धान्यात, गव्हात आणि ज्वारीत किडे कसे होतात?
गव्हात आणि ज्वारीत किडे (उदा. पोरकिडे, टोका किंवा पांढरी अळी/धान्यातील किडे) होण्याची मुख्य कारणे.
🔴┈┉❀🏵|🧿|🏵❀┉┈🔴
दमट हवामान आणि ओलावा: धान्य साठवताना त्यात थोडेही पाणी किंवा ओल राहिली असल्यास, हवामानातील दमटपणामुळे कीटकांना प्रजनन करण्यासाठी पोषक वातावरण मिळते.
योग्य वाळवण न होणे: शेतातून काढणीनंतर धान्य जर कडक उन्हात व्यवस्थित वाळवले नाही, तर त्यातील ओलाव्यामुळे किडे लवकर पडतात.
अस्वच्छ साठवणूक: ज्या कोठारात किंवा पोत्यांमध्ये धान्य साठवले जाते, ती जागा किंवा जुनी पोती स्वच्छ नसतील तर आधीचे किडे किंवा त्यांची अंडी नव्या धान्यात पसरतात.
हवेचा अभाव किंवा जास्त उष्णता: हवा बंद आणि दमट जागी साठवलेले धान्य लवकर खराब होते.
किडे कसे होतात? (प्रक्रिया):
❀꧁✧꧂❀
🥚 पिकातच सूक्ष्म अंडी असणे:
काही कीटक पिकाच्या दाण्यांवर किंवा कणसात अंडी घालतात. कापणीच्या वेळी ती अंडी/अळ्या धान्यासोबत येऊ शकतात.
अनेकदा धान्य शेतात असताना किंवा काढणीच्या वेळीच कीटक धान्याच्या दाण्यांवर किंवा आत अत्यंत सूक्ष्म (डोळ्यांना न दिसणारी) अंडी घालतात.
कापणी व मळणीदरम्यान – शेतातील किंवा मळणीच्या जागेतील कीटक नवीन धान्यात मिसळू शकतात.
जुने धान्य/कचरा राहिल्यास – कोठार, पोती, डबे किंवा मळणीची यंत्रे यामध्ये आधीच्या धान्याचे अवशेष राहिले असतील तर त्यातील कीटक नवीन धान्यात येतात.
सुप्त अवस्थेतून बाहेर येणे: ही अंडी धान्यासोबत आपल्या घरात किंवा कोठारात येतात. जोपर्यंत हवामान कोरडे असते तोपर्यंत ती सुप्त राहतात. परंतु, साठवणुकीत थोडाही ओलावा किंवा उष्णता मिळाली की त्या अंड्यांतून अळ्या आणि पुढे किडे बाहेर पडतात.
धान्य आतून खाणे: हे किडे किंवा अळ्या धान्याचा आतील भाग खातात, ज्यामुळे धान्य पोकळ होते आणि त्याची पिठूळ पावडर तयार होते.
☬✧°══✺══°✧☬
प्रतिबंधात्मक उपाय:
दाणा बाहेरून अगदी नवीन व चांगला दिसत असला तरी त्याच्या आत कीटकाची अळी किंवा अंडे असण्याची शक्यता असते.
🎷 साठवण्यापूर्वी धान्य ३ ते ४ दिवस कडक उन्हात चांगले वाळवावे.
लवंग धान्यांच्या डब्यात घालून ठेवल्यानं किड्यांना, अळ्यांना दूर ठेवण्यास मदत होते.
🧂 मिठ:- ऐकायला खूप विचित्र वाटू शकते पण मिठाचे तुकडे एका कापडात बांधून गव्हाच्या किंवा डाळीच्या डब्यात ठेवल्यास किड लागणार नाही.
तेजपत्ता:- ४ ते ५ तमालपत्र डाळी आणि धान्यांमध्ये ठेवल्याने वर्षानुवर्ष किडे लागणार नाहीत.
साठवणुकीच्या जागी कडुलिंबाचा वाळलेला पाला किंवा काडेपालटाची पाने (काही भागात याला 'काडेकिराईत' किंवा 'किराईत' असेही म्हणतात) टाकावीत.
🧄 लसूण: न सोललेल्या लसणाच्या ७-८ पाकळ्या धान्यात वेगवेगळ्या ठिकाणी दाबून ठेवाव्यात. लसूण वाळल्यावर त्या बदलून दुसऱ्या ठेवाव्यात.
हिंगाचा वापर: हिंगाचा खडा एका सुती कापडात (पुरचुंडी) बांधून धान्याच्या कंटेनरमध्ये ठेवल्यास कीटक जवळ येत नाहीत.
धान्य साठवण्यासाठी हवाटाइट (Air-tight) डबे वापरावेत आणि त्यात ओल जाणार नाही याची काळजी घ्यावी.
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
💠💠══✺══💠💠



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा