8 वी. विज्ञान, स्वाध्याय- 5. अणुचे अंतरंग.
𝄅𝄄𝄅𝄈⧗⃝✿*~> ~*✿⃝𝆭⧗⃪ ꯭𝄈𝄅𝄄𝄅🪈꯭
NMMS परीक्षेसाठी याचा छान उपयोग करता येईल.
निव्वळ लिखाण📝 म्हणजे अभ्यास नव्हे.
अभ्यास करणाऱ्या📚 मुलांपेक्षा अभ्यास न करणारी मुलं ही दरी प्रचंड वाढत आहे.
बऱ्याच पालकांना असे वाटते की आपली मुलं लिहीत ✍️ आहेत म्हणजे अभ्यास करत आहेत. ती मुलं केवळ इकडून पाहून तिकडे लिहीत🖊️ असतात.
नम्र विनंती:- हा उपक्रम म्हणजे पूर्ण अभ्यास नव्हे. विद्यार्थ्याने खरोखर धडा व्यवस्थित वाचला आहे की नाही, त्याला धड्याचे आकलन झाले आहे का नाही यासाठी चा हा प्रयत्न आहे.
शिक्षकाच्या हातात प्रयत्न करणे हे सगळ्यात मोठे शस्त्र आहे.
मुलांना स्वाध्याय दिल्यावर मुलं नवनीत, कोहिनूर, इन माय पॉकेट..... यामधून पाहून लिहितात. असे कॉपी-पेस्ट करण्यापेक्षा त्यांच्यात बदल करण्यासाठी धड्यातून स्वाध्याय दिल्यास तो धडा वाचणे मुलांना क्रमप्राप्त ठरेल. धडा वाचून प्रश्नांची उत्तरे शोधून लिहिल्यास त्यांचा लिखाण सरावासोबत अभ्यास वाढेल.
✿¸.•*¨`*•..¸✿✿¸.•*¨`*•..¸✿
- ....... ह्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग जीवाश्मांचे वय ठरविण्यासाठी होतो.
- अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉन्सचा वेग व संख्या कमी करण्याची kontya गोष्टींचा वापर केला जातो?
- ‘.......’ ही मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे.
- द्रव्याच्या लहानात लहान कणाला डेमोक्रिटसने ...... असे नाव दिले.
- ....... अणुसिद्धांतानुसार द्रव्य अणूंचे बनलेले असते व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात.
- रूदरफोर्डयांनी सोन्याचा अतिशय पातळ पत्रा घेऊन त्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित ...... - कणांचा मारा केला.
- अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित ..... असते.
- परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक ह्यांच्या दरम्यान ...... असते.
- रूदरफोर्डच्या अणुप्रारूपातील कोणती त्रुटी नील्स बोर यांनी दूर केली?
- रस्त्यावरील सोडिअम व्हेपर
- दिव्यांमधूनही त्याच पिवळ्या रंगाचा प्रकाश येतो.
- .......... (quantum mechanics) ह्या नवीन विज्ञानशाखेमध्ये अणुसंरचनेचा सखोल अभ्यास करण्यात आला.
- द्रव्य म्हणजे काय ?
- डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणूमध्ये ...... चे वितरण सर्वत्र एकसमान असते.
- केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व ...... एकवटलेले असते.
- गॉयटर या थायरॉईड ग्रंथींच्या आजारावरील उपचारांमध्ये ........-131 चा उपयोग होतो.
- अणू म्हणजे काय ?
- अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनसंख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा ....... असून तो ‘Z’ ह्या संज्ञेने दर्शवतात.
- ........ म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या hoy.
- फ्लुओरीन अणूमधील सर्वांत बाहेरचे म्हणजे बाह्यतम कवच कोणते ?
- .....सारख्या प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचारांमध्ये काही मूलद्रव्यांच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होतो. उदा. कोबाल्ट - 60.
- प्राेटॉन व न्यूट्रॉन हे ....... चे दोन प्रकार आहेत.
- द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असते त्यांना कणाद मुनींनी ........ (म्हणजे लहानात लहानकण) असे नाव दिले.
- सोडिअम अणूमधील बाह्यतम कवच कोणते ?
- इलेक्ट्रॉन अष्टक (किंवा द्विक) पूर्ण असते तेव्हा संयुजा ........ असते.
- सल्फरमध्ये 16 प्रोटॉन व 16 न्यूट्रॉन असतात तर त्याचा अणुअंक व अणुवस्तुमानांक किती असेल ?
- ........ चा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकांमध्ये न्यूट्रॉन असतात.
- ....... हा ऋणप्रभारित अवअणुकण असून त्याचा निर्देश ‘e-’ ह्या संज्ञेने करतात.
- अणू विद्युतदृष्ट्या उदासीन का असतो?
- अणूत किती प्रकारचे अवअणुकण आढळतात ?
- कार्बनच्या केंद्रकात किती न्यूट्रॉन असतात?
- कार्बनचा अणुअंक 6 आहे. कार्बनच्या अणूत किती इलेक्ट्रॉन असतील?
- हायड्रोजनची एकूण तीन समस्थानिके konti?
- युरेनिअम -....... चा उपयोग केंद्रकीय विखंडन व वीजनिर्मितीसाठी होतो.
- मूलद्रव्यांचा ....... हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख आहे.
- व्याख्या- समस्थानिके.
- 1 डाल्टन म्हणजे 1 u =............ kg.
- ...... हा विद्युतप्रभारदृष्ट्या उदासीन असलेला अवअणुकण आहे.
- मॅग्नेशिअमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 12 व 24 आहे. चिन्हांकित संकेतामध्ये तुम्ही ते कसे दर्शवाल ?
- भारतामध्ये आठ ठिकाणच्या अणुवीजनिर्मिती केंद्रांमध्ये एकूण ......अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत.
- भारतात थोरिअम- ..... ह्या मूलद्रव्याचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा