धडा १: सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण (Notes)
१. जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता
जैवविविधता (Biodiversity): भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण यांसारख्या विविध कारणांमुळे पृथ्वीवरील सजीवांमध्ये अनुकूलन (Adaptation) होऊन विविध बदल झालेले दिसतात.
२०११ च्या गणनेनुसार: पृथ्वीवरील जमीन व समुद्र यांमधील सर्व सजीव मिळून सुमार ८७ दशलक्ष (87 Million) जाती ज्ञात आहेत.
जैविक वर्गीकरण (Biological Classification): सजीवांतील साम्य आणि फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट बनविण्याच्या प्रक्रियेला 'जैविक वर्गीकरण' म्हणतात.
🌄 वर्गीकरणाचा इतिहास:
- इ.स. १७३५ (कार्ल लिनिअस): सजीवांची २ सृष्टीत विभागणी केली – वनस्पती (Vegetabilia) व प्राणी (Animalia).
- इ.स. १८६६ (हेकेल): ३ सृष्टी कल्पिल्या – प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी.
- इ.स. १९२५ (चॅटन): सजीवांचे २ गट केले – आदिकेंद्रकी (Prokaryotes) व दृश्यकेंद्रकी (Eukaryotes).
- इ.स. १९३८ (कोपलंड): ४ सृष्टींमध्ये विभागणी केली – मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी.
२. रॉबर्ट व्हिटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती (1969)
अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ (Ecologist) रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर (1920–1980) यांनी इ.स. १९६९ मध्ये सजीवांची ५ गटांत (पंचसृष्टी - Five Kingdom Classification) विभागणी केली.
👉 वर्गीकरणाचे निकष:
1. पेशीची जटिलता (Complexity of cell structure): आदिकेंद्रकी (Prokaryotic) व दृश्यकेंद्रकी (Eukaryotic).
2. सजीवांचा प्रकार / जटिलता (Complexity of organisms): एकपेशीय (Unicellular) किंवा बहुपेशीय (Multicellular).
3. पोषणाचा प्रकार (Mode of nutrition):
वनस्पती: स्वयंपोषी (प्रकाशसंश्लेषण).
कवके: परपोषी (मृतावशेषांतून अन्नशोषण - मृतोपजीवी).
प्राणी: परपोषी (भक्षण).
4. जीवनपद्धती (Life style): उत्पादक (वनस्पती), भक्षक (प्राणी), विघटक (कवके).
5. वर्गानुवंशिक संबंध (Phylogenetic relationship): आदिकेंद्रकी ते दृश्यकेंद्रकी, एकपेशीय ते बहुपेशीय.
💫 पंचसृष्टी वर्गीकरण तक्ता:
सृष्टी १ : मोनेरा (Monera)
उदाहरणे: लॅक्टोबॅसिलाय, स्ट्रेप्टोकोकस न्युमोनि, ट्रेपोनेमा पॅलिडम, क्लॉस्ट्रिडिअम टिटॅनी, व्हायब्रिओ कोलेरी, साल्मोनेला टायफी इ.
लक्षणे:
- हे सर्व सजीव एकपेशीय असतात.
- हे स्वयंपोषी किंवा परपोषी असतात.
- हे आदिकेंद्रकी असून यांच्यात पटलबद्ध केंद्रक किंवा पेशीअंगके नसतात.
सृष्टी २ : प्रोटिस्टा (Protista)
उदाहरणे:
स्वयंपोषी: युग्लिना, व्हॉल्व्हॉक्स (यांच्यात हरितलवके असतात).
परपोषी: अमिबा, पॅरामेशिअम, प्लाझमोडिअम.
लक्षणे:
1. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते (दृश्यकेंद्रकी).
2. प्रचलनासाठी छदमपाद (Pseudopodia), रोमके (Cilia) किंवा कशाभिका (Flagella) असतात.
🍄 सृष्टी ३ : कवके (Fungi)
उदाहरणे: किण्व (Baker's Yeast), बुरशी (Mucor), ॲस्परजिलस (मक्याच्या कणसावरील बुरशी), पेनिसिलिअम, भूछत्रे (Mushroom).
लक्षणे:
- कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो.
- बहुसंख्य कवके मृतोपजीवी (Saprophytes) आहेत; ती कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांवर जगतात.
- कवकांची पेशीभित्तिका 'कायटीन' (Chitin) या जटिल शर्करेपासून बनलेली असते.
- काही कवके तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात.
👊 सूक्ष्मजीवांच्या आकाराचे प्रमाण:
1m = 10 6 µm मायक्रोमीटर
1m = 10 9 nm
👍सूक्ष्मजीवांचे प्रकार:
१. जीवाणू (Bacteria):
आकार: 1 µm ते 10 µm
लक्षणे:
- एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा वसाहती (Colonies) बनवतात.
- पेशी आदिकेंद्रकी असते (केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात, पेशीभित्तिका असते).
- प्रजनन द्विखंडीभवनाने (एका पेशीचे दोन भाग होऊन) होते.
- अनुकूल परिस्थितीत २० मिनिटांत यांची संख्या दुप्पट होऊ शकते.
- आकारानुसार प्रकार: गोलाणू (Coccus), दंडगोलाणू (Bacillus), दंडाणू, स्वल्पविरामाकृती (Vibrio), सर्पिलाकार (Spirillum).
२. आदिजीव (Protozoa):
आकार: सुमारे 200 µm
लक्षणे:
- माती, गोडे पाणी व समुद्रात आढळतात. इतर सजीवांच्या शरीरात राहून रोगास कारणीभूत ठरतात.
- पेशी प्रकार: दृश्यकेंद्रकी, एकपेशीय.
- प्रजनन: द्विखंडन पद्धतीने.
- अमिबा, पॅरामेशिअम (गढूळ पाण्यात मुक्त जगतात).
- एंटामिबा हिस्टोलिटिका (आमांशास कारणीभूत).
- प्लाझमोडिअम व्हायव्हॅक्स (मलेरिया/हिवतापास कारणीभूत).
- युग्लिना (स्वयंपोषी).
३. कवके (Fungi):
आकार: सुमारे 10 µm ते 100 µm
लक्षणे:
- कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे यांवर आढळतात.
- दृश्यकेंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव.
- पोषण: मृतोपजीवी (काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात).
- प्रजनन: लैंगिक पद्धतीने तसेच द्विखंडन व मुकुलायन (Budding) अशा अलैंगिक पद्धतीने.
- ईस्ट, कॅन्डिडा, आळंबी (मशरूम).
४. शैवाले (Algae):
आकार: सुमारे 10 µm ते 100 µm
लक्षणे:
- पाण्यात वाढतात.
- दृश्यकेंद्रकी, एकपेशीय व स्वयंपोषी.
- पोषण: हरितलवकाच्या साहाय्याने प्रकाशसंश्लेषण करतात.
- उदाहरणे: क्लोरेल्ला, क्लॅमिडोमोनास (काही प्रजाती बहुपेशीय असतात).
५. विषाणू (Virus):
आकार: सुमारे 10 nm ते 100 nm
जीवाणूंच्या १० ते १०० पटीने लहान, फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकानेच दिसतात.
लक्षणे:
- विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही; ते सजीव-निर्जीवांच्या सीमारेषेत मानले जातात.
- विषाणू स्वतंत्र कणांच्या रूपात असतात.
- विषाणू DNA (डीऑक्सीरायबो न्यूक्लिक आम्ल) किंवा RNA (रायबो न्यूक्लिक आम्ल) पासून बनलेले असतात आणि त्यांना प्रथिनांचे आवरण असते.
- फक्त वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात आणि स्वतःची प्रथिने बनवून असंख्य प्रतिकृती तयार करतात.
- यजमान पेशींना नष्ट करून नव्या पेशींना संसर्ग करतात. यामुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात.
👏 महत्त्वाची माहिती (माहित आहे का तुम्हाला?):
राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे (National Institute of Virology - NIV, Pune): ही संस्था विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) अखत्यारीत १९५२ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली.
🧐 माहीत आहे का तुम्हांला ?
मानव – पोलिओ विषाणू, इन्फ्लुएंझा विषाणू, HIV-एड्स विषाणू इत्यादी.
गुरे - पिकोर्ना विषाणू (Picorna virus)
वनस्पती - टोमॅटो विल्ट विषाणू, तंबाखू मोझाईक विषाणू इत्यादी.
जीवाणू - बॅक्टेरिओफाज हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात.











टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा