स्वाध्याय, 8 वी. विज्ञान, 13. रासायनिक बदल व रासायनिक बंध
⏤͟͟͞͞❅ *⏤͟͟͞͞❅*⏤͟͟͞͞ ☝❅⏤͟͟͞͞❅ *⏤͟͟͞͞❅*
- डॉ. होमी भाभा या परीक्षेच्या तयारीसाठी ही या घटकाचा योग्य उपयोग करता येईल. 🎻
- धड्यातील छोट्या छोट्या घटकांचा विचार करून स्वाध्याय तयार केला तर धड्याची संपूर्ण तयारी छान होते. यालाच आपण सूक्ष्मा कडून अनंताकडे असे म्हणू. 🎷
- स्वाध्याय रिकाम्या जागा या स्वरूपातच का? घेत आहोत तर त्या वाक्यासाठी योग्य शब्द म्हणजे रिकामी जागा. 💫
- पर्याय का देत नाही, पर्याय दिल्यास त्या चार पर्यायांपैकी एक उत्तर असणार आहे. म्हणजेच आपल्याला फक्त त्या चार शब्दांचाच विचार करायचा असतो.🏮
विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील लिंकला स्पर्श करा. 🎸
꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂
1. जेव्हा सारखे गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूंचा संयोग होतो तेव्हा साधारणपणे ... बंध तयार होतो.
2. कॅल्शिअम कार्बोनेट + हायड्रोक्लोरिक आम्ल -----> ... + कार्बन डायऑक्साइड + पाणी
3. कोणताही रासायनिक बदल होताना मूळ पदार्थाचे संघटन बदलते व त्याच्यापासून वेगळे संघटन असलेला, वेगळे गुणधर्म असलेला ... पदार्थ मिळतो.
4. विजातीय प्रभारांमध्ये ... विद्युत आकर्षण बल असल्यामुळे हे विरुद्ध प्रभारी आयन एकमेकांकडे आकर्षिले जातात व त्यांच्यात रासायनिक बंध तयार होतो.
5. दोन अणूंनी एकमेकांबरोबर आपापले संयुजा इलेक्ट्रॉन संदान केल्यावर जो रासायनिक बंध तयार होतो त्याला ... बंध म्हणतात.
6. ... रासायनिक बंध तयार करत नाहीत व त्यांचे इलेक्ट्रॉन अष्टक / द्विक पूर्ण असते.
7. सायट्रिक आम्ल + सोडिअम बायकार्बोनेट -----> ... + सोडिअम सायट्रेट
8. प्रकाशसंश्लेषणः कार्बन डायऑक्साइड + पाणी -----> ... + ऑक्सिजन
9. बदलांचे वर्गीकरण करण्याच्या विविध पद्धती कोणत्या?
10. सर्व इंधनामध्ये ज्वलन होणारा एक सामाईक पदार्थ ‘...’ हा आहे.
11. ग्लुकोज + ... ------> कार्बन डायऑक्साइड + पाणी
12. रासायनिक बंध तयार करताना अणू त्यांच्या संयुजा ... चा उपयोग करतात.
13. सोडिअम व क्लोरिनचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा.
14. NaCl ह्या आयनिक संयुगाची निर्मिती आकृती सह स्पष्ट करा.
15. ... केलेले इलेक्ट्रॉन दोेन्ही अणूंची सामाईक मालमत्ता झाल्यामुळे दोन्ही अणूंचे इलेक्ट्रॉन अष्टक /
द्विक पूर्ण होते.
16. परस्परविरुद्ध प्रभार असलेल्या धन आयन व ॠण आयन यांच्यामधील स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला ... बंध किंवा विद्युत संयुज बंध म्हणतात.
17. एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या म्हणजे त्या अणूची ... .
18. रासायनिक अभिक्रियेमुळे तयार होणाऱ्या नवीन पदार्थांना ...म्हणतात.
19. भौतिक बदल व रासायनिक बदल यांच्यात फरक काय ?
20. प्रकाशसंश्लेषण रासायनिक समीकरण
CO2 + H2O -----> ... + O2
21. C6H12O6 + ... ------> CO2 + H2O
22. MgCl2 ह्या आयनिक संयुगाची निर्मिती आकृती सह स्पष्ट करा.
23. शाब्दिक समीकरण लिहून स्पष्ट करा. धुण्याच्या सोड्याचे द्रावण मिसळल्याने दुष्फेन पाणी सुफेन होते.
24. H2 ह्या सहसंयुज रेणूची निर्मिती आकृती सह स्पष्ट करा.
25. इलेक्ट्रॉन अष्टक / द्विक पूर्ण करण्याच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या?
26. H2O ह्या सहसंयुज रेणूची निर्मिती आकृती सह स्पष्ट करा.
27. पुढे दिलेल्या बदलांचे भौतिक बदल व रासायनिक बदल असे वर्गीकरण करा.
28. कार्बन डायऑक्साइड + कॅल्शिअम हायड्रॉक्साइड -----> ... + पाणी
29. रासायनिक समीकरण: कार्बन + ऑक्सिजन ------> ...
30. दुष्फेन पाण्यात ... व मॅग्नेशिअमचे क्लोराइड व सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात.
32. रंगहीन असलेली चुन्याची निवळी दुधाळ कशी करता येईल?
33. दुष्फेन पाणी सुफेन करताना मॅग्नेशिअमच्या क्षारांमध्ये होणाऱ्या रासायनिक बदलांसाठी शाब्दिक व रासायनिक समीकरण लिहा.
34. विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये टाकल्यावर चुनखडी चूर्णदिसेनासे होते. स्पष्ट करा.
35. जोड्या जुळवा.
अ. प्रकाशसंश्लेषण i. इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती
आ.पाणी ii. ज्वलनप्रक्रियेतील अभिकारक
इ. सोडिअम iii. रासायनिक बदल
क्लोराइड
ई. पाण्यात मीठ iv. सहसंयुज बंध
विरघळणे
उ. कार्बन v. आयनिक संयुग
ऊ. फ्लुओरिन vi. भौतिक बदल
ए. मॅग्नेशिअम vii. ॠण आयन बनण्याची प्रवृत्ती
┈┅━❀꧁꧂❀━•┈
ऐका गोष्ट बाराची
12/12/12/12/12
बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक...
मोजण्यासाठी द्वादशमान
पध्दती... १२ ची
फूट म्हणजे १२ इंच
एक डझन म्हणजे १२ नग.
वर्षाचे महिने १२,
नवग्रहांच्या राशी १२
गुरू, शनी, मंगळ हानिकारक समजले जातात... १२ वे
तप... १२ वर्षाचे,
गुरुगृही अध्ययन... १२ वर्षे
घड्याळात आकडे... १२,
दिवसाचे तास... १२,
रात्रीचे तास... १२,
मध्यरात्र म्हणजे रात्रीचे… १२
मध्यान्ह म्हणजे दुपारचे… १२
एकादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले... १२
सकाळच्या बाजारात उरला सुरला माल १२ च्या भावात काढतात...
पूर्वी मुलीचा विवाह १२ व्या वर्षी करत...
इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलिंग
बाळाचे नामकरण १२ व्या दिवशी केले जाते
मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांचे...
बलुतेदार, बारभाई, बारावाटा... सगळे १२,
बेरकी माणूस म्हणजे १२ गावचं पाणी प्यायलेला
तसेच कोणाचेही न ऐकणारी रगेल व रंगेल व्यक्तीला १२ चा आहे असे म्हणतात.
ज्योतिर्लिंग... १२ आहेत,
कृष्ण जन्म... रात्री १२
राम जन्म दुपारी... १२,
मराठी भाषेत स्वर... १२ त्याला म्हणतात... बाराखडी
१२ गावचा मुखीया,
जमिनीचा उतारा ७/१२चा
इंजिनिअरींग, मेडीकल, किंवा ईतर कोर्सेससाठी १२ वी नंतर प्रवेश
खायापिया कुछ नही, गिलास फोडा बारा आना
बारडोलीचा सत्याग्रह
पळून गेला ——पो’बारा’
पुन्हा पुन्हा ——-दो’बारा’
एक गाव, १२ भानगडी
लग्न वऱ्हाडी ——— ‘बारा’ती
अशी आहे ही १२ चीं किमया.
🤔😀😄🤪🙄*
काही लोकांच्या तोंडावर नेहमीच वाजलेले असतात ते पण 12 😂
कोणालाच दोष देऊन उपयोग नाही...
हा महिनाच "बारावा" आहे...
😂

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा