मुख्य सामग्रीवर वगळा

8 वी, विज्ञान धडा 3, बल आणि दाब 🎷


  8 वी, विज्ञान धडा 3,  बल आणि दाब 


Force and Pressure

*━═━═💠═━═━*

✍🏻... विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील⬇️ लिंकला🖇️ स्पर्श करा.


        👉   माहिती विज्ञानाची 🎷

✺ 00:03●━✨━● 00:21 ✺


१. बल (Force)

व्याख्या: वस्तूवर असणाऱ्या क्रिया ज्यामुळे वस्तूच्या गतीची स्थिती, चाल, दिशा किंवा तिचा आकार बदलतो त्या क्रियेला बल म्हणतात.

न्यूनचा गतिविषयक पहिला नियम: स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते आणि गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने पुढे जात राहते.

▓▓▓🧿▓▓▓❀▓▓▓🧿▓▓▓

बलाचे प्रकार:

संपर्क बल (Contact Force): वस्तूंच्या एकमेकांशी असलेल्या थेट संपर्कामुळे किंवा वस्तूच्या मार्फत आलेल्या संपर्कामुळे प्रयुक्त होणाऱ्या बलाला संपर्क बल म्हणतात.

उदाहरण: स्नायूबल, घर्षण बल.

असंपर्क बल (Non-contact Force): दोन वस्तूंमध्ये थेट संपर्क नसला तरीही त्यांच्यात प्रयुक्त होणाऱ्या बलाला असंपर्क बल म्हणतात.


उदाहरण: चुंबकीय बल, गुरुत्वीय बल, स्थितिक विद्युतबल.

🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅

२. संतुलित आणि असंतुलित बले (Balanced and Unbalanced Forces)

संतुलित बल: वस्तूवर दोन्ही बाजूंनी समान परिमाणाची व विरुद्ध दिशेने बले लावल्यास त्यांचा परिणामी प्रभाव शून्य होतो आणि वस्तू हलत नाही.

असंतुलित बले: वस्तूवर असमान बले लावली गेल्यास वस्तूला गती मिळते.

┈┅━❀꧁.🧿꧂❀━•┈       

३. जडत्व (Inertia)

व्याख्या: वस्तूच्या गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला तिचे जडत्व म्हणतात.

जडत्वाचे प्रकार:

  • विराम अवस्थेतील जडत्व: वस्तूच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही (उदा. बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागे फेकले जातात).
  • गतीचे जडत्व: वस्तूच्या गुणधर्मामुळे तिच्या गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही (उदा. पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो).
  • दिशेचे जडत्व: वस्तूच्या गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही (उदा. वाहन वळणावर वळल्यास प्रवासी विरुद्ध बाजूला फेकले जातात).
꧁●💠○≛⃝ ≛⃝ 🌍○💠●꧂
४. दाब (Pressure)

व्याख्या: एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब म्हणतात.

सूत्र: दाब = बल / क्षेत्रफळ

एकक: SI पद्धतीत बलाचे एकक Newton (N) आणि क्षेत्रफळाचे m ^2 आहे. म्हणून दाबाचे एकक N/m ^2 म्हणजेच पास्कल (Pascal - Pa) हे आहे.

नियम: क्षेत्रफळ वाढले की दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झाले की दाब वाढतो.

✤⊰❉⊱═⊰☬⊱═⊰❉⊱✤

द्रवाचा व वायूचा दाब

द्रवाचा दाब: द्रव त्याच्या पात्राच्या भिंतीवर आणि तळावर दाब प्रयुक्त करतो. एकाच पातळीत द्रवाचा दाब समान असतो आणि खोली वाढेल तसा द्रवाचा दाब वाढतो.


▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬

वातावरणीय दाब
(Atmospheric Pressure): पृथ्वीवरील हवेच्या वजनामुळे निर्माण होणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात. समुद्राच्या पातळीला असणाऱ्या हवेच्या दाबाला 1 Atmosphere म्हणतात.

Atmosphere = 101* 103 Pa = 1 bar = 10 ^3 mbar

mbar 102 Pa (hectopascal)

━━═◆❃★❂★❃◆═━━

६. प्लावक बल (Buoyant Force)

व्याख्या: पाण्यात किंवा इतर द्रवात बुडवलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलाला प्लावक बल (f_b) म्हणतात.

प्लावक बल दोन गोष्टींवर अवलंबून असते:

वस्तूचे आकारमान (वस्तूचे आकारमान जास्त तर प्लावक बल जास्त).

द्रवाची घनता (घनता जास्त तर प्लावक बल जास्त).

➰⋐⋑🔸✧ 🔸⋐⋑➰

७. आर्किमिडीजचे तत्त्व (Archimedes' Principle)

तत्त्व: "एखादी वस्तू द्रव पदार्थामध्ये अंशतः किंवा पूर्णतः बुडविल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते आणि हे बल त्या वस्तूने बाजूला सारलेल्या द्रवाच्या वजनाइतके असते."

उपयोग

  • जहाजे, 
  • पाणबुड्या यांची रचना करणे,
  •  दुग्धतामापी (Lactometer) आणि 
  • आर्द्रतामापी (Hydrometer) या उपकरणांमध्ये.

🔴┈┉❀🏵|✧|🏵❀┉┈🔴

८. घनता आणि सापेक्ष घनता (Density and Relative Density)

घनता = वस्तुमान / आकारमान 

एकक: kg/m^3

सापेक्ष घनता= पदार्थाचे घनता / पाण्याची घनता 

🪄 प्रश्न: एका लाकडी पेटीच्या तळाचे क्षेत्रफळ 0.4 m^2 असून तिचे वजन 120 N आहे, तर त्या पेटीने फळीवर प्रयुक्त केलेला दाब काढा.

दिलेले:

क्षेत्रफळ = 0.4 m^2

पेटीचे वजन w (बल) = 120 N

 दाब = ?

सूत्र: दाब = वजन w (बल) / क्षेत्रफळ

दाब = 120 ÷ 0.4

 = 1200 ÷ 4 = 300 N/m^2

उत्तर: लाकडी पेटीने प्रयुक्त केलेला दाब 300 Pa (किंवा N/m^2).

┅━━━•❀•━━━┅

१. दररोज एकदा तरी 

आपल्या राष्ट्राच्या प्रगतीसाठीचा

 विचार मनात आला पाहिजे.

२. राष्ट्र निर्माण कार्यात 

 आपला हातभार लागला पाहिजे.

*━═━═💠═━═━*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...

12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.

12  वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल २०२६ संदर्भात मोठी अपडेट! डिजीलॉकरवर रिझल्ट लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत  बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होतो. निकाल ऑनलाइन कसा तपासायचा? निकाल जाहीर झाल्यावर  विद्यार्थी खालील 👇 अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.... 👉   🌈    mahahsscboard.in १. mahresult.nic.in २.  hscresult.mkcl.org ३.  results.digilocker.gov.in ४.  mahahsscboard.in निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव. स्ट्रीम वाईज निकाल (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञ...