मुख्य सामग्रीवर वगळा

८ वी, विज्ञान. प्रकरण २. आरोग्य व रोग नोट्स -१🎷

 

८ वी, विज्ञान. प्रकरण २. आरोग्य व रोग नोट्स (Health and Diseases)

▬▬▬۩۞۩▬▬▬


┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ━┅┉┈

✍🏻.. विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील लिंकला🖇️ स्पर्श करा.🎸

         👉  माहिती विज्ञानाची 🎷

❀꧁✧꧂❀

१. व्याख्या:-

आरोग्य (Health): रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरीत्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय.

रोग (Disease): शरीरक्रियात्मक किंवा मानशास्त्रीयरीत्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यांमध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय.

२. रोगांचे प्रकार (Types of Diseases)

रोगांचे वर्गीकरण दोन मुख्य आधारांवर केले जाते:

✤⊰❉⊱═⊰☬⊱═⊰❉⊱✤

अ. कालावधीनुसार:

  1. दीर्घकालीन रोग
  • तीव्र रोग

ब. कारणानुसार:

  1. आनुवंशिक रोग: उदा. डाऊन संलक्षण (Down Syndrome).
  2. उपार्जित रोग:
  3. संसर्गजन्य रोग (Infectious Diseases): दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहकांद्वारे (कीटक व प्राणी) पसरणारे रोग. (उदा. सर्दी🤧, फ्ल्यू, डेंग्यू).
  4. असंसर्गजन्य रोग (Non-infectious Diseases): जे रोग संसर्गाने पसरत नाहीत. (उदा. मधुमेह, हृदयविकार).

🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴

३. काही प्रमुख संसर्गजन्य रोग

रोगाचे नाव कारक (Pathogen) संक्रमणाचे माध्यम लक्षणे 

😏 रोगाचे नाव:- क्षय (Tuberculosis)

कारक (Pathogen):- जिवाणू (मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली)

संक्रमणाचे माध्यम:- थुंकीतून, हवेमार्फत, रुग्णाच्या दीर्घकाळ सानिध्यात राहिल्याने.

लक्षणे:- दीर्घमुदतीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे, श्वासोच्छ्वासास🫁 त्रास.

उपाय व उपचार:- B.C.G. लस टोचणे, रुग्णास वेगळे ठेवणे, नियमित औषधे आणि DOT उपचार घेणे.


➰⋐⋑🔸✧ 🔸⋐⋑➰


😣 रोगाचे नाव:- कावीळ (Hepatitis)

कारक (Pathogen):- विषाणू (हेपॅटायटिस A, B, C, D, E)

पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया,

लक्षणे:- रक्तपराधन.भूक मंदावणे, गडद पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलट्या, राखाडी विष्ठा.

उपाय व उपचार:- उकळलेले व गाळलेले पाणी पिणे, हात साबूनाने स्वच्छ धुणे, स्वच्छतागृहांचा वापर.

┅━═▣◆★✧★◆▣═━┅


☠️  रोगाचे नाव:- अतिसार / हगवण (Diarrhoea)

कारक (Pathogen):- जिवाणू, विषाणू (शिगेल्ला, बॅसीलस, एन्टामिबा हिस्टोलिटिका)

दूषित अन्न व पाणी.

लक्षणे:- पोटदुखी, पाण्यासारखे पातळ जुलाब.

उपाय व उपचार:- अन्न झाकून ठेवणे, उकळलेले पाणी पिणे, जलसंजीवनी (ORS) घेणे.

✺༺☬༒☬༻✺

💀रोगाचे नाव:- पटकी (Cholera)

कारक (Pathogen):- जिवाणू (व्हिब्रिओ कॉलरी)

दूषित अन्न व पाणी.

लक्षणे:- उलट्या, तीव्र जुलाब, पोट दुखणे, पायांत पेटके येणे.

उपाय व उपचार:- स्वच्छता राखणे, उघड्यावरील अन्न न खाणे, कॉलरा प्रतिबंधक लस घेणे.


☬✧°══✺══°✧☬


🤒 रोगाचे नाव:- विषमज्वर (Typhoid)

कारक (Pathogen):-जिवाणू (साल्मोनेला टायफी)

दूषित अन्न व पाणी.

लक्षणे:- भूक मंदावणे, डोकेदुखी, पोटावर पुरळ उठणे, अतिसार, 104° F पर्यंत ताप.

उपाय व उपचार:- स्वच्छ व निर्जंतुक पाणी पिणे, लसीकरण करणे, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट.


┗══╰🧿╯══┛


👉  काही महत्त्वाचे रोग

१. डेंग्यू (Dengue)

प्रसार: साठलेल्या पाण्यात पैदास होणाऱ्या एडिस इजिप्ती (Aedes aegypti) प्रकारच्या डासामार्फत.

विषाणू: फ्लेवी व्हायरस प्रकारातील डेन-१, २ (Den-1, 2).

लक्षणे:

  • तीव्र ताप🤒, तीव्र डोकेदुखी आणि उलट्या होणे.
  • डोळ्यांच्या खोबणीत दुखणे.
  • रक्तातील रक्तबिंबिका (Platelets) चे प्रमाण कमी होऊन शरीरांतर्गत रक्तस्त्राव होणे.


꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂

२. 🐷 स्वाईन फ्लू (Swine Flu)

कारण व प्रसार: डुकरांद्वारे व माणसांद्वारे प्रसार होतो. हा रोग इन्फ्लुएन्सा ए (H_1N_1) या विषाणूमुळे होतो.

लक्षणे: धाप लागणे / श्‍वसनाला🫁 अडथळा निर्माण होणे, घसा खवखवणे, शरीर दुखणे.

निदान: रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते.

प्रयोगशाळा: एन.आय.व्ही. (NIV), पुणे आणि एन.आय.सी.डी. (NICD), दिल्ली.

▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬

३. 🦠 एड्स (AIDS)

पूर्ण नाव: Acquired Immuno Deficiency Syndrome

कारण: HIV (Human Immunodeficiency Virus) या विषाणूमुळे.

परिणाम: मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती हळूहळू दुर्बल होते.

निदान चाचणी: ELISA ही रक्ताची चाचणी.

महत्त्वाची टीप: HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने, सोबत जेवल्याने किंवा सेवाशुश्रूषा केल्याने एड्स होत नाही.

╚─━━━━░─╗░━━━━─╗. 

५. प्राण्यांमार्फत होणारा रोगप्रसार

रेबीज (Rabies)

प्रसार: संसर्ग झालेल्या कुत्रा🐕, ससा🐇, माकड🐒, मांजर🐱 इत्यादी चावल्यामुळे.

विषाणू प्रवेश: चेतातंतूंद्वारे मेंदूत🧠 प्रवेश करतात.

मुख्य लक्षण: जलद्वेष 💦(Hydrophobia) – रोगी पाण्याला घाबरतो.

इतर लक्षणे: 

  • २ ते १२ आठवडे ताप🤒 राहणे, 
  • अतिशयोक्ती करत वागणे.

कालावधी: लक्षणे कुत्रा चावल्यापासून ९० ते १७५ दिवसांत दिसू शकतात.

उपचार: रोग होण्यापूर्वी लस देऊन संरक्षण करता येते.

▓▓▓▓▓▓▓▓🪔▓▓▓▓▓▓▓▓

🪔 महत्त्वाची माहिती (डासांचे प्रकार):

  • 🦟 अ‍ॅनाफिलीस (Anopheles) डास: हिवताप (Malaria) पसरवतो (हा डास स्वच्छ पाण्यात असतो).
  • क्युलेक्स (Culex) डास: हत्तीरोग पसरवतो (हा डास दूषित/गटाराच्या पाण्यात असतो).
  • एडिस (Aedes) डास: डेंग्यू पसरवतो (हा डास स्वच्छ पाण्यात असतो).

*वेळे अभावी
 संगत तुटली तर 
तुटू द्यात 
पण संवाद तुटला नाही पाहिजे...
 संवाद हा 
चांगल्या नात्याची रक्तवाहिनी असते...!*

*सोनं अंगावर घातले म्हणजे, 
माणूस मौल्यवान होतो असे नाही... 
तेवढ्या कॅरेटची शुद्धता 
माणसाच्या विचारात असायला हवी...!*
    🎷

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...

12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.

12  वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल २०२६ संदर्भात मोठी अपडेट! डिजीलॉकरवर रिझल्ट लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत  बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होतो. निकाल ऑनलाइन कसा तपासायचा? निकाल जाहीर झाल्यावर  विद्यार्थी खालील 👇 अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.... 👉   🌈    mahahsscboard.in १. mahresult.nic.in २.  hscresult.mkcl.org ३.  results.digilocker.gov.in ४.  mahahsscboard.in निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव. स्ट्रीम वाईज निकाल (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञ...