मुख्य सामग्रीवर वगळा

11वी प्रवेश, 12वी पुरवणी परीक्षा 🎷

11वी प्रवेश व 12वी पुरवणी परीक्षा 🎷



 11वी प्रवेश अर्जाचा भाग पहिला 10वी च्या निकाला पर्यंत भरता येईल.🎻


बारावी परीक्षेच्या निकालानंतर  सर्वांचे लक्ष हे दहावीच्या निकालकडे लागले आहे. 


11 वी प्रवेश प्रक्रियेबाबत मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

 विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने 11वी प्रवेश नोंदणीची मुदत वाढवली आहे. 

विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल लागेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.


मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 11वी प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी 10 एप्रिलपासून ऑनलाइन नोंदणी पोर्टल सुरू केले होते. 

सुरुवातीला 30 एप्रिलपर्यंत ही मुदत निश्चित करण्यात आली होती. 

मात्र अनेक विद्यार्थी अद्याप निकालाच्या प्रतिक्षेत असल्याने त्यांना अडचणी येत होत्या,ही बाब लक्षात घेऊन संचालनालयाने 11वी प्रवेश मुतद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

11 वी प्रवेशासाठी अर्जाचा भाग पहिला भरण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. त्यानुसार अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 हजारहून अधिक तर राज्यभरातून 6.97 लाख विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग पहिला भरला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाचा भाग पहिला भरला नसेल त्यांनी तो भरून घ्यावा यासाठी ही सोय करण्यात आली आहे.




12वी पुरवणी परीक्षेसाठी दि. 05/05/2026 पासून अर्ज प्रक्रिया, 

अंतिम मुदत 15 मे पर्यंत.🤗


12 वी परीक्षेचा निकाल 2 मे रोजी जाहीर झाला आहे. 

या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या, खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या, तसेच श्रेणीसुधार व आयटीआय अंतर्गत तुरळक विषय घेऊन परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेची अर्ज प्रक्रिया 5 मे पासून सुरू होत आहे. 

विद्यार्थ्यांना 15 मे पर्यंत नियमित शुल्कासह, तर 20 मे पर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरता येतील. 

अर्जाचे शुल्क जमा करण्याची अंतिम मुदत 21 मे असून, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या याद्या 25 मे पर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करायच्या आहेत. 

अधिक माहितीसाठी www.mahahsscboard. in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.

www.mahahsscboard. in

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...

12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.

12  वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल २०२६ संदर्भात मोठी अपडेट! डिजीलॉकरवर रिझल्ट लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत  बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होतो. निकाल ऑनलाइन कसा तपासायचा? निकाल जाहीर झाल्यावर  विद्यार्थी खालील 👇 अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.... 👉   🌈    mahahsscboard.in १. mahresult.nic.in २.  hscresult.mkcl.org ३.  results.digilocker.gov.in ४.  mahahsscboard.in निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव. स्ट्रीम वाईज निकाल (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञ...