मुख्य सामग्रीवर वगळा

दहावी विज्ञान पेपर संदर्भात.


दहावी विज्ञान पेपर संदर्भात.


दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक अभ्यासक्रमासाठी 👇

 👉 🖊️    १० वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग- १

सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा.

वर्षभर केलेल्या अभ्यासामुळे जास्त परिश्रम न करता योग्य सराव करून आपण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकतो.

उत्तर पत्रिका कशी लिहावी यासाठी काही मार्गदर्शक सूचना.

एकुण वीस पानाची उत्तर पत्रिका आहे. तिसऱ्या पानापासून उत्तरे लिहिण्यास सुरुवात होत असते म्हणून...

१. तिसरे पान - प्रश्न पहिला अ 

२. चौथी पान- प्रश्न पहिला ब. 

३. प्रश्न दुसरा अ हा शास्त्रीय कारणे द्या चा असून तीन पैकी दोन सोडवायचे आहेत. 

पाचवे पान - प्रश्न दुसरा अ- १

४. सहावे पान - प्रश्न दुसरा अ-२

५. प्रश्न दुसरा ब यामध्ये पाच पैकी तीन सोडवायचे आहे. 

सातवे पान - प्रश्न २ रा ब -१

६. आठवे पान- प्रश्न २ रा ब - २

७. नववे पान- प्रश्न २ रा ब - ३

८. तिसऱ्या प्रश्नात आठ पैकी पाच सोडवायचे आहेत. दहावे पान- प्रश्न ३. १

९. अकरावे पान- प्रश्न ३.२

१०. बारावे पान- प्रश्न ३.३

११. तेरावे पान- प्रश्न ३.४

१२. 14 वे पान - प्रश्न ३.५

१३. प्रश्न चौथ्या मध्ये दोन पैकी एक सोडवायचे असते. पंधरावे पान- प्रश्न ४.१

१४. सोळावे पान- प्रश्न ४.२

याचा अर्थ असा की आपण सुटसुटीत उत्तर पत्रिका लिहू शकतोत हे लक्षात येते.

* गरज असेल तर पुरवणी मिळतेच.

* प्रश्न संपल्यावर आडवी रेष मारून त्या प्रश्नाचा भाग बंद करावा.

* आकृतीला चौकट करावी.

* सुबक व नामनिर्देशित आकृती काढावी.

* विज्ञानातील गणित सोडवताना त्याच पानावर उभी रेष मध्यभागात मारून कच्चे काम करता येते. 

* विज्ञानातील गणित सोडवताना शेवटच्या उत्तराला चौकट करावी.

* योग्य ठिकाणी एकक लिहावे. 

* रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रिया कारक व उत्पादित योग्य पद्धतीने संतुलित करावेत. समीकरण रेणुसूत्र व शब्दात मांडावे.

* जास्तीचे प्रश्न येत असतील तर ते पण सोडवावेत. जेणेकरून एखाद्या प्रश्नात कमी जास्त गुण झाल्यास आपले एकूण गुण कमी होणार नाहीत.

* प्रश्न पहिला लिहीत असताना ए बी सी डी पर्याय अचूक उत्तर खडाखोड न करता व्यवस्थित लिहावे. पूर्ण वाक्य लिहून उत्तर लिहिल्यास सर्वोत्तम. 

* शास्त्रीय कारणे द्या मध्ये कमीत कमी दोन मुद्दे असावेत. 

* संपूर्ण उत्तर पत्रिकेत योग्य पण मोजक्याच ठिकाणी अंडरलाईन करावी.

* प्रश्न क्रमांक लिहिल्याशिवाय उत्तराला सुरुवात करू नये. 

* नवीन प्रश्न नवीन पानावर लिहिणे ही एक उत्तम पद्धत आहे. 

* एका प्रश्नातील सर्व उपप्रश्न सलग असावेत.

* कोणतीही घाई गडबड न करता एक तास 45 मिनिटात उत्तम पद्धतीने

 प्रश्न पत्रिका सोडवता येते.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.             __[♡!!...🥀⛓️...!!♡]__ दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या  व्हाट्सॲप  ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे . What's app link 👇 --> 🔴  माहिती विज्ञानाची 🎷  🔴          :⋯ ◯ ⋯ : 🏈  ग्रुप वर जॉईन का व्हावे ? याचे कारण.... आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू. शिक्षक होण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरील CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) किंवा राज्यस्तरीय TET ( शिक्षक पात्रता परीक्षा ) उत्तीर्ण करावी लागते, जी तुम्हाला शिक्षक म्हणून पात्र करते.  कोणत्याही स्पर्धा परीक्षे त विज्ञान विषय हा असतोच.याची तयारी दररोज थोडी थोडी आपल्या विज्ञान लेखातून नक्की होईल. दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो. एखाद्या...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...