस्थेमुळे निसर्गातील सर्वात आश्चर्यकारक प्राण्यांपैकी एक मानला जातो.
➖♾️⭕🔘⭕♾️➖
┈┉━ *❍❀🧿❀❍* ━┉┈
🔄 बॉम्बार्डियर बीटलचे जीवनचक्र (Life Cycle):
- बॉम्बार्डियर बीटलचे जीवनचक्र चार प्रमुख टप्प्यांत विभागलेले असते.
- हे कीटक साधारणपणे ओलसर ठिकाणी, जसे की दगडांखाली किंवा कुजलेल्या लाकडाजवळ अंडी घालतात.
- 🥚अंडी (Egg): मादी बीटल ओलसर मातीत किंवा झाडांच्या पानांखाली अंडी घालते.
- 🐛अळी (Larva): अंड्यातून बाहेर पडलेली अळी (लार्व्हा) दिसायला लहान किड्यासारखी असते. हा टप्पा मुख्यतः अन्नाचा शोध घेण्याचा आणि वाढीचा असतो.
- कोश (Pupa): पूर्ण वाढ झाल्यानंतर अळी स्वतःभोवती एक कडक कवच तयार करते, ज्याला कोश म्हणतात. या टप्प्यात बीटलच्या शरीरात अंतर्गत बदल होतात.
- प्रौढ बीटल (Adult): कोशातून शेवटी एक पूर्ण विकसित झालेला बॉम्बार्डियर बीटल बाहेर पडतो
┗══╰🧿╯══┛
🍽️ बॉम्बार्डियर बीटल काय खातो? (Diet)
- बॉम्बार्डियर बीटल हा एक मांसाहारी (Carnivorous) कीटक आहे.
- तो रात्रीच्या🌌 वेळी शिकारीसाठी बाहेर पडतो.
- त्याच्या आहारात🥙 प्रामुख्याने लहान कीटक आणि त्यांच्या अळ्या (Larvae), गांडूळ (Earthworms), सरपटणारे लहान जीव, इतर लहान कीटकांची अंडी खातो.
⚔️ बॉम्बार्डियर बीटलचे शत्रू (Predators):
या बीटलचा आकार लहान असल्याने निसर्गात त्याचे अनेक शत्रू आहेत.
मात्र, त्याच्याकडे असलेल्या 'केमिकल स्प्रे' (रासायनिक फवारा) मुळे अनेक शिकारी त्याच्यापासून दूर राहतात.
बॉम्बार्डियर बीटलचे चे प्रमुख शत्रू:
- बेडकाच्या पोटातुन सुटका Strange जर एखाद्या बेडकाने या कीटकाला जिवंत गिळले, तर हा बीटल बेडकाच्या पोटातच रासायनिक स्फोट घडवून आणतो. यामुळे होणाऱ्या तीव्र वेदनेमुळे बेडकाला त्याला उलटून (उलटी करून) बाहेर काढावे लागते आणि बीटल जिवंत बाहेर पडतो.
- 🪿🐔पक्षी: विविध प्रकारचे लहान-मोठे पक्षी या बीटलची शिकार करतात.
- कोळी (Spiders🕷️): मोठे कोळी आपल्या जाळ्यात या बीटलला पकडतात.
- 🦎सरडे आणि सरपटणारे प्राणी: जमिनीवर फिरणारे सरडे या बीटलवर हल्ला करतात.
- 🐜मुंग्या: मुंग्यांचे मोठे समूह कधीकधी या बीटलवर हल्ला करून त्याला आपले भक्ष्य बनवतात.
शरीरात रासायनिक बॉम्ब निर्मिती / रासायनिक तोफ (Chemical Cannon):
लॅबोरेटरी सारखे शरीर: त्याच्या शरीरात दोन वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये हायड्रोजन पेरोक्साइड (Hydrogen Peroxide) आणि हायड्रोक्विनोन (Hydroquinone) ही रसायने साठवलेली असतात.
जेव्हा गरज असते, तेव्हा ती एका विशेष 'रिएक्शन चेंबर'मध्ये एकत्र येतात आणि एन्झाइम्सच्या मदतीने स्फोटक रासायनिक प्रक्रिया होते.
कॅटालेज (Catalase) आणि पेरोक्सिडेज (Peroxidase): हे दोन्ही 'एंझाइम्स' (प्रथिने) दुसऱ्या एका लहान कप्प्यात (reaction chamber) असतात. हे उत्प्रेरक (catalysts) म्हणून काम करतात, जे रासायनिक अभिक्रियाचा वेग वाढवतात.
उत्प्रेरकाची क्रिया: लहान कप्प्यातील 'कॅटालेज' हे एंझाइम हायड्रोजन पेरोक्साइडचे रूपांतर पाणी आणि ऑक्सिजन मध्ये करते.
ऑक्सिडेशन (Oxidation): 'पेरोक्सिडेज' हे एंझाइम हायड्रोक्विनोनचे ऑक्सिडेशन करून त्याचे रूपांतर 'बेन्झोक्विनोन' (Benzoquinone) मध्ये करते.
बेन्झोक्विनोन हे अतिशय दुर्गंधीयुक्त आणि जळजळ निर्माण करणारे विषारी रसायन आहे.
रिएक्शन चेंबर मध्ये उत्प्रेरकांच्या (Enzymes) मदतीने रासायनिक प्रक्रिया होऊन अत्यंत तीव्र स्फोट💥 होतो.
१००°C तापमानाचा गरम फवारा:
या रासायनिक प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या द्रवाचे तापमान थेट १०० अंश सेल्सिअस (उकळत्या पाण्याइतके) पोहोचते.
हा कीटक हा उकळता रासायनिक फवारा शत्रूच्या अंगावर उडवतो, ज्यामुळे शिकारी प्राणी लगेच भाजून पळून जातात.
अचूक निशाणा (२७० अंशांपर्यंत फिरण्याची क्षमता)
बॉम्बार्डियर बीटल त्याच्या पोटाचा मागचा भाग (Abdomen) कोणत्याही दिशेने वळवू शकतो. तो अगदी अचूक उन्नम धरून (२७० अंशांपर्यंत) शत्रूच्या दिशेने फवारा मारतो.
❀꧁✧꧂❀
मशीन गनसारखा मारा
हा कीटक एकाच वेळी सलग द्रव बाहेर टाकत नाही, तर प्रति सेकंद ५०० ते १००० वेळा लहान-लहान स्फोट (Pop-pop sound) करून मशीन गनसारखा फवारा सोडतो. या जलद गतीमुळे त्याचे स्वतःचे शरीर जळण्यापासून वाचते.
निसर्गाची कमाल:
- रासायनिक स्फोटामुळे भुंग्याच्या स्वतःच्या शरीराला कोणतीही इजा होत नाही, कारण त्याच्या शरीरातील रिएक्शन चेंबरचे अस्तर अत्यंत मजबूत आणि उष्णतारोधक असते.
- इंजिनिअर आणि शास्त्रज्ञ या कीटकाच्या 'स्प्रे मेकॅनिझम'चा अभ्यास करून विमानाचे इंजिन, स्प्रिंकलर्स आणि औषध फवारणीच्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेत आहेत.
🔴┈┉❀🏵|🧿|🏵❀┉┈🔴
✺༺☬༒☬༻✺



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा